प्रशासनाचे दुर्लक्ष

हिमायतनगर(अनिल मादसवार)मीटरगेचजे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाल्यानंतर सर्व सोई सुवीधा मिळतील अशी आपेक्षा हिमायतनगरवासीयांसह प्रवाशांना होती. येथील रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने प्रवाशांच्या आशा धुळीस मिळल्याचे चित्र येथील रेल्वे स्थानक परीसरात दिसत आहे. येथे येणा-या जाणा-या प्रवाश्यांना घाणीच्या साम्राज्य बरोबर, सवच्छता गृह, वेटींग हॉल, प्रवाशी शेड, आरक्षण, उडडान पुलांचा अभावामुळे गैरसोईंना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकाराकडे संबंधीतांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांतुन होते आहे.

हिमायतनगर शहर ह तालुक्याचे ठिकाण असुन, या ठिकाणची बाजारपेठ मोठी आहे. रेल्वे स्थानकातील शेड प्रवाशांना अपुरा पडत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात तर पावसाळ्याच्या दिवसात पावसात भीजावे लागते. सिमेंट पत्र्याचा शेड ब-याच ठिकाणी गळत असुन, त्यामुळे शेडमध्ये प्रवाशी बसण्याच्या ठिकाणी पाणी जमा होत आहे. तसेच रात्रीला लाईटच्या तिव्रतेपाशी जमा होणा-या फकडयांचा खचखळगा शेडखाली पडुन दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शेडमध्ये उभे राहतांना नाकाला रुमाल बांधुन उभे रहावे लागत आहे. अनेक दिवसापासुन रेल्वे स्थानक परीसराची साफ - सफाई केल्या गेली नसल्याची जिकडे पहावे तिकडे केरकचरा जमलेल पाणी, पिण्याच्या पाण्याजवळील तेाट्या तुटलेल्या व घाण यामुळे प्रवाशी महीला - पुरुषांना गैरसोईना सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानकावर महीला - पुरुषांसाठी शौच्चालय नसल्यामुळे उघडयावरच विधी उरकावा लागत आहे.

या ठिकाणी धनबाद सारख्या रेल्वेला थांबा देण्याची मागणी केली असतांनाही संबंधित विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे तिकीट काढण्यासाठी एकल खिडकी असल्यामुळे प्रवाशांना लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. याच वेळेत प्लॅटफार्मवर रेल्वे आल्यास तीकीटाची रांग सोडुन रेल्वेत चढण्याची वेळे प्रवाश्यांवर येते. या ठिकाणी रेल्वे थांबण्याची वेळ कमी असल्याने रल्वेत चढतांना पाय तुटने, जखमी होने, ऐवढेच नव्हे मागील 2 वर्षात जवळपास 25 ते 30 जनांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रेल्वे स्थानकावर उान पुल नसल्यामुळे प्रवाशांना एकाच वेळी दोन रेल्वे प्लॅटफार्मवर आल्यास एका रेल्वतेुन दुस-या रेल्वेत धावपळ करतांना चढ - उतर करावी लागत आहे. या प्रकारामुळे वयोवृध्द नागरीक व बालकांना आपला जिव धोक्यात टाकावा लागत आहे. या प्रकाराकडे रल्वे डिव्हीजन मॅनेजर साहेबांनी लक्ष दऊन प्रवाशांना उड्डाणपुल, आरक्षण सुविधा, शोेैच्चालय, स्थानकाची सफाई यासह अवश्यक त्या सुवीधा सेवा करुन द्याव्या अशी मागणी जोर धरत आहे.

हिमायतनगरचे रेल्वे स्थानक विदर्भ - आंध्रप्रदेशाच्या सिमेवर असल्याने मुंबई, हैद्राबात, तिरुपती, विशाखापट्टणम, मनमाड, नागपुर, राजस्थान, पंढरपुर, जयपुर असा लांब पल्याचा प्रवास करणा-यांची संख्या भरपुर आहे. परंतु येथे आरक्षण सुवीधा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव नांदेड, मुदखेड सारख्या ठिकाणी जावे लागते, तर काही वेळा येथुन जाणा-यांना टिसीला 100 ते 200 रुपये देऊन प्रवास करावा लागतो. यामुळे दक्षीण मध्य रेल्वेचे नुकसान होत आहे. नागपुर - मुंबई, अदीलाबाद - अकोला, पुर्णा- अदिलाबाद, अदिलाबाद - नांदेड इंटरसीटी एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाश्यांना रेल्वेची प्रतीक्षा करत ताटकळत रहावे लागते. लोहमार्गावर धावणा-या रेल्वेमध्ये तुटलेले आसन, शौच्चालयातील घाण, पाकीटमार, तृतीय पंथीय व भीक मागणाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे. त्यातच पॅसेंजर रेल्वेला असलेल्या कमी डब्यांची संख्या यामुळे प्रवाशी जाम वैतागले आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी