87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

16 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण दि.7 एप्रिल रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरवात अरुण डोंगरे जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दृकश्राव्य संदेशाने झाली. या संदेशाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांनी परिपूर्ण प्रशिक्षण घेवून टपाली मतदानाचाही लाभ घ्यावा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन अरूण डांगरे यांनी
केले. त्यानंतर भारत निवडणुक आयोगाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 27 मिनीटाच्या दृकश्राव्य  चित्रफितीच्या माध्यमातून प्रशिखणार्थ्यांना षशिक्षण देण्यात आले. यानंतर औरंाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या उपयुक्त अशा चित्रफितीद्वारे मतदान यंत्र सिल करण्याची प्रक्रिया विशद करण्यात आली.

 यावेळी प्रशिक्षणपीठावर प्रशांत शेळके उपजिल्हा निवडणूक अधिकारी, लतीफ पठाण सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, किरण अंबेकर तहसीलदार नांदेड,  गट शिक्षणाधिकारी अशोक देवकरे व मुगाजी काकडे नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रशांत शेळके उपनिवडणूक अधिकारी, लतीफ पठाण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून किरण अंबेकर तहसीलदार नांदेड यांनी केले. यावेळी प्रशांत शेळके उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मार्गदर्शनाच्या सुरूवातीस प्रशिक्षणार्थ्यास नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवून कांही महत्वाच्या बाबींचा उल्लेख करून मार्गदर्शन केले. प्रशांत शेळके असे म्हणाले की, प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांनी केंद्राध्यक्षांसाठीच्या पुस्तिकेचे वाचन करून पूर्ण अभ्यास करावा आणि प्रत्येक निवडणूक एक आवाहन म्हणून पार पाडावी तसेच कोणतीही शंका न ठेवता संदिग्ध मनस्थितीमध्ये मतदान केंद्रावर जावू नये. याशिवाय मतदान यंत्र व व्ही.व्ही.पॅट संबंधी खबरदारीच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे अशीही मौलीक सूचना करण्यात आली. मतदान केंद्रावरील सर्व टीमने  एकदिलाने व परस्पर सहकार्याने कार्य केल्यास मतदान प्रक्रिया सुलभपणे संपन्न होईल, असेही आवाहन प्रशांत शेळके यांनी केले.

प्रशिक्षणाच्या अति महत्वाच्या टप्यात किरण अंबेकर तहसीलदार नांदेड यांनी पॉवर पॉईंट प्रेझेटेंशनच्या माध्यमातून मतदान पुर्व प्रक्रिया, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर, मतदान दिवशी व पूर्वसंध्येला कोणत्या आवश्यक बाबी कराव्या लागतात तथा विविध फॉर्म, लिफाफे कसे पूर्ण करतात, मतदान केंद्राध्यक्षांच्या डायरीचे महत्व अशा इतर अनेक बाबींचा अभ्यासपूर्ण विवेचन करून उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. शेवटी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांच्या शंकाचे निरसन केल्यामुळे प्रशिक्षण परिपूर्ण दिल्या गेल्या प्रतिक्रिया अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केल्या. या प्रशिक्षणास 1536 प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती. प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीसाठी विलास भोसीकर उपायुक्त मनपा, रमेश चौरे स्टेडियम व्यवस्थापक, मास्टर ट्रेनर आर.एन. कानगुले व सर्व क्षेत्रीय अधिकारी तथा विविध मास्टर ट्रेनर यांनी कार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मुगाजी काकडे, मधुकर फुलवळे, संजय भालके, राजेश कुलकर्णी, कुणाल जगताप, अनिरुध्द जोंधळे, संजय कोठाळे, चंद्रशेखर सहारे, गोविंद दंडवते, पी.डी.जमदाडे, संगणक परिचालक शमशोद्दीन तथा सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी