अग्रवाल बंधूस आठ महिन्याची शिक्षा

निकृष्ट दर्जाचा गुटखा बाळगल्या प्रकरणी 
अग्रवाल बंधूस आठ महिन्याची शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)निकृष्ट दर्जाचा व मानवाच्या शरीराला हानीकारक असणारा राजबाबू हा गुटखा बनावट असल्याची माहिती मिळताच छापा टाकून गुटखा नमुण्यासाठी पाठविण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी डी.टी. वसावे यांच्या न्यायालयात अग्रवाल बंधुस आठ महिन्याची सक्त मजूरी व प्रत्येकी हजार रूपये दंड ठोठावला आहे.

वजिराबाद भागातील मारवाडी धर्म शाळेच्या पाठिमागे शितल एजन्सी या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा गुटखा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. माहिती मिळताच प्रविण काळे व नंदू चंदू गायकवाड या पंचासह सदरील जागी छापा टाकून राजाबाबू या नावाच्या सहा पुड्या विकत घेऊन पुढील तपासासाठी अन्न व औषध विभागाकडे पाठवून देण्यात आल्या. या विभागाने या गुटख्याच्या पुड्यात मानवाच्या शरीरास हानीकारक पदार्थ असल्याचे सांगून यामध्ये 3.15 मॅग्नेशिएम कार्बोनेट हा घटक आढळून आला. या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश ओमप्रकाश अग्रवाल (वय 52 ) व दिनेश ओमप्रकाश अग्रवाल (वय 40) रा. वजिराबाद या दोघांविरूध्द 18 ऑक्टोबर 2006 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. यात अन्न व औषध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि.24) मुख्य न्यायदंडाधिकारी डी.टी. वसावे यांच्या न्यायालयात झाली असता त्यांनी पुराव्याआधारे मुकेश ओमप्रकाश अग्रवाल व दिनेश ओमप्रकाश अग्रवाल यांना अन्न व औषध नियमानुसार आठ महिने सक्त मजूरी व एक हजार रूपये दंड तर अन्न व औषध कलमानुसार सहा महिने सक्त मजूरी व प्रत्येकी एक हजर रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावली लागणार असून दोन्ही बंधूस आठ महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षाकडून ऍड. एम.के. सय्यद, ऍड. देशमुख संजय यांनी काम पाहिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी