लोकसभा निवडणूक / वैयक्तिक पातळीवर टीका

शिवसेनाचा भाषणावर जोर काँग्रेसचा संयमी प्रचार 
वंचिंत आघाडीही फार्मात
विकासाबाबत होत नाही चर्चा  

हिगोली लोकसभा मतदार संघात एकुण २८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रमुख पक्षाचे उमेदवार
काँग्रेसचे सुभाष वानखेडे, शिवसेनेकडून भाजपा युतीचे नादेड दक्षिणचे आ. हेमत पाटील, वंचित बहुजन  आघाडीचे मोहन राठोड अशी तिरंगी लढत सध्या तरी दिसुन येत आहे. अन्य उमेदवार माञ गेले कुठे अशी परिस्थिती दिसुन येत असून, हिगोली लोकसभा मतदार संघात हदगाव विधानसभा क्षेत्र हे निवडणूक काळात जाहीर सभाना उतु येणारा क्षेत्र म्हणून गणल्या जायच. माञ या निवडणूकीत चिञ वेगळेच दिसुन येत आहे.
सध्या तरी प्रमुख उमेदवार याच्या एकही सभा झाल्या नाहीत हे आवर्जून उल्लेख कराव लागेल. आता पुढच्या दिवसात कोणते चिञ असेल हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.

एकीकडे हदगाव विधान सभा क्षेत्रांत समस्यांचा डोगर उभे आसताना निस्तारण्याचीही भाषा या  होणाऱ्या लोकसभाच्या निवडणूकीत प्रचार सभेतुन होताना दिसुन येत नाही. विकासाची चर्चा तर होतच नाही उलट वैयक्तिक पातळीवर जावुन एकमेकावर टीकाटिपणी होताना दिसुन येत आहे. यामुळे समोर  महीला बसल्या आहेत याचे पण भान काही जबाबदार नेत्यांना राहिले नाही. हे शुक्रवारच्या एका पक्षाच्या सभेत दिसुन आले आहे. या लोकसभाच्या निवडणूकीत हदगाव विधानसभा क्षेत्रांत माञ शिवसेनेची गर्दी खेचेल असा नेता नाही. सेनेचे लोकसभा उमेदवार हेमत पाटील हे उमेदवार लादलेले आहेत हे सागण्यात आता काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुभाष वानखेडे कसर सोडीत नाहीत. आपल्या बोली भाषेत पटवुन देण्यात त्यांचा भर दिसुन येत आहे. इतर उमेदवार लायक असताना हा उमेदवार का लादला..? असा सवाल टाकुन ते मतदारांना सागत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम [कोहळीकर] माञ याची भुमिका सेना भाजपा युतीचे उमेदवार करिता फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण जेव्हा त्यांची नादेड जिल्हा प्रमुख पदी उंचलबागडी झाली आसताना त्यानी त्यावेळी हदगाव विधानसभा क्षेत्रांत असणा-या प्रमुख शिवसैनिकांनी बाबुराव कदम [कोहळीकर] याना संख्या रुपी दाखविलेले प्रेम हे जिल्ह्यातील ईतर पक्षाना बुचकाळ्यात टाकणारे होते. बाबुराव कदम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.... अश्या घोषणाने त्यांचे  [कोहळी] हे गाव दुमदुमले होते. त्यावेळी सेनेच्या नेत्या संबधी माञ उपस्थित शिवसैनिकात रोष दिसुन येत होता. त्यामुळे हदगाव विधानसभा क्षेत्रांत लोकसभाच्या निवडणूकीत इतर नेत्यापेक्षा बाबुरावांनी भुमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. तसेच विद्यमान आमदारांनी ४ वर्षात लक्षात राहील असे एकही काम केले नसल्याने त्यांच्या प्रचाराच्या भूमिकेमुळे शिवसेनेचे मताधिक्य वाढण्याऐवजी कमी होण्याची शकयता नाकारता येत नाही.

माजी खा.सुभाष वानखेडे हे पूर्वी शिवसेनेचे खासदार असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत ते सेनेत जाण्याची इच्छा धरून होते. त्याला कारण होते सध्याचे नादेडचे आमदार व सेना युतीचे हिगोली लोकसभाचे उमेदवार हेमत पाटील हे शिवसेने माजी खा सुभाष वानखेडे यांचे जिगरी मिञ पण आहेत. माजी खा. सुभाष वानखेडे हे शिवसेनेतील अतर्गत गटबाजीमुळे वैतागून ते २०१४ च्या दरम्यान नादेड जिल्ह्याच्या काँग्रेसच्या काही दिग्ज नेत्याच्या नादात भाजपात शामिल झाले होते. पण स्वभाव बोलका असल्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री व भाजपाचे प्रदेशअध्यक्ष याचेशी संबध वाढू लागाल्याने त्यानी मरगळलेली भाजपाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. माञ जिल्ह्यातीलचा काही भाजपाच्या स्थानिकाना ते रुचले नाही व त्यानी माजी खा. सुभाष वानखेडे याच्या विरोधात मुबई नागपुरकडे गुप्तरित्या तक्रारी केल्या व त्यात ते अलगद फसले. त्याचे उदाहरण म्हणाजे कृ.उ.बा.समितीच्या प्रशासकीय संचालक मँडळात त्यानी सुचविलेल्या कोणत्याही कार्यकर्तेला घेण्यात आले नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. अश्या वेळी त्याचे जिगरी मिञ नादेडचे आ.हेमत पाटील याच्या माध्यमातून त्याची घरवापसी होईल अशी पारिस्थिती वातावरण निर्माण झाले आसताना त्याना पुन्हा सेनेतुन डच्चु मिळाला होता. ऐन वेळी त्यांची अवस्था... ना इधर ना ऊधर .... अशी झाल्याने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व हिगोली लोकसभाचे खा राजीव सातव याच्यामध्ये चर्चा होऊन सेनेचे माजी खा.सुभाष वानखेडे याना काँग्रेसमध्ये प्रवेश देवुन थेट दिल्लीहून उमेदवार बहाल केली. ही सर्व जबाबदारी त्यानी हिगोली जिल्यातील काँग्रेस व राष्ट्रांवादीच्या नेत्यावर सोपवली. इतकेच नव्हे तर हदगाव विधानसभा क्षेत्रातील जबाबदारी काँग्रेसचे माजी आ. माधवराव पा. जवळगावकर व जि.प.चे उपअध्यक्ष चाभेरकत यांच्यावर सोपवली. तसेच किनवट विधानसभेची जबाबदारी प्रमुख्याने राष्ट्रीवादीचे आ.प्रदीप नाईक याचेकडै सोपवली आणि  उमरखेड विधानसभेची जबाबदारी काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांच्याकडे सोपवली. एकूणच त्यांच्या या नियोजनबद्ध प्रचारामुळे सध्यातरी काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची बाजु प्राभावी दिसुन येत आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रांत अनेक समस्या आहेत प्रचार सभा त्यांचे कार्यकर्ते घेत आहेत. निव्वळ वैयक्तिक पातळीवर जावुन टिक्का टिपाणीने सभा काही नेते पदाधिकारी सभा रंगदार करण्याचा प्रयत्न होतो आहे. सध्या तरी पिण्याच्या पाण्याच्या, सिचन, आरोग्य, शिक्षण या मुलभुत समस्या आध्यप ही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे मतदार मण की बात सागण्यास तयार नाहीत.

खासदाराच काम पडत नाही - आ आष्टीकर ..
खरं पाहील तर खासदारच काही कामच पडत नाही...? मी आहे ना ..अस सभेत मतदाराना सागताच आ. नागेश पाटील आष्टीकर याच्या या अहवानाला सभेतील प्रेक्षाका मधुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहताच त्यानी विषय बदलला व काँग्रेसचे उमेदवारावर शब्दरुपी हल्ला चढविला होता. पण आमदाराच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य व्यक्ति काहीच काम पडत नाही असे म्हणतात. परंत्तू त्यांनी  २०१२ पासुन वर्धा नादेड हे नविन रेल्वे प्रकल्प विषयी खासदाराकडे कधी तरी मागणी केली का..? हा प्रकल्प नेमके कश्यामुळे रखडला आहे. कारण या प्रकल्प मध्ये राज्यशासनाचा ४०% टक्के वाटा व केद्र शासनाच ६०% वाटा आसताना बजेट मध्ये किती निधीची तरतुद करण्यात आली. कारणा हदगाव तालुक्यातील या रेल्वे प्रकल्पाकरिता ५ वर्षा पुर्वीच जमीनी आधिनगृह करण्यात आल्या आहेत. त्याचा मोबदला तर मिळतच नाही. त्या विकता ही येत नसल्याने शेतक-याची अवस्थेत अडकितल्या सुपारी सारखी झाली आहे. या बाबतीत कधी तरी हिगोलीचे खा रजीव सातव सोबत चर्चा विद्यामान आमदार यानी केली का ? आसा संतप्त सवाल ही मतदारात चर्चिल्या जात असुन, यापेक्षा दुसरी गँभीर बाब अशी की हिगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यानी पण या पाच वर्षात वर्धा नादेड रेल्वे संदर्भात सभागृहात चर्चा घडवुन आणल्याचे ऐकिवात नाही.

वंचीत आघाडीचे उमेदवार ही फार्मात ....
काही दिवसा पुर्वी वचिंत आघाडी प्रचारच्या बाबतीत प्रचार मध्ये मरगळ दिसुन येत होती. पण जेव्हा वचित आघाडीचे प्रकाश आबेडकर यांची हदगाव शहरात सभा यशस्वी होताच वंचित आघाडीच्या प्रचारात जोश दिसुन येत आहे. या वंचित आघाडी कडुन मोहन राठोड आसुन त्यांनी आध्याप हदगाव शहराला भेट दिलेली नसली तरी त्यानी काँग्रेस व सेना युतीच्या उमेदवार समोर जबरदस्त अहवान उभे केलेले आहे.

बाकीचे उमेदवार गेले कुठं ...?
हदगाव शहरात एकच जबरदस्त सभा वँचित आघाडीची झाली दुसरी शिवसेनेचे उमेदवार हेमत पाटील याच्या पत्नी सौ. पाटील यानी गाजवली तर काँग्रेसने अणखीन ही एक ही सभा शहरात घेतलेली नाही. हिगोली लोकसभा मतदार संघात एकुण २८ उमेदवार उभे टाकलेले आहेत. यापैकी राष्ट्रीय पक्षाचे
३ नोदणीकृत पक्षाचे ८ आसुन बाकी ईतर पक्षाचे उमेदवार आहेत. शहरात तर प्रमुख उमेदवाराच्या सभा झाल्या नाहीत. बाकी उमेदवारांचा हदगाव विधानसभा क्षेत्रांत बोलबाला नाही अणखीन उमेदवार या भागात पोहचु शकले नाही. हिगोली लोकसभाचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार अखेर पर्यंत तरी हे उमेदवार मतदाराना भेटु शकतील की नाही..? या....बाबतीत साशंकता दिसून येत आहे.

....... शे चाँदपाशा, हदगाव.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी