काळ्या बाजाराचे केंद्र



भ्रष्टराशन दुकानदारांना पुरवठा विभागाचे अभय

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात गोर गरिबांसाठी मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालू असून, तेलंगाना राज्याच्या सीमेवर असलेले हिमायतनगर शहर हे स्वस्त ध्नाय्च्या काळ्या बाजारचे केंद्रबिंदू बनले आहे. याभ्रष्ट दुकानदारांना मात्र पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्याचे नागरिकांचे म्हनणे आहे.

हिमायतनगर तालुक्यात जवळपास ७२ स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक आहेत. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्याना लाभ मिळत असला तरी अन्न सुरक्षा योजनेचे बहुतांशी लाभार्थी हे साधन कुटुंबातील घेण्याचा चमत्कार अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी केला आहे. राशन कराची फोड करून संख्या वाढविण्यात स्वस्त धान्य दुकानदार यशस्वी झाले आहेत. विभक्त राशन कार्ड करून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा मालीदाही अनेक दुकानदारांनी लाभार्थ्याकडून ५०० ते १००० प्रती कार्ड या प्रमाणात लाटल्याचे अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या होत्या. परंतु भागीदारीत असलेल्या पुरवठा विभागाने एकही दुकान्दारचे चौकशी करण्याचे वा कार्यवाही करण्याचे धरिष्ठ दाखविले नाही. परिणामी पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने नागरिकांचा संताप अनावर होत असून, अनेक स्वस्त धान्य दुन्कंदर महिन्याला किमान तीन ते पाच कुंटल धान्य काळ्या बाजारात विकत असल्याचे नागरिक सांगतात.

हिमायतनगर हे शहर तेलंगाना सीमेवर असल्याने अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्याचा माल हे येथूनच तेलंगाना मध्ये पाठविल्या जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात हिमायतनगर येथील अनेक स्वस्त धान्य दुकानदारासह राजकीय वरदहस्त असलेले बडे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येते. यात अनेक दुकानदार पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांना हाताशी धरून गरीबांचा घास काळ्या बाजारात विकून मालामाल होत आहेत. गरिबांवर मात्र उपाशी पोटी राहण्याची वेळ येत आहे.

अनेक स्वस्त धान्य दुकानदार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार स्वस्त धान्याचे वितरण करीत नसून, महिन्यातून दोन - तीन दिवस दुकान उघडून उर्वरित माल परस्पर काळ्या बाजारात लांबवीत असल्याचे वंचित लाभार्थ्यामधून सांगितल्या जात आहे. वितरीत केलेल्या धान्याची लाभार्थ्यांना पावती दिली जात नसून, दिवस ढवळ्या लाभार्थ्यांची लुट केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक दुकानदार उर्वरित स्वस्तधान्य प्रशासनाकडे परत देत असल्याचे सांगत असले तरी खरा प्रकार काही औरच असल्याचे आढळून येते आहे.

केरोसीन वितरणमध्ये सुद्धा घोळ
-----------------------------
रेशन बरोबर यातील बहुतांश दुकानदाराकडे केरोसीन वितरणाचा ठेका दिलेला असल्याने त्यातही मोह्या प्रमाणात अनागोंदी दिसून येते आहे. कार्द्धार्काना डावलून वाहनांना २५ ते ३० रुपये जादा दराने रॉकेलची विक्री केली जात आहे. त्यामुळे झोपडीतील कार्ड धारकांना रात्रीला अंधारात राहण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी धीरज कुमार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष देवून खर्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून भ्रष्ट दुकानदारावर कार्यवाही करावी अशी मागणी धान्य व केरोसिनच्या लाभापासून वंचित नागरीकातून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी