अंत्ययात्रेला पाणी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक... वृद्ध ठार

किनवट तालुक्यातील कोठारी (सि.) ते जरूर मार्गावरून अंत्ययात्रेसाठी पायी चालत जाणार्‍या वृद्ध नागरिकास, पाठीमागून एका दुचाकीने भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने ते जागीच गतप्राण झाले. हा दुर्देवी अपघात आज रविवारी (दि.07) दुपारी 12.40 वाजता घडला असून, दुचाकी चालविण्यार्‍या नवयुवकाविरुद्ध मांडवी पो.स्टे.अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रामजीनाईकतांड्याचे रहिवासी रमेश रुपसिंग जाधव (वय 60 वर्षे) हे रविवारी (दि.07) त्यांचे कनकीतांडा येथील व्याही खिरू राठोड हे मृत्यू पावल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी  कोठारी ते जरूर मार्गावरून पायी चालत जात होते. दरम्यान दुपारी 12.30 च्या सुमारास कोठारी (सि.) कडून येणारी दुचाकी (क्र. एम.एच-26 बी.एम.5065) या गाडीचा चालक रामेश्वर अशोक राठोड (वय 18 वर्षे) रा.जमुनागर,ता.किनवट याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवून पायी जात असलेल्या रमेश जाधव यांना पाठीमागून जबर धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. मयत रमेश जाधव यांचे  जेष्ठ बंधू उद्धव रुपसिंग जाधव (वय 65) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रामेश्वर अशोक राठोड याच्याविरुद्ध गुरनं 26/2019 कलम 279,304(अ) भारतीय दंड विधान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.  पुढील तपास सहाय्यक  पो.उपनिरीक्षक विजय मारोती कोळी हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी