महिलांच्या समस्या



हदगाव(वार्ताहर)हदगाव - हिमायतनगर तालुक्याच्या जनतेनी नागेश पाटील आष्टीकर यांना भरघोस मतांनी निवडून देवून बालेकिल्ला पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात दिला. हि बाब तालुक्यासाठी भूषणावह असून, सध्याच्या दुष्काळजण्य परिस्थितीत गोर - गरीब महिलांच्या समस्या सोडवून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी गाव - गावात महिलांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. असे उद्गार हदगाव तालुका महिला आघाडीच्या प्रमुख लताताई फाळके यांनी काढले.

त्या तालुक्यातील ग्रामीण भागातील निराधार महिलांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी हदगाव तहसील कार्यालयात आल्या असता महिलांशी संवाद करताना बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत जयश्री देशमुख, जनाबाई कदम, सुषमा उदावंत, शीलाताई गंधारे व ग्रामीण भागातील निराधार, परितक्त्या महिला उपस्थित होत्या. पुढे बोलताना त्या म्हणल्या कि, सध्या महिलांच्या उन्नतीसाठी शासनाने भरपूर योजना आखल्या आहेत. त्या योजनांचा पुरेपूर फायदा निराधार - परितक्त्या महिलांना, बचत गटाच्या महिला, तसेच रोजंदारीवर कामाला जाणार्या महिलांच्या हाताला काम, ग्रह उद्योग, सुकन्या योजना, जन - धन योजना यांच्या लाभ सर्व महिलांना मिळावा, तसेच महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून स्वावलंबी बनविणे, महिला व बालविकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोन्चविणे हा आमच्या शिवसेना महिला आघाडीचा उद्देश आहे.

तसेच एखाद्या गरीब महिलेला दारुड्या पतीकडून त्रास दिला जात असेल तर तीस यातून वाचवून दारुड्याला अद्दल घडविणे, तसेच महिलांच्या हक्कासाठी वेळ प्रसंगी संघटनेच्या रणरागिणी महिलांना सोबत घेवून रस्त्यावर उतरून महिलांच्या हक्कासाठी लढू. आजवर हदगाव तालुक्यात बर्याच ठिकाणी महिला आघाडीचे संघटन उभे केले आहे. आजूनही मोठ्या प्रमाणात महिलांची फळी तयार झाली असून, त्या त्या ठिकाणी लवकरच शाखा स्थापन करून फलक लावून उद्घाटन करण्यात येईल. कोणत्याही महिलेची कुठेही अडवणूक होत असेल तर बिनधास्त आमच्या महिला आघाडीशी संपर्क करा असे आवाहनही त्यांनी महिलांना केले. यावेळी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी