NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

रविवार, 7 अप्रैल 2019

हेमंत पाटलांच्या प्रचारासाठी भाजपा महिला आघाडी व भाजपा कार्यकर्ते मैदानात

भाजपा-सेना महायुतीचे हिंगोली मतदार संघाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ सौ राजश्री  पाटील यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद गटात मतदारांच्या भेटी गाठी घेऊन मताधिक्याने निवडणून आणण्याचे आव्हान केले आहे.

हिमायतनगर भेटीदरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील पुरुष व महिलां आघाडीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर चौफेर हल्ला  
सीमेवर देशाची सुरक्षा करणार्‍या जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था आज टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसह जे कोणी या जहाजात बसले, ते दररोज डुबण्याच्या अवस्थेत आहेत, कोणी आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे, अशा घणाघाती शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या विराट सभेत काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला.

पुणे शहरातून अल्पवयीन बालिकेला पळवून आणणारा युवक कुंटूर पोलिसांच्या ताब्यात

पुणे शहरातून एका 14 वर्षीय बालिकेला पळवून आणून निझामाबाद येथे काही महिने राहिलेल्या नायगाव तालुक्यातील एका युवकाला कुंटूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.आज पुणे पोलीस येणार असून पुढील कार्यवाहीसाठी त्या युवकाला घेऊन जाणार आहेत.

जानेवारी महिन्यापासून कुंटूर पोलीस वजिरागाव ता.नायगाव येथील युवक श्यामसुंदर गौतम भदरगेचा

नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा शुभारंभ... साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी सर्वत्र नवीन वर्षांचं जल्लोषात स्वागत होत आहे. स्वागत यात्रांच्या माध्यमातून मराठमोळ्या परंपरेचं दर्शन घडवलं जात आहे. याच उत्साहमयी वातावरणात काहीशा वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

नूतन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी सोशल मीडियाच्या

अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणातून सर्व माहिती जाणून घ्यावी

अभिनव गोयल यांचे आवाहन 

किनवट तालुक्यातील सर्व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणातून सर्व इत्यंभूत माहिती जाणून घ्यावी आणि आत्मविश्वासाने मतदान प्रक्रियेला सामोरे जावे, असे प्रतिपादन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.   

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने

अंत्ययात्रेला पाणी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक... वृद्ध ठार

किनवट तालुक्यातील कोठारी (सि.) ते जरूर मार्गावरून अंत्ययात्रेसाठी पायी चालत जाणार्‍या वृद्ध नागरिकास, पाठीमागून एका दुचाकीने भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले. हा दुर्देवी अपघात आज रविवारी (दि.07) दुपारी 12.40 वाजता घडला असून, दुचाकी चालविण्यार्‍या नवयुवकाविरुद्ध मांडवी पो.स्टे.अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

16 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण दि.7 एप्रिल रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरवात अरुण डोंगरे जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दृकश्राव्य संदेशाने झाली. या संदेशाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांनी परिपूर्ण प्रशिक्षण घेवून टपाली मतदानाचाही लाभ घ्यावा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन अरूण डांगरे यांनी

7 महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या करून नवऱ्याची आत्महत्या

11 महिन्यांपुर्वीच झाले होते लग्न 
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर येथे बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या सात महिन्याची गरोदर गरोदर महिलेची साडीने गळादाबून हत्या झाली आहे.  तिच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी गंगाधर गवाले (वय 21) यांचा मृतदेह घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळला तर त्याच घरात दांडीला दोरी बांधून तिचा पती गंगाधर भुजंग गवाले (वय 23) यांनी गळफास घेऊन सासुरवाडीतच आत्महत्या केली आहे.

आता अवैध रेती वाहतुकीसह काळी माती, गिट्टीची वाहनेही जप्त

वाहन मालकांचा प्रशासनाच्या नावाने शिमगा
बिलोलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यातील मांजरा व गोदावरी नदी पात्रातुन रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या रेती तस्करांना सळो की पळो करुन सोडणारे येथील तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात महसुलामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत असले तरी दुसऱ्या बाजूला आता काळ्या मातीचे वाहन व गिट्टीचे वाहने जप्त केल्यामुळे वाहन धारकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर छिद्र करून सरपंचाने केली पाण्याची चोरी

इस्लापूरच्या पाणी पुरवठा पाईप लाईनवर ड्रिल मशीनने छिद्र पाडून स्वत: सरपंचाच्या विहीरीमध्ये पाणी नेण्याचा प्रकार उघडा झाला आहे, या सरपंचावर  कार्यवाही होईल काय असा प्रश्न इस्लापूर येलि नागरिकांना पडला आहे.

इस्लापूर पाणीपुरवठा सहस्त्रकुंड येथून पाणीपुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, परंतु त्यावेळेस सहस्त्रकुंडलाच पाणी भरपूर होते. त्यामुळे ते कुणालाच लक्षात आले नाही. परंतु या दोन-तीन वर्षांपासून इस्लापूर नगरीला पाण्याची झळ जास्तच सोसावी

उमरी येथे एका युवकाचा खून; महिलांनी नातलगावर केला जीवघेणा हल्ला

मला भिकारी का म्हटलास या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणातील जखमी मरण पावल्याने हा खूनाचा गुन्हा उमरी पोलीसांनी 6 एप्रिल रोजी दाखल केला आहे. आपल्या सासऱ्याच्या तेरवी कार्यक्रमात आलेल्या एका जावयावर नांदेडमध्ये कांही महिलांनी जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

या बाबतची सविस्तर हकीकत अशी की, दि.28 मार्च 2019 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान रामू

वोट करेगा, वोट करेगा... सारा नांदेड वोट करेगा...

या घोषवाक्यांनी नांदेड शहर दुमदुमले 

नांदेड जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी देणाऱ्या सरकारची निर्मिती आपल्या मताने होते, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची नांदेड शहरातून वॉक फॉर वोट (पदयात्रा) काढण्यात आली.

आचारसंहितेला केराची टोपली दाखून हिमायतनगर शहरात विकासाची कामे सुरु

आचारसंहितेचा भंग आणि निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी 

 सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे, यावेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मते मिळावीत म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांनी नारळ हिमायतनगरात १२ कोटीच्या विकास कामाचे नारळ फोडून, उद्घाटन, भूमिपूजन करून, विकास कामाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्यावर जोर दिला आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश विकास कामाचे नारळ फोडून अजूनही ती कामे जैसे थेच असून, नव्याने उपलब्ध झालेल्या निधीची कामे आचारसंहितेच्या नियमांना बगल देत

लोकसभा निवडणूक / वैयक्तिक पातळीवर टीका

शिवसेनाचा भाषणावर जोर काँग्रेसचा संयमी प्रचार 
वंचिंत आघाडीही फार्मात
विकासाबाबत होत नाही चर्चा  

हिगोली लोकसभा मतदार संघात एकुण २८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रमुख पक्षाचे उमेदवार
काँग्रेसचे सुभाष वानखेडे, शिवसेनेकडून भाजपा युतीचे नादेड दक्षिणचे आ. हेमत पाटील, वंचित बहुजन  आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत सध्या तरी दिसुन येत आहे. अन्य उमेदवार माञ गेले कुठे अशी परिस्थिती दिसुन येत असून, हिगोली लोकसभा मतदार संघात हदगाव विधानसभा क्षेत्र हे निवडणूक काळात जाहीर सभाना उतु येणारा क्षेत्र म्हणून गणल्या जायच. माञ या निवडणूकीत चिञ वेगळेच दिसुन येत आहे.

वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडली

मो जावेद यांनी केली घरकुल ठेकेदारांची कानउघडणी