NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

रविवार, 30 नवंबर 2014

बडे दलाल मोकाट

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील स्वस्त धान्याचा २०० कुंटल गहू काळ्या बाजारात जाता असताना भोकर पोलिसांनी पाळज शिवारात सापळा रचून पकडला. या घटनेत चालक व एका मुनिमावर आणि अन्य एकावर कार्यवाही करण्यात आली असली तरी यातील बडे दलाल मात्र मोकाटच आहेत. पोलिसांच्या या कार्यवाहिने साशंकता निर्माण झाली असून, चोर सोडून संन्याश्याला फाशी देण्याचा हा प्रकार असल्याचे धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यामधून बोलले जात आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरात स्वस्त धान्याच्या काळ्याबाजाराचे केंद्र बनले हिमायतनगर, भ्रष्ट राशन दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय ... या मथळ्याखाली दि.२० नोव्हेंबर रोजी नांदेड न्युज लाइव्हने वृत्त प्रकाशित करून, जिल्हा प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. याच वृत्ताने धास्तावलेल्या व्यापार्यांनी काही दिवस हा प्रकार बंद करून पुन्हा सुरु केला. तेलंगाना - मराठवाड्याच्या सीमा रेषेवर असलेल्या हिमायतनगर येथे स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराचे केंद्र असून, अनेक तालुक्यातील दिवसात धान्याचा माल काही दलाल खरेदी करून गावाबाहेर असलेल्या एका गोडावून मध्ये साठवत असतात. याची खातरजमा अनेकदा पत्रकारांनी करून हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. अन्न सुरक्षा योजनेत अनेक सधन कुटुंब दाखवून लाभधारकांची संख्या वाढविण्याचा चमत्कार शहरातील अनेक दुकानदारांनी केल्याचे निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुरवठा विभागाच्या अधिकारी व अव्वल कारकून यानी दुकानदारांच्या कर्मावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्यानेच दुकानदारांसह दलालांचे फावते आहे. परिणामी अन्न सुरक्षा योजनेतील शिल्लक माल दलालांच्या घश्यात घालण्याचे महापाप करून हेच दुकानदार आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. 

नुकतेच हिमायतनगर येथून तेलंगणात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने पाळज शिवारातून २०० कुंटल गहू घेवून जाणारा ट्रक भोकर पोलिसांनी ताब्यात घेतला. हा माल हिमायतनगर शहरातील तीन बड्या स्वस्त धान्य दुकानदारांचा असल्याची माहिती पुढे येवू लागली आहे. आमचा कारभार अगदी धुतल्या तांदळासारखा पारदर्शी आहे, आम्ही उर्वरित माल प्रशासनाला परत करतो. असे तोर्याने सांगणार्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या कारभारावर मात्र भोकर पोलिसांच्या कार्यवाहिने मुस्कटात मारली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांनी हिमायतनगर येथील एका भुसार दुकानदाराच्या मुनिमावर कार्यवाही केली असून, सदरील मुनिमास ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविल्यास यातील बडे मासे गळाला लागण्याची शक्यता सामान्य नागरीकातून वर्तविली जात आहे. हिमायतनगर तालुक्यातून काळ्या बाजारात पाठविल्या जाणार्या घटनेचा सखोल तपास करून बड्या दलालांच्या मुसक्या आवळणार कि..? थातूर माथुर कार्यवाही करून केवळ चौकशीचा फार्स पूर्ण करणार हे भोकर पोलिसांच्या पुढील कार्यवाहीवरून दिसून येणार आहे. 

दलालांच्या मुसक्या आवळणार - आरदवाड 
---------------------------------- 
या प्रकरणी भोकर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सदरील माल हा राम - रहिम ट्रेडिंग कंपनी या नावाने नोंदणीकृत असलेल्या दुकानाच्या नावे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सदरील मालाची नोंद असल्याचे सांगितले. यातील आरोपी ट्रकचालक फारुख पठाण हा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपी दिगंबर देवराव पाटील व प्रभू कल्याणकर हे अद्याप फरार आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत तपास करण्यावरच असून, लवकरच त्यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली जाईल. यातील प्रमुख सुत्रदार कोण ते लवकरच उघड करू असे आश्वासन त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिले. 

अवैद्य धंद्यासाठीच राम - रहिम ट्रेडिंग कंपनी..? 
------------------------------------ 
वास्तवात राम - रहिम ट्रेडिंग कंपनी हे दुकान हिमायतनगर शहरात अस्तित्वातच नसून, केवळ नोंदणी करून रेशनसह अन्य प्रकारचे अवैद्य धंद्यांना अधिकृत दाखविण्यासाठी राम - रहिम ट्रेडिंग कंपनीची नोंदणी करण्यात आली काय..? असा सवाल सामान्य जनता विचारीत आहे. कारण याच कंपनीचा व अन्य एका ट्रेडिंग कंपनीच्या नावाने आंध्रप्रदेशात विक्रीसाठी जाणारा गव्हाचा ट्रक एका पाठोपाठ दोन वेळा मागील वर्षी सुद्धा भोकर पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला होता. ती चौकशी सुरु करून काही दिवसानंतर गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने सध्याच्या घटनेत काय..? कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अश्या अनेक ट्रेडिंग कंपन्यांची नोंदणी आहे, ज्या नावाची दुकानेच अस्तित्वात नाहीत, मग यांची नोंदणी कोणत्या आधारावर केली जात असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.

शनिवार, 29 नवंबर 2014

२०० कुंटल गहू पकडला

हिमायतनगर येथील स्वस्त धान्याचा २०० कुंटल गहू काळ्या बाजारात जाताना पकडला 


हिमायतनगर/भोकर(वार्ताहर)मागील अनेक वर्षापासून पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने  हिमायतनगर येथून रेशनचा गहू लाभार्थ्यांना वितरीत न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी जात होता. याबाबतची वृत्त वर्तमान पत्रातून प्रकाशित करताच भोकर पोलिस प्रशासनाने गुप्त पद्धतीने सापळा रचून दि.२८ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास, अवैद्य विक्री करण्याच्या उद्देशाने आंध्रप्रदेशात जाणारा २०० कुंटल गव्हासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. हि कार्यवाही भोकर तालुक्यातील पाळज गावाजवळील रोडवर करण्यात आली. या घटनेमुळे धान्याचा कला बाजार करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली असून, सदर प्रकरण रफा - दफा करण्यासाठी राजकीय बळाचा वापर झाला. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यवाही केली खरी, परंतु धान्याचा काळा बाजार करणाऱ्या मुख्य मालकावर कार्यवाही न करता नौकरावर गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यवाहीबाबत उलट - सुलट चर्चा होत आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालविला जात आहे. त्यामुळे तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर शहर हे स्वस्त धान्याचा काळ्या बाजाराचे केंद्रबिंदू बनले आहे. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आशीर्वाद व राजकीय पाठबळाचा वापर करीत जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, मनाठा, तामसा, किनवट आदीसह अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हिमायतनगर येथे आणून येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. अशी गुप्त माहिती एका रेशन दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितल्याने वर्तमान पत्रातून स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराचे केंद्र बनले हिमायतनगर या मथळ्याखाली वृत्त २० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले होते. त्यामुळे धान्याचा काला बाजार करणार्यांनी धास्ती घेवून चार पाच दिवस हा धान्याच्या काळ्या बाजारचा गोरखधंदा बंद केला होता.   पुन्हा सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून स्वस्त धान्याचा माल भोकरच्या मध्यमार्गाने आंध्र प्रदेशात पाठविण्यास सुरुवात केली. हि बाब भोकर पोलिस प्रशासनाला कळताच दि.२८ रोजी सापळा रचला. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाळज गावाजवळील रोडवर येताच पोलिसांनी ट्रक क्रमांक एम.एच.२६ ए डी ८५७१ ला थांबविले. तपासणी केली असता यात रेशनचा गहू आढळून आला. यावरून आरोपी (१) ट्रकचालक फारुख अली पठाण, वय 25 वर्ष (२) प्रभु कल्याणकर, रा.हिमायतनगर (3) दिगांबर देवराव पाटील, रा. भोकर यांनी शासनातर्फे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये स्वस्त धान्य दुकानात पुरवठा करण्यात येणारा माल २०० क्विटंल गव्हु किंमती ३ लाख ९६ हजार व ट्रक असा एकुण १५ लाख्स ९६ हजाराचा मुददेमालासह ताब्यात घेतला. आरोपींना ताब्यात घेतच आरोपी क्रमांक २ याने सदर गहू काळया बाजारात चढत्या भावाने विक्री करण्यासाठी तेलंगाना परराज्यात हैद्राबाद येथे आरोपी क्रमांक ०३ च्या सांगण्यावरून घेवून जात असल्याचे सांगितले. याबाबत सपोनि प्रशांत ज्ञानोबा आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादवरून भोकर पोलिस स्थानकात कलम 3, 7 जिवनावश्यक वस्तुचा कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास सपोनि आरदवाड हे करीत आहेत. मात्र सदरचा गहू खरेदी करणारा व्यापारी हिमायतनगर येथील बडा भुसार खरेदी - विक्री करणारा व राजकीय लोकांशी संबंध असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे. 

काल पकडण्यात आलेल्या रेषांचा माल कोणत्या कोणत्या दुकानदाराचा होता, कोण - कोण या गोरख धंद्यात सामील आहेत. किती दुकानदारांनी अन्न सुरक्षा योजनेचे धान्य वितरीत केले, कोणत्या दुकानदाराकडे किती बोगस लाभार्थी आहेत. याचा उलगडा करण्यासाठी पकडण्यात आलेल्या धान्याच्या मुख्य मालकावर गुन्हा दाखल करावे. आणि स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराच्या रेकेटचा पर्दाफाश करून हक्काच्या धान्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शुक्रवार, 28 नवंबर 2014

बोगस मजुरांचा जादा भरणा


हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संगोपनाच्या कामात सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकारी, सहाय्यक लागवड अधिकारी, रोजगार सेवक व दलाल कार्यकर्त्यांनी मिळून वाहनाने काम करून घेवून बोगस मजुरांचा भरणा दाखवीत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. अशी तक्रार पळसपूर येथील ११ खर्या मजूरदारांनी वर्षभरापासून मजुरीचा मोबदला न दिल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावरही न्याय न मिळण्यास वेळ प्रसंगी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक वनीकरण विभाग हदगाव रेंज अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर कार्यक्षेत्राचा कारभार मोतेवार नामक महिला अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, ते नांदेड शहराच्या ठिकाणी राहून कारभार चालवितात. तसेच सहाय्यक लागवड अधिकारी श्री ढवळे हे सुद्धा देखरेख करता. मागील वर्षीच्या काळात पळसपूर ते हिमायतनगर रोडवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे, झाडे लावणे, पाणी टाकणे व संगोपन करणे हि कामे डेली वेजेस वरील मजुर मार्फत करण्यात यावे यासाठी लाखोचा निधी उपलब्ध झाला होता. सदरची कामे बोगस पद्धतीने करण्यात आली असून, यातील काही कामावर मजूर तर काही कामावर मजुरांना न लावता कागदावरच पूर्ण केली आहेत. हा भ्रष्टाचाराचा प्रकार लक्षात येताच तत्कालीन लागवड अधिकारी श्री ठाकूरवार यांनी काही महिने सुट्टी घेवून पुन्हा पदावरून निरोप घेवून या कटकटीतून सुटका करून घेतली. तत्कालीन अधिकारी शेख व सध्याचे लागवड अधिकारी सौ मोतेवार, तत्कालीन सहाय्यक लागवड अधिकारी मुरगुलवाड यांच्या सांगण्यावरून रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री सूर्यवंशी, संगणक ऑपरेटर खुडके आणि दोन दलाल व रोजगार सेवक यांनी संगनमत करून कामावर मजूर असल्याचे दाखविले. एवढेच नव्हे तर या कामात मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांचाच भरणा करून कोणतेही काम नियमाप्रमाणे न करता शासनाची रक्कम परस्पर पोस्टच्या खात्यावर जमा व उचल केली आहे. हा सर्व प्रकार कामावर असलेल्या खर्या मजुरांना माहित असताना काही अंशी का होईना हाताला काम मिळते व मजुरी मिळेल या आशेने तोंड बंद ठेवले होते.

मात्र नूतन लागवड अधिकार्यांनी पदभार स्वीकारल्यापासून वंचित मजुरांनी अनेकदा मजुरीची मागणी केली. परंतु गावातीलच स्वयंघोषित अधिकारी व दलालांनी आज देवू उद्या देव..असे म्हणत मजुरी देण्यास टाळाटाळ केली आहे. वर्ष उलटले तरी देखील मजुरी मिळत नाही तर बोगस भरणा केलेल्या मजुरांच्या नावाने मोठ्या प्रमाणात शासनाकडून आलेली मजुरी दिल्या गेल्याचे समजताच हक्कापासू वंचित असलेल्यांनी सरकारी कार्यालय गाठून या भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. आज घडीला येथील कामावर केवळ दोन मजूर आहेत, तरीदेखील जादा मजुरांच्या नावाने मजुरी उचलून हिमायतनगर येथील दलाल सेवकांनी शासनाला लुटण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे.

तसेच येथील रोजगार सेवक श्री भीमराव ढोणे यांनी तर या भागातील मजुरांची पोस्टाची खाते पुस्तिका आपल्याच घरी ठेवून घेतल्याने खरे मजूरदार व बोगस मजूरदार याचा ताळमेळ लागणे कठीण झाले असून, यामुळे मजुरांची मजुरी परस्पर उचलण्यात हे महाभाग यशस्वी होत आहेत. असा आरोप करीत येथील खर्या ११ मजुरांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे, तहसीलदार हिमायतनगर यांना निवेदन देवून आमच्या हक्काची मजुरी आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच लागवड अधिकारी, रोजगार सेवक व दोन दलालावर शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी गणेश वानखेडे, चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, संभाजी घोडगे, जिजाबाई वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, पिंटू अवधूत वानखेडे, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, आनंद गायकवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे.

या बाबत लागवड अधिकारी सौ. मोतेवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता इस नंबर पे कोई जवाब नाही दे रहा अशी धून पद्धतीची सूचना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

तर सध्याचे सहाय्यक लागवड अधिकारी श्री ढवळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि, मी महिन्याभरापूर्वी चार्ज घेतला आहे. माझ्याकडे मस्टर व इतर कारभार देण्यास श्री मुरगुलवार व ढोणे यांनी भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडू नये म्हणून टाळाटाळ केली होती. माझ्या पाहणीत हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, कारला, मंगरूळ, आदी ठिकाणच्या वृक्ष लागवड कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पणा दिसून आला, त्यातील बहुतांश कामांची मी प्रत्यक्ष ठिकाणावर जावून दोन मजुरांना घेवून सुधारणा केली आहे. दि.२८ रोजी एस.डी.एम.साहेबांनी पाहणी केली असून, आगामी काळात भ्रष्ट कारभाराला मी थारा देणार नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

अपहाराचा वाद गौतमच्या दरबारात
-------------------------
मागील चार दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील रोहयोच्या कामात झालेला भ्रष्टाचार व कामातील अपहार प्रकारची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. मजुरी न मिळालेल्या मजुरांनी शासकीय अधिकार्यांना तक्रार तर दिलीच उलट तक्रार का करता म्हणून धमकी दिल्याने काही मजुरांनी पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांची भेट घेवून प्रकार कथन केला आहे. त्यावरून संबंधित अपहार करते यांना त्यांनी बोलावून तंबी देत तातडीने मजुरांचा मोबदला देण्याचे सुचित केले. तसेच या संबंधीची माहिती महसूलच्या वरिष्ठांना सांगून खर्या मजुरांना न्याय मिळून देण्यासाठी लक्ष देण्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक गौतमच्या दरबारात आल्यानंतर तरी खर्या मजुरांना न्याय मिळेल काय..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरुवार, 27 नवंबर 2014

शेतकरी जखमी

हिमायतनगर(वार्ताहर)सीरंजनी येथील एका शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना दि.२७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेत सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे सीरंजनी येथील शेतकरी रामा जळबा बम्मलवाड वय ५५ वर्ष हे नेहमीप्रमाणे शेतातील कापसाच्या व रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यसाठी विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. दरम्यान परिसरातील झाडा झुडपात दाबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात शेतकऱ्याच्या उजव्या हाताला व गालाला वन्य प्राण्याने चावा घेतला. आरडा ओरडा करताच परिसरातील शेतकरी धावून आल्याने रानडुकराने घटना स्थळावरून धूम ठोकली. या घटनेत भयभीत होऊन गंभीर जखमी झालेल्या शेतकर्यास नागरिकांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी श्री डी.डी.गायकवाड यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर केले आहे. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्री वाकोडे यांनी रुग्णालयातील जखमी शेतकर्याची भेट घेवून आस्थेवाईकपने चौकशी केली. तसेच त्यांना वनविभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

चारा - पाणी टंचाई

पैनगंगा कोरडी पडल्याने चारा - पाणी टंचाई वाढली


हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडी ठाक पडल्याने नदी काठावरील गावासह जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. 

नदीकाठावर अवलंबून असलेल्या गावकर्यांना नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाई चा सामना करावा लागत असून, नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील अनेक वर्षापासून नदीकाठावरील गावकर्यांना फेब्रुवारी - मार्च महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यंदा खरीप हंगामात वरून राजाने केलेली वाकृपा यामुळे दिवाळी पासूनच नदी काठावरील २० ते २५ गावकर्यांना भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चार्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी या प्रकारामुळे हतबल झाले असून, पाणी नाही चार नाही, म्हणून आपली जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत. बाजारातही जनावरान भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शासनाने अद्याप नुकसानीची मदत जाहीर केली नसल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. खरीपात म्हणावा तसा पावूस झाला नसल्याने रब्बीची पिके घेण्यासाठी जमिनीची कुवत नसल्याने रब्बीची सुधा अशा मावळली आहे. या परिस्थितीकडे पाहून शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी आणि शेतकर्यांना आर्थिक अडचणीतून सोडवावे अशी मागणी होत आहे.

नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे, तर जनावरांना जमा असलेल्या खड्ड्यातील पाणी पिवून आजारांना बळी पडावे लागत आहे. या परिस्थितीची जानवी लक्षात घेता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणी साठा पैनगंगा नदीत सोडून पाणी टंचाई ने त्रस्त झालेल्या मानवांसह मुक्या जनावरांना दिलासा द्यावा अशी मागणी नदीकाठावरील नागरिक शेतकरी करीत आहे.

रविवार, 23 नवंबर 2014

रंगली मैफिल

मेरे सर पे सदा.... 
यासह अनेक गाण्यांची खुले आम रंगली मैफिलहिमायतनगर(अनिल मादसवार)मेरे सर पे सदा तेरा हात रहे..मेरे साई तू हमेशा मेरे साथ रहे...यासह अनेक सर्धार्मीय गीतांनी बस स्थानक परिसरात उघड्यावर मैफिल भरविली होती. ती नागपूरच्या रहेमान कुटुंबीयाने.

टीचभर पोटासाठी भटकंती करणाऱ्या रहेमान कुटुंबाने हिमायतनगर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करून अनेक हिंदी मराठी गाण्यांची मेजवानी हिमायतनगरकराना मोफत उपलब्ध करून दिली. मुलाच्या नागपूर येथील या कुटुंबाने पोटासाठी निवादाल्केल्या या व्यवसायाने मात्र वर्षातील आठ महिने त्यांना घराच्या बाहेरच जीवन कंठावे लागते. त्यातच मुलाबाळांच्या शिक्षणाचे आबाळ...भटकंतीने शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या रहेमान कुटुंबातील मुलांचे भवितव्य मात्र अंधकारमयचं. वाजंत्री वाजविणे, संगीत शिकणे, गाणे म्हणणे, हाच एकमेव रहेमान परिवाराचा व्यवसाय असल्याने कुटुंबातील महिला सदस्यही त्यांना सहकार्य करत असतात. तबला, हार्मोनियम, झांझर, मृदुंग, आदी साहित्यासह सुरेल आवाजात गाणे म्हणून प्रेक्षकांची मने जिंकांर्या या कुटुंबाला प्रेक्षकही तेवढ्याच आपुलकीने दाद देताना दिसून येतात. गत दोन दिवसापासून सुरु असलेल्या या गीतांच्या कार्यक्रमात उमर में बाली..भोली भाली...शेर कि बेटी हुं... भिमाराजाकी बेटी हुं..मैं जी भीम वाली हुं.. मां शेरावाली... छत्रपतीच्या शुराविराने... दुनिया चलेना श्री राम के बिना.. रामजी चाले ना हनुमान के बिना...यासह अनेक गाणे भावगीतांना प्रेक्षणी टाळ्यांचा वर्षाव केला. 

अनेक भावगीत, भक्तीगीत, गजल, मराठी -हिंदी सिनेमांची गाणे गाऊन उदार निर्वाह करणाऱ्या कुटुंबाने शासनाने कलावंताकडे लक्ष देण्याची अपेक्षाही आहे. आपकी फरमाईश प्रेक्षकांच्या मागणीनुसार गीत गाऊन चार पैसे मिळविणे व उदार निर्वाह करणे हीच मात्र त्यांच्या जीवन जगण्याची कला होय..! असे म्हंटल्यास वावगे ठरणार आहे. 

याबाबत रहेमान यांना विचारणा केली असता, हि गाणे म्हणण्याची कला आम्ही आमच्या बाप दादा पासून शिकलेली आहे. अभ्यास व शिक्षण नसताना सर्व समावेशक गाण्यांमध्ये तरबेज असल्याने जनतेची कोणत्याही कोणत्याही गाण्याची फरमाईश आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. सर्वत्र भटकंती करताना अनेक अडचीन येतात मात्र न डगमगता घागडा चालविण्यासाठी आम्ही गीत गावून उदार निर्वाह करत, परंतु शासनाने आम्हा कलाकारांना राबविल्या जाणार्या योजनाचा लाभ मिळवून द्यावा अशी रास्त अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्वयंसेवक आपला दारी

शनिवार, 22 नवंबर 2014

कापूस जनावरांना चारवीला

हताश शेतकर्याने उभा कापूस जनावरांना चारवीला


हिमायतनगर(अनिल मादसवार) नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाच्या झाला बसण्यास सुरुवात झाली असून, पावसाअभावी पिके अनेक रोगांना बळी पडून वळत आहेत. या प्रकारामुळे कपाशीचे उत्पन्न निघण्याची अशा मावळ्याने हिमायतनगर तालुक्यातील एका हताश शेतकर्यांनी शेतातील उभ्या कापसात चक्क जनावरांना सोडून जगायचे कसे असा गंभीर प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. आजघडीला शेतकर्यांना उभा कापूस जनावरांना चारावावा लागत असले तरी शासन मात्र कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाच्या झाला बसण्यास सुरुवात झाली असून, केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा चार जनावरांना शिल्लक आहे. नंतर पशुधन सांभाळायचे कसे, हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. उसनवारी करून पेरलेल्या पिकांना पावसा अभावी काहीच आले नाही, आले त्यातून लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. आता शेतात उभे असलेल्या कापसाच्या पिकांना पाणी नसल्याने बोंडासह झाडे वाळू लागली आहेत. तर अनेक रोगांनी कापसासह, तुरीच्या पिकांना घेरले आहे. तर पाऊस पडता नसल्याने अनेकांनी रब्बीच्या आशेने सोयाबीनची काढणी करून रान तयार केली मात्र. जमिनीत ओलावा राहिला नाही, म्हणून रब्बीची अशाही मावळली आहे. कापूस असलेली झाडे रोगांच्या बळी पडल्याने हताश शेतकरी आता कापसाच्या पिकात जनावरे चरण्यास सुरुवात केली आहे. असे पिक वळून जाण्यापेक्षा जनावरांचा चारलेला बरा..म्हणत कशाचीही तमा न बाळगता उभ्या पिकात जनावरे सोडून कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र हिमायतनगर तालुक्यात दिसून येत आहे.

हि परिस्थिती पाहता आता तरी शासन हिमायतनगर सह नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसगट नुकसान भरपाई देईल काय..? असा प्रश्न दुष्काळाच्या गडद छायेत अडकलेल्या बळीराजा विचारीत आहे. जिल्ह्यात महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचा दौरा होत असल्याने शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील काय..? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.  

शुक्रवार, 21 नवंबर 2014

भयावह चित्र


हिमायतनगर तालुक्यात पहिल्या वेचनिनंतर कापसाच्या पऱ्हाट्या  झाल्याचे भयावह चित्र पहावयास  मिळत आहे. हि परिस्थिती पाहता शासनाने नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. छाया - अनिल मादसवार

चढ्या दराने विक्री..हिमायतनगर(अनिल मादसवार)राज्य उत्पादन शुल्क किनवट विभागातील अधिकाऱ्यांच्या लालची प्रवृत्तीचा फटका तळीरामांना बसत असून, देशी आणि विदेशी दारूचे परवानाधारक दुकानातून सर्रास चढ्या दराने विक्री होत आहे. या प्रकाराकडे नांदेडचे उत्पादन शुल्क अधिकारी गणेश पाटील यांनी लक्ष देऊन हिमायतनगर भागात होत असलेल्या दुकानदारावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील शहरी भागात देशी दारूचे अधिकृत परवानाधारक चार दुकाने असून, दिवसभर काबाड कष्ट करणारा मजूर वर्ग हा मोठ्या प्रमाणात देशी भक्त आहे. सायंकाळी देशीच्या दुकानाकडे घोट भर घेवून चैन मिळावा असे वाटणार्या मजुरास मात्र दिवसभर कष्ट उपसून कमावलेले चार पैसे भट्टी वाल्याच्या खिश्यात घालावे लागत आहे. निव्वळ हलक्या दर्ज्याच्या देशी दारूची विक्री येथील परवानाधारक दुकानदार चढ्या दराने करत असल्याने त्याचे विपरीत परिणाम मद्यपींच्या आरोग्यावर होत असल्याचे देशीची चव घेनार्याकडून सांगितले जात आहे. 

सर्व करासहित ३३ रुपये किंमत असलेल्या एका बाटलीला माद्यापिना ४५ ते ५० रुपये मोजावे लागत असल्याने १७ ते २२ रुपयाची लुट प्रत्येकी एक बॉटल या प्रमाणे दारू विक्रेते करीत आहेत. परंतु हप्ते वसुली करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकार्यांना याचे काही एक देणे - घेणे नाही. मद्यपींच्या या लुटीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जणू मूक सहमती असल्यानेच दुकानदार निर्ढावले असल्याचे मद्यपि सांगतात. 

देशी दारूसह विदेशी दारू विक्रेत्यांनीही लुटीचा सपाटा चालूच ठेवला असून, १८० एम.एल.च्या बाटली मागे ५० ते ६० रुपये जादा आकारले जात असून, या संदर्भात बार चालकांकडे तक्रार केली तर दारूबंदी वाल्यांना हप्ते द्यावे लागतात असे काही बार चालक दबक्या आवाजात सांगतात. बियर शोपिमध्ये सुद्धा ग्राहकांची परवड होत असून, येतेही जादा दराने विक्री केल्या जात असल्याचे माद्यापिंकडून सांगितले जात आहे. परिणामी मद्यपींची होणारी लुट हि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच होत असल्याचे चित्र दिसून येते. 

केवळ हप्ते वसुलीसाठी तालुक्यात येणाऱ्या दारू बंदी विभागाने मात्र अवैद्य विकल्या जाणाऱ्या देशी व विदेशी दारूकडे सोयीस्करपणे पाठ फिरविल्याचे दिसून येते. येथे रुजू झालेले पोलिस निरीक्षक श्री गौतम यांनी अवैद्य देशी दारू विक्रीवर निर्बंध आणला असला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र एकही ठोस कार्यवाही अवैद्य देशी -विदेशी विक्रेत्यावर केली नसल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात आजही छुप्या मार्गाने देशी दारू पोन्चविली जात असल्याचे नागरिक सांगतात. तसेच बंद काळातही येथील दुकानदाराकडून छुप्या पद्धतीने देशी व विदेशीची विक्री दुप्पट तिप्पट दराने केली जात असताना याकडे संबंधित विभागाचे क्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

उत्पादन शुल्क विभागचे अर्थपूर्ण दुर्लक्ष 
------------------------------------ 
किनवट उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.व्ही.पाटील यांच्या अंतर्गत माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, मुदखेड, व अर्धापूर हे तालुके येतात. तसेच श्री पाटील यांच्या खाली दुय्यम निरीक्षक म्हणून घोरतळे, कूळवे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरतवाड हे देखरेख व तपासणी करतात. किनवट विभागातील दुकानदारांची महिन्याला तपासणी करणे, व जादा दराने विक्री करणाऱ्या व दारूत पाणी मिसळून विकणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही करणे, वेळ प्रसंगी परवाना रद्द करण्याचे अधिकार त्यांना आहेत. परंतु संबंधित दुकानदाराकडे उत्पादन शुल्क विभागचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून दुकानदारांना अभय देत आहेत. म्हणूनच परवानाधारक दुकानदाराकडून मनमानी पद्धतीने सर्रास जादा दराने विक्री करून लुट करीत आहेत. तर ग्रामीण भागात अवैद्य रित्या छुप्या पद्धतीने पुरवठा केली जात आहे. 

या संदर्भात दारू बंदी विभागाशी संपर्क साधला असता गेल्या महिन्यात देशी दारू दुकानांची तपासणी केली असून, चारही परवाना धारक दुकानदारांना २५ ते ३० हजारचा दंड आकारण्यात आल्याचे सांगितले आहे. तीन दुकानदारांनी दंड भरला तर राजू जयस्वाल या देशी दारू विक्रेत्याने अजूनही दंड भरला नसून त्याला हि सवलत कश्यामुळे देण्यात आली हे न उलगडणारे कोडेच आहे.

गुरुवार, 20 नवंबर 2014

काळ्या बाजाराचे केंद्रभ्रष्टराशन दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालू असून, तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेले हिमायतनगर शहर हे स्वस्त ध्नाय्च्या काळ्या बाजारचे केंद्रबिंदू बनले आहे. याभ्रष्ट दुकानदारांना मात्र पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्याचे नागरिकांचे म्हनणे आहे.

हिमायतनगर तालुक्यात जवळपास ७२ स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक आहेत. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्याना लाभ मिळत असला तरी अन्न सुरक्षा योजनेचे बहुतांशी लाभार्थी हे साधन कुटुंबातील घेण्याचा चमत्कार अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. राशन कराची फोड करून संख्या वाढविण्यात स्वस्त धान्य दुकानदार यशस्वी झाले आहेत. विभक्त राशन कार्ड करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा मालीदाही अनेक दुकानदारांनी लाभार्थ्याकडून ५०० ते १००० प्रती कार्ड या प्रमाणात लाटल्याचे अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या होत्या. परंतु भागीदारीत असलेल्या पुरवठा विभागाने एकही दुकान्दारचे चौकशी करण्याचे वा कार्यवाही करण्याचे धरिष्ठ दाखविले नाही. परिणामी पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने नागरिकांचा संताप अनावर होत असून, अनेक स्वस्त धान्य दुन्कंदर महिन्याला किमान तीन ते पाच कुंटल धान्य काळ्या बाजारात विकत असल्याचे नागरिक सांगतात.

हिमायतनगर हे शहर तेलंगाना सीमेवर असल्याने अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हे येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. यात अनेक दुकानदार पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांना हाताशी धरून गरीबांचा घास काळ्या बाजारात विकून मालामाल होत आहेत. गरिबांवर मात्र उपाशी पोटी राहण्याची वेळ येत आहे.

अनेक स्वस्त धान्य दुकानदार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्याचे वितरण करीत नसून, महिन्यातून दोन - तीन दिवस दुकान उघडून उर्वरित माल परस्पर काळ्या बाजारात लांबवीत असल्याचे वंचित लाभार्थ्यामधून सांगितल्या जात आहे. वितरीत केलेल्या धान्याची लाभार्थ्यांना पावती दिली जात नसून, दिवस ढवळ्या लाभार्थ्यांची लुट केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक दुकानदार उर्वरित स्वस्तधान्य प्रशासनाकडे परत देत असल्याचे सांगत असले तरी खरा प्रकार काही औरच असल्याचे आढळून येते आहे.

केरोसीन वितरणमध्ये सुद्धा घोळ
-----------------------------
रेशन बरोबर यातील बहुतांश दुकानदाराकडे केरोसीन वितरणाचा ठेका दिलेला असल्याने त्यातही मोह्या प्रमाणात अनागोंदी दिसून येते आहे. कार्द्धार्काना डावलून वाहनांना २५ ते ३० रुपये जादा दराने रॉकेलची विक्री केली जात आहे. त्यामुळे झोपडीतील कार्ड धारकांना रात्रीला अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी धीरज कुमार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देवून खर्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून भ्रष्ट दुकानदारावर कार्यवाही करावी अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित नागरीकातून केली जात आहे.

कायदेविषयक शिबिर

हिमायतनगर(अनिल मादसवार)माणसाला कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान नसल्याने अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते. त्यासाठी सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून कामे केल्यास प्रगती साधता येते असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश तथा फिरत्या लोकन्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बी.टी.नरवाडे पाटील यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी, धानोरा ज.येथे दि.१९ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व नंदीग्राम मल्टीपर्पज सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिराच्या मंचावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून झाली. यावेळी उपस्थित मंचावरील मान्यवरांचे गावकर्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून पुढे बोलताना ते म्हणाले कि, कायद्याने चालण्याचे अनंत फायदे असून, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समावेशक घटना या देशाला बहाल केली आहे. राज्य घटनेचा सर्वांनी अभ्यास करून कायद्यातील बारकावे जाणून घेत अज्ञानात दूर करावी. कारण कायद्याचा गुन्हा करणार्यास शिक्षा जरूर होणारच. हेच गुन्ह्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी तथा रामराज्य आणण्यासाठी उच्च न्यालयाने " न्याय आपल्या दारी " ची संकल्पना राबविली आहे. यातून गावातील प्रश्न, समस्या कोर्टात न जात जाग्यावरच सामन्जश्याने सोडविल्या जातात. त्यामुळे वादी - प्रतीवाद्याचा वेळ पैसा दोन्हीची बचत होते. आणि कायद्याचे ज्ञान मिळाल्याने होणार्या गुन्ह्यात घट होते. तसेच जीवनात घडणार्या घटना जश्या कि, साप चावल्यावर पोलिस स्थानकास कळविणे गरजेचे आहे, हीच नोंद शासनाच्या ०१ लाखाच्या विमा मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच जन्म - मृत्यूची नोंद ग्राम पंचायतीत करणे अनिवार्य आहे, त्यामुळे दारिद्र्य रेषेतील मुलींच्या पालकास मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १० हजारची मदत दिली जाते. तसेच युवकांनी सर्व व्यसनापासून दूर राहावे यासह असंख्य प्रकारच्या कायदाचे फायदे तसेच आपुलकीची भावना ठेवून जीवनात वावरावे असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी उपस्थितांना कायद्याची माहिती देत, कायद्याचा सर्वांनी आदर करावा, कारण कायद्याचा आदर करणार्यांना मोठे फायदे होतात तर अनादर करणार्यांना कायद्यामुळे शिक्षा भोगावी लागते असे सांगितले. एड.प्रवीण आयचीत यांनी अपघात नुकसान भरपाई कायद्याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. एड.दिलीप राठोड यांनी महिला विषयक कायद्याची माहिती व त्याचे नियम अटी बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सामजिक कार्यकर्ते गंगाधर गाडेकर, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, डॉ. गणेश कदम, धानोरा येथे गणेश शिंदे, बळीराम देवकते, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर, प्रकाश सेवनकर, राहुल सोनुले यांची उपस्थिती होती. कार्याक्रमाचे सूत्र संचालन एड.आर.एस.जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष सिल्लेवाड यांनी मानले. याप्रसंगी हजारोच्या संखेत गावातील नागरिक, महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.

बुधवार, 19 नवंबर 2014

डेंगू बाबत जनजागृती

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील जी.प.उर्दू व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढून सध्या फोफावत असलेल्या डेंगू आजाराबाबत जनजागृती करून कोरडा दिवस पाळण्याचा संदेश दिला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात देण्गुच्या आजाराने डोके वर काढले असून, यामुळे अनेकांना आपला अनमोल प्राण गमवावा लागला आहे. हा आजार अस्वच्छ परिसर, घाणीचे साम्राज्य यामुळे पसरतो. डेंग्यू हा एका विषाणूमुळे होणारा आजार असून, एडीस इजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंगूचा वाढता प्रकोप लक्षात घेता याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशेने जिल्हाभरात जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील जी.प.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री असद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांची हाती फलक धरून प्रभात फेरी काढली.

यात विद्यार्थ्यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा, परिसर स्वच्छ ठेवा, डेंग्यूचे नियंत्रण करण्यासाठी डासांची पैदास थाबाविण्यासाठी काळजी घ्या, परिसर स्वच्छता पाळा डेंगू टाळा, जो घर दार स्वच्छ करी तिथे आरोग्य वास करी, डेंगू पासून सावधान, स्वच्छता दिवस पाळा..आजार टाळा, डेंग्युपासून आपला बचाव करा यासह डेंगू आजाराबत अनेक घोषणा देत जनजागृती केली. हि प्रभात फेरी जी.प.शाळा ते बाजार चौक, चौपाटी, ग्रामीण रुग्णालय, आंबेडकर चौक परत जी.प.शाळेत परत येवून हात धुवा कार्यक्रम संपन्न करून समारोप झाला. सदर रेलीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पांचाळ, औषध निर्माता डॉ. सुचित मामीडवार, म.अहमद खान, परिचारिका वंदना रच्चावार, डॉ. राजेंद्र वानखेडे, जी.प. शाळेचे मोहसीन सर, सिराज सर, शेख तय्यब सर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

महीलांनी पुढाकार घ्यावा

हिमायतनगर(अनिल मादसवार) गांवातील नागरीकांचे आरोग्य आबाधीत ठेवण्यासाठी सर्वांनी घराबरोबर सामाजीक स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन, आपल्या घरात शौच्चालय बांधुन वैयक्तीक स्वच्छता ठेवण्यासाठी महीलांनी पुढाकार घ्यावा. तसेच निरोगी व निरामय जिवन जगण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतीपादन पंचायत समीतीच्या सभापती सौ.आडेलाबाई हातमोडे यांनी केले.

त्या तालुक्यातील दरेसरसमतांडा येथील जि.प.प्राथमीक शाळेत आयोजीत स्वच्छ भारत अभीयाणाअंतर्गत आयोजीत स्वच्छता जनजागरण कार्यक्रमव शोच्चालय बांधकामाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होत्या. यावेळी जि.प.सदस्य सुभाष राठोड, पं.स.उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, गटविकास अधिकारी गंगावणे, सरपंच श्रीरंग तरटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री जि.एम.कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.

जिल्हाभरात स्वच्छ भारत अभीयाण कार्यक्रमाची सुरुवात दि.18 पासुन करण्यात आली असुन, त्याच पार्श्वभुमीवर हिमायतनगर तालुक्यातील स्वच्छतेला दरेसरसमयेथुन करण्यात आली. प्रथममहात्मा गांध व संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेचे पुजन करुन झाली. गावातील नागरीकांना घेऊऩ प्रथणताह शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. यात विदयमान पदाधाकी-यांसह गटविकास अधिकारी यांनी हाती झाडु घेऊन स्वच्छता अभीयाणाला सुरुवात केली. त्यानंतर गावातील चालु असलेल्या स्वच्छता गृहाची पहाणी केली. तर नव्याने शौच्चालय बांधकामसुरु करणा-या नागरीकांच्या घरी सभापती महोदयांच्या हस्ते शौच्चालयाचे भुमीपुजन करण्यात येऊन कामास सुरुवात केली. यावेळी उपस्थीत नागरीकांनी स्वयंस्फुर्तिने शोच्चालय बांधुन गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. यावेळी बोलतांना हातमोडे पुढे म्हणाल्या की आगामी २०२० पर्यंत संपुर्ण भारत स्वच्छ करुन शासनाचा महासत्ता बनविण्याचा उद्देश आहे. त्याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे अवाहन करुन अभीयाणाल गती देण्याची सुचना केली आहे. त्यानुसार जिल्हाभरात संपुर्ण स्वच्छता अभीयाण व निर्मल भारत अभियाण चळवळ गतीमान झाली आहे. यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतहा मेहनत घेत असल्याने नांदेड जिल्हा राज्या नक्कीच अव्वल ठरेल. मात्र यासाठी तुम्हा - आम्हा सर्व जनतेनी पुढाकार घेणे गरजेचे असुन, या चळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच गटविकास अधिकारी यांनी सुध्दा उपस्थीत नागरीकांना स्वच्छता व शौच्चालय बांधकामासाठी शासनाकडुन मिळणारी योजना व निधि बाबत इंतभुत माहीती दिली. तसेच येथील शाळा स्वच्छ , सुंदर असल्याबाबत समाधान मानुन शाळेचे मुख्याद्यापक व शिक्षक यांचे अभीनंदन केले. याप्रसंगी गावकरी नागरीक, शिक्षक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री विजयकुमार दुर्गे यांनी केले तर उपस्थीतांचे आभार ग्रामसेवक तेलंगे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कस्तुरे, दळवेसर, भालेरावसर, शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष गुणाजी राठोड, अवधुतराव भिसे, रामदास राठोड यांच्यासह गावक-यांनी परीश्रम घेतले.

अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यावर वचक नाही

हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील तहसील कार्यालयाचे विद्यमान तहसीलदार सुट्टीवर गेल्याने सध्याचा कारभार हा पुन्हा प्रभारीवर येवून ठेपला आहे. सदर अधिकारी सुद्धा या ठिकाणी येत नसल्याने तहसील कार्यालयात भोंगळ कारभार सुरु असल्याने अनेकांची कामे खोळंबली आहे. या प्रकाराकडे तालुक्याच्या आमदारांनी लक्ष देवून कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष अधिकारी या ठिकाणी आणून भरकटलेल्या तहसीलच्या कारभारास शिस्त लावावी अशी मागणी लाभार्थी, सामान्य नागरिकांतून केली जात आहे.

५२ तालुक्याचा कारभार चालविल्या जाणार्या तहसील कार्यालयात मागील काही वर्षापासून सवल -गोंधळ सुरु आहे. या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्यालयातील व फिल्डवर राहणाऱ्या कर्मचार्यांवर वचक राहिली नसल्याने आवो..जावो घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे. गत पुढार्यांना अभायामुळे तहसील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असून, वाटेल तेंव्हा येणे व जाणे करीत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना चपला झिजवाव्या लागत आहेत. तहसील मधून चालणार्या पुरवठा विभाग, आपत्कालीन, निराधार, गौण खनिज महसूल वसुली, १०७ च्या जमानती, आअवक - जावक विभाग, यासह साज्ज्यावरील मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य विभागातील कमर्चारी मनमानी पद्धतीने वागून सामन्यांची लुट करीत असल्याच्या असंख्य तक्रारी होतच असतात. तरी देखील आजवरच्या एकही अधिकार्यांनी या कर्मचार्यांना शिस्त लावणे तर सोडाच नागरिकांच्या तक्रारीवरून साधी विचारपूस तर सोडाच स्वार्थासाठी अभय देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे जिल्हाभरात हिमायतनगर तालुक्यातील गौण खनिज, फेरफार, वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या रेशन कार्डच्या फायली, रेशन व केरोसीन वितरण, निराधारांची निवड, तक्रारी वरिष्ठांकडे न पाठविणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे, निराधारांची कामे करण्यापासून ते उत्पन्न व जातीच्या प्रमाणपत्रासाठी दलालांचा सूळसुळाट यावर अंकुश ठेवण्यास तथा कामात पारदर्शकता ठेवण्याबाबत सूचना केल्या नाही. त्यामुळेच कि काय बहुतांश गोर -गरिबांची कामे प्रलंबित आहेत. तथा कामात पारदर्शकता ठेवण्याबाबत सूचना केल्या नाही. त्यामुळेच कि काय तालुक्यात रेशन, केरोसीनचा काळाबाजार, निराधार, शेतकरी, रेशन कार्ड लाभधारकांची लुट, गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन केले जात असताना आकारण्यात आलेली दंडाची रक्कम वसुली व जप्त करण्यात आलेल्या साठ्याचा लिलाव न करता चोरट्यांना रान मोकळे सोडले असल्याचा आरोप नागरीकातून व्यक्त होत आहे.

याचाच प्रत्यय दि.१९ बुधवारी येथिल तहसिल कार्यालयात आला असून, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार याच्या कार्यालयात जवळगाव साजज्चे मंडळ अधिकारी यांच्यात कलगीतुरा रंगला होता. वरिष्ठांनी सुचविलेले काम चोखपणे पार न पडता चोरट्यांना अभय देत असल्यावरून हा प्रकार झाल्याचे समजले. याचे कारण जाणून घेतले असता समजले की मागील काही दिवसापासून अल्प प्रमाणात पाणी साठा असलेल्या पोटा तलावातून अवैद्य रित्या पाणी उपसा करणार्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु याची अंमलबजावणी केली जात नसल्यावरून या दोघात भांडण सुरु होते. यावेळी सूचना करणाऱ्या वरिष्ठ अधिकार्यास या मंडळ अधिकारी महाशयाने तर आरेरावीची भाषा वापरल्याने राजकीय वरदहस्त असलेल्या पाणी चोरट्यांना मंडळ अधिकार्याकडून अभय दिल्या जात असल्याचे समजले. हा प्रकार तहसील कार्यालयात उपस्थित झालेल्या शेकडो नागरिकांनी पहिल्याने अश्या उर्मट व कामचुकार मंडळ अधिकार्यास निलंबित करावे असा सूर नागरिकांच्या तोंडून निघत होता. कारण या महाशयाने आजवर नेमून दिलेल्या ठिकाणी महिन्यातून दोन - तीन वेळा हजेरी लावणे, उतपन्न प्रमाणपत्र, जातीच्या प्रमाणपत्र, निराधारांच्या प्रस्ताव, शेती फेर -फेरफारसाठी अनेकांची अडवणूक करून चपला झिजविण्यास भाग पडले होते असे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलून दाखविले. या मंडळ अधिकार्यावर व कार्यालयात वेळेनुसार कामात कुचराई करून अनुपस्थित राहत शुल्लक कामासाठी नागरिकांची लुट करणार्यावर तालुक्याच्या नूतन आमदार महोदयांनी शिस्त भंगाची कार्यवाही करून मुख्यालयी राहण्याचे आदेश देवून कामकाजात पारदर्शकता आणावी अशी मागणी सामान्य नागरीकातून केली जात आहे.शनिवार, 15 नवंबर 2014

पाणी टंचाई आराखडा बैठक

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अधिकार्‍यांनी मुख्यालयावर राहावे - आ.आष्टीकर


हदगाव(शिवाजी देशमुख)पंचायत समितीच्या वतीने पाणी टंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होतो त्या बैठकीमध्ये आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई व दुष्काळ पाहता तालुक्यातील सर्व ग्रामसवेक व सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी आपआपल्या मुख्यालयावर किमान चार ते पाच दिवस राहुन तेथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडव्यावात असे आहवान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी पाणी टंचाई निवारानार्थ घेण्यात आलेल्या आराखडा आढावा बैठकीत बोलतांना केले.

या बैठकींस हदगाव पंचायत समितीचे सभापती बालासाहेब कदम, उपभापती जयश्रीताई देशमुखे, तालुका दंडाधिकारी संतोष गोरड, गटविकास अधिकारी धनवे, कृषी अधिकारी तपासकर ,अभियंता भारती , पाणी पुरवठा गायकवाड, माजी जि.प.सदस्य बाबुराव कदम, माजी तालुका प्रमुख पांडूरंग कोल्हे,शामराव चव्हाण, सुभाष जाधव, विवेक देशमुख, डॉ.संजय पवार ,रामराव पाटील, गजानन पवार, सुधाकर महाजन, बालाजी राठोड, वळसे पाटील, रामु ठाकरे, कांतराव तावडे, प्रताप सोळंके, राजु तावडे, विश्र्वबंर गोदजे, सरपचं , उपसरपचं, चेअरमन, सदस्य उपस्थित होते. हदगाव तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी घेण्यात आलेली ही बैठक देवउखळाई आश्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पाणी टंचाई बैठक 3 ते 4 तास चालली, पाणीटंचाई निवारण बैठकिच्या निमीत्यांने उपस्थित असलेल्या गावातील सरपंच, ग्रामपचांयत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य अशाकडुन विविध सुचना त्यांचे निरक्षण करून सबंधीत विभागाला सुचना करण्यात आल्या. दुष्काळ टंचाई व पाणी टंचाई पाहता ईसापुर धरणातील पाणी पैनगंगा नदीत सोडणे व विधन विहिरी अधिगृहण करण्याच्या सुचना केल्या.

तसेच भविष्यामध्ये तालुक्यातील गावामध्ये असलेल्या गावतळयात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गाव तलावातील तात्काळ गाळ काढुन पाणीसाठा वाढविण्यात यावा. प्रत्येक गावातील पाणी पुरवठा करणार्‍या योजनांना सुरळीत विज पुरवठा 24 तास उपलब्ध करून दयावा यासाठी सुचना करण्यात आल्यात. पाणी पुरवठा योजनेचा डिपी जळाला असेल तर तो विधुत रोहीणी अंतर्गत जोडावा तसेच या बैठकिस दांडी मारणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची सुचना हि देण्यात आली. पाणी टंचाई व दुष्काळ यामध्ये अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी कुठल्याही प्रकारे काम चुकारपणा न करता सहकार्य करावे असे आव्हान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या बैठकीचे सुत्रसचलन कुलदिपक व आभार वडजे यांनी केले.

सभापतीचे कार्य कौतूकास्पद 
-------------------------
हदगाव पंचायत समितीचे सभापती बालासाहेब कदम यांनी स्वत: तालुक्याममध्ये पत्येक गावामध्ये जावुन स्वच्छता अभियान व स्वच्छालय बांधकामासाठी नागारिकांना सुचना करुन स्वच्छालयाचे महत्व पटवुन देवुन नागरिकांना आपले गाव स्वच्छ कसे ठेवता येईल याचे मार्गदर्शन करुन आपल्या टिमला घेवुन उपक्रम राबवित आहेत त्यामुळे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

सत्कार घेणे योग्य नाही 
--------------------------
हदगाव तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असुन आपल्या तालक्यातील शेतकरी ह दुष्काळाच्या विळख्यात अडकला असुन या दुष्काळ व पाणी टंचाई च्या काळात सत्कार घेणे हे योग्य नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी व माझ्या हितंचितकांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन सत्कारांचे आयोजन करू नये असे उदगार आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.

वांग्यात ओम

अहो आश्चर्यं..कापलेल्या वांग्यात दिसून आले ओम

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील एका गृहिणीने स्वयंपाकासाठी वांगे कापताच त्यात " ओम " आकार दिसून आल्याने गृहीनेने आश्चर्य व्यक्त केले असून, कापलेले वांग्याचे दोन्ही भाग देवघरात ठेवले आहे.

सविस्तर असे कि, नित्याप्रमाणे हिमायतनगर शहरातील रुखामिनी नगर भागातील एका गृहिणीने सायंकाळी ५  वाजता स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. शनिवार उपवासाचा दिवस असल्याने वांग्याची भाजी करण्याच्या हेतून वांगे चिरत होती . अचानक चिरलेल्या एका वांग्यात चक्क ओम आकार दिसून आला. हा प्रकार बघतच गृहिणी तर आश्चर्यचकित झालीच, अन्य लोकांनी पाहून निसर्गाची हि किमया पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. सदर गृहिणीने चिरलेले ते वांगे भाजीत न टाकता नवलाईने त्याचे दोन्ही भाग हे देवघरात विराजमान केले आहे. ओम आकार हे शुभ संकेत असल्याचे सदर गृहिणीचे म्हणणे आहे.    

शेती फुलवली

चलम्याच्या पाण्यावर खडकाळ कोरडवाहू जमिनीवर शेती फुलवली 


हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रयत्ने वाळूचे कान रगडीता तेलही गळे या म्हणीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकर्याने शेतात वीजपुरवठा, विद्दुतपंप नसताना देखील एका बड्या शेतकऱ्याला लाजवील अश्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्टाच्या घामाने चलम्याच्या पाण्यावर खडकाळ कोरडवाहू जमिनीवर शेती फुलविली आहे. त्यांची हि जिद्द चिकाटीची मेहनत पाहून सर्व स्तरातून शेतकर्याचे कौतुक केले जात आहे. अश्या अल्पभूधार मेहनती शेतकऱ्याला शासनाने योजनांचा लाभ मिळवून देवून हातभार लावावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. 

हिमायतनगर शहरातील कालीन्का गल्लीत राहणारा गरीब शेतकरी गोपीनाथ राजाराम गुंडेवार वय ५८ वर्ष यांना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रोडवर २ एकर ११ गुंठे शेती आहे. सदर शेती हि खडकाळ व कोरडवाहू आहे. अश्या शेतीत उतपन्न काढायचे म्हणजे भल्या भल्याचे कंबरडे मोडते. मात्र कोणत्याही परिणामाची चिंता न करता या शेतकर्याने पत्नीच्या मदतीने घाम गाळून शेती कसली. सध्या बदलत्या वातावरणात शेती पिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना सर्वाप्रमाणे त्यांना सुद्धा अल्प पावसाचा फटका बसल्याने दुबार पेरणी करावी लागली. तरीदेखील हार न मानता त्यांनी कष्टाने कापूस, तूर व मिरचीचे पिक घेतले. मात्र पुन्हा निसर्गाने अवकृपा केल्याने पिकांना कसे वाचवावे या चिंतेत होता. सर्वत्र प्रयत्न केले, मात्र कोणी साथ देइन अश्या परिस्थितीत मागील काळात स्वतःच्या कष्टाने १० - १२ हाथ खोदलेल्या चालम्याच्या पद्धतीत (झरा खोदल्या प्रमाणे) असलेल्या विहिरीत पाणी आले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी विद्दुत पुरवठा आवश्यक होता, परंतु तो मिळाला नाही. म्हणून त्यांनी घरात नळासाठी वापरण्यात येणारी पावून इंच पाईप लाईन आणून २ एकर शेतात नळफिटिंग पद्धतीने फिरविली. तसेच चलम्याच्या काठावर एका लोखंडी डब्ब्याचे आळे तयार करून सदर पाईप लाईनला कनेक्शन जोडले. प्लास्टिकच्या रंगाची बकीट घेवून चलम्यातील पाणी शेंदून काढून आळ्याद्वारे ते पाणी कापूस, तूर, मिरची या पिकांना देत आहे.  


त्यामुळे आजघडीला शेतकर्याने दोन एकरात पहिल्या वेचानीत पाच कुंटल कापूस पिकविला आहे. आजही शेतातील एका एका झाडाला ३५ ते ४५ कापसाचे बोंड लागलेले असून, पुढील काळात यातून १५ ते २० कुंटल कापूस उत्पादन होईल असे त्याने प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. एवढेच नव्हे तर उर्वरित ११ गुंत्या मध्ये सदर शेतकर्याने टमाटे, बैंगन, कांदा, लसुन, मेथी, मुलगा, आदीसह अन्य प्रकारचा भाजीपाला लावून उत्पन्न काढीत आहे. 

याच्या यशाचे गमक त्याने पत्नीची साथ असल्याचे सांगून गत २० वर्षापूर्वी मिस्त्रीचे काम सोडून  १९८४ ला शेती करण्यास सुरुवात केली. शेतीत मेहनत केल्याने फळ मिळते हे लक्षात आल्यानेच आज घडीला चांगले उत्पन्न काढीत आहे. यावर ४ मुलींचे लग्न केले, गरीब परिस्थिती असताना देखील एका मुलीला शिक्षण देवून नौकरिअल लावले, एक मुलगा शिक्षण घेत असून, एक मुलगा ऑटो चालवून मला शेतीकामासाठी मदत करीत आहे. मात्र एका शेतकर्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनाचा फायदा व्हायला पाहिजे तोही होत नाही. शेतीतून निघणारे उत्पन्नावर  परिवारचा उदरनिर्वाह करतो परंतु महागाईच्या काळात तो अपुरा पडत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जर माझ्या शेतात शासनाकडून जवाहर विहीर, विद्दुत पंप, विद्दुत कनेक्शन मिळाले असते तर आज घडीला माझ्या उत्पन्नात तीन पटीने वाढ झाली असती असेही त्यांनी बोलून दाखवीत आगामी काळात शासनाच्या योजनाचा लाभ आमच्यासारख्या घाम गळणाऱ्या शेतकर्यांना मिळायला हवा अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.     

शुक्रवार, 14 नवंबर 2014

नुकसान भरपाई तातडीने मिळावी

हवामानावर आधारित पीकविमा संरक्षण योजनेची नुकसान भरपाई तातडीने मिळावी

  
हिमायतनगर(वार्ताहर)राष्ट्रीय पिक विमा कार्यक्रम २०१४ हवामानावर आधारित पिक विमा योजने अंतर्गत शेतकर्यांना कापूस, सोयाबीन पिक संरक्षण विमा योजनेची रक्कम शेतकर्यांना तातडीने वितरीत करावी अशी मागणी सरसम बु.येथील शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासन निर्णय नुसार खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी हवामानावर आधारित पिक विमा योजने अंतर्गत कापूस, सोयाबीन विमा लागू झाला असताना अद्यापही सदर विम्याची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोंचली नाही. खरीप हंगामात कृषी विभागाच्या सांगण्यावरून तालुक्यातील गरीब शेतकर्यांनी पिकांची पेरणी केली. परंतु वातावरणातील बदल पाहता हवामानावरील पिकविमा असल्याने बहुतांश शेतकर्यांनी खिशात दमडी नसताना देखील शासनाच्या फसव्या जाहिरातीला भुलून पिकविमा काढून हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केत डी.डी.द्वारे रक्कम भरली. 

दरम्यान पेरणीच्या काही दिवसात पर्जन्यमान कमी झाले, तसेच वातावरांतील बदलाने अपुरा पाऊस, १५ दिवसानंतर पडणारा महिना, दोन महिन्याचा खंड यामुळे हाती आलेली पिके नुकसानीत  आली. हा प्रकार हमानामाच्या बदलामुळे झाला असून, या बाबतची नुकसान भरपाईचा विम्याची रक्कम मिळायला हवी होती. यासाठी अक्टोबर २०१४ पासून हिमायतनगर तालुका कृषी कार्यालय, नांदेड येथील कृषी कार्यालयास विचारपूस केली. मात्र संबंधिताकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक तर झाली नाही न असा सवाल उपस्थित होत आहे. 

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून, पिके गेली, आता शासनानेही वार्यावर सोडल्याने पिकविमाही हाताचा जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकर्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.  या बाबीकडे संबंधित विभाग व शासनाने जातीने लक्ष देवून तातडीने शेतकर्यांना हवामानावरील पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करावी. अन्यथा शेतकरी हक्कासाठी न्यायालयाच्या दारात जावे लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावर सर्सम परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.

गुरुवार, 13 नवंबर 2014

कुपोषण मुक्तीचा संदेश

चिमुकल्यांनी दिला कुपोषण मुक्तीचा संदेश 


हिमायतनगर(वार्ताहर)शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडीच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून ठीक ठिकाणी प्रभातफेरी द्वारे चिमुकल्यांनी कुपोषण मुक्तीचा संदेश दिला आहे.

दि.१४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी ताई, मदतनिस यांच्या पुढाकारातून चिमुकल्या बालकांची हाती फलक घेवून जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली. तत्पूर्वी अंगणवाडीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत चिमुकल्यांनी वेळेवर लसीकरण केले पाहिजे, जन्मजात बाळाला अर्ध्या तासाच्या आत चीकयुक्त दुध पाजविले पाहिजे, कुपोषण निर्मुलन झालेच पाहिजे, महिलांनी बाळाचा वाढदिवस केलाच पाहिजे, लेक वाचवा देश वाचवा, आदी घोषनातून संदेश देण्यात आला आहे. बालक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला आहे.

महिलांच्या समस्याहदगाव(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या जनतेनी नागेश पाटील आष्टीकर यांना भरघोस मतांनी निवडून देवून बालेकिल्ला पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात दिला. हि बाब तालुक्यासाठी भूषणावह असून, सध्याच्या दुष्काळजण्य परिस्थितीत गोर - गरीब महिलांच्या समस्या सोडवून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी गाव - गावात महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. असे उद्गार हदगाव तालुका महिला आघाडीच्या प्रमुख लताताई फाळके यांनी काढले.

त्या तालुक्यातील ग्रामीण भागातील निराधार महिलांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी हदगाव तहसील कार्यालयात आल्या असता महिलांशी संवाद करताना बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत जयश्री देशमुख, जनाबाई कदम, सुषमा उदावंत, शीलाताई गंधारे व ग्रामीण भागातील निराधार, परितक्त्या महिला उपस्थित होत्या. पुढे बोलताना त्या म्हणल्या कि, सध्या महिलांच्या उन्नतीसाठी शासनाने भरपूर योजना आखल्या आहेत. त्या योजनांचा पुरेपूर फायदा निराधार - परितक्त्या महिलांना, बचत गटाच्या महिला, तसेच रोजंदारीवर कामाला जाणार्या महिलांच्या हाताला काम, ग्रह उद्योग, सुकन्या योजना, जन - धन योजना यांच्या लाभ सर्व महिलांना मिळावा, तसेच महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून स्वावलंबी बनविणे, महिला व बालविकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोन्चविणे हा आमच्या शिवसेना महिला आघाडीचा उद्देश आहे.

तसेच एखाद्या गरीब महिलेला दारुड्या पतीकडून त्रास दिला जात असेल तर तीस यातून वाचवून दारुड्याला अद्दल घडविणे, तसेच महिलांच्या हक्कासाठी वेळ प्रसंगी संघटनेच्या रणरागिणी महिलांना सोबत घेवून रस्त्यावर उतरून महिलांच्या हक्कासाठी लढू. आजवर हदगाव तालुक्यात बर्याच ठिकाणी महिला आघाडीचे संघटन उभे केले आहे. आजूनही मोठ्या प्रमाणात महिलांची फळी तयार झाली असून, त्या त्या ठिकाणी लवकरच शाखा स्थापन करून फलक लावून उद्घाटन करण्यात येईल. कोणत्याही महिलेची कुठेही अडवणूक होत असेल तर बिनधास्त आमच्या महिला आघाडीशी संपर्क करा असे आवाहनही त्यांनी महिलांना केले. यावेळी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

बुधवार, 12 नवंबर 2014

दत्तक गाव एकघरीला भेट

शेतकर्यांनी विहिरी, बोअर पुनर्भरणावर भर द्यावा - कुलगुरू व्यंकटेश्वरलू 
दत्तक गाव एकघरीला भेट 
शेतकऱ्यांशी साधला मुक्त संवाद 


हिमायतनगर(अनिल मादसवार)खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसाने महाराष्ट्रात पिक परिस्थिती अगदी बिकट आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यात तर अधिकच बिकट परिस्तिति आहे. या परिस्थितीवर मात करून आगामी काळात शेतीत चांगल्या उत्पादनासाठी शेतकर्यांनी विहिरी, बोअर पुनर्भरण करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीशील वाटचालीसाठी शेतीपूरक जोड धंद्यावर भर द्यावा असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केले. 

ते हिमायतनगर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या एकघरी गावात कापूस संशोधन केंद्र नांदेडच्या वतीने अखिल भारतीय समन्वयीत कापूस सुधार प्रकल्पाद्वारे प्रथम दर्शनी पिक प्रात्यक्षिक व आदिवासी उपाययोजनाच्या माध्यमातून दि.१२ बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षीकाना भेटी आणि निविष्ठा वाटप कार्यक्रमास उपस्थित झालेल्या शेतकर्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नांदेड कापूस संशोधक केंद्राचे प्रमुख डॉ.खिजर बेग, सहाय्यक कृषी विद्यावेत्ता प्रा.अरविंद पंडागळे, सहाय्यक विकृती शास्त्रज्ञ डॉ.पवन ढोक, सहाय्यक पैदासकार दत्तात्रेय दळवी, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी पर्यवेक्षक लाखामोड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शेतकऱ्यांची मुक्त संवाद साधून पाणी परिस्थिती, उत्पादन, शेती लागवड पद्धत, बियाणे व खतांचा उपयोग आदींसह अन्य कृषी विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच काही शेतकर्यांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या बियाणांचे वाटप हे मी महिन्यातील पहिल्या आठवड्यात देण्यात यावेत अशी मागणी केली. तर काहींनी जास्तीत जास्त शेतकर्यांना शासनाच्या बियाणांचा लाभ मिळावा त्यात अजित १५५ या बी.टी.बियाणाचा समावेश व्हावा अशी रास्त मागणी केली. तर माजी सरपंच सत्यव्रत्त ढोले यांनी तालुक्यात अजित व डॉ. ब्रन्ड सारख्या बियाणांची होत असलेल्या जादा दराच्या विक्री बाबतचा प्रश्न मांडला. 

शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर देताना त्यांनी सर्व प्रश्नाबाबत गांभीर्याने विचार करून समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच कृषी विभागाने पाणी पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देवून शेतकऱ्यांना विहिरी, बोअराचे पुनर्भरण करण्याबाबत प्रोत्साहित करावे. जास्त उत्पादनासाठी पुढील वर्षी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात बी.बी.एफ.(रुंद वरंबा सरीचे) यंत्र आणून लागवडीसाठी पर्यंत करावे. जास्त शेतकर्यांना शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती देवून त्यांच्या पर्यंत पोन्चवाव्या. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्यावर भर द्यावा असे सुचित केले. तर शेतकर्यांनी लागवडीपूर्वी मातीपरीक्षण करून बियाणे व खताची मागणी करावी, त्यानुसार वापर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी मंचावरून संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नानां उत्तरे देत कपाशीवरील पंढरी माशी, मावा- तुडतुडे, मिलीबग, फुलकिडे आदी कपाशीवरील रस शोषण किडीवर नियंत्रन कश्या पद्धतीने मिळवावे. आणि कापूस लागवडीपूर्वी व्यवस्थापन कसे करावे याबाबत सांगून सविस्तर माहिती असलेली पुस्तिका व कोरडवाहू बी.टी.कापूस उत्पादन तंत्रज्ञान असलेली पुस्तिका, हंड्प्रोस्पेक्ट, तसेच निविष्ठांचे वितरण करण्यात आले. 

कापूस सुधार प्रकल्पाद्वारे घेतलेल्या प्रथम दर्शनी पिकाची कुलगुरूनी केली पाहणी
-------------------------
कृषी विद्यापीठाने दत्तक घेतलेले गाव एकघरी येथे शेतकर्यांना मार्गदर्शन केल्यानंतर लगेच परिसरातील शेतकरी सुदाम सीताराम ढोले, केशव सीताराम ढोले, माधव मारोती ढोले यांनी अखिल भारतीय समन्वयीत कापूस सुधार प्रकल्पाद्वारे घेतलेल्या प्रथम दर्शनी पिक प्रात्यक्षिकाची पाहणी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केली. 

यावेळी शेतकऱ्यांशी व कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच शेतकर्यांनी आगामी काळात आणखीन जास्त कपाशीचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे सुचित करून अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संशोधक संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कापूस संशोधक प्रमुख डॉ.खिजर बेग, सहाय्यक कृषी विद्यावेत्ता प्रा.अरविंद पंडागळे, सहाय्यक विकृती शास्त्रज्ञ डॉ.पवन ढोक, सहाय्यक पैदासकार दत्तात्रेय दळवी, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, श्री तुषार नामदे, एल.टी.शेळके, तालुका कृषी अधिकारी बी.बी.दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी पर्यवेक्षक लाखामोड, कृषी सहाय्यक डी.डी.भालेवाड, आर.व्ही सिलमवार, एन.एम.पैलवाड, बी.डी.माजळकर, ना.मा.लोखंडे, राठोड, व्ही.बी.कदम, माजी सरपंच सत्यव्रत्त ढोले, प्रकाश जाधव, पत्रकार अनिल मादसवार,धम्मपाल मुनेश्वर आदींसह शेतकरी, गावकरी, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.                                                               


   

मंगलवार, 11 नवंबर 2014

बोगस बदली प्रकरण

बोगस बदली प्रकरणात हिमायतनगरच्या तिघांचा समावेश..
आणखी १० हून अधिक मासे रडारवर 


हिमायतनगर(अनिल मादसवार)गत २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात नियमबाह्य पद्धतीने सोयीचे ठिकाण बदली करून घेणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील १७ शिक्षकांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यु काळे यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे. त्यात हिमायतनगर तालुक्यातील २ शिक्षक व एका केंद्रप्रमुखाचा समावेश असून, अजूनही १० पेक्षा जास्त शिक्षकांची याचा काळात बदल्या झाल्या होत्या. त्यांच्यावरही कार्यवाहीची टांगती तलवार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

तत्कालीन काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षांनी काही संबंधित कर्मचर्यांना हाताशी धरून अनेकांच्या नियमबाह्य पद्धतीने बदल्या करून एक पराक्रमाच केला होता. परंतु सत्य हे सत्यच असते ते कधीही लपत नसते. याचा प्रत्यय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यु काळे यांनी सुरु केलेल्या बदलीच्या चौकशीच्या कार्यवाहीवरून दिसून येत आहे. जी.प.अध्यक्षांना आपल्या स्तरावर केवळ २० शिक्षकांच्या बदल्या करण्याचा अधिकार असताना त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून ५० ते ६० शिक्षकांच्या नियमबाह्य पद्धतीने बदल्या करून स्वार्थ साधला अशी ओरडा त्या वेळी अनेकांनी केली होती. यात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचे सर्वश्रुत असताना त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी योग्य पुरावा हाती नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु नव्याने जिल्हा परिषदेचा कारभार पाहणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी हळू हळू आपली कामाची चुणूक दाखवीत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामाची चौकशी केली. यात नियमबाह्य पद्धतीने बदल्या केल्याचे निदर्शान आलेल्या संबंधित केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यवाहीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, सेवा जेष्ठतेनुसार अन्याय झालेल्या शिक्षकात समाधानचे वातावरण आहे. 

नियमबाह्य बदल्यांचे राजकारण हिमायतनगर तालुक्यातील स्वार्थी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या लालचेने मोठ्या प्रमाणे फोफावले असून, यात अनेक शिक्षक अडकल्याचे बोलले जात आहे. हि बाब सर्वश्रुत असताना देखील कोणीही आवाज उठविल्या नसल्याने संबंधित शिक्षकांनी नेमून दिलेल्या शाळेच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर न राहत सोयीचे ठिकाण घेवून आपली चांदी करून घेतली आहे. आता ते शिक्षकही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याने त्यापैकी किती जणांवर निलंबनाची कार्यवाही होणार असा सवाल पुढे येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांनी पहिल्या टप्प्यात केवळ १७ जणांवर कार्यवाही झाली असली तरी अन्य लोकांवर केंव्हा कार्यवाही होणार याकडे शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्यामुळे नियमाप्रमाणे पात्र असलेल्या शिक्षकांना आता न्याय मिळण्याची आशा वाढीस लागली आहे. 
     

चातुर्मास उत्सवास सुरुवात

शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवास सुरुवात 


हिमायतनगर(वार्ताहर)येथील शिवनागनाथ मंदिरात चातुर्मास उत्सवाला अभिषेक व सत्यानाराना महापुजेने सुरुवात कार्तिक वद्य पंचमी शके १९३६ दि. ११ मंगळवारी झाली आहे. यावेळी आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्ण पाटील यांनी भेट देवून दर्शन घेतले आहे. 

शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या शिवनागनाथ मंदिरात दरवर्षी चातुर्मास वार्षिकोत्सव उत्साहाच्या वातावर्नास्त साजरा केला जातो. याची सुरुवात दि.११ मंगळवारी सकाळी ११ वाजता अभिषेक, महापूजा व सत्यनारायण पूजेने करण्यात आली. या कार्यक्रमास आ.नागेश पाटील आष्टीकर येणार होते परंतु पहिल्या विधानसभेच्या अधिवेशनास सुरुवात झाल्याने त्यांची उणीव भासू नये म्हणून त्यांचे ची. कृष्णा नागेश पाटील यांनी उत्सवात हजेरी लावून नागनाथाचे दर्शन घेतले. यावेळी संत देवमय यांनी शाल श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला.
    
संयोजक मोहन सातव, सदाशिव सातव, अध्यक्ष सुदर्शन पाटील यांच्या पुढाकारातून या उत्सवात चांगलीच रंगत आली आहे. मंगळवारी सायंकाळी ०७ वाजता झेंडा व लॉड जागेची पूजा, त्यानंतर  हभप कृष्णा बुवा चिखलीकर महाराज यांचे प्रवचन व संत देवमाय व नाग्नाठावर श्रद्धा असलेल्या भक्तांनी धगधगत्या निखार्यातून प्रवेश केला. रात्री महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम सुरु होता. दि. १२ बुधवारी सकाळी ८ वाजता शिवनागनाथ मंदिरातून तुळशी वृंदावन कलशासह पालखी मिरवणूक ढोल तश्याच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. सदर मिरवणूक हि शहरातील सर्व देवी-देवतांचे दर्शन घेत पुन्हा शिव नागनाथ मंदिराजवळ परत येवून समारोप केला जाईल. त्यानंतर हभप कृष्णा बुवा चिखलीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. हा अदभूत सोहळा पाहण्यासाठी सर्व नागनाथ भक्तांनी उपस्तीत राहावे असे आवाहन संयोजकाने केले आहे.  

मंदिराचा विकास काम सुरु असून, भक्तांच्या सहकार्यातून कळसाचे काम झाले असून, सभामंडपाचे काम शिल्लक आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आ.नागेश पाटील यांनी या मंदिरास भेट देवून मंदिराचे उर्वरित विकासकाम पूर्णत्वास नेण्याचे वचन दिले होते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता देवमय व नागनाथ व तमाम जनतेच्या आशीर्वादाने मला विधानसभेत पाठविले हे   मी कदापि विसरणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.   

सोमवार, 10 नवंबर 2014

अवैद्य पाणी उपसा सुरूच...

पोटा तलावातून अवैद्य पाणी उपसा सुरूच...
जिल्हाधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी 


हिमायतनगर(वार्ताहर)सर्वत्र पाणी टंचाई सुरु असताना व राखीव पाण्याचा कोठा मृतावस्थेत गेला असताना देखील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील तलावातून राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या शेतकर्यांनी अवैद्यरित्या मोटारी चालवून बेसुमार पाण्याचा उपसा सुरु केला आहे. परिणामी आगामी काळात परिसरातील गाव, वाडी, तांड्यांना व मुक्या जनावरांना पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देवून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करूनही संबंधिताकडून पाण्याचा उपसा सुरुच असल्याचे म्हंटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा तलाव हे तेलंगाना- मराठवाड्याच्या सीमेच्या पायथ्यावर असून, मौजे वाई तांडा ग्राम पंचायती अंतर्गत येतो. या वर्षी खरीप हंगामात अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे तलावात २० टक्क्याच्या जवळ मृतसाठा असून, आगामी उन्हाळ्यातील काळात परिसरातील ५ ते ७ गाव, वाडी, तांड्यांना व जंगलातील पशु, प्राण्यांना पाणी टंचाई जाणवू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सिंचन विभागाद्वारे  पाणी साठा आरक्षित करण्यात आलेला आहे. मात्र या तलावातू काही राजकीय वरद हस्त असलेल्या विद्यमान तथा तत्कालीन पुढारी तथा शेतकर्यांनी या तलावातून मोटारपंपाद्वारे शेतीपिकासाठी पाण्याचा बेसुमार उपसा सुरु केला आहे. हि बाब ग्रामस्थांना समजताच या बाबतच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे करण्यात आल्या. त्यावरून वाई येथील सर्पांचा मधुकर बद्दु राठोड यांनी अवैद्यरित्या सुरु असलेल्या पाणी उपसा बंद करून जनावरांना, पशु पक्षांना व गाववासियाना आगामी काळातील टंचाई पासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त कराव्यात अशी मागणी दि.२० अक्टोबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, तहसीलदार, सिंचन विभाग केनोल निरीक्षक, शाखा अभियंता भोकर यांच्याकडे केली होती. 

या तक्रारीवरून चार - पाच दिवसांनी पोटा सज्जाचे तलाठी रातोळीकर यांनी पोलिस पाटील मधुकर पवार यांच्या समस्क्ष तलावावरील मोटारींना सील लावून कार्यवाही केली होती. परंतु राजकीय बाळाचा वापर करत येथील काही बड्या शेतकर्यांनी महसूल विभागामार्फत लावण्यात आलेले मोटारीचे सील तोडून, विद्दुत पुरवठा खंडित असताना देखील जनरेटर, डीजेलपंपाच्या सहाय्याने पाण्याचा उपसा सुरु केला आहे. या प्रकारामुळे तलावातील साठा कमी होऊ लागला असून, आगामी काळात पाणी संपल्यास जंगली श्वापदे गाव - कुशीत शिरकाव करून वाडी, तांड्यातील नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची संभावना आहे. पाण्याअभावी मुक्या जनावरांना, प्राणीमात्र व पक्षांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे काही गावकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. 

याबाबत अभियंता पत्तेवार यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि, तलावात केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे, आमच्याकडे आलेल्या तक्रारीवरून आम्ही याबाबत विद्दुत मंडळ, तहसील  कार्यालय, पोलिस स्थानक यांना पत्राद्वारे सूचना देवून संबंधितावर कार्यवाही करण्याचे सुचित केले होते. त्यावरून विद्दुत मोटारीच्या पुरवठा खंडित झाला होता. तसेच आमच्या स्तरावर सुरु असलेल्या परवानाधारक व विना परवाना शेतकर्यांना नोटीस देवून मोटारी बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मोटारी बंद करण्याचे काम तहसीलदार यांचे आहे असे सांगून त्यांनी फोन बंद केला. 

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com