उमरी येथे एका युवकाचा खून; महिलांनी नातलगावर केला जीवघेणा हल्ला

मला भिकारी का म्हटलास या कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणातील जखमी मरण पावल्याने हा खूनाचा गुन्हा उमरी पोलीसांनी 6 एप्रिल रोजी दाखल केला आहे. आपल्या सासऱ्याच्या तेरवी कार्यक्रमात आलेल्या एका जावयावर नांदेडमध्ये कांही महिलांनी जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

या बाबतची सविस्तर हकीकत अशी की, दि.28 मार्च 2019 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान रामू
हानमंतु पवार (25) हे आपल्या घरासमोर झोपले असतांना त्यावेळी कांही जणांनी त्याला विचारणा केली की, होळीच्या अगोदर तुला दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. तेंव्हा असे भिकाऱ्यासारखे पैसे का मागतोस असे सांगितले होते. या कारणावरुन भांडण झाले आणि रामू पवारच्या पोटात त्या लोकांनी तिक्ष्ण हत्याराने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत रामू पवारवर उपचार सुरू असतांना 5 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6 वाजता त्याचा मृत्यू झाला. गंगाधर रामा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खून करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक साळूंके अधिक तपास करीत आहेत.  दुसऱ्या घटनेत लक्ष्मणसिंह राजेंद्रसिंह मार्केम (36) रा.विशाखापटणम हे तारासिंह मार्केटमधील आपल्या सासऱ्याच्या तेरवी कार्यक्रमात आले असतांना तु आमच्या घरासमोर का थांबलास असे सांगून हजारी कुटूंबियातील तीन महिलांनी त्याच्यावर लाठीकाठी, हॉकीस्टीकने जबर हल्ला केला. लक्ष्मणसिंह मार्केच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी महिलांविरुध्द भारतीय दंडविधानाच्या कलम 307, 324,34 आणि 4/25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे हे करीत आहेत.

मालेगाव रस्त्यावर ट्रक चोरला; मुखेडमध्ये ऍटो जाळला 
मालेगाव रस्त्यावरून एक ट्रक चोरीला गेला आहे तर मुखेड येथे एक ऍपे ऍटो जाळून नुकसान करण्यात आले आहे.

अमरदिपसिंघ चंचलसिंघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 मार्च 2019 रोजी रात्री 10 वाजता त्यांनी आपला ट्रक एम.एच.26 ए.डी.4757 हा अजिंक्यतारा हॉटेल, मालेगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ उभा केला असतांना 1 एप्रिलच्या सकाळी 9 वाजेपर्यंत तो 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ट्रक कोणीतरी चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा ट्रक चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे हे करीत आहेत. दुसऱ्या एका घटनेत भवानी गल्ली मुखेड येथे रामराव कऱ्हाळे यांनी 6 एप्रिल 2019 रोजी आपला ऍपे ऍटो क्रमांक एम.एच.26 टी.7131 उभा केला होता. 6 एप्रिलच्या मध्यरात्री 2 वाजता कोणी तरी त्या ऍटोवर रॉकेल टाकून तो जाळून टाकला आहे. त्यामुळे 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुखेड पोलीसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 435, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी