NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

सोमवार, 30 जून 2014

अफवेने तालुका ढवळला

महिलेच्या पोटी " साप " जन्मल्याच्या अफवेने तालुका ढवळला  


हिमायतनगर(वार्ताहर)एका महिलेच्या पोटी ३.५ किलो वजनाच्या सापाचा जन्म झाल्याची एकच चर्चा हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वार्यासारखी पसरली असून, या अफवेच्या वृत्ताने संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. विशेषतः महिलांमध्ये याची एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरात गतदोन दिवसापूर्वी एका महिलेने येथील एका खाजगी रुग्णालयात असलेल्या सोनोग्राफी सेन्टरवर चेकउप केले होते. परंतु चेक अपमध्ये सदर महिलेच्या पोटात बाळाच्या जागी " लांब आकाराचा साप " असल्याचे सांगण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. या चर्चेचे उधान इतके वाढले कि जो तो पुरुष - महिला एका महिलेच्या पोटात साप जन्माला तो सुद्ध ३.५ किलोचा याने सर्वांचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. शहरातील जवळपास सर्वच दवाखान्यात कार्यरत डॉक्टर, कंपाउंडर यांना जो तो फोन करून या बाबतची खात्री करण्याच्या प्रयत्नात दिसत होत. दोन दिवस उलटले तरी या चर्चे निराकरण काही होईना. महिलेच्या पोटी साप तर जन्मला मग पेपरात बातमी नाही...? पत्रकारांना सुद्धा याची खबर नाही..? कोणी म्हणाले कि, सरसम येथील ती महिला होती.. कोणी म्हणतेय कि सदर महिलेस नांदेडला रेफर केले...? यासह अनेक असे प्रश्न जो तो विचाताना दिसत आहे. 

एकूणच हि बातमी खरी किंवा खोटी याची खात्री करून घेण्यासाठी काही पत्रकारांनी शहरातील सोनोग्राफी सेंटरवाल्या डॉक्टरांना विचारणा केली. त्यांनी सांगितले कि.. असा काहीच प्रकार नाही बाळाबरोबर एखादा मोठा जंतू आढळला असावा.. त्यास काहींनी साप संबोधित करून महिलेच्या पोटात " साप " दिसला अशी अफवा पसरविली असावी. तर एका खाजगी डॉक्टरस विचारणा केली असता ते म्हणाले कि, मला दोन दिवसात हजारोहून अधिक फोन आले होते. असा कोणताही प्रकार आमच्या रुग्णालयात घडला नाही.. एक रुग्ण आला होता मात्र त्यांच्या पोटात पुन्हा मुलीचे अभ्रक होते.. त्यांनी अबोर्शनचि विनंती केली मात्र...सध्या लागु झालेल्या बेटी बचाव कार्यक्रमामुळे हे प्रकार बंद झाल्याचे सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आले. त्यामुळे कदाचित त्यांनीच मुलगी नको म्हणून महिलेच्या पोटात साप असल्याची अफवा पसरविली असावी असे त्यांनी सांगितले. एकूणच हा प्रकार अफवाच असल्याचे निष्पन्न झाले तरी सुद्धा जो तो हा प्रश्न एकमेकांना विचाताना दिसत आहेत.   

अफवांवर विस्वास ठेऊ नये -  गायकवाड

या बाबत येथील वैद्यकीय अधिकारी श्री गायकवाड यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, गर्भातील बाळाचा मेंदू व शरीर विकसित झालेला नव्हते. म्हणून हे बाळ जन्माला आले तरी जगणे कठीण आहे, त्यासाठी सदर रुग्णास नांदेडला रेफर करण्यात आले आहे. महिलेच्या पोटी साप जन्माला हि बाब पूर्णतः खोटी असून, जनतेनी अश्या कोणत्याही अफवांवर विस्वास ठेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.    

रस्ता बनला मृत्यूचा सापळा...

नेत्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कामारीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा...


हिमायतनगर(वार्ताहर)आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मूळगावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कामारी गावाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, वाहनधारक व पादचार्यांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

मागील अनेक वर्षापासून हदगाव रोड ते कामारी अश्या रस्त्यात खड्डेच खड्डे झाले आहे. उन्हाळ्यात खाद्यातून जाताना अनेकांना कमर लचकने, मानेची नस दबाने, यासह अन्य विकार जडले आहे. तर पावसाळ्यात येथील खड्डेमय रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यातून खड्ड्यातून मग काढताना अनेकांना घाण पाण्यात पडून विविध आजाराला बळी पडावे लागले आहे. या रोडवून पावस करणाऱ्या पद्चायान तर कुठे पाय ठेऊन चलवे हे कळायला मार्गाचा राहिला नसल्याने अल्पश्या पावसामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. या सर्व खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन धारकांना हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत असल्याचा भास होत असून, गावातील नागरिकांना बाहेगावी जाताना २१ व्या शतकात घरी वहाने असताना बाजूला ठेऊन बैलगाडीचा वापर करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल, तर काही राजकीय नेते व कायकर्ते निधी उपलब्ध करून दिल्याची बतावणी करून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. परंतु निधी दिला तर ५ वर्षा कालावधीत आलेला निधी गेला कुठ..? तर दिला नाही तर केवळ मातासाठीच या भागातील जनतेचा वापर करून घ्यायचा काय..? असा सवाल ग्रामस्थ व युवा मतदार विचारीत आहेत. या प्रकाकडे संबंधित विभाग, राजकीय नेते मंडळीनी लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील जनता बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलून दाखविली.

आम्हा कामारीकरांच नशीबच खराब हाय साहेब..गेल्या 15 वर्षात खैरगाव ते कामारी रोडची दयनीय आवस्था...रोडला पडलेले खड्डे त्यात साठलेल पाणी त्यामुळे होनारी प्रवासाची कसरत लोकांच्या  जीवावर बेतायला लागली.. तरीहि प्रशासन व नेते मंडळीच्या आश्वासनाशिवाय कामारीकराला काहीच मीळत नसल्याची खंत भागवत पेटकर या युवकाने नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केली.

रविवार, 29 जून 2014

उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई..?

अर्धवट आय.टी.आय.इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई..?


हिमायतनगर(अनिल मादसवार)पळसपूर रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या भव्य आय.टी.आय.इमारतीचे काम मोठ्या प्रमाणावर शिल्लक असताना उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई ..? असा सवाल नागरिक विचारीत आहेत. 

मागील काही दिवसात सहा जून रोजी आय.टी.आय.इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री, खासदार, आमदार आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे वृत्त काही वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्याने नागरिक आचम्बित झाले. बहुसंख्य काम शिल्लक असून, काम पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती इमातीचे काम करणाऱ्या सूत्रांकडून सांगण्यात आली. कासव गतीने चालू असलेल्या या कामाची मुद्दत जून २०१४ मधेच संपत असून, बरेचसे काम अर्धवट अवस्थेत आहे. संत गतीने चालू असलेल्या या कामाचे ठोस कारण उपलब्ध निधी अधिकारी वेळेवर देत नसल्याचे सांगण्यात आले. काम झाले तरीही अभियंते वेळ मारून नेत असून, टक्केवारी बहाल केल्याशिवाय देयके आदा केले जात नसल्याचे सांगण्यात येते. आय.टी.आय.इमारतीच्या कामाचा सुमार दर्जा  पाहता बी.एंड.सी.म्हणजे बस आणि नोटा छापा असेच काय अधिकार्याचे असल्याचे दिसून येत आहे.   


उद्घाटना पूर्वीच सदरील इमारतीच्या भिंतीना तडे जात असून, संरक्षण भिंत तर चक्क कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. वर्ग खोल्यांच्या चौकातीने सांधा सोडून दिला असून, कार्यशाळेच्या अंतर्गत वायरिंग, दारे, खिडक्यांची तावदाने, नाल्या बांधकाम असे मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असल्याने सदरील आय.टी.आय.इमारतीच्या अधावत अवस्थेतही उद्घाटनाचा अट्टाहास कश्यासाठी धरण्यात आला ...? असा सवाल नागरिक विचारीत आहेत. 

या विषयी शाखा अभियंता जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, उद्घाटनाचे नक्की ठरले नसून, याचा निर्णय कार्यकारी अभियंता हे पाहणी करूनच घेतील. सदरील इमारतीचे अंदाजपत्रकीय मुल्य ६ कोटी ५० लाख असल्याचे सांगून आज पर्यंत ४ कोटी ५० लाखाचा निधी गुत्तेदारास आदा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.      

प्रशासनाची डोळेझाक

पाऊस पडला नसल्याने माफियांचा वाळू उपश्यावर जोर...प्रशासनाची डोळेझाक  


हिमायतनगर(अनिल मादसवार)जून महिना संपत आला असला तरी पाऊस पडला नसल्याने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी नदी व तालुका परिसरातील नाल्याचे पात्रे अद्याप कोरडी आहेत. त्याचा फायदा वाळू माफिया घेत असून, लिलाव झालेल्या एका व लिलाव न झालेल्या पाच ते सहा वाळू घाटावरून बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. हि बाब स्थानिकच्या तलाठी व मंडळ अधिकायांना माहित असताना देखील स्वार्थापोटी डोळेझाक करीत असल्याने वाळू माफियांचे मनसुबे वाढले आहेत. थेट नदीतील वाळू बाहेर काढून मोठ्या प्रमाणात साठेबाजीवर भर दिल्याचे पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, घारापुर, वारंगटाकळी, कामारी परिसरातील वाळूंच्या ढिगारावरून दिसून येत आहे.    

यावर्षी जिल्ह्यातील वाळू साठ्यांच्या लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. प्रशासनाने वाळू उपश्यासाठी केलेल्या कडक नियमावलीमुळे अनेक ठेकेदार लिलाव घेण्यासाठी आले नाहीत. दिवाळीनंतर वाळू उपसा जोमात सुरु झाला तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यग्र होते. त्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले. त्यामुळे लिलाव झालेले घारापुर सह न झालेल्या पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, वारंगटाकळी, कामारी, कोठावाडी वाळू साठे राजरोसपणे उपसण्यात येत आहेत. पावसाळ्यात तरी हा प्रकार थांबेल असे पर्यावरण प्रेमीना वाटत असताना पाऊस लांबल्याने नाले - नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू साठे उघडे पडले आहेत. काही वाळू माफियांनी राजरोसपणे उपसा करून वाळू व्यावसायिकांना विकण्याचा धंदा चालविला आहे. रात्रंदिवस चार ते पाच वाळूचे ट्रेक्टर द्वारे वाळूचा उपसा करून अधिकारी - कर्मचार्यांच्या साक्षीने प्रशासनाला गंडविले जात आहे.

नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने वाळू हा संवेदनशील विषय आहे, जिल्ह्यातील बिलोली, नायगाव, लोहा, धर्माबाद, हदगाव, किनवट, माहूरसह हिमायतनगर तालुक्यात प्रशासनालाही न जुमानता व्यवसाय करणारे वाळू माफिया तथा ठेकेदार राजकीय वरद हस्ताने आपला हा गोरखधंदा चालवीत आहेत.  वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावार्जाबाब्दारी सोपविण्यात आली आहे. तसेच नव्या नियमाप्रमाणे वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकारी, वाळू माफिया, महसूल   अधिकाऱ्यांना धरून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याने कधी शुल्लक कार्यवाही दाखून मालामाल होत आहेत. या प्रकारामुळे वाळू व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून काही ठिकाणी शेतकरीही आता या व्यवसायात उतरले आहेत. अलीकडेच केलेल्या एका पाहणीत पैनगंगा नदीकाठी असलेल्या पळसपूर, घारापुर, रेणापूर, कोठा वाडी, एकंबा, सिरपल्ली, कामारी, हिमायतनगर, दिघी, यासह अन्य ठिकाणच्या परिसरात शेकडो ठिकाणी नदीतून वाळू बाहेर आणून साठविल्याचे दिसून आले आहे. यामुळे हिमायतनगर तालुका परिसरातील भूजल पातळी खालावली असून, नदी काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवत आहेत, तर हिमायतनगर शहरात दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. या टंचाईस बेसुमार वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. 

होत असलेल्या बेकायदा वाळू उपष्याची माहिती काही जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीन दिवसापूर्वी येथील प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांना दिली होती. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने लाचखोर तलाठ्यांच्या माध्यमातून वाळू माफियांचे फावले जात आहे. या प्रकाराकडे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष देऊन शासनाला गंडऊन तिजोरीवर डल्ला मारू पाहणाऱ्या अधिकारी कर्मचारी तथा वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी रास्त मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.  

मागील काळात पळसपूर सज्जाचे तलाठी श्री सुगावे व सिरंजनी सज्जाचे तलाठी श्री शे.मोइन यांनी वाळू माफियांना पकडून कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याची चर्चा सुरु आहे. यावरून बहुतांश वर्तमान पत्रातून वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर संबंधित तलाठ्यांनी काही दिवसाच्या सुट्ट्या उपभोगुन या कारनाम्यावर मंडळ अधिकार्याच्या माध्यमातून पडदा टाकण्याचा प्रयत्न चालविला असल्याची विश्वसनीय माहित आहे. त्यामुळेच कि काय..? पाऊस लांबणीवर गेल्याची संधी साधून पुन्हा या परिसरात माफियांनी राजरोसपणे वाळूचा उपसा सुरु करून साठेबाजीवर भर दिल्याचे नदीकाठावरील नागरिकांचे म्हणणे आहे.  
याबाबत प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. 
याबाबत मंडळ अधिकारी श्री सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, काल दि.२८ रोजी पळसपूर येथे निनावी १०० ब्रास्साचा एक रेती साठा व सरसम येथील मुस्लिम कब्रस्तान  येथे २८ ब्रास निनावी साठा जप्त केला आहे. मात्र या ठिकाणी पोलिस पाटील नसल्यामुळे वाळू साठा अजूनही कोणाच्या ताब्यात दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. 
  

शनिवार, 28 जून 2014

उत्सवात शांतता नांदते

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील हिंदू - मुस्लिम तथा सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने नांदतात हे नांदेड जिल्ह्यासाठी भूषणावह असून, सर्वच सन - उत्सवात गावात शांतता नांदते असे मत माजी जी.प.सदस्य समदखान यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर पोलिस स्थानकात दि.२८ रोजी पार पडलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे, प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड, पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, सहाय्यक पो.नि.सुशील चव्हाण आदींसह शहरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिमायतनगर येथील पोलिस अधिकार्याच्या हलगर्जीपणा बाबतच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यात प्रामुख्याने विसा - पासपोर्ट साठीच्या जास्त असून, आपल्याकडे प्रस्ताव येताच तातडीने त्याचा निपटारा करून वरिष्ठांना पाठवावे जेणे करून संबंधिताना पुढील कार्यवाहीसाठी खेटे मारावे लागणार नाहीत. असे सुचित करून येथील सर्व - सन उत्सावात्सव समाज बांधव एकमेकांना शुभेच्छा देऊन सुख दुखत सामील होतात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बंधुभाव व शांतता हा जिल्ह्यासाठी आदर्श असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रभारी तहसीलदार यांनी उपस्थितांना सनवारात उद्भवणाऱ्या समस्यांचा निपटारा करून शांततेत उत्सव साजरे करणे आपले अद्य कर्तव्य असल्याचे सांगून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे म्हणाले कि, मागील अनेक वर्षपासून हिमायतनगर शहराच्या शांततेची गाथा ऐकत आणि पाहत आहे. तीच परंपरा यावर्षी सुद्धा शांतता कायम ठेऊन नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या सेवेसाठी आमचे पोलिस दल सदैव आपल्या पाठीशी आहेत. येणाऱ्या अडचणीसाठी नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क करून समस्यांचा निपटारा करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना बोलताना केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे विजय शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, माधव बिंगेवार, कमलबाई मादसवार, बळवंत जाधव, साईनाथ कोमावार, फेरोज खान, मन्नान भाई, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, सुरज दासेवार, शिवसेनेचे जाफर भाई, श्याम जक्कलवाड, राष्ट्रवादीचे सुभाष शिंदे, सरदार खान, चंद्रकलाबाई गुड्डेटवार, सादिक चातारकर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार प्रकाश जैन, कानबा पोपलवार, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, यांच्यासह अनेक हिंदू - मुस्लिम नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी मागील आठ दिवसात तीन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्या, यात चोरट्यांनी शेतकर्यांना चाकूचा धाक दाखून थेट बैलजोड्या टेम्पोत बसविल्याची माहिती तुप्तेवार यांनी देऊन, सदर चोरट्या सोबत तालुक्यातील एका व्यक्तीचा हात आहे. याची माहिती पोलिसांना देऊनही त्यास अटक तर सोडच साधी विचापूस सुद्धा केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यास कांबळे यांनी दुजोरा देत तातडीने शेतकयांच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करीत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

पाण्यासाठी प्रार्थना...

रकात नमाज आदा करून अल्लाहकडे पाण्यासाठी प्रार्थना... 


हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध महाराष्ट्रात पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. तर चारा व पाण्यावाचून प्राणी मात्रानाही झळा  सोसाव्या लागत आहेत. यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी हिंदू बांधव एकीकडे देवी देवतांना साकडे घालत असताना दुसरीकडे मुस्लिम समाज बांधवांनी इदगाह मैदानावर दोन रकात नमाज आदा करून अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली आहे. 

मान्सूनने पाठ फिरविल्यामुळे  रुसलेल्या निसर्गाला धरतीवर बरसण्यासाठी एकीकडे हिंदू बांधव शेतकऱ्यांच्या वतीने दिंड्या, पंगती, घड, जलाभिषेक करून साकडे घातले जात असताना दुसरीकडे मुस्लिम समाजातील शेतकरी व सामान्य बांधवांनी अल्लाहला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरातील शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी दि.२८ रोजी सकाळी ९.३० वाजता इदगाव मैदानावारेकात्र जमून सामुहिक नमाज आदा केली. या वेळी खालील मौलाना यांनी नमाज पठाण केले, यावेळी उपस्थितांनी नमाज पडून अल्लाहला पाऊस पाणी पडू दे..रान सारे भिजू दे .. अश्या शब्दात मन्नत मागून दुवा मागितली. यावेळी मौलाना यांनी आशयचा पद्दतीने सलग तीन दिवस म्हणजे २९ आणि ३० जून रोजी सुद्धा सकाळी ९.३० वाजता रकात नमाज आदा करून मन्नत मागली जाणार आहे, त्यासाठी सर्वांनी आपल्याकडे असलेल्या पाळीव गाय, बैल, म्हैस, बकरी यासह अन्य प्राण्यांना सोबत घेऊन येण्याच्या सूचना केल्या. कारण पावसाभावी पशु - प्रण्यानाही झळा सोडाव्या लागत असून, चारा - पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. तेंव्हा अल्लाला आपण तर दुवा करतच आहोत पण, प्राण्यांच्याही दुवामुळे कदाचित अल्लाह प्रसन्न होऊन, जोरदार पाऊस बरसेल अशी रास्त अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, सदर खान, शकील भाई, फाहद खान, अ.अजीज, हाफिज अ.अजीम, शे.सादुल्ला भाई, शकील भाई, यांच्यासह जवळपास २०० ते ३०० नागरिक व बालकांनी उपस्थिती लावली होती.  


सिरंजनी येथील महिलांची पावसासाठी दिंडी 


सिरंजनी(वार्ताहर)येथील वाकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या महिला व पुरुषांनी पावसासाठी देवी देवतांना साकडे घालून पैनगंगा नदी पर्यंत पाई दिंडी काढली होती. या दिंडीत ताल मुदंगाच्या तालात लहान बालके सुद्धा सामील झाल्याचे दिसून आले. 

मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह, सामान्य जनता व पशु प्राणी हैराण झाले आहे. यापूर्वी तर पाण्याची चिंता होती आता मात्र पशूंच्या खाद्य व चारा टंचाईची समस्या वाढली आहे. पाऊस पडला असता तर सर्वत्र हिरवेगार तृणाची निर्मित्ती होऊन काही अंशी चार्याचा प्रश्न सुटला असता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने सर्वत्र वळवांटा सारखी स्थिती निर्माण झाली असल्याने कोरडा दुष्काळाचे सावट  सदृश्य परिस्थिती दिसत आहे. यावर मात कारणासाठी पाऊस पडणे गरजेचे असताना मृग नक्षत्र कोरडे गेले, आता आर्द्रानक्षत्र सुद्धा कोरडेच जात आहे. जून महिना संपत आला असताना आता तरी वरून राजाची कृपा होईल या आशेने सर्व स्तरातून देवी- देवतांना साकडे घातले जात आहे. याच उद्देशाने सिरंजनीच्या भजनी मंडळाचे मारोती सिल्लेवाड, सुभाष महाराज, बाबू घुंगरे, श्याम भाराने, गणेश भिंबरवाड, बंडू दिवटेवाड, लक्ष्मीबाई देशमाने, परमेश्वर गम्पलवाड,   यांच्यासह शेकडो महिला - पुरुष बालक व वृद्धांनी सहभाग घेऊन एकंबा येथील कानोबा, सिरंजनी येथील मारुती आणी धुरपतमाई सह अन्य देवी देवतांना पैनगंगा नदीवरून आणलेल्या पाण्याने  जलाभिषेक करून पाऊस पाणी पडून सुगीचे दिवस येऊ दे अशी विनवणी केली आहे.      

                

शुक्रवार, 27 जून 2014

दुष्काळाचे सावट

हिमायतनगर(वार्ताहर)पावसाने पाठ फिरविल्याने नुकसानीत आलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई एन्यत यावी या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकर्यांनी येथील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

गत १५ दिवसापासून पाऊस पडत नसल्याने लागवड केलेली कपाशीची पिके नुकसानीत आली आहेत. तळपत्या उन्हामुळे कोवळी पिके तग धरत, मान खाली टाकून देत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी येणार आहे. गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्रताही तेच हाल होत आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, यामुळे नुकसानीत आलेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळून द्यावी या मागणीचे निवेदन येथील शेतकर्यांनी प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांना दिले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, बाळू चावरे, साहेबराव चव्हाण, सुरज दासेवार, केवलदास सेवनकर, जमील भाई, अमिर अहेमद, शे.मोइन, दलीप ढोणे, विठ्ठल ढोणे, चंदुलाल बाबूलाल, शिवशंकर कोंडरवाड, सचिन कल्याणकर, राजारामसिंह ठाकूर, नसीर अहेमद, मुश्ताक अहेमद, अमोल बंडेवार, पंजाबराव पाटील, खंडेराव मिराशे, प्रकाश हनवते, बालाजी घुंगरे, विठ्ठलराव वानखेडे, पंजाब राउत, गोविंद गोखले, राजाराम गुंडेवार, गणेश भोयर, संजय गुड्डेटवार, माधव बिंगेवार, बाळू मुधोळकर, दत्तात्रेय तीम्मापुरे, गंगाधार्कात्रे, कमलबाई तीम्मापुरे आदींसह शेकाडो शेतकयांच्या स्वाक्षर्या आहेत.

दुष्काळाचे भीषण चटके सहन करणारर्या हिमायतनगर तालुक्यात ३३ हजार २०० हेक्टर जमीन पेरणीयोग्य सर्वसाधारण आहे. त्यापैकी सन २०१२-१३ च्या हंगामात ३४ हजार ९७० हेक्टर जमिनीवर खरीपाची पेरणी करण्यात आली होती. यात सर्वाधिक पेरा कापसाचा झाला असून, २० हजार ६०० हेक्टर मधील शेतकर्यांनी पांढरे सोने उगविले होते. तर ६ हजार ९६३ हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. तर तूर २४३२ हेक्टर, मुग ३९० हेक्टर, उडीत ४०४ हेक्टर, तीळ ५९ हेक्टर, ज्वारी ३ हजार ३१७ हेक्टर, भात २५ हेक्टर,उस ७९० हेक्टर वर लागवड झाली होती. अशी माहिती कृषी अधिकारी दवालाबाजे यांनी दिली. 

पर्जन्यवृष्टीसाठी

हिमायतनगर(अनिल मादसवार)हे वरून राजा...शेतकऱ्यांची किरी परीक्षा घेणार... आम्हावरील दुष्काळ सदृश्य परिस्थिती हटविण्यासाठी पावसाच्या आगमनाने संपूर्ण चराचर सृष्टी न्हाऊन काढून सुगीचे दिवस येऊ दे.. आतातरी आमच्या हाकेला धाऊन ये... अशी प्रार्थना करीत हिमायतनगर येथील शेतकरी कष्टकरी, मजूरदार व सामान्य नागरिकांची पैनगंगा ते हिमायतनगर परमेश्वर मंदिर अशी पाई दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात शुक्रवारी काढण्यात आली होती. दिंडी परत शहरात आल्यानंतर सर्व देवी देवतांना जलाभिषेक करून साकडे घालण्यात आले.

या वर्षी जून महिना संपत आला तरी आवश्यक त्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली नाही, जी झाली त्या भरवश्यावर शेतकर्यांनी पेरलेली पिके उन्हामुळे करपू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासाठी लागणारी बी - बियाणे, खते कुठून आणणार असा यक्ष पश्न बळीराजाला पडला आहे. या परिस्थितीतून केवळ वरून राजाचं वाचऊ शकतो त्यामुळे येथील नागरिक वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी दि.२७ रोजी सकाळी विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदी पर्यंत पाई दिंडी काढली होती. या दिंडीचे नेतृत्व कांतागुरु वाळके यांनी केले. तर दिंडीत नारायण महाराज, रामराव ढोणे, नारायण जाधव, यांच्यासह परमेश्वर भजनी मंडळातील महिला - पुरुष मोठ्या संखेने सामील झाले होते. 

गुरुवार, 26 जून 2014

बैलजोड्या चोरी

आठ दिवसात तीन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरी..
शेतकऱ्यात दहशत 


हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन खरीप हंगामाच्या दिवसात काळ्या मातीत तिफन फिरवणारी बैलजोडी आखाडयावरून चोरीला गेल्याने बळीराजा कोंडीत सापडला असून, मागील आठ दिवसात हिमायतनगर शेत शिवारातून तीन शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या चोरीला गेल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याना शासनाने मदत करून हाथभार लावावा अशी मागणी होत आहे. 

वरून राजाने पाठ फिरविल्यामुळे अगोदरच शेतातील अडचणीत आला आहे. पाऊस पडून रान भिजावे या साठी देवी देवतांना साकडे घालीत असताना सर्ज्या राज्याची जोडीच आखाडायावरून गायब होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाख मोलाची बैलजोडी गेल्याने पेरणीसह अन्य कामे कशी करावी या विवंचनेने शेतकऱ्यास ग्रासले आहे. नांदेड किनवट राज्य रस्त्यावरील सरसम शेत शिवारातील आखाड्यावर दि.२५ च्या रातीला बांधून ठेवलेली लाखो रुपये किमतीची बैल जोडी कोण्यातरी अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. हा प्रकार दि.२६ रोजी सकाळी ६ वाजता जेंव्हा शेतकी मोती कोंडीबाराव मोरे हे शेतात गेले त्यावेळी उघडकीस आली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या व्यक्तीवर कलम ३७९ भादवी  प्रमाणे गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

दि.१८ रोजी रात्रीं आखाड्यावर बैलजोडी बांधून घरी झोपण्यासाठी शेतकरी परमेश्वर सोनबा डांगे गेले असता अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी लांबविली होती.  तसेच दि. १७ रोजीच्या रात्रीला दर्भ उमरखेड तालुक्यातील शेतकरी श्री रामराव गणपतराव माने हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीतीरावर असलेल्या शेतातील आखाड्यावरून बैलजोडी लांबविली होती. त्यानंतर दि. २५ च्या रात्री लाखोची बैलजोडी चोरीला गेल्याने पशु पालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. से प्रकार घडत असताना देखील हिमायतनगर येथील पोलिस चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरतास्ल्याचे यावरून दिसून येत आहे.

बुधवार, 25 जून 2014

कालव्याची निर्मित्ती करा..

हिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव - हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागासातील बहुतांश गावे उर्ध्व पैनगंगा प्रकल्याच्या कामापासून वंचीत आहेत. ग्रामीण भागातील कोरडवाहू सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कामे हाती घ्यावीत अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी सिंचन विभागाकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात येणारे वटफळी, कांडली खु., कांडली बु, टाकराळा, मोरगव्हाण, वडगांव, पोटा बु. पोटा खु, पारवा बु, पारवा खु, वायवाडी, भोन्डणी तांडा, दाबदरी, सोनारी, दुधड, वाळकेवाडी, करंजी व सरसम सर्कल गाव परिसरातील कोरडवाहू जमीन
२१ व्या शतकातही सिंचनापासून दूर आहे. हिमायतनगर तालुक्यातील वरील गावांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कामे केल्यास हजारो हेक्टर शेती ओलीताखाली येउन गोर - गरीब शेतकर्यांना याचा लाभ होवुन सिंचन क्षेत्र वाढेल. तसेच शेतकर्‍यांचे तथा राष्ट्राचे हित जोपासले जार्इल. करिता वरील गावांना उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कालवाच्या लाभ मिळवा. या अगोदर झालेल्या कालव्याचा चुकीच्या धोरणामुळे लाभ मिळाला नाही. ज्या जमिनींना पाण्याची आवश्यता होती अशी गावे कालव्याच्या लाभापासुन वंचित रालीलेली आहे. त्यामुळे अर्ध्याच्या वर शेतकर्‍यांना सदरील धोरणाचा फटका बसल्यामुळे त्यांच्या जमिनी आजही कोरडवाहू असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. या शेतकर्‍यांना लाभ मिळण्याच्या दृटीने वरील सिंचन कालवा निर्मित्ती बाबतचा गाभीर्‍याने विचार करुन शासन स्तरावरुन जोड कालवा निर्माण करण्याच्या दृटीकोणातुन पाऊले उचलावीत अशी मागणी एका निवेदान्द्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती सुनिलजी तटकरे, जल संपदा मंत्री महाराट्र , कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग औरंगाबांद, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक ला.क्षे.वि.ज.स.वि.औरंगाबाद, कार्यकारी अभियंता उ.पै.प्र.वि.क्र.५ हदगाव यांना देण्यात आल्या आहेत.

पुराच्या धोक्याची शक्यता

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड -किनवट राज्य रस्त्यावरील ओढ्यात बेश्रमाच्या झाडांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाला बेश्रममय झाला आहे. यातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन, पुराचा धोका शहराला बसण्याची शक्यता आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शहरानजीकच्या ओढ्यातील बेशरमास हटउन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, हे शहर आंध्रप्रदेश विदर्भाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या - जाण्याची नेहमीच वर्दळ असते, शहरात येणारा नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील मार्गावर मोठा ओढा आहे. याचा ओढ्याच्या पुलावरून रेल्वे स्थानक, भोकर, हदगाव, नांदेडकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील रेल्वे कोर्नरवरील ओढ्यात व संपूर्ण परिसराला बेश्रमाच्या झाडणी व्यापले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत बेश्रमाचीच हिरवीगार झाडे दिसत असून, याच नाल्याला पावसाळ्यात मोठा पूर येउन संपूर्ण गावाला वेढा पडतो. याचा अनुभव गत वर्षीच्या अतिवृष्टीत वाहनधारक, नागरिक व शहरवासियांना आला होता. त्यावेळी तब्बल ५ ते ६ तास वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेकांची वाहने वाहून जाऊन नुकसान झाले, तसेच काही गावाचा संपर्क तुटला होता.

यास कारण ठरले ते बेश्रामाने व्यापलेला परिसर कारण त्यामुळे पावसाचे पाणी थेट ओढ्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरात पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याच नाल्यात पाणी जमा राहून पुढे मार्ग नसल्याने शहरातील वार्ड क्र.३ रहिम कॉलनी, उमर चौक, रुख्मिणी नगर परिसरातील नूतन वस्तीत शिरले होते. त्यामुळे तोच प्रकार एकदम येणाऱ्या पावसामुळे घडू शकतो. तेंव्हा आगामी काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच शहराचा धोका टाळण्यासाठी जी.प.प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जुन्याजानकारातून व्यक्त होत आहे.

मागील चार वर्षापूर्वी या नाल्यातील गाळ व बेश्रमाची झाडे तोडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून नाल्याचे सरळीकरण ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा नाला पूर्णतः गाळ आणि बेश्रमाच्या झाडणी व्यापला असून, यासाठी ग्राम पंचायत स्तरावर खर्च करणे अशक्य नसल्याचे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांचे म्हणणे आहे.

कोरडा दुष्काळ

नांदेड(खास प्रतिनिधी)पावसाळा सुरु होऊन मृगनक्षत्र गेले आर्द्राची सुरुवात होऊ चार दिवस लोटले, मात्र पाऊस अजूनही बेपत्ता आहे. पावसाभावी शेतकर्यांची स्वप्न भंगली जात असून, पेरण्य खोलळंबल्याने हि दुष्काळ सदृश्य परिस्थितीची चाहूल आहे. गात वर्षी अतिवृष्टीने ओळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर्षी त्याउलट स्थिती आहे. आता कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली असताना मात्र विकासाच्या नावाने गप्पा मारणारे नेते या बाबत बोलत नसल्याने शेतकर्यांना कोणी वाली आहे कि नाही असा सवाल अन्नदाता विचारीत आहे.

मृगनक्षत्र संपले तरी जिल्ह्यात पेरणीसाठी पुरक पाऊस झाला नाही. ज्या भागात तुरळक पाऊस झाला. त्या भागात केवळ १ टक्के पेरण्या झाल्या. उर्वरीत भागात पाऊस झाला नसल्याने पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. खरीप हंगामघेण्यासाठी शेतकर्‍यांनी खरीप पूर्व मशागतीची कामे अटोपली आहेत. गतवर्षी झालेली अतीवृष्टी आणि त्यातुन झालेले शेतीचे नुकसान लक्षात घेता यावर्षी पाऊस लवकर येईल या आपेक्षेवर शेतकर्‍यांनी मशागतीची कामे लवकरच आटोपली. खते, बी-बियाने खरेदी करून ठेवण्यात आली. याशिवाय शेतीची अवजारेही तयार ठेवण्यात आली. कर्ज काढून, बचेतीला ठेवलेल्या पैशातून पदरमोड करून बियान्यांची खरेदी करण्यात आली. पाऊस वेळेवर झाल्यानंतर आपल्या पेरण्या खोळंबु नयेत यासाठी शेतकर्‍यांनी परिस्थितीशी तोडजोड करून तयारी केली. यावर्षीची लगन सराई त्या मानाने मोठी होती. लगनसराईत शेतीकडची कामे खोळंबु नयेत यासाठी विशेष काळजी घेतली गेली. सोयाबीन, कापुस या नगदी पिकांस झाल्याने शेतकर्‍यांना ते विकत घेणे परवडणार नाही यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या घरातील सोयाबीनचा बीयाने म्हणुन वापर करावा त्यासाठी आवश्यक त्या बाबी समजुन घ्याव्यात म्हणुन कृषी विभागाने जनजागरण हाती घेतले. ऐवढेच नाही शेतकर्‍यांच्या मदतीला माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यावर अधिकार्‍यांची नेमणुकर करण्यात आली. प्रत्येक कृषी केंद्रावर माहिती देणारा सक्षमअधिकारी नियुक्त करण्यात आल. सोबत माहिती पत्रकही ठेवण्यात आले.

केवळ बीटी वाणावर अवलंबून न राहता कापूस उत्पादकाने अन्य कंपनीचा कापुस लागवड करावा यासाठीही शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आले. गतवर्षी सोयाबीनचे भाव गडगडले होते. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीनचे भाव वधारल्याने सोयाबीनला चांगले दिवस येतील म्हणुन शेतकर्‍यांने सोयाबीनची लागवड करण्यासाठी सोयाबीनची बियाने खरेदी केले. मुग, उडीद आणि ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी आवश्यकते प्रमाणे बियाने खरेदी करून रान तयार करण्यात आली. खरीप पुर्व मशागतीची पुर्ण तयारी करून शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावला आहे. रोणीच्या नक्षत्रात झालेला पाऊस, मृगनक्षात्राच्या पहिल्या चरणात वादळी वार्‍यासह दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ८ जणांचा बळी घेतला. बाजारपेठा आणि शासन दरबारी बेदखल झालेला शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. मृगनक्षत्र संपवुन आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी पाऊस पडला नाही. यामुळे जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या चार दिवसापासून जे उन पडत आहे त्या उन्हाची तीव्रता मे महिन्यासारखी आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील लघु व मध्यमप्रकल्पातील पाणी साठा रसा तळाला जाईल त्यातुन नव्या संकटाला सुरूवात होईल. जिल्ह्यातील एकुणच परिस्थिती कोरडा दुष्काळ सदृष्य असल्याने राज्य सरकारला या बाबतीत विचार करावा लागणार आहे

पालकांनी मुख्याध्यापकास घेरले

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील सिबदरा येथील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला असून, शाळेची वेळ १० वाजता असताना सकाळी ९.३० वाजता शाळा उघडायला हवी होती. मात्र सकाळी ११ वाजले तरी शाळेला कुलूप दिसून आल्याने शिक्षण प्रेमी पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच रजा न देता उशिरा शाळेत येणे व काही शिक्षक गैरहजर राहिल्याने उपस्थित नागरिकांनी मुख्याध्यापकास घेराव घालून धारेवर धरल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.

शैक्षणिक वर्ष २०१४ ची सुरुवात होऊन दहा दिवसाचा कालावधी लोटला नसताना हिमायतनगर तालुक्यातील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. याचे जिवंत उदाहरण आज दि. २५ रोजी तालुक्यातील मौजे सिबदरा येथील शाळेवर दिसून आल्याने संतप्त शिक्षण प्रेमी पालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मंगरूळ केंद्र अंतर्गत येणारी जी.प.उच्च प्राथमिक शाळा सिबदरा ता. हिमायतनगर येथे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात. यात एकूण १४० विद्यार्थी संख्या असून, या ठिकाणी शिक्षकांची संख्या ७ असून, कार्यरत ५ तर २ शिक्षकाच्या रिक्त जागा आहेत. जिल्ह्यात शाळांची सुरुवात झाली असून, येथील शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकासह पाच शिक्षकांनी दोन दिवसा शाळा सुरळीत चालून पुन्हा मनमानी कारभार सुरु केला आहे. शाळा वेळेवर न उघडणे, शाळेत वेळेवर हजर न होणे, शाळा सुरु झाली तरी कोणतीही रजा न देता काही हजर तर काही जन गैरहजर राहणे असा प्रकार सांगणमताने सुरु केला आहे. त्यामुळे येथील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षणाचा पाया खचण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. या बाबीला कंटाळून चक्क काही पालकांनी आपल्या पल्ल्याना हिमायतनगर येथील खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश दिल्याचे उपस्थीत पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बेटमोगरेकर, जिल्हा शिक्षण सभापती कराळे यांनी, शिक्षण अधिकारी श्री पाटील यांनी लक्ष देऊन शाळेतील भोंगळ कारभारावर अंकुश लाऊन शिक्षणिक दर्जा सुधारावा अशी मागणी केली. यावेळी केरबा सुद्देवाड, गुरुदास गोसलवाड, संजय बाचकलवाड, शंकर भदेवाड, राम उक्कलवाड, संतोष नालनवार, गजानन गोसलवाड यांच्यासह बहुसंख्या पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळा सुरु होण्याची वेळ निघून गेल्यानंतर शाळेचे एक शिक्षक चौधरी हे १०.३० वाजता शाळेवर हजार होऊन ११ वाजता शाळेचे कुलूप उघडले. तर खुद्द मुख्याध्यापक जाधव जी.के. आणि जाधव पी.एल. हे शिक्षक ११.३० वाजता शाळेवर हजार झाले. त्यानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आत घेण्यात आले, उशिरा आलेल्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकास येथील शिक्षण प्रेमी पालकांनी धारेवर धरले होते. शाळेचे काम सोडून घरगुती कामावर का लक्ष देता असा प्रश विचारला, मात्र संबंधित शिक्षकांनी पालकांना उडवा - उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काहींनी या बाबतची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी संगपवाड यांना व पत्रकारांना दिली. पत्रकार शाळेवर पोहोंचले तरी सुद्धा गटशिक्षण अधिकारी आले नव्हते, विचारणा केली असता त्यांनी सदर शाळेवर पंचनाम्यासाठी मंगरूळच्या प्रभारी केंद्र प्रमुख श्री भिसे यांना पाठविल्याचे सांगितले आहे. वृत्त लिहीपर्यंत उशिरालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर काय कार्यवाही केली हे समजू शकले नाही.

याबाबत गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांना विचारले असता ते म्हणाले कि, चौकशीसाठी भिसे यांना पाठविले आहे, शाळेवर उशिरा येणारे शिक्षक दोषी आढळल्यास एक दिवसाची पगार कपात करण्यात युन पुढील कार्यवाहीसाठी वैष्ठांकडे प्रस्तावित करण्यात येईल असे ते म्हणाले.

याबबत मुख्याध्यापक जाधव यांना विचारले असता, मी बैन्केत कामासाठी गेलो होतो अन्य एका शिक्षकावर शाळा उघडण्याची जबाबदारी टाकली होती. एकाची जिल्हा बदली, एक बिमार, एक प्रशिक्षण, एक रजेवर आहेत असे ते म्हणाले. 

दुचाकी बैलगाडीवर आदळली

सिरंजनी(धम्मपाल मुनेश्वर)उभ्या बैलगाडीवर भरधाव वेगातील दुचाकी जाऊन धडकल्याने दोघे जन गंभीर तर एक जन किरकोळ जखमी झाल्याची घटना दि.२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी येथून एकंबा शिवारातील शेतावर जागलीला तीन तरुण शेतकरी दुचाकीवरून जात होते. जाताना चालकाने दुचाकी जोरात पालाविल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीवर जाऊन आदळली. या घटनेमुळे बैलगाडी पालथी झाली तर दुचाकीस्वार दोन तीन ते चार कोलांटउड्या मारीत १०० मीटर दूरवर जाऊन पडले. या घटनेत चालक अनिल बाबुराव शिल्लेवाड व पाठीमागील युवक माधव परमेश्वर मैकलवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पांडू बलपेलवाड हा किरकोळ जखमी झाला. दोन्ही गंभीर जखमींना रात्रीला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, यापैकी चालक युवक अजूनही कोमात गेल्याने मृत्यूशी झुंज देत आहे.

अपघात स्थळाचे दृश्य पाहून किती भयानक अपघात झाला असावा असे वाटत असून, यातील एकही जन वाचू शकत नाही अशी परीस्थिती दिसत होती. या घटनेमुळे बैलगाडी सुद्धा अक्षरश्या तुटल्याची दिसून आली असून, विशेष म्हणजे बैलगाडीवर मोठे खोड असताना सुद्धा खोडासह पलटी झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी घटनास्थळाचे दृश्य पाहण्यासठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

सोमवार, 23 जून 2014

अस्थिकलशाचे दर्शन

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील श्री परमेश्वर मंदिर मैदानात दि.२३ रोजी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थिकलश आणण्यात आला असून, अखेरचे दर्शन घेऊन गोपीनाथ मुंडे यांना शहरातील भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी अभिवादन केले. 

भारताचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठवाडा शोकाकुल झाला आहे. गोर गरीबाची जाण असलेला नेता बहुजन तसेच मागास्वर्गीयाचा तसेच लोकनेता असलेल्या या महान नेत्याचे अचानक निधन झाल्याने महाराष्ट्रासह देशशोक सागरात बुडाला. केंद्रीय मंत्री पदाचा कार्यकाल सुरु होऊन केवळ सात दिवसाचा कालावधी लोटला होता त्या दरम्यान काळाने त्यांना आपल्या कुशीत घेतले. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही त्यांच्या निधनाचे दुख जनतेत अजून असून, दि. २३ रोजी हिमायतनगर येथे त्यांचे शेवटचे दर्शन म्हणजे अस्थिकालाषाचे आगमन झाल्यानंतर येथील भाजप कायकर्ते व सामान्य जनतेने दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रकाश अण्णा तुप्तेवार, जेष्ठ कार्यकर्ते नारायण करेवाड, कांता वाळके, भाजपा तालुकाध्यक्ष गजानना तुप्तेवार, सरचिटणीस डॉ.प्रसाद डोंगरगावकर, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा सुरज दासेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचलक बाळू चवरे, दिनकर संगनवार, विजय नरवाडे, विलास वानखेडे, अनिल नाईक, गजानन पिंपळे, परमेश्वर भोयर, बालाजी ढोणे, शे.मोइन, प्रदीप येळविकर, यांच्यासह शेकडो नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ए.टी.एम.मशीनमधून

भारतीय स्टेट बैंक अधिकार्याचा भोंगळ कारभार
ए.टी.एम.मशीनमधून ग्राहकांना येतेय कमी रक्कम

 
हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील भातीय स्टेट बैन्केच्या शाखाधिकार्यांनी हलगर्जी पनाची सीमाच  पार केली असून, बैन्केचा कारभार कर्मचार्यांच्या भरवश्यावर सोडल्या जात असल्याने चक्क ग्राहकांना ए.टी.एम.माशिमधून मागणीपेक्षा कमी रक्कम येत असल्याचे उघड झाले आहे.

मागील वर्षापासून भारतीय स्टेट बैन्केतील अधिकायानी मनमानी कारभाराचा कळस गाठला आहे. बैन्केत येणाऱ्या ग्राहकांशी उद्धट पनाची वागणूक, वेळेवर कामकाज सुरु न करणे, बैन्केत येउन सुद्धा ग्राहकांची गर्दी असताना जाणीवपूर्वक वेळ मारून नेण्यासाठी बाहेर पानटपरी, लघुशंका यासह अन्य कामात वेळ वाया घालून ग्राहकांना ताटकळत उभे ठेवणे, पिक कर्जासाठी अडवणूक, महामंडळाचे कर्ज वितरण यासह खाते काढण्यास टाळाटाळ करून कामचुकार पना करीत आहेत. त्यामुळेच कि काय ए.टी.एम.मशीनमध्ये टाकण्यात आलेल्या पाचशे रुपयाच्या नोटांमध्ये शंभराची नोट निघाल्यामुळे एका ग्राहकाला चारशे रुपयाचा फटका बसला आहे.

दि.२३ सोमवारी येथील हुजपा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्री करणसिंह भगवानसिंह ठाकूर हे  आपली पगार जमा झाल्यामुळे हिमायतनगर येथील भातीय स्टेट बैंक शाखेतील ए.टी.एम. मशीनमध्ये रक्कम काढण्यासाठी सकाळी १०.२२ वाजता गेले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रथम ए.टी.एम. कार्डाचा वापर करून सुरुवातीला २० हजार रुपये काढले त्यावेळी ५०० रुपयाच्या ४० नोटा बरोबर आल्या. त्यानंतर दुसर्यांदा १० हजाराच्या मागणी केली असता ५०० रुपयाच्या २० नोटा निघणे गरजेचे होते. मात्र केवळ १९ नोटा ५०० रुपयाचे व ०१ नोट शंभराची नोट आल्याने खातेदार अचंबित झाले. त्यांनी सदरच्या नोटा प्रत्यक्ष या ठिकाणी असलेले गार्ड यांच्या समक्ष मोजल्या. या बाबतची माहिती शाखाधिकारी श्री जैन यांना देण्यासाठी गेले असता प्रथम त्यांनी असा प्रकार होणे नाही असे सांगून ग्राहकास धूडकाऊन लावण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ग्राहकाचा अर्ज घेतला खरा, परंतु नुकसान भरपाईचे मात्र ठोक आश्वासन न दिल्याने ४०० रुपयाचा भुर्दंड सदर ग्राहकास सोसावा लागल आहे. 

मागील काळात सदरील बैंक मैनेजर जैन यांच्याविषयी ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, अनेक नागरिकांनी जैन यांची हकल पट्टी करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने बैंक ग्राहकात संतापाची लाट पसरली आहे. शासनाच्या अनेक योजनांचा निधी सदरील बैंक अधिकार्याने ग्राहकांना न देण्याची शपतच घेतली काय..? असे या अधिकार्याच्या कर्तुत्वातून दिसून येत आहे.    

रविवार, 22 जून 2014

सर्किटमुळे आग

भोकर(मनोज चौव्हाण)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेला शोर्ट सर्किटमुळे आग लागली असून, नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सदर घटना हि रविवारी भर दिवसा पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. यात बैन्केतील टाकाऊ फर्निचर राख झाले असून, अन्य कुठलेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.


भर दिवसा भोकर शहरातील मुख्य रस्त्यावरील नूतन शाळेच्या पाठीमागे असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेला रविवारी दुपारी वरील मजल्याच्या समोरील (गैलरी) च्या भागास शोर्टसर्किट होऊन आग लागली. सदर आगीचे लोट बाहेर येत असताना रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना द-बर्निग बैंकचे दृश्य दिसून आले. तातडीने माधव गादेवार यांनी शाखाधिकारी जोशी यना कळविले. वादळी वार्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. हा प्रकार आटोक्यात आणण्यासाठी शाखाधिकारी यांच्या परवानगीने रामचंद्र मुसळे, उत्तम बाबळे, माधव गोरठेकर, मिर्झा फहीम बेग, काशिनाथ लिंगकर, प्रसाद साईनवार, यांच्यासह अनेकांनी बैन्केत प्रवेश करून पाणी टाकून आग विझविली. या आगीत खुर्च्या, टेबल, आणि इतर साहित्य जाळून राख झाले.

नागरिकांनी वेळेत सहकाया केल्याने आणि अग दिवसा लागल्यामुळे होणारा मोठा अनर्थ टाळला आहे. आगीची माहिती नगर परिषदेस समजताच तातडीने अग्निशमन बंब दाखल होऊन अग आटोक्यात आणण्यासाठी पयत्न केले. मुख्य रस्त्यावर झालेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे काही काल वाहतूक विस्कळीत झाली होती.

सिकलसेल आजार

हिमायतनगर(वार्ताहर)हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येउन आजाराबाबत जनजागरण करण्यात आले. सिकलसेल आजारावर नियंत्रण शक्य आहे परंतु तत्पूर्वी तपासणी अंती निदान होणे गरजेचे आहे. या आजारावर परिणामकारक औषधी उपलब्ध नाहीत. पणतू नियंत्रण करणे आपल्या हातात आहे. याची जाणीव जनतेला करून जनजागृती व्हावी या उद्देशाने सिरंजनी गावातून शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी श्री कैलास शेळके, एम.व्ही.चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर जी.प.शाळेत गावातील ०१ ते ३० वयोगटातील रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातून सदर आजार असलेल्या रुग्णांची शोध मोहीम घेतल्या गेली. या गावात तपासणी करण्यात आलेल्या एकूण १५ संशयित (फ्लू बी.टी.यु पॉजीटिव्ह) रुग्णांच्या रक्ताचे दुषित नमुने आढळले असून, वरील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पैकी तीन रुग्ण वाहक होते,त्यांना शासकीय योजनांचा मोफत लाभ मिळून देण्यात येणार आहे अशी माहिती तालुका सिकलसेल सहाय्यक चव्हाण एस.एस. यांनी दिली. यावेळी ग्रामसेवक शंकर गर्दसवार, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

मृतदेह आढळला

सरसम(वार्ताहर)हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील गावाशेजारी असलेल्या नाल्याच्या कादेवैल बोरीच्या झाडाखाली एका ३५ वर्षीय युवकाचा मूतदेह आढळला असून, सदर घटना दि.२१ रोजी रात्री ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सरसम येथील युवक संतोष ज्ञानोबा कदम वय ३५ वर्ष हा सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास शौच्चालयास गावानजीकच्या ओढ्याकडे गेला होता. बचा वेळ झाला घरी आला नसल्याने शोध सुरु करताच ओढ्या नजीकच्या बोरीच्या झाडाखाली मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती पोलिस पाटील श्री नरवाडे यांनी पोलिसांना कळविली. तातडीने घटनास्थळी हिमायतनगर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मयत युवकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. शौच्चास गेलेल्या युवकाचा अचानक मृत देह आढळल्याने गावात उलट - सुलट चर्चेला उधान आले असून, युवकाचा गूढ मृत्यू कश्यामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. मयत युवकास पत्नी, ४ मुली असा परिवार आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू न.कलम १७४ सी.आर.पी.सी.अनुसार नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण, पोहेको.सुधाकर कोठेवार कित आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

हिमायतनगर(अनिल मादसवार)मीटरगेचजे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यानंतर सर्व सोई सुवीधा मिळतील अशी आपेक्षा हिमायतनगरवासीयांसह प्रवाशांना होती. येथील रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने प्रवाशांच्या आशा धुळीस मिळल्याचे चित्र येथील रेल्वे स्थानक परीसरात दिसत आहे. येथे येणा-या जाणा-या प्रवाश्यांना घाणीच्या साम्राज्य बरोबर, सवच्छता गृह, वेटींग हॉल, प्रवाशी शेड, आरक्षण, उडडान पुलांचा अभावामुळे गैरसोईंना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकाराकडे संबंधीतांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतुन होते आहे.

हिमायतनगर शहर ह तालुक्याचे ठिकाण असुन, या ठिकाणची बाजारपेठ मोठी आहे. रेल्वे स्थानकातील शेड प्रवाशांना अपुरा पडत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात तर पावसाळ्याच्या दिवसात पावसात भीजावे लागते. सिमेंट पत्र्याचा शेड ब-याच ठिकाणी गळत असुन, त्यामुळे शेडमध्ये प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी पाणी जमा होत आहे. तसेच रात्रीला लाईटच्या तिव्रतेपाशी जमा होणा-या फकडयांचा खचखळगा शेडखाली पडुन दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शेडमध्ये उभे राहतांना नाकाला रुमाल बांधुन उभे रहावे लागत आहे. अनेक दिवसापासुन रेल्वे स्थानक परीसराची साफ - सफाई केल्या गेली नसल्याची जिकडे पहावे तिकडे केरकचरा जमलेल पाणी, पिण्याच्या पाण्याजवळील तेाट्या तुटलेल्या व घाण यामुळे प्रवाशी महीला - पुरुषांना गैरसोईना सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानकावर महीला - पुरुषांसाठी शौच्चालय नसल्यामुळे उघडयावरच विधी उरकावा लागत आहे.

या ठिकाणी धनबाद सारख्या रेल्वेला थांबा देण्याची मागणी केली असतांनाही संबंधित विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे तिकीट काढण्यासाठी एकल खिडकी असल्यामुळे प्रवाशांना लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. याच वेळेत प्लॅटफार्मवर रेल्वे आल्यास तीकीटाची रांग सोडुन रेल्वेत चढण्याची वेळे प्रवाश्यांवर येते. या ठिकाणी रेल्वे थांबण्याची वेळ कमी असल्याने रल्वेत चढतांना पाय तुटने, जखमी होने, ऐवढेच नव्हे मागील 2 वर्षात जवळपास 25 ते 30 जनांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रेल्वे स्थानकावर उान पुल नसल्यामुळे प्रवाशांना एकाच वेळी दोन रेल्वे प्लॅटफार्मवर आल्यास एका रेल्वतेुन दुस-या रेल्वेत धावपळ करतांना चढ - उतर करावी लागत आहे. या प्रकारामुळे वयोवृध्द नागरीक व बालकांना आपला जिव धोक्यात टाकावा लागत आहे. या प्रकाराकडे रल्वे डिव्हीजन मॅनेजर साहेबांनी लक्ष दऊन प्रवाशांना उड्डाणपुल, आरक्षण सुविधा, शोेैच्चालय, स्थानकाची सफाई यासह अवश्यक त्या सुवीधा सेवा करुन द्याव्या अशी मागणी जोर धरत आहे.

हिमायतनगरचे रेल्वे स्थानक विदर्भ - आंध्रप्रदेशाच्या सिमेवर असल्याने मुंबई, हैद्राबात, तिरुपती, विशाखापट्टणम, मनमाड, नागपुर, राजस्थान, पंढरपुर, जयपुर असा लांब पल्याचा प्रवास करणा-यांची संख्या भरपुर आहे. परंतु येथे आरक्षण सुवीधा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव नांदेड, मुदखेड सारख्या ठिकाणी जावे लागते, तर काही वेळा येथुन जाणा-यांना टिसीला 100 ते 200 रुपये देऊन प्रवास करावा लागतो. यामुळे दक्षीण मध्य रेल्वेचे नुकसान होत आहे. नागपुर - मुंबई, अदीलाबाद - अकोला, पुर्णा- अदिलाबाद, अदिलाबाद - नांदेड इंटरसीटी एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाश्यांना रेल्वेची प्रतीक्षा करत ताटकळत रहावे लागते. लोहमार्गावर धावणा-या रेल्वेमध्ये तुटलेले आसन, शौच्चालयातील घाण, पाकीटमार, तृतीय पंथीय व भीक मागणाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यातच पॅसेंजर रेल्वेला असलेल्या कमी डब्यांची संख्या यामुळे प्रवाशी जाम वैतागले आहेत.

शनिवार, 21 जून 2014

पाणी टंचाईच्या झळा

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हिमायतनगर 
वासियांना पाणी टंचाईच्या झळाहिमायतनगर(अनिल मादसवार)उन्हाळ्यापासून सुरुवात झालेल्या पाणी टंचाईने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उग्र रूपधारण केले असून, शहर वासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जी.प.विभागाच्या दोन टैन्करद्वारे शहरातील टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जात आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेल्या हिमायतनगरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २४ हजार ७४५ च्या जवळपास आहे. सध्या हि लोकसंख्या ३० हजाराहूर जास्त झाली असून, गावाला पैनगंगा नदीवरील १९४५ मधील जुन्या नळ योजनेद्वारे प्रभाग ०१ व ०२ मधील जवळपास ५० घरांना पाणी पुरवठा केला जातो. तर अर्ध्याहून अधिक गावासाठी ग्रामपंचायती हद्दीत ५२ बोअर घेण्यात आलेले आहेत. ३० बोअर ५५० फुट खालील असून, त्यातील ४५ हून अधिक बोअर बंद तर ९ पेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उर्वरित कुपनलिकांची पाणी पातळी घटली असून, शहरात ५ हातपंप असून, ते सुद्धा नादुरुस्त व पाणी नसल्याने सध्या तरी बंद आहेत. त्यामुळे शहरातील अर्ध्या अधिक गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

आठ ठिकाणच्या विहिरीत दोन टैन्करद्वारे पाणी पुरवठा

शहरातील लाकडोबा चौक, नेहरू नगर, कोरडे गल्ली, परमेश्वर गल्ली कन्या शाळा, शब्बीर कॉलनी - खुबा मस्जिद, मुर्तुजा नगर कॉलनी, बळीरामसिंह कॉलनी, यासह शहरातील अन्य प्रभागातील नागरिकांना घाघरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जी.प.पाणी पुरवठा विभागाकडे ६ टैन्करची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दि. १४ जून पासून दोन टैन्कर दिले. त्याद्वारे शहरातील विहिरीत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र शहातील अजूनही काजी मोहल्ला, जनता कॉलनी, बजरंग चौक, कालीन्का गल्ली तसेच नव्याने झालेल्या प्रभागातील  काही भागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत असल्याचे चित्र आहे.


नळयोजना राबूनही पाणी टंचाईच्या झळा... 

मागील अनेक वर्षापूर्वी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. यावर मात करण्यासाठी मागील चार वर्षा खाली तालुक्यातील १४ टंचाई ग्रस्त गावात लोक सहभागातील पाणी पुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र  त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर योजना असताना  नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

हिमायतनगरची २.५ कोटीची योजना थंड बस्त्यात 

हिमायानगर शहराची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी येथे दोन कोटी १८ लाख ६६ हजार रुपयाची नळयोजना मंजूर झाली होती. मात्र तत्कालीन पाणी पुरवठा समिती व सचिवाने केलेल्या ७ आणि ४ अश्या ११ लाखाच्या अपहारामुळे सदर योजनेचे काम थंड बस्त्यात पडले आहे. आहे निवडणुका आल्या कि शहराची मुख्य पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन नेत्यांकडून दिले जाते. मात्र पुन्हा या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष  केले जात असल्याने अजूनही सदर योजना थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. 

याबाबत ग्राम विकास अधिकारी श्री शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि शहरातील आठ ठिकाणच्या विहिरीत २ टैन्कर द्वारे दिवसभरातून प्रत्येकी ४ ते पाच फेर्या करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे काम चालू आहे. आणखी काही भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने मागणी नुसार त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच शहरातील पाणी पुरवठा योजना दिवसेंदिवस महागाईमुळे रखडली आहे. नवीन किमतीनुसार रीवाइज करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मंजूर होतच नळयोजनेचे काम सुरु होईल असे सांगितले.   

शुक्रवार, 20 जून 2014

बोगस मतदान..!

हिमायतनगर(अनिल मादसवार)विधान परिषदेसाठी औरंगाबाद - ५ पदवीधर मतदार संघातून उमेदवार निवडीसाठी दि.२० रोजी मतदान होत असताना एका शिक्षक मतदाराच्या नावे कोण्यातरी अज्ञाताने मतदान प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडून मतदान करून गेल्याची घटना हिमायतनगर येथील जी.प.शाळेवरील मतदान केंद्रावर घडली आहे.

शुक्रवार दि. २० रोजी तालुक्यातील सर्व पदवीधर मतदारान मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जी.प.हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या केंद्रावर राजा भगीरथ विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक यु.एम.जाधव पसंतीच्या क्रमाने मतदान देण्यासाठी केंद्रावर गेले असता त्यांच्या नावाने कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने मतदान केल्याचे उघड झाले. मूळ मतदानाचा हक्क हिरावल्या जाऊ नये म्हणून मतदान केंद्राधिकारी यांनी प्रदत्त मतदान देण्याची व्यवस्था करून मतदानाचा हक्क अबाधित ठेवला. मात्र सुशिक्षित समजल्या जाणार्या मतदार संघात बोगस मतदान झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. बोगस मतदाराने निवडणूक आयोग व एका गुरुजीस मामा बनविले याची चर्चा होत आहे. आपल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी मतदाराच्या एका गटाने हे कुट्या केले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. बोगस मतदान करणारा कुणीतरी जाधवच होता काय..? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे. दरम्यान सायंकाळी ३.३० वाजता या बंदोबस्तासाठी नियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री औटे यांनी भेट देऊन पाहणी केल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी मतदान केंद्राधिकारी यु.ए.सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता नाव साधर्म्यामुळे असा प्रकार झाल्याचे सांगून, प्रदत्त मतदान करण्यात आल्याचे संगितले.

हिमायतनगर केंद्रावर ५० टक्के मतदान

दि.२० जून २०१४ रोजी पार पडलेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर येथे मतदान झाले असून, यात ४५३ पैकी २७६ मतदान ४९.९० टक्के झाले आहे. यात २५६ पुरुष मतदार व २० महिला पद्विधार्मातादारणी हक्क बजावल्याची माहिती केंद्राधिकारी यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली आहे.

दुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...

मुजोर जनावर डॉक्टरची अरेरावी...म्हणे बातम्या आल्यावर काय फरक पडणार..!
दुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर....
शेतकऱ्यांनी फोनवरून केला संताप व्यक्त  


हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार वाढल्यामुळे काल जखमी हरीनास उपचारा अभावी पाच तास विव्हळावे लागले अश्या आशयाच्या बातम्या वृत्त पत्रातून प्रकाशित होताच पित्त खवळलेल्या डॉक्टर बिरादार यांनी अरेरावी करत बातम्या आल्याने माझे काही वाकडे होणार नाही. असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा मुजोरीचे दर्शन घडवीत जनावराच्या डॉक्टरचे वागणे जनावरा सारखेच असल्याचा प्रत्यत आणून दिला आहे.

काल दि.१९ गुरुवारी २०१४ रोजी सिरंजनी येथील काही युवकांनी कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पिल्लाचा बचाव करून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले होते. परंतु या ठिकाणी सकाळी ७ वाजता उपस्थित होऊनही रुग्णालय कुलूप बंद असल्यामुळे तब्बल पाच तास उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. त्यामुळे उप - डाऊन करणाऱ्या अधिकायाच्या मनमानी काभाराबाबत पशुपालक व वन्य प्रेमी युवकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.  सदरील घटनेचे वृत्त काही पत्रकार बांधवांनी प्रकाशित केल्याने या जनावर डॉक्टरचे पित्त खवळले आणि कर्तव्यात कसूर करूनही अश्या बातम्यांनी माझे काही वाकडे होणार नाही या अविर्भावात सलग दुसर्या दिवशी हि दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णालयात हजर झालेच नाही. आज दि.२० रोजी पळसपूर, कारला पी, हिमायतनगर, यासह अनेक ग्रामीण बहुल भागातील बहुतेक शेतकरी आपली जनावरे उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र १०.३० वाजले तरी रुग्णालयास कुलूप होते. 


काल झालेल्या प्रकारामुळे तर या ठिकाणी सदर डॉक्टरने नोटीस लाऊन अकलेचे तारेच तोडले आहेत. राष्ट्रीय गर्भपात नियंत्रण कार्यक्रमामुळे रुग्णालय सकाळी ७ ते १० पर्यंत बंद राहील. अत्यावश्यक सेवेसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. तसेच शुल्लक कारणावरून फोन करून, कामात व्यत्यय आणू नये असे सुचित केले आहे. या नोटिशीवर कोणताही दिनांक टाकला नसल्याने काहीं पशुपालकांनी डॉक्टरांशी थेट संपर्क करून उपचार करण्यासाठी येण्याची विनंती केली. मात्र मुजोर डॉक्टरांनी वेळेवर येणे तर सोडाच पेपरमध्ये बातम्या आल्याच्या संतापाच्या भरात  दूरध्वनीवरून पशु पालकांना शिवीगाळ करून मुजोरीचे दर्शन घडून दिले. यावेळी निवृत्ती देवसरकर, व्यंकटराव गंगाराम, किशन कदम, राजू बनसोडे, विठ्ठल यांच्यासह काही पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. याच वेळेत वर्णउपचारक श्री बोइवार यांनी रुग्नालयात दाखल होऊन उपचारासाठी आलेल्या पशूंची तपासणी केली.  

सध्या पेरणीची धामधूम सुरु असून, शेतकरी बांधवासाठी वेळ फार महत्वाचा आहे. शेती कामासाठी पशु धनाची निगराणी व आजारापासून मुक्ती मिळून देणे यासाठी त्यांची तळमळ वाढलेली आहे. शेती कामासाठी वापरण्यात येणारी बैलजोडी, गुरे, वासरे, शेळ्या आदींना अचानक अपघात, फऱ्या, हगवण, लाळ गाळणे, सर्पदंश असे आजार उद्भवल्यास व वेळेवर उपचार न मिळाल्यास मोठ्या नुकसानीची भीती आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आता मुजोर डॉक्टरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची संतप्त प्रतिकिया उपस्थित शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. 

अश्या प्रकारे कर्तव्यात कसूर करून, भोकर येथे राहून मनमानी पद्धतीने उप - डाऊन करून १२ - १२ वाजेपर्यंत रुग्णालयात हजार न होणार्या पशुधन अधिकारी डॉक्टर बिरादार यांची तात्काळ हकालपट्टी करून पोटाच्या पोराप्रमाणे पशूना जपणाऱ्या शेतकर्यांना न्याय देण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकायाची नेमणूक या ठिकाणी करावी अशी मागणी होत आहे.        

गुरुवार, 19 जून 2014

जखमी हरण

जखमी हरण उपचाराअभावी पाच तास विव्हळले ..

हिमायतनगर(अनिल मादसवार)पाण्याच्या शोधत आलेल्या हरणाच्या पिलावर कुत्र्यांनी हल्ला चढून जखमी झालेल्या पिलास हिमायतनगर येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात गुरुवार ता. १९ रोजी सकाळी ०७ वाजता दाखल केले. मात्र वैद्यकीय तब्बल पाच तास उशिरापर्यंत हरणाला विव्हळत पडण्याची वेळ आली होती. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वाढते तापमान व जंगलातील वन्य प्राण्यांसाठी पाणवठे नसल्यामुळे मौजे सिरंजनी परिसरातील पानवठ्याकडे हरणाचा कळप दि.१९ रोजी आला होता. त्यापैकी एक हरण वाट चुकून फिरत असल्याने काही कुत्र्याच्या टोळक्याने घेरून हल्ला चढविला. यात हरणाचे पिल्लू गंभीर जखमी झाले असून, काही जागरूक युवकांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडून दुचाकीवरून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सकाळी ७ वाजता उघडणारे रुग्णालय कुलूप ९.३० वाजले तरी उघडले नसल्याने जखमी हरणास पाच तास विव्हळत बसावे लागले आहे. या बाबतची माहिती युवकांनी येथील पत्रकारांना दिली होती, त्यांनी येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी बिरादार यांना घटनेची माहिती देऊन उपचारासाठी येण्याची विनंती केली. मात्र ते भोकर येथून ये - जा करत असल्याने १२ वाजले तरी ते येथे दाखल झाले नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेले नागरीक, वन्यप्रेमी युवकांनी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. त्याच वेळी ग्रामीण भागात गाई - वासरांचा सर्वे कण्यासाठी गेलेले वर्णउपचारक श्री के.जे.बोईवार यांनी १० वाजता उपस्थिती लाऊन जखमी हरणाची पाहणी करून प्राथमिक उपचार केले. परंतु डॉक्टर बिरादार १२ वाजेपर्यंत आले नसल्याने हरणाचा योग्य तो उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेल्या युवक व नागरिकांनी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. 

यथील पशु वैद्यकीय अधिकारी हे भोकरला व पशुधन पर्यवेक्षक हे नांदेड ला राहून कारभार चालवितात. खरे पाहता कर्मचारी ग्रामीण भागात गेले असता या ठिकाणी एका तरी अधिकार्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय उघडण्याची वेळ फेबुवारी ते सप्टेंबर महिन्यात सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ आणि अक्टोबर जानेवारी महिन्यात सकाळी ८ ते ०१ आणि दुपारी ०३ ते ०५ असे ठराविक वेळापत्रक लावण्यात आलेले आहे. परंतु या वेळेनुसार रुग्नालय उघडत नसल्याने अनेक पशुपालकांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. मागील वर्षी येथील श्री परमेश्वर मंदिराचा कठाळ्या(सांड) आजाराने गंभीर होता, त्यावेळी डॉ.बिरादार हे वेळेवर न आल्याने प्राण गमवावा लागला होता. तर येथील शेतकरी श्री गाजेवार यांच्या कालवडीच्या उपचारासाठी अनेक चक्रा मारूनही उपचार झाला नाही. तर चक्क डॉक्टर बिरादार यांनी तर त्या कालवडीस नांदेड ला उपचारासाठी नेण्याचे पत्र देऊन अकलेचे तारे तोडले होते. 

अधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे एक्सपायरी औषधी उघड्यावर 

येथील पशूना वापण्यात येणारी औषधी तथा एक्सपायरी औषधी नष्ठ करण्यासठी जमिनीत पुरून ठेवणे गरजेचे असताना येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र औषधांच्या साहित्याचा ढीग पडल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पशु व पालकांना बोअर बंद असल्यामुळे पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. 

वनखात्याची उदासीनता..
अधिकार्याच्या उंटावरून शेळ्या 

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पिल्लास सिरंजनि येथील युवक रितेश नरवाडे, विकास कौठेकर, धम्मपाल मुनेश्वर यांनी पशुवैद्यकिय रूग्णालयात दाखल केले होते. याबाबतची माहिती वनपाल श्री शिंदे यांना दिली असता ते नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकत होते. तर श्री बनसोडे यांना सांगताच तुमचा एरिया माझ्याकडे नाही, असे म्हणत शिंदेना सांगा अशे उत्तर दिले. तर शिंदे यांनी एक तासांनी वनमजूर अहेमद यांना पाठून दिल्याने वनविभागाची उदासीनता दिसून आली आहे. आज सकाळी १२ च्या नंतर त्या जखमी पिलावर उपचार करण्यात आले. वनमजूर अहेमद यांनी सायंकाळी हिमायतनगर वनक्षेत्र जंगलात हरणास सोडून देणार असल्याचे सांगितले. हरणाच्या पिल्लासाठी युवकांनि दाखविलेल्या सतर्कतेने हरिणाच्या पिलास पुनर्जन्म मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

बी बियाणे- खते राख...


शोर्ट सर्किटमुळे आखाडा जळून खते -बियाण्यासह शेती साहित्य राख... 


हिमायतनगर(वार्ताहर)ऐन खरीप मोसमाच्या पेरनीच्या तयारीत शेतकरी असताना हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाडा जळून बी बियाणे- खते व शेती साहित्य जाळून राख झाल्याची घटना दि.१९ रोजी सकाळी ०५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी येथील शेतकरी संतोष पंढरी मुनेश्वर यांचे शेती गट क्रमांक २५३ मध्ये ४० तीन पत्र्याचा आखाडा बांधण्यात आला आहे. या आखाड्यात बाजूच्या खंबावरून वीज पुरवठा घेण्यात आला असून, यात शेती उपयोगी साहित्य व धान्य साठवून ठेवल्याने नेहमी जगलीवर राहत असे. दि.१८ रोजी रात्रीं जागल करून सकाळी ५ वाजता गावातील घराकडे गले असता अचानक शोर्ट सर्किट होऊन आखाड्याला आग लागली. त्यातच सकाळी वार्याच्या सुसाट वेगाने आगीने रौद्ररूप धारण केल्याने आखाडा जळू लागला. हा प्रकार परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या लक्षात येताच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आखाड्यातील गहू ०२ कु.-०४ हजार, छान ०३ कु. - ०८ हजार, खताचे पोते ४० नग- २० हजार, सोयाबीन बियाणे बैग ०३ नग - ०८ हजार ७०० रुपये, ताडपत्री १ नग - ०४ हजार, पाण्याचे इंजन - १५ हजार, स्प्रिंकलर  सेट - १२ हजार, टीन पत्रे - ४० नग - २० हजार, पाठीवरील पंप ०२ नग - ०२ हजार, शेती उपयोगी साहित्य ज्यामध्ये नांगर, वखर, फासी यासह अन्य साहित्य १० हजार असे एकूण ०१ लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. 

या घटनेमुळे ऐन पेरणीची दिवसात शेतकऱ्यावर संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरचे गत वर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हैराण असून, कशी बशी या वर्षीच्या पेरणीची तयारी केली मात्र या घटनेमुळे शेतकर्याची चिंता वाढली आहे. या नुकसानीमुळे आता खरीपाची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्यास पडला आहे. या घटनेची दाखल घेऊन तातडीने प्रशासनाने मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती या सज्जाच्या तलाठ्यास देऊनही त्यांनी पंचनामा करण्यास हजेरी लावली नसल्याने सदर शेतकर्याने नाराजी व्यक्त करून तलाठी स्थानिकला न राहता नांदेडला राहून उपडाऊन करीत असल्याचे आरोप केला आहे.  

एवढ्जेच नव्हे तर या परिसरात मागील आठ दिवसात टीन घटना घडली असून, पहिल्या घटनेत सिरंजनी येथील शेतकरी शिवाजी नारायण सूर्यवंशी वय ६५ वर्ष यांचा वीज पडून मत्यू झाला होता. तर दि.१८रोजि येथीलच शेतकरी परमेश्वर पिराजी शिल्लेवाड यांनी नापिकी व कर्जबाजरीला कंटाळून आत्महत्या केली होती. तर आज दि.१९ च्या सकाळी मुनेश्वर यांच्या शेतातील आखाड्यास आग लागून बी - बियाणे व साहित्य जाळून राख झाले. या तिन्ही घटना घडून येथे कार्यरत तलाठी शे.मोइन यांनी घटनास्थळास भेट दिली नाही असा आरोप येथील नागरिक व शेतकरी वागातून केला जात आहे. 

या बाबत शे.मोइन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, दोन्ही शेतकऱ्याचा अहवाल वरिष्ठ स्थरावर पाठविला आहे. फक्त आखाडा जळल्याचा पंचनामा राहिला असून, माझ्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही, उदयाला येउन करणार आहे.  

बुधवार, 18 जून 2014

शेतकर्याची आत्महत्या

खरीप पेरणीच्या तोंडावर अल्पभूधारक शेतकर्याची आत्महत्या


हिमायतनगर(अनिल मादसवार)ऐन खरीप हंगामाच्या पेरणीच्या तोंडावर मौजे सिरंजणी येथील परमेश्वर पिराजी सिल्लेवाड या ४० वर्षीय अल्पभूधारक शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध प्राषण करून आत्महत्या केली. सदर घटना दि.१८ रोजी सकाळी ६ वाजता सिरंजणी शिवारातील शेतातील आखाड्यावर उघडकीस आली असून, या घटनेमुळे तालुका सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गत वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने सबंध तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. याचाच फटका हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथील मयत शेतकरी परमेश्वर पिराजी सिल्लेवाड वय ४० वर्ष यांनाही बसला होता. नाल्याच्या काठावर असलेल्या शेतीत पाणी जाऊन शेतातील कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तूर हि पिके हाताची गेली. उर्वरित पिकांना जागविण्याचा प्रयत्न केला, मात्र अधून मधून होत असलेला पाऊस वातावरणातील दमटपणा त्यामुळे पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. शासनाने मदतीचा हाथभार लावला मात्र तो पेरणीपूर्व मशागतीला सुद्धा कमी पडला. कशी बशी पेरणीची तयारी केली मात्र मृग नक्षत्र लागून दहा दिवस लोटले तरी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. पाऊस बेपत्ता झाल्याने पेरणीची चिंता सतावत होती. यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती उद्भवल्यास कर्ज फिटेल कि नाही..? या चिंतेत तो होता.

त्यामुळे सदर शेतकऱ्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होण्याऐवजी वाढतच गेला आहे. गत वर्षी बैन्केकडून घेतलेले कर्ज व सहुकारी कर्ज वेळेत फेडू शकले नाही. आता २०१४ च्या पेरणीसाठी लागणारे बी - बियाणे कुठून आणणार या विवंचनेत मागील आठ दिवसपासून होता. याच विवंचनेतून परमेश्वर पिराजी सिल्लेवाड वय ४० वर्ष याने मंगळवारी रात्रीला शेतातील आखाड्यावर विषारी औषध प्राषण करून जीवनयात्रा संपविली. ऐन खरिपाच्या तोंडावर त्याच्या या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मृत्यू पश्चात आई , वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर आत्महत्या झालेल्या शेत्कायाच्या कुटुंबियांना प्रशासनाने तातडीची मदत मिळून द्यावी अशी मागणी शेतकरी, नागरिक व नातेवाइकामधून केली जात आहे.

याबाबत नांदेड न्युज लाईव्हच्या वार्ताहराने मयत शेतकऱ्याच्या घरच्यांची भेट घेऊन विचारपूस  केली असता मयताची पत्नी अंजनाबाई म्हणाल्या कि, माझ्या पतीच्या नावावर गट क्रमांक २६७ मध्ये दोन एकर शेती आहे, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने सर्व काही हिरावून नेले. त्यावेळी हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केकडून घेतलेले कर्ज व साहुकारचे देणे ०१ लाखावर गेले आहे. याची परत फेड कशी करावी तसेच मुलीच्या लग्नाची चिंता व मुलांचे शिक्षण या द्विधा मनस्थितीत ते होते. याच विवंचनेत ते आम्हाला पोरके करून गेल्याचं सांगून आता मुलांची जबाबदारी मी कशी पेलू असून म्हणत अश्रुंना वाट मोकळी करून दिली.     

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com