आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणाली

आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणालीच्या
समृद्धतेसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न व्हावेत - नड्डा 
 
नांदेड (प्रतिनिधी) आयुर्वेदाद्वारे भारतीय चिकीत्सा प्रणाली समृद्ध करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या प्रणालीतील तज्ञ्जांनी आणि अभ्यासकांनी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाशनड्डायांनी आज येथे केले. येथील आयुर्वेद शासकीय महाविद्यालय व रसशाळा विभागास श्री. नड्डा यांनी भेट दिली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार रामविचार नेताम, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. बी. एच. श्यामकुंवर, संतुकराव हंबर्डे, डॅा. धनाजीराव देशमुख, डॅा. अजित गोपछडे, डॅा. यशवंत पाटील, डॅा. विरेंद्र तळेगांवकर यांची उपस्थिती होती.

मार्गदर्शनपर भाषणात श्री. नड्डा पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद चिकीत्सा प्रणालीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आयुष विभाग स्वतंत्र करण्यात आला व त्यासाठी आर्थिक तरतूदही स्वतंत्र आणि मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. भारतीय चिकित्सा प्रणालातील या महत्त्वपुर्ण प्रणालीला आणखी बळकट करण्याची जबाबदारी या प्रणालीत काम करणाऱ्यांकडेच येते. या वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनीच या प्रणालीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या चिकीत्सा, रोग-निदान उपचार आदी प्रक्रियांच्या नोंदी ठेवणे, त्याबाबतचे संशोधन यांचे दस्तऐवजीकरण करणे यावर भर द्यावा लागेल. शास्त्रीय पद्धतीने नोंदी ठेवण्याने, त्याबाबत संशोधनात्मक महत्त्व वाढते. आयुर्वेद वैद्यकशास्त्रामध्ये पंचकर्म सारखे महत्त्वाची उपचार पद्धती आहे. अशा महत्त्वपुर्ण उपचार पद्धतींमुळे आयुर्वेद समृद्ध आहे. ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतीय योगविद्येला जागतीकस्तरावर सन्मान प्राप्त होत असल्याचेही श्री. नड्डा यांनी सांगितले.

सुरवातीला धन्वंतरी पूजन झाले. मधुमेहावरील उपचार क्षेत्रात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॅा. विरेंद तळेगावकर यांच्यासह आरोग्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या डॅा. यशवंत पाटील, डॅा. अजित गोपछडे यांचाही मंत्री श्री. नड्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. श्यामकुंवर यांनी प्रास्ताविक केले. डॅा. जातवेद पवार यांनी सुत्रसंचालन केले. डॅा. विजय उखळकर यांनी आभार मानले, डॅा. मंगेश नळकांडे यांनी पसायदान सादर केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी