कायदेविषयक शिबिर

हिमायतनगर(अनिल मादसवार)माणसाला कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे. कायद्याचे ज्ञान नसल्याने अनेक वेळा नुकसान सहन करावे लागते. त्यासाठी सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून कामे केल्यास प्रगती साधता येते असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश तथा फिरत्या लोकन्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बी.टी.नरवाडे पाटील यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी, धानोरा ज.येथे दि.१९ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व नंदीग्राम मल्टीपर्पज सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिराच्या मंचावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून झाली. यावेळी उपस्थित मंचावरील मान्यवरांचे गावकर्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून पुढे बोलताना ते म्हणाले कि, कायद्याने चालण्याचे अनंत फायदे असून, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समावेशक घटना या देशाला बहाल केली आहे. राज्य घटनेचा सर्वांनी अभ्यास करून कायद्यातील बारकावे जाणून घेत अज्ञानात दूर करावी. कारण कायद्याचा गुन्हा करणार्यास शिक्षा जरूर होणारच. हेच गुन्ह्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी तथा रामराज्य आणण्यासाठी उच्च न्यालयाने " न्याय आपल्या दारी " ची संकल्पना राबविली आहे. यातून गावातील प्रश्न, समस्या कोर्टात न जात जाग्यावरच सामन्जश्याने सोडविल्या जातात. त्यामुळे वादी - प्रतीवाद्याचा वेळ पैसा दोन्हीची बचत होते. आणि कायद्याचे ज्ञान मिळाल्याने होणार्या गुन्ह्यात घट होते. तसेच जीवनात घडणार्या घटना जश्या कि, साप चावल्यावर पोलिस स्थानकास कळविणे गरजेचे आहे, हीच नोंद शासनाच्या ०१ लाखाच्या विमा मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच जन्म - मृत्यूची नोंद ग्राम पंचायतीत करणे अनिवार्य आहे, त्यामुळे दारिद्र्य रेषेतील मुलींच्या पालकास मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर १० हजारची मदत दिली जाते. तसेच युवकांनी सर्व व्यसनापासून दूर राहावे यासह असंख्य प्रकारच्या कायदाचे फायदे तसेच आपुलकीची भावना ठेवून जीवनात वावरावे असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी उपस्थितांना कायद्याची माहिती देत, कायद्याचा सर्वांनी आदर करावा, कारण कायद्याचा आदर करणार्यांना मोठे फायदे होतात तर अनादर करणार्यांना कायद्यामुळे शिक्षा भोगावी लागते असे सांगितले. एड.प्रवीण आयचीत यांनी अपघात नुकसान भरपाई कायद्याबाबत सविस्तर अशी माहिती दिली. एड.दिलीप राठोड यांनी महिला विषयक कायद्याची माहिती व त्याचे नियम अटी बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सामजिक कार्यकर्ते गंगाधर गाडेकर, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम, डॉ. गणेश कदम, धानोरा येथे गणेश शिंदे, बळीराम देवकते, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर, प्रकाश सेवनकर, राहुल सोनुले यांची उपस्थिती होती. कार्याक्रमाचे सूत्र संचालन एड.आर.एस.जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष सिल्लेवाड यांनी मानले. याप्रसंगी हजारोच्या संखेत गावातील नागरिक, महिला पुरुष मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी