NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

रविवार, 7 अप्रैल 2019

7 महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या करून नवऱ्याची आत्महत्या

11 महिन्यांपुर्वीच झाले होते लग्न 
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर येथे बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या सात महिन्याची गरोदर गरोदर महिलेची साडीने गळादाबून हत्या झाली आहे.  तिच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी गंगाधर गवाले (वय 21) यांचा मृतदेह घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळला तर त्याच घरात दांडीला दोरी बांधून तिचा पती गंगाधर भुजंग गवाले (वय 23) यांनी गळफास घेऊन सासुरवाडीतच आत्महत्या केली आहे.


11 महिन्यांपूर्वी कृष्णूर येथील शुभांगी हिचा विवाह गंगाधर गवाले यांच्यासोबत (औराळा, ता.कंधार) येथे झाला होता. तेलंगणातील पिटलम येथे हे दोघेही पती-पत्नी आई-वडीलांसोबत विटा बनविण्याचे काम करीत होते. शुभांगी गवाले सात महिन्याची गरोदर असल्याने बाळंतपणासाठी 10 दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तर चार दिवसांपासून तिचा पती गंगाधर हादेखील सासुरवाडीतच आला होता. शुभांगीचे आई, वडिल कामासाठी बाहेरगावी गेल्याने घरात ते दोघेच होते. त्यांच्यासोबत आजी बाहेर झोपली आणि दोघे घरात झोपले. सकाळी आजाने शुभांगीला आवाज दिला पण त्यावर कांहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर ही घटना उघड झाली. शुभांगी यांचा मृतदेह रविवारी सकाळी पलंगावर आढळून आला. तर तिचा पती गंगाधर गवाले यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच गंगाधर यांचे आई,वडील कृष्णूरमध्ये दाखल झाले आहेत. ही घटना निरिक्षीत करण्यासाठी बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर धुमाळ यांनी कुष्णूर गावात भेट दिली होती. घटनास्थळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मरे, अजित बिरादार, पोहेकॉ. उमरे, महाजन दाखल झाले असून, या घटनेची अधिक चौकशी करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत मयत पत्नी शुभांगी आणि तिचा नवरा गंगाधर यांच्या मृतदेहावर वैद्यकीय प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणातील मयत गंगाधर हा अत्यंत रागीट व्यक्ती होता आणि त्याने आपल्या पत्नीवर संशय घेवून तिचा खून करून स्वत: आत्महत्या केली आहे असे सांगितले जात आहे. 

कोई टिप्पणी नहीं: