बी बियाणे- खते राख...


शोर्ट सर्किटमुळे आखाडा जळून खते -बियाण्यासह शेती साहित्य राख... 


हिमायतनगर(वार्ताहर)ऐन खरीप मोसमाच्या पेरनीच्या तयारीत शेतकरी असताना हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील आखाडा जळून बी बियाणे- खते व शेती साहित्य जाळून राख झाल्याची घटना दि.१९ रोजी सकाळी ०५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी येथील शेतकरी संतोष पंढरी मुनेश्वर यांचे शेती गट क्रमांक २५३ मध्ये ४० तीन पत्र्याचा आखाडा बांधण्यात आला आहे. या आखाड्यात बाजूच्या खंबावरून वीज पुरवठा घेण्यात आला असून, यात शेती उपयोगी साहित्य व धान्य साठवून ठेवल्याने नेहमी जगलीवर राहत असे. दि.१८ रोजी रात्रीं जागल करून सकाळी ५ वाजता गावातील घराकडे गले असता अचानक शोर्ट सर्किट होऊन आखाड्याला आग लागली. त्यातच सकाळी वार्याच्या सुसाट वेगाने आगीने रौद्ररूप धारण केल्याने आखाडा जळू लागला. हा प्रकार परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या लक्षात येताच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आखाड्यातील गहू ०२ कु.-०४ हजार, छान ०३ कु. - ०८ हजार, खताचे पोते ४० नग- २० हजार, सोयाबीन बियाणे बैग ०३ नग - ०८ हजार ७०० रुपये, ताडपत्री १ नग - ०४ हजार, पाण्याचे इंजन - १५ हजार, स्प्रिंकलर  सेट - १२ हजार, टीन पत्रे - ४० नग - २० हजार, पाठीवरील पंप ०२ नग - ०२ हजार, शेती उपयोगी साहित्य ज्यामध्ये नांगर, वखर, फासी यासह अन्य साहित्य १० हजार असे एकूण ०१ लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. 

या घटनेमुळे ऐन पेरणीची दिवसात शेतकऱ्यावर संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अगोदरचे गत वर्षीच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हैराण असून, कशी बशी या वर्षीच्या पेरणीची तयारी केली मात्र या घटनेमुळे शेतकर्याची चिंता वाढली आहे. या नुकसानीमुळे आता खरीपाची पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्यास पडला आहे. या घटनेची दाखल घेऊन तातडीने प्रशासनाने मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती या सज्जाच्या तलाठ्यास देऊनही त्यांनी पंचनामा करण्यास हजेरी लावली नसल्याने सदर शेतकर्याने नाराजी व्यक्त करून तलाठी स्थानिकला न राहता नांदेडला राहून उपडाऊन करीत असल्याचे आरोप केला आहे.  

एवढ्जेच नव्हे तर या परिसरात मागील आठ दिवसात टीन घटना घडली असून, पहिल्या घटनेत सिरंजनी येथील शेतकरी शिवाजी नारायण सूर्यवंशी वय ६५ वर्ष यांचा वीज पडून मत्यू झाला होता. तर दि.१८रोजि येथीलच शेतकरी परमेश्वर पिराजी शिल्लेवाड यांनी नापिकी व कर्जबाजरीला कंटाळून आत्महत्या केली होती. तर आज दि.१९ च्या सकाळी मुनेश्वर यांच्या शेतातील आखाड्यास आग लागून बी - बियाणे व साहित्य जाळून राख झाले. या तिन्ही घटना घडून येथे कार्यरत तलाठी शे.मोइन यांनी घटनास्थळास भेट दिली नाही असा आरोप येथील नागरिक व शेतकरी वागातून केला जात आहे. 

या बाबत शे.मोइन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, दोन्ही शेतकऱ्याचा अहवाल वरिष्ठ स्थरावर पाठविला आहे. फक्त आखाडा जळल्याचा पंचनामा राहिला असून, माझ्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही, उदयाला येउन करणार आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी