पाण्यासाठी प्रार्थना...

रकात नमाज आदा करून अल्लाहकडे पाण्यासाठी प्रार्थना... 


हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध महाराष्ट्रात पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. तर चारा व पाण्यावाचून प्राणी मात्रानाही झळा  सोसाव्या लागत आहेत. यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी हिंदू बांधव एकीकडे देवी देवतांना साकडे घालत असताना दुसरीकडे मुस्लिम समाज बांधवांनी इदगाह मैदानावर दोन रकात नमाज आदा करून अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केली आहे. 

मान्सूनने पाठ फिरविल्यामुळे  रुसलेल्या निसर्गाला धरतीवर बरसण्यासाठी एकीकडे हिंदू बांधव शेतकऱ्यांच्या वतीने दिंड्या, पंगती, घड, जलाभिषेक करून साकडे घातले जात असताना दुसरीकडे मुस्लिम समाजातील शेतकरी व सामान्य बांधवांनी अल्लाहला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरातील शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी दि.२८ रोजी सकाळी ९.३० वाजता इदगाव मैदानावारेकात्र जमून सामुहिक नमाज आदा केली. या वेळी खालील मौलाना यांनी नमाज पठाण केले, यावेळी उपस्थितांनी नमाज पडून अल्लाहला पाऊस पाणी पडू दे..रान सारे भिजू दे .. अश्या शब्दात मन्नत मागून दुवा मागितली. यावेळी मौलाना यांनी आशयचा पद्दतीने सलग तीन दिवस म्हणजे २९ आणि ३० जून रोजी सुद्धा सकाळी ९.३० वाजता रकात नमाज आदा करून मन्नत मागली जाणार आहे, त्यासाठी सर्वांनी आपल्याकडे असलेल्या पाळीव गाय, बैल, म्हैस, बकरी यासह अन्य प्राण्यांना सोबत घेऊन येण्याच्या सूचना केल्या. कारण पावसाभावी पशु - प्रण्यानाही झळा सोडाव्या लागत असून, चारा - पाण्याची मोठी पंचाईत झाली आहे. तेंव्हा अल्लाला आपण तर दुवा करतच आहोत पण, प्राण्यांच्याही दुवामुळे कदाचित अल्लाह प्रसन्न होऊन, जोरदार पाऊस बरसेल अशी रास्त अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. यावेळी माजी जी.प.सदस्य समद खान, सदर खान, शकील भाई, फाहद खान, अ.अजीज, हाफिज अ.अजीम, शे.सादुल्ला भाई, शकील भाई, यांच्यासह जवळपास २०० ते ३०० नागरिक व बालकांनी उपस्थिती लावली होती.  


सिरंजनी येथील महिलांची पावसासाठी दिंडी 


सिरंजनी(वार्ताहर)येथील वाकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या महिला व पुरुषांनी पावसासाठी देवी देवतांना साकडे घालून पैनगंगा नदी पर्यंत पाई दिंडी काढली होती. या दिंडीत ताल मुदंगाच्या तालात लहान बालके सुद्धा सामील झाल्याचे दिसून आले. 

मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह, सामान्य जनता व पशु प्राणी हैराण झाले आहे. यापूर्वी तर पाण्याची चिंता होती आता मात्र पशूंच्या खाद्य व चारा टंचाईची समस्या वाढली आहे. पाऊस पडला असता तर सर्वत्र हिरवेगार तृणाची निर्मित्ती होऊन काही अंशी चार्याचा प्रश्न सुटला असता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने सर्वत्र वळवांटा सारखी स्थिती निर्माण झाली असल्याने कोरडा दुष्काळाचे सावट  सदृश्य परिस्थिती दिसत आहे. यावर मात कारणासाठी पाऊस पडणे गरजेचे असताना मृग नक्षत्र कोरडे गेले, आता आर्द्रानक्षत्र सुद्धा कोरडेच जात आहे. जून महिना संपत आला असताना आता तरी वरून राजाची कृपा होईल या आशेने सर्व स्तरातून देवी- देवतांना साकडे घातले जात आहे. याच उद्देशाने सिरंजनीच्या भजनी मंडळाचे मारोती सिल्लेवाड, सुभाष महाराज, बाबू घुंगरे, श्याम भाराने, गणेश भिंबरवाड, बंडू दिवटेवाड, लक्ष्मीबाई देशमाने, परमेश्वर गम्पलवाड,   यांच्यासह शेकडो महिला - पुरुष बालक व वृद्धांनी सहभाग घेऊन एकंबा येथील कानोबा, सिरंजनी येथील मारुती आणी धुरपतमाई सह अन्य देवी देवतांना पैनगंगा नदीवरून आणलेल्या पाण्याने  जलाभिषेक करून पाऊस पाणी पडून सुगीचे दिवस येऊ दे अशी विनवणी केली आहे.      

                

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी