पुराच्या धोक्याची शक्यता

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड -किनवट राज्य रस्त्यावरील ओढ्यात बेश्रमाच्या झाडांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाला बेश्रममय झाला आहे. यातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन, पुराचा धोका शहराला बसण्याची शक्यता आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शहरानजीकच्या ओढ्यातील बेशरमास हटउन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, हे शहर आंध्रप्रदेश विदर्भाच्या सीमेवर आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या - जाण्याची नेहमीच वर्दळ असते, शहरात येणारा नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील मार्गावर मोठा ओढा आहे. याचा ओढ्याच्या पुलावरून रेल्वे स्थानक, भोकर, हदगाव, नांदेडकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील रेल्वे कोर्नरवरील ओढ्यात व संपूर्ण परिसराला बेश्रमाच्या झाडणी व्यापले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत बेश्रमाचीच हिरवीगार झाडे दिसत असून, याच नाल्याला पावसाळ्यात मोठा पूर येउन संपूर्ण गावाला वेढा पडतो. याचा अनुभव गत वर्षीच्या अतिवृष्टीत वाहनधारक, नागरिक व शहरवासियांना आला होता. त्यावेळी तब्बल ५ ते ६ तास वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेकांची वाहने वाहून जाऊन नुकसान झाले, तसेच काही गावाचा संपर्क तुटला होता.

यास कारण ठरले ते बेश्रामाने व्यापलेला परिसर कारण त्यामुळे पावसाचे पाणी थेट ओढ्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरात पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. याच नाल्यात पाणी जमा राहून पुढे मार्ग नसल्याने शहरातील वार्ड क्र.३ रहिम कॉलनी, उमर चौक, रुख्मिणी नगर परिसरातील नूतन वस्तीत शिरले होते. त्यामुळे तोच प्रकार एकदम येणाऱ्या पावसामुळे घडू शकतो. तेंव्हा आगामी काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच शहराचा धोका टाळण्यासाठी जी.प.प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जुन्याजानकारातून व्यक्त होत आहे.

मागील चार वर्षापूर्वी या नाल्यातील गाळ व बेश्रमाची झाडे तोडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून नाल्याचे सरळीकरण ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आले होते. परंतु त्यानंतर हा नाला पूर्णतः गाळ आणि बेश्रमाच्या झाडणी व्यापला असून, यासाठी ग्राम पंचायत स्तरावर खर्च करणे अशक्य नसल्याचे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी