उत्सवात शांतता नांदते

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील हिंदू - मुस्लिम तथा सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने नांदतात हे नांदेड जिल्ह्यासाठी भूषणावह असून, सर्वच सन - उत्सवात गावात शांतता नांदते असे मत माजी जी.प.सदस्य समदखान यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर पोलिस स्थानकात दि.२८ रोजी पार पडलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे, प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड, पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे, सहाय्यक पो.नि.सुशील चव्हाण आदींसह शहरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिमायतनगर येथील पोलिस अधिकार्याच्या हलगर्जीपणा बाबतच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यात प्रामुख्याने विसा - पासपोर्ट साठीच्या जास्त असून, आपल्याकडे प्रस्ताव येताच तातडीने त्याचा निपटारा करून वरिष्ठांना पाठवावे जेणे करून संबंधिताना पुढील कार्यवाहीसाठी खेटे मारावे लागणार नाहीत. असे सुचित करून येथील सर्व - सन उत्सावात्सव समाज बांधव एकमेकांना शुभेच्छा देऊन सुख दुखत सामील होतात. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बंधुभाव व शांतता हा जिल्ह्यासाठी आदर्श असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रभारी तहसीलदार यांनी उपस्थितांना सनवारात उद्भवणाऱ्या समस्यांचा निपटारा करून शांततेत उत्सव साजरे करणे आपले अद्य कर्तव्य असल्याचे सांगून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्षीय भाषणात उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे म्हणाले कि, मागील अनेक वर्षपासून हिमायतनगर शहराच्या शांततेची गाथा ऐकत आणि पाहत आहे. तीच परंपरा यावर्षी सुद्धा शांतता कायम ठेऊन नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या सेवेसाठी आमचे पोलिस दल सदैव आपल्या पाठीशी आहेत. येणाऱ्या अडचणीसाठी नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क करून समस्यांचा निपटारा करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना बोलताना केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे विजय शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, माधव बिंगेवार, कमलबाई मादसवार, बळवंत जाधव, साईनाथ कोमावार, फेरोज खान, मन्नान भाई, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, सुरज दासेवार, शिवसेनेचे जाफर भाई, श्याम जक्कलवाड, राष्ट्रवादीचे सुभाष शिंदे, सरदार खान, चंद्रकलाबाई गुड्डेटवार, सादिक चातारकर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार प्रकाश जैन, कानबा पोपलवार, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, यांच्यासह अनेक हिंदू - मुस्लिम नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी मागील आठ दिवसात तीन शेतकऱ्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्या, यात चोरट्यांनी शेतकर्यांना चाकूचा धाक दाखून थेट बैलजोड्या टेम्पोत बसविल्याची माहिती तुप्तेवार यांनी देऊन, सदर चोरट्या सोबत तालुक्यातील एका व्यक्तीचा हात आहे. याची माहिती पोलिसांना देऊनही त्यास अटक तर सोडच साधी विचापूस सुद्धा केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यास कांबळे यांनी दुजोरा देत तातडीने शेतकयांच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करीत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी