शिष्टमंडळ घेणार आज खासदारांची भेट

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावे राष्ट्रीय
महामार्गापासून वंचित राहणार

हिमायतनगर(प्रतिनिधी)खा.राजीव सातव यांनी अर्धापूर - माहूरला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना आनंद झाला आहे. परंतु सदरचा मार्ग चुकीच्या मार्गाने जात असून यात बदल करून हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी - बदली - सिरपल्ली - गांजेगाव - ढाणकी - माहूर असा मंजूर करावी या मागणीसाठी प्रमुख नागरिकांचे शिष्टमंडळ दि.१८ शनिवारी खासदारांची भेट घेणार आहेत. यावरही तोडगा न निघाल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब केला जाइल असेही नागरिकांनी सांगितले.
 
गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यानी दिलेल्या माहितीनुसार अर्धापूर - माहूर या १३० किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी २९० कोटीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले होते. सदर महामार्ग अर्धापूर - तामसा - आष्टी - जवळगाव - सोनारी फाटा - हिमायतनगर - बोरी - ढाणकी मार्गे माहूर असा जाणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने, हा मार्ग मंजूर होऊन काम झाल्यास हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावे रस्त्यापासून वंचित राहणार आहेत. हा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी दि.१८ रोजी काही गावच्या नागरिकांचे शिष्टमंडळ हे खा.राजीव सातव यांची भेट घेणार असून, या संबंधीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वरील मार्ग ऐवजी हिमायतनगर - पळसपूर - डोल्हारी - बुदली - सिरपल्ली - गांजेगाव - ढाणकी - माहूर असा मंजूर करून करण्यात यावा अशी मागणी करणार आहेत. या भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ढाणकी हे शहर हिमायतनगरहून केवळ १८ की. मी. अंतरावर आहे. या मार्गावरून सध्या एस टी महामंडळाच्या ९ ते १० फेर्या होत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक रेल्वे प्रवासाचा लाभही गेट आहेत. नांदेड शहरासह मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद, तिरुपती, निझामाबाद अश्या मोठ्या शहराला हा मार्ग जोडला जाऊ शकतो. तसेच हा रस्ता झाल्यास एस.टी.महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन हिमायतनगर - ढाणकी - उमरखेड - माहूर या बाजारपेठेचे नावलौकिक होईल. मराठवाडा - विदर्भातील बाजारपेठेत दळण वळणासाठी सोयीस्कर मार्ग होईल. त्यामुळे तालुक्याची रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता हा रस्ता झाल्यास या मार्गावरील अनेक गावे नावारूपास येतील यासाठी पळसपूर -  डोल्हारी - बदली - सिरपल्ली येथील नागरिकांचे शिष्टमंडळ खा.राजीव सातव यांची भेट घेऊन मार्गात बदल करण्याची विनंती करणार आहेत. हा मार्ग मंजूर न झाल्यास या परिसरातील नागरिक, जनता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे मदनराव पाटील, तुकाराम देवसरकर, विठ्ठलराव वानखेडे, डॉ.प्रकाश वानखेडे, किशनराव वानखेडे, बळीराम राउत, चांदराव वानखेडे, नागोराव शिंदे, यांच्यासह अनेकांनी सांगितले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी