माकडाचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी

लाल माकडाचा उच्छादाणे 
मंगरूळचे गावकरी हैराण...
 
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे मंगरूळ गावात गेल्या काही महिन्यापासून दोन लाल रंगाच्या माकडाने उच्छाद माडला आहे. दिवस बाहेर खेळणाऱ्या बालकांना मारहाण केल्याने अनेकजण जखमी झाले. तर खायला न देता हाकनार्यांची कपडे ओढणे, सामानाची नासधूस करण्याच्या प्रकाराने विशेषतः महिला वर्ग त्रस्त झाला आहे. या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करून गावकर्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करूनही बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या तीन वर्षापूर्वी मंगरूळ येथे तीन माकडे वास्तव्यास आली आहेत. येथील एका जुन्या वाड्यात कोणीच राहत नाही, त्या ठिकाणी असलेल्या झाडे झुडपात राहून गावात फेर - फटका मारण्याची आपली वेळ ठरविलि आहे. दुपारी गावात कोणीही माणसे दिसेनासी झाली कि ते बाहेर पडत असून, बालके दिसल्यास त्यांना मारहाण करत आहेत. तसेच कुठे एखादी महिला काम करताना दिसली कि त्या घराच्या छतावरून उडी मारून घरातील साहित्याची नासधूस करणे, भाकर न देता हाकण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावर धावून येणे, काही वयस्कर नागरिकांना या माकडांनी मारहाण केली आहे. माकडाच्या धुमाकुळाने बालके, महिला, पुरुष हैराण झाले आहेत. यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या महिला, बालक धजावत नसून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मंगरूळ गावात उच्छाद मांडलेल्या माकडाला पकडण्यासाठी जाळ्याचा पिंजरा लाऊन माकडास बंदिस्त करावे आणि त्यांना जंगलात सोडून नागरिकांना सुरक्षा देऊन संभाव्य धोका टाळावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरपंचासह गावातील ५० ते ६० गावकर्यांनी केली होती. त्यावर वनविभागाचे काही कर्मचारी आले, परंतु माकडांचा माकडांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही साहित्य नसल्याने बंदोबस्त करण्यास त्यांना यश आले नाही. नुकतेच माकडांनी गावातील ओंकार संदीप पावडे, मोनिका विकास भंगे, शिवाजी माधव पावडे यांच्यासह अनेक बालकावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. माकडांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा यासाठी मागील आठवड्यात १० ते २० गावकर्यांनी हिमायतनगर येथील वनविभागाच्या कार्यालयात येउन केली होती. मात्र संबंधित बीटचे वनपाल व त्यांच्या कर्मचार्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे माकडाच्या उछादाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप संदीप पावडे या युवकासह मंगरूळ येथील अनेकांनी केला आहे.  

अधिकारी - कर्मचार्यांची टाळाटाळ 
---------------------
मागील सहा महिन्यापूर्वी असाच प्रकार खडकी बा, सरसम बु, गाव परिसरात घडला होता, यावेळी सुद्धा वनविभागाने बंदोबस्त करण्यास टाळाटाळ केली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या वानरांच्या टोळीचा व माकडांचा बंदोबस्त करण्यात आला, हे सर्व श्रुत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची  कर्मचाऱ्यावर वचक नसल्याने वनविभागातील अधिकारी, कर्मचारी कर्तव्य पालनात कसूर करत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी