देशीची घरपोच डिलिवरी.

देशीदारूची ग्रामीण भागात घरपोच डिलिवरी... पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष 

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध्य देशी दारूची मोठ्या प्रमाणात घरपोच डिलिवरी द्वारे विक्री केली जात असून, याकडे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे दुष्काळी परीस्थित अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. 

सध्या ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरात येण्याचे तलत आहेत. परिणामी शहरातील परवानाधारक देशी दारूच्या दुकानातील दारूची विक्री अल्प प्रमाणात होत असल्याने परवानाधारक दुकानदारांनी दारूचा खप वाढविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून दुकानातील देशी दारूचे बॉक्स ग्रामीण भागात पोहोचवून गल्ला भरत आहेत. यामुळे खेड्या पाड्यातील तरुण युवक व्यसनाकडे वळत असुन अनेक कुटुंबातील करता पुरुष दारूच्या आहारी गेल्याने उध्वस्त होत आहेत. तर दारूमुळे अनेक महिलांना कुंकू पुसावे लागले आहे. य गंभीर प्रकाराकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत अल्स्याचा आरोप सुजन नागरीकातून करण्यात येत आहे.

तालुक्यातील टेंभी, पवना, सरसम बु, खडकी बा, पोटा बु, पारवा, सिरंजणी, वाशी, मंगरूळ, आदी गावासह सबंध वाडी तांड्यामध्ये अवैध्य देशीदारूची वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याने, हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा. आणि निर्ढावलेल्या दारू विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरीकामधून केली जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी