आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कलशारोहन
हिमायतनगर| लकडोबा चौकातील श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने दि.०१ में ते ८ में काळात हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह होणार असून, सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बालब्रम्हचारी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहन कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिराची रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून, अन्य तयारी करण्यात आली आहे.
वाढोणा शहरातील लकडोबा चौकात असलेल्या श्री लकडोबा देवस्थान मंदिर कमिटीच्या वतीने हनुमान मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमाचे आयोजन हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. येणाऱ्या दि.०१ में पासून या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान काकडा भजन, सकाळी ७ ते १० वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार असून, हभप.गंगाधर महाराज सांगोळकर हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ सांभाळणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ पर्यंत हरिपाठ, रात्रीला ८ ते ११ वेळेत हरिकीर्तन होणार आहे. तर साप्ताच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अखंड विना पारायण होणार आहे.
सप्ताहात दररोज हभप.बाबू महाराज बासेवाड आंदेगावकर, हभप.रुपालीताई महाराज पवनेकर, हभप.लक्ष्मण महाराज मंदेवाड धानोरकर, हभप.डॉ.लक्ष्मीकांत महाराज रावते ढाणकीकर, कृष्णकृपामूर्ती हभप.लक्ष्मण महाराज बोरगडीकर, हभप. गजान महाराज खरबीकर, हभप.माधव बुवा महाराज बोरगडीकर, आणि शेवटच्या दिवशी म्हणत हभप.समाधान महाराज भोजेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. तत्पूर्वी दि.०७ में रोज शनिवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्याने कलश मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर बालब्रम्हचारी शिवगिरी महाराज दत्त संस्थान महादेव फाटा जिरोणा यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा संपन्न होईल.
या सप्ताहात हरिपाठ व कीर्तनसेवेचे कार्य गायनाचार्य हभप.साहेबराव महाराज बोरगडीकर, हभप.लक्ष्मण महाराज धानोरकर, हभप.पणजोबा महाराज बोरगडीकर, हभप.लक्ष्मण महाराज बोरगडीकर हे राहतील. तर मृदंगाचार्य म्हणून हभप.ज्ञानेश्वर महाराज बोरगडी, चोपदर हभप. परमेश्वर महाराज आंदेगाव, आदींसह श्री परमेश्वर भजनी मंडळ, श्री कालिंका भजनी मंडळ, श्री पांडुरंग भजनी मंडळ, श्री हनुमान भजनी मंडळ, नेहरू नगर, श्री परमेश्वर महिला भजनी मंडळ, श्री लकडोबा भजनी मंडळी सहभागी राहतील. या धार्मिक कार्यक्रमास शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लकडोबा मंदिर देवस्थान कमिटी व समस्त गावकरी मंडळींनी केलं आहे.