पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर छिद्र करून सरपंचाने केली पाण्याची चोरी

इस्लापूरच्या पाणी पुरवठा पाईप लाईनवर ड्रिल मशीनने छिद्र पाडून स्वत: सरपंचाच्या विहीरीमध्ये पाणी नेण्याचा प्रकार उघडा झाला आहे, या सरपंचावर  कार्यवाही होईल काय असा प्रश्न इस्लापूर येलि नागरिकांना पडला आहे.

इस्लापूर पाणीपुरवठा सहस्त्रकुंड येथून पाणीपुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, परंतु त्यावेळेस सहस्त्रकुंडलाच पाणी भरपूर होते. त्यामुळे ते कुणालाच लक्षात आले नाही. परंतु या दोन-तीन वर्षांपासून इस्लापूर नगरीला पाण्याची झळ जास्तच सोसावी लागत आहे, यामुळे सरपंचाच्यावतीने यावर्षी लिकेज कुठे आहे हे शोधताना वाळकीच्या सरपंच दिलीप तुमलवाड यांनी स्वत: ड्रिल मशीनच्या सहाय्याने छिद्र पाडून स्वत:च्या विहीरीत पाणी घेतले अशी चर्चा इस्लापूरच्या नगरीत जोरदार चालू आहे. त्यांनी लावलेली मोटार दहा मोटार एवढे पाणी ओढते तेवढे पाणी वाळकीचा सरपंच चोरून घेतो. याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांत पडला आहे. ते पाणी बंद करीत असताना व ते पाईप कोणी फोडली असे विचारले असता वाळकीचा सरपंच दिलीप तुमलवाड यांना पाण्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी महिलांना पुढे करून वादवाढविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिस प्रशासनाला कळून इस्लापूर बिट जमादार जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेव्हा बिट जमादार जाधव यांनी तुम्ही तक्रार करा म्हणाले, तेव्हा मात्र सरपंचाचे प्रतिनिधी काहीही बोलले नाही, कारण का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. कारण हेच सरपंच गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पॉवरफुल मोटारीने पाणी स्वत:च्या विहीरीत घेतो आणि ते पाणी विकत आहे व पाणी शेतीसाठी वापरत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न इस्लापूरातील वार्ड क्र. पाच मधील जनता प्रश्न विचारीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावल्याने इस्लापूरचे बिट जमादार जाधव वार्ड क्र. पाच मधील भवरे म्हणतात की, ग्रामपंचायतला लावलेले कुलूप काढा, नसता तुमच्यावर कार्यवाही करतो म्हणाते. तेव्हा वार्ड क्र. पाच मधील महिला व पुरूषांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली की, जे सरपंच गेल्या दहा वर्षांपासून पाणी चोरून घेतो त्यांच्यावर कार्यवाही न करता महिलांना व पुरूषांना का धमकावतात? हिंमत असेल तर चोरावर कार्यवाही करा, बिट जमादार चोर सोडून संन्याशाला फाशी का हो जमादार साहेब असा सवाल वार्ड क्र. पाचमधील महिला करीत होत्या. जर खरच पाणी चोरणाऱ्यावर कार्यवाही झाली तर यात बडे मासे गळला लागतील यात शंका नाही. कारण या पाणीपुरवठा पाईक कट करून पाणी घेण्यासाठी या सरपंचांना परवानगी दिली कोणी हे सिद्ध होईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी