जखमी हरण

जखमी हरण उपचाराअभावी पाच तास विव्हळले ..

हिमायतनगर(अनिल मादसवार)पाण्याच्या शोधत आलेल्या हरणाच्या पिलावर कुत्र्यांनी हल्ला चढून जखमी झालेल्या पिलास हिमायतनगर येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात गुरुवार ता. १९ रोजी सकाळी ०७ वाजता दाखल केले. मात्र वैद्यकीय तब्बल पाच तास उशिरापर्यंत हरणाला विव्हळत पडण्याची वेळ आली होती. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, वाढते तापमान व जंगलातील वन्य प्राण्यांसाठी पाणवठे नसल्यामुळे मौजे सिरंजनी परिसरातील पानवठ्याकडे हरणाचा कळप दि.१९ रोजी आला होता. त्यापैकी एक हरण वाट चुकून फिरत असल्याने काही कुत्र्याच्या टोळक्याने घेरून हल्ला चढविला. यात हरणाचे पिल्लू गंभीर जखमी झाले असून, काही जागरूक युवकांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडून दुचाकीवरून हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सकाळी ७ वाजता उघडणारे रुग्णालय कुलूप ९.३० वाजले तरी उघडले नसल्याने जखमी हरणास पाच तास विव्हळत बसावे लागले आहे. या बाबतची माहिती युवकांनी येथील पत्रकारांना दिली होती, त्यांनी येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी बिरादार यांना घटनेची माहिती देऊन उपचारासाठी येण्याची विनंती केली. मात्र ते भोकर येथून ये - जा करत असल्याने १२ वाजले तरी ते येथे दाखल झाले नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेले नागरीक, वन्यप्रेमी युवकांनी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. त्याच वेळी ग्रामीण भागात गाई - वासरांचा सर्वे कण्यासाठी गेलेले वर्णउपचारक श्री के.जे.बोईवार यांनी १० वाजता उपस्थिती लाऊन जखमी हरणाची पाहणी करून प्राथमिक उपचार केले. परंतु डॉक्टर बिरादार १२ वाजेपर्यंत आले नसल्याने हरणाचा योग्य तो उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेल्या युवक व नागरिकांनी डॉक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला. 

यथील पशु वैद्यकीय अधिकारी हे भोकरला व पशुधन पर्यवेक्षक हे नांदेड ला राहून कारभार चालवितात. खरे पाहता कर्मचारी ग्रामीण भागात गेले असता या ठिकाणी एका तरी अधिकार्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय उघडण्याची वेळ फेबुवारी ते सप्टेंबर महिन्यात सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ आणि अक्टोबर जानेवारी महिन्यात सकाळी ८ ते ०१ आणि दुपारी ०३ ते ०५ असे ठराविक वेळापत्रक लावण्यात आलेले आहे. परंतु या वेळेनुसार रुग्नालय उघडत नसल्याने अनेक पशुपालकांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. मागील वर्षी येथील श्री परमेश्वर मंदिराचा कठाळ्या(सांड) आजाराने गंभीर होता, त्यावेळी डॉ.बिरादार हे वेळेवर न आल्याने प्राण गमवावा लागला होता. तर येथील शेतकरी श्री गाजेवार यांच्या कालवडीच्या उपचारासाठी अनेक चक्रा मारूनही उपचार झाला नाही. तर चक्क डॉक्टर बिरादार यांनी तर त्या कालवडीस नांदेड ला उपचारासाठी नेण्याचे पत्र देऊन अकलेचे तारे तोडले होते. 

अधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे एक्सपायरी औषधी उघड्यावर 

येथील पशूना वापण्यात येणारी औषधी तथा एक्सपायरी औषधी नष्ठ करण्यासठी जमिनीत पुरून ठेवणे गरजेचे असताना येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र औषधांच्या साहित्याचा ढीग पडल्याचे दिसून आले. तसेच या ठिकाणी येणाऱ्या पशु व पालकांना बोअर बंद असल्यामुळे पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे. 

वनखात्याची उदासीनता..
अधिकार्याच्या उंटावरून शेळ्या 

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पिल्लास सिरंजनि येथील युवक रितेश नरवाडे, विकास कौठेकर, धम्मपाल मुनेश्वर यांनी पशुवैद्यकिय रूग्णालयात दाखल केले होते. याबाबतची माहिती वनपाल श्री शिंदे यांना दिली असता ते नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकत होते. तर श्री बनसोडे यांना सांगताच तुमचा एरिया माझ्याकडे नाही, असे म्हणत शिंदेना सांगा अशे उत्तर दिले. तर शिंदे यांनी एक तासांनी वनमजूर अहेमद यांना पाठून दिल्याने वनविभागाची उदासीनता दिसून आली आहे. आज सकाळी १२ च्या नंतर त्या जखमी पिलावर उपचार करण्यात आले. वनमजूर अहेमद यांनी सायंकाळी हिमायतनगर वनक्षेत्र जंगलात हरणास सोडून देणार असल्याचे सांगितले. हरणाच्या पिल्लासाठी युवकांनि दाखविलेल्या सतर्कतेने हरिणाच्या पिलास पुनर्जन्म मिळाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी