उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई..?

अर्धवट आय.टी.आय.इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई..?


हिमायतनगर(अनिल मादसवार)पळसपूर रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या भव्य आय.टी.आय.इमारतीचे काम मोठ्या प्रमाणावर शिल्लक असताना उद्घाटनाचा अट्टाहास कश्यापाई ..? असा सवाल नागरिक विचारीत आहेत. 

मागील काही दिवसात सहा जून रोजी आय.टी.आय.इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री, खासदार, आमदार आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे वृत्त काही वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्याने नागरिक आचम्बित झाले. बहुसंख्य काम शिल्लक असून, काम पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती इमातीचे काम करणाऱ्या सूत्रांकडून सांगण्यात आली. कासव गतीने चालू असलेल्या या कामाची मुद्दत जून २०१४ मधेच संपत असून, बरेचसे काम अर्धवट अवस्थेत आहे. संत गतीने चालू असलेल्या या कामाचे ठोस कारण उपलब्ध निधी अधिकारी वेळेवर देत नसल्याचे सांगण्यात आले. काम झाले तरीही अभियंते वेळ मारून नेत असून, टक्केवारी बहाल केल्याशिवाय देयके आदा केले जात नसल्याचे सांगण्यात येते. आय.टी.आय.इमारतीच्या कामाचा सुमार दर्जा  पाहता बी.एंड.सी.म्हणजे बस आणि नोटा छापा असेच काय अधिकार्याचे असल्याचे दिसून येत आहे.   


उद्घाटना पूर्वीच सदरील इमारतीच्या भिंतीना तडे जात असून, संरक्षण भिंत तर चक्क कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. वर्ग खोल्यांच्या चौकातीने सांधा सोडून दिला असून, कार्यशाळेच्या अंतर्गत वायरिंग, दारे, खिडक्यांची तावदाने, नाल्या बांधकाम असे मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असल्याने सदरील आय.टी.आय.इमारतीच्या अधावत अवस्थेतही उद्घाटनाचा अट्टाहास कश्यासाठी धरण्यात आला ...? असा सवाल नागरिक विचारीत आहेत. 

या विषयी शाखा अभियंता जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, उद्घाटनाचे नक्की ठरले नसून, याचा निर्णय कार्यकारी अभियंता हे पाहणी करूनच घेतील. सदरील इमारतीचे अंदाजपत्रकीय मुल्य ६ कोटी ५० लाख असल्याचे सांगून आज पर्यंत ४ कोटी ५० लाखाचा निधी गुत्तेदारास आदा करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.      

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी