NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

बुधवार, 30 अप्रैल 2014

शुक्रवारी सामुहिक विवाह मेळावा...

गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून जवळगावात १० जोडप्यांचा शुक्रवारी सामुहिक विवाह मेळावा...हिमायतनगर(वार्ताहर)संत तुकडोजी महाराजांच्या विचारसरनीतून प्रभावित झालेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्ते व गावकरी मंडळीनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मूळ गावात दि.०२ मे शुक्रवारच्या शुभ मुहूर्तावर १० जोडप्यांचा सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन कण्यात आले आहे. या मेळाव्यास अनेक राजकीय नेते मंडळी, मान्यवर नागरिक व नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.  

महागाईच्या काळात अधिकच्या खर्चाला फाटा देऊन वेळ व पैश्याची बचात व्हावी. यातून गरीबातील गरिबांचे लग्न संपन्न व्हावे असा संदेश संत तुकडोजी महाराजांनी ग्राम गीतेतून दिला होता. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी होत असून, याच पर्व काळात त्यांच्या सुविचार आचरणात आणत येथील गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्याच्या वतीने सर्वधर्मीय भव्य सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले आहे. विवाहाच्या तत्पूर्वी याचा विवाह मंडपात राष्ट्रीय प्रवचनकार ज्ञानेश्वर केसाले महाराज यांचे ग्रामगीतेवर प्रवचन होणार आहे. असा हा मंगल सोहळा पार पडून गावकरी व गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची जय्यत तयारी केली आहे. या शुभप्रसंगी हजारोच्या संखेत नागरिकांनी उपस्थिती दर्शून वधू - वर दाम्पत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन गावकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हच्या माध्यमातून केले आहे.   

सोमवार, 28 अप्रैल 2014

प्रस्ताव धूळखात

कालबद्ध वेतन श्रेणीपासून आरोग्य कर्मचारी वंचित..प्रस्ताव धूळखात  


हिमायतनगर(वार्ताहर)जी.प.च्या आरोग्य विभागामाफात ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे कर्तव्य पार पडणाऱ्या आरोग्य कर्मचारी माहिला  - पुरुष यांची १२ वर्षाची सेवा पूर्ण होऊनही कालबद्ध वेतनश्रेणी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. या बाबतचे प्रस्ताव संबंधित कर्मचार्यांनी जी.प.आरोग्य विभागाकडे सुपूर्द करूनही धूळखात पडल्याने आरोग्य विभागाच्या गालथानपनाच्या कारभाराबाबत   कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, यांच्यासह इतर पदावर्काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवा काल १२ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना कालबद्ध वाढीव वेतनश्रेणी देण्याचा शासनाचा निर्णय आहे. तरीदेखील जी.प.च्या आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आरोग्य विभागातील शेकडो कर्मचारी या वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित आहेत. १२ वर्षच्या सेवेनंतर खाते प्रमुखांकडून रीत्सार्प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठून चार ते पाच वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र या पास्तावावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी वेतन श्रेणीपासून वंचित आहेत. आरोग्य कर्मचार्यांच्या प्रलंबित बाबीकडे जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यु काळे यांनी लक्ष देऊन समस्या मार्गी लावाव्यात अशी रास्त मागणी होत आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म दिन

हिमायतनगर(वार्ताहर)केवळ तुकडोजी महाराजांची जयंती साजरी करणे हा ग्रामजयंतीचा उद्देश नसून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेले ग्रामगीतेतील तत्वांचे पालन सर्वांनी करावे हा हवे. तरच खर्या अर्थाने तुकडोजी महाराजांचा जन्म दिन तथा ग्राम जयंती साजरी केल्याचे फळ मिळेल. त्यासाठी आजच्या युगात सर्वांनी ग्रामगीतेतील ओव्यांचे आचरण करावे, असे आवाहन श्री गोपाळ महाराज मुळझरेकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे आयोजित ग्राम्हीता सप्ताह दरम्यान बोलत होते. यावेळी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल देशमवाड, ग्रामगीता तत्वज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव फुलके महाराज, सचिव एल.पी.कोस्केवार, उपाध्यक्ष विठ्ठल कोस्केवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीतेवर प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोपाळ महाराज म्हणाले कि, जन सेवा हीच ईश्वरसेवा आहे.. मानवातची देव पाहावा.. असे म्हणणारे दोनची संत एक गाडगे बाबा .. तर दुसरे तुकडोजी बाबा... होत. त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत विविध पद्धतीने जनमानसाला समजण्यासारखे लिहिले आहे. त्यात महत्वाचे म्हणजे गीता बोधली अर्जुनाला ..ग्राम गीता हि सर्व ग्रामाला...राहू नये कोणी मागासला .. म्हणुनी बोलला देव माझा ... अरे उठा उठा अधिकायानो...श्रीमंतानो, पंडीतानो, सुशिक्षीतानो , साधुजनानो, हक आली क्रांतीची गाव गावाशी जगवा भेद भाव हा समूळ मितवा...उजाळा ग्रांमोनतीचा दिवा.. तुकड्या म्हणे, हि ओवी सर्वात जास्त प्रचलित झाली. यासह अनेक ग्रामगीतेतील ओव्यांचे पठण करून उपस्थितांना ग्रामगीतेचे महत्व पटउन दिले. त्याच बरोबर अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी परंपरा, व्यसनमुक्ती अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आंदेगाव, टेंभी, सवना ज. पवना, सरसम, पार्डी आदींसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. सायंकाळच्या कार्यक्रमानंतर दुसया दिवशी सकाळी सामुदायिक ध्यान, ग्रामसफाई त्यानंतर रामधून असे सर्व कार्यक्रम पार पाडून पुढील गावातील प्रबोधन कार्यासाठी ग्रामसप्ताह दिंडी मार्गस्त झाली. दिंडीसोबत सुभाषराव वानखेडे, संतोष गुंडे, गणेश वानोळे, ज्ञानेश्वर चव्हाण, विश्वबंधु ग्रामगीता प्रचारक, साहेबराव पाटील पोटेकर, परमेश्वर अक्कलवाड टेम्भीकर यांची उपस्थिती होती. सदर ग्रामगीता दिंडीचे आगमन हिमायतनगर शहारात होताच येथील प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र दमकोंडवार यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, पत्रकार कानबा पोपलवार, प्रकाश जैन, दत्ता शिराने, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, परमेश्वर शिंदे, छायाचित्रकार धम्मपाल मुनेश्वर, माधव यमजलवाड, ज्ञानेश्वर गोडसेलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

गुरुवार, 24 अप्रैल 2014

विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून जगावे

पंचासुत्रीला अंगीकारून विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून जगावे - प्रा.राजाराम वट्टमवार


किनवट(वार्ताहर)समानता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समाजवाद, विज्ञाननिष्ठ या पंचासुत्रीला अंगीकारून विद्यार्थ्यांनी कोणताही भेदभाव न बाळगता फक्त माणूस म्हणून जगावे व इतरांना त्याचा पद्धतीने जगण्यासाठी स्वातंत्र्यात द्यावी हाच विचार राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातील विद्यार्थ्यांनी सोबत न्यावा असे आवाहन प्रा.राजाराम वट्टमवार यांनी केले. ते येथील साने गुरुजी प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सुरु असलेल्या राष्ट्री सेवा दलाच्या " विज्ञान छंद व साहस शिबिराच्या " बौद्धिक सत्रात बोलत होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त अधिकारी कडगे काका यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

दुपारच्या सत्रात विज्ञान या विषयांतर्गत दैनंदिन जीवनातील विज्ञान शिकवताना अभियंता प्रकाश ढोबळे यांनी बॉल पोईंट पेन, सोलर लैम्प, कागद, चाक, इंजिन, बल्ब, काम्पुटर अश्या शोधांची सखोल माहिती त्या शोधांचे शोधकर्ता शास्त्रज्ञ या सर्व वस्तूंची होत गेलेली प्रगती इत्यादी भरपूर माहिती दिली. संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण खेळही त्यांनी मुलांना शिकविले. दि.२२ ते २७ या कालावधीत होत असलेल्या ह्या जिल्हास्तरीय शिबिराचा हा दुसरा दिवस असून, किनवट व परिसरातील शंभर मुला - मुलीनी शिबिरात सहभाग घेतला होता.     

बुधवार, 23 अप्रैल 2014

पती-पत्नींनी विवाह नोंदणी

प्रत्येक पती-पत्नींनी विवाह नोंदणी करुन भविष्यातील गैरसोय टाळावी
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन

नांदेड(अनिल मादसवार)महापालिका क्षेत्रातील ज्या पती-पत्नींनी आपल्या विवाहाची अद्याप नोंदणी केली नाही, अशांनी विवाहाची कागदपत्रे आणि स्वत:ची ओळख पटविणारे पुरावे सादर करुन तात्काळ विवाह नोंदणी करुन घ्यावी आणि भविष्यात होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 अन्वये विवाह झाल्यानंतर त्याचे योग्य पुरावे सादर केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला विहित शुल्काची आकारणी करुन विवाहाची नोंदणी करुन वर आणि वधूंच्या छायाचित्रासह विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. धार्मिक संस्कार किंवा अन्य पध्दतीने होणा-या वैध विवाहास कायदेशीर मान्यता असली तरी वर आणि वधू यांच्या विवाहास कायदेशीरदृष्ट्या प्रमाणित करण्यासाठी अनेकदा वेगवेगळी कागदपत्रे संकलित करावी लागतात.
विवाह नोंदणी कशासाठी?
विदेश भ्रमणासाठी जोडीदारासोबत जायचे असेल तर विवाहाचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. महिलेचे विवाहानंतरचे नाव बदलल्याचा पुरावा देण्यासाठीही विवाहाची निमंत्रण पत्रिका व इतर कागदपत्रांची ऐनवेळी शोधाशोध करावी लागते. विम्याचे किंवा इतर दावे करताना विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करणे अपेक्षित असते. भविष्यात काही अन्य सुविधा किंवा सवलतींचा लाभ घेतानाही पती-पत्नी यांच्या एकमेकांच्या नातेसंबधाचा पुरावा आवश्यक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता ऐनवेळी धावपळ करुन कागदपत्रे जमा करण्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक जोडीदाराने आपल्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आधी काढून ठेवणे कधीही संयुक्तीक असते.
विवाह नोंदणीचे फ़ायदे
विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे देशाबाहेर पती-पत्नी यांना एकत्र जायचे असल्यास पुरावा, विवाहानंतर महिलेच्या नावात बदल, पती-पत्नी सवलतींचा शासकीय व इतर लाभ, रेशन कार्ड किंवा अन्य शासकीय कागदपत्रांमध्ये नाव समाविष्ट करणे तसेच पती-पत्नी यांच्या विवाहाचे अन्य कायदेशीर पुरावे म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र अतिशय उपयुक्त ठरते.

कोण करु शकतो विवाह नोंदणी?
महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी वर किंवा वधू यांच्यापैकी कोणीही एक जण नांदेड मनपा क्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. विवाहाच्या वेळी वधूचे वय 18 तर वराचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.अर्जासोबत त्यांची कागदपत्रे असावीत. त्याशिवाय नोंदणी करता येणार नाही.
विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, विवाहाची निमंत्रण पत्रिका, लग्नाची विधी करणा-याचे शपथपत्र, पती-पत्नी यांचे एकत्रित छायाचित्र, दोघांचे जन्म दाखले किंवा जन्म तारखेची नोंद असलेली शैक्षणिक कागदपत्रे, दोघांचा पत्ता दर्शविणारे रहिवास पुरावे, प्रत्येकी एक पासपोर्ट फ़ोटो, निवडणूक ओळ्खपत्र किंवा सक्षम अधिका-याने दिलेला अन्य फ़ोटो ओळख पुरावा, महापालिका क्षेत्रातील तीन साक्षीदार आणि त्यांचे रहिवास व फ़ोटो पुरावे तसेच प्रत्येकी एक पासपोर्ट फ़ोटो, कोर्ट फ़ी स्टॅम्प अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची छाननी करुन योग्य अर्जदारांना विहित केलेले शुल्क आकारुन तात्काळ पती-पत्नी यांचे छायाचित्र असलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
अर्ज कोणाला आणि कुठे करता येईल?
पती किंवा पत्नी यांच्यापैकी कोणीही एक जण आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या संबधित क्षेत्रिय कार्यालयात अर्ज करुन शकतो. अर्जदार महापालिकेच्या ज्या क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात राहतात, त्यांनी त्याच भागातील क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे त्यांच्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम 1998 अन्वये मनपा आयुक्त हे विवाह नोंदणी निबंधक (रजिस्ट्रार)  आहेत. परंतु सन 2008-09 पासून आयुक्तांनी विवाह नोंदणी निबंधकपदाचे अधिकार महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी तथा सहायक आयुक्त यांना प्रदान केले आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अधिका-यांच्या स्तरावरच अर्ज स्विकारणे आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया केली जाते.
वजिराबाद झोनमध्ये 381 विवाह नोंदणी
महापालिकेच्या वजिराबाद क्षेत्रिय कार्यालय क्र. 4 अंतर्गत 2008-09 ते आतापर्यंत एकूण 381 दांम्पत्यांची विवाह नोंदणी झाली आहे. मागील वर्षी महिला गुंजन ग्रुप आणि कै. किशोरीलाल शर्मा मिशनच्या वतीने सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिरात शिबिर घेऊन एकाच दिवशी 52 जोडप्यांची विवाह नोंदणी करुन त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले होते. दि. 1 मार्च 2014 ते दि. 19 एप्रिल 2014 पर्यंत तीन दाम्पत्यांनी विवाह नोंदणी केली आहे. नगरसेविका पुष्पाबाई शर्मा यांची कन्या श्रुती व आदित्य भट्ट यांनी आपल्या विवाहाची नोंदणी दि.19 रोजी वजिराबाद क्षेत्रिय कार्यालयात जाऊन केली. सहाय्यक आयुक्त एस. टी. मोरे यांनी नवदाम्पंत्यांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान केले. जास्तीत जास्त दाम्पत्यांनी आपली विवाह नोंदणी करुन भविष्यातील गैरसोय टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

मतदानाची आकडेमोड सुरु..

वाढीव मतदानाच्या टक्केवारीचा फायदा सेनेला कि काँग्रेसला .... मतदानाची आकडेमोड सुरु..
नांदेड(अनिल मादसवार)हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान दि.१७ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर आता कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील व कोणाचा विजय होईल यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरु केली असून, गत निवडणुकी पेक्षा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हि वाढीव मताची टक्केवारी कोणासाठी लाभदायक ठरेल व कोणता उमेदवार निवडून येईल याची एकच चर्चा सुरु आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेस पक्षाकडे गेल्याने व उच्च शिक्षित उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे निकात्वार्तीय राजीव सातव यांना उमेदवारी दिल्या गेल्याने २०१४ हि लोकसभा निवडणूक विशेष करून प्रकाश झोतात आली होती. कारण मागील काळात काभार पाहिलेले खा.सुभाष वानखेडे यांच्यावर स्वपक्षासः सामान्य नागरिकात असमाधानाचे वातावरण होते. परंतु मोदी लाटेच्या वादळाचा फायदा त्यांनाच होणार असल्याने शिवसनेने पुन्हा वानखेडे यांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षाचे प्राबल्य उमेदवार असल्याने दोघात काट्याची लढत होणार हे निश्चित होते. हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २३ उमेवार उभे होते. त्यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एड. राजीव सातव व शिवसेना, भाजप, रिपाई आठवले गट महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. या निवडणुकीची  मतदान प्रक्रिया राज्यातील दुसर्या टप्प्याच्या १७ एपिल रोजी पार पडली. त्यात शिवसेनेच्या नाराज व जवळील सर्वच कार्यकर्त्यांनी अंग झटकून सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तर राजीव सातव यांना निवडून आणण्यासाठी मातब्बर पुढारी तथा विद्यमान आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत मतांचा जोगवा मागितला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सावांचे लक्ष लागलेले आहे.

हिंगोली लोकसभेच्या ११ तालुक्यांमधील १५ लाख ८६ हजार ४६५ पैकी १० लाख ४८ हजार ८९७ मतदारांनी मतदान हक्क बजावला असून, एकूण सरसरी ६६.६१ टक्के मतदान झाल्याने गत निवडणुकीत ११ तालुक्यातून ०८ लाख १७ हजार ५५३ मतदारांनी हक्क बजावल्याने एकूण ५९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत चक्क ०२ लाख ३१ हजार ३३४ मतदारांची आकडेवारी  वाढून ७.६१ टक्के मतदानाचा टक्का वाढला आहे. विशेष म्हणजे यात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली असून, ती पुढील प्रमाणे आहे.

उमरखेड २००९ मध्ये ०१ लाख ४८ हजार ८६१ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ८० हजार ६३५ मतदान झाले. किनवट २००९ मध्ये ०१ लाख २० हजार ६१५ तर, २०१४ मध्ये ०१ लाख ५८ हजार ६५९ मतदान झाले. हदगाव २००९ मध्ये ०१ लाख ३२ हजार २१० तर, २०१४ मध्ये ०१ लाख ६८ हजार ४०० मतदान झाले. वसमत २००९ मध्ये ०१ लाख ४५ हजार ७९५ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ७९ हजार ९९४ मतदान झाले.कळमनुरी २००९ ला ०१ लाख ३२ हजार ०४५ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ८५ हजार ७५३ मतदान झाले. हिंगोली २००९ मध्ये ०१ लाख ३७ हजार ७५२ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ७५ हजार ३५६ मतदान झाले आहे. या सर्वच मतदार संघात गत मतदानाच्या तुलनेत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या मतदान जन -जागृतीमुळे सरासरी १० टक्के मतदान जादा झाले आहे. यावरून दोन्ही पक्षातील कार्यकते आकडे मोड करीत आपलाच उमेदवार विजयी होईल असे छाती ठोकपणे सांगत आहेत. परंतु या निवडणुकीत वाढीव मतदानाचा टक्केवारीचा आकडा ज्या उमेदवाराच्या मतपेटीत जाऊन पडेल तोच उमेदवार विजयी होणार आहे.

ऐन प्रचाराच्या सुरुवातीलाच हिगोलीच्या राष्ट्रवादी कॉंगेसच्या माजी खा.सूर्यकांताताई पाटील यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला तर उघडपणे माजी खा. शिवाजी माने यांनी सेनेचा प्रचार केला. तसेच अबकी बार...मोदी सरकार... या नावाचे वादळ हे ग्रामीण भागातील कोण्या - कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोंचले होते, तर अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या आजीबाई सुद्धा अरे.. बाबा यातील मोदीचे बटन कोणते..? असे स्पष्टपणे विचारीत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा एकदा हिंगोलीचे खा. सुभाष वानखेडेच होतील अशी आशा जनमानसात दिसून येत आहे. तर शेवटच्या टप्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे राजीव सातव निवडून येणार..अशी चर्चा खुद्द काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करीत असल्याने हिंगोलीचा खासदार कोण..? या बाबतची उत्कंठा मतदारांमध्ये सध्या तरी दिसून येत आहे. या २०१४ च्या निवडणुकीची मतमोजणी हि हिंगोली येथे दि.१६ मे रोजी होणार असून, अजून तरी निकालासाठी आणखी २३ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंगलवार, 22 अप्रैल 2014

पर्यटकांची गैरसोय

सहस्रकुंड पर्यटन स्थळाचे काम रखडल्याने पर्यटकांची गैरसोय


हिमायतनगर(अनिल मादसवार) विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सहस्रकुंड बाणगंगा धबधब्याचे विहंगम दृश्य रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारे आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना याचा अनुभव घेत येउन डोळ्याचे पारणे फिटावे म्हणून पर्यटन विकास महामंडळ कडून ६.५ शे कोटीच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामाची सुरुवात गात दोन वर्षापूर्वी करण्यात आली मात्र सदरचे काम हे अत्यंत संत गतीने केले जात असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर - किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या इस्लापूर  गावापासून ४ कि.मी. अंतरावर पैनगंगा नदीच्या किनार्यावर असलेल्या महादेव मंदिराच्या पायथ्याशी १०० ते ९० फुटावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे निसर्गनिर्मित्त दृश्य आहे. हे दृश पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून शेकडो पर्यटक हजेरी लावतात. मात्र या नदी पत्रात पाणी नसल्यामुळे सध्या धबधब्याची धार बंद पडली आहे. तरी सुद्धा या ठिकाणच्या कड्या कपार्यातून जाणार्या पाण्यामुळे दगडातून कश्या पद्दतीने रस्ता केलाय याचे रेखीव वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. हे दृश्य देखील पाहणार्यांच्या डोळ्यांना मोहित करणारे आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून, सुट्टीत मौज - मजा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या ठिकाणी हव्या त्या प्रमाणात सोई - सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याने येणार्यांना पिण्याच्या पाणी टंचाई बरोबर अन्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील तीन वर्षापूर्वी पर्यटन विकास महामंडळाकडून ६.५ शे कोटीचा निधी मंजूर करून विकासाचा मास्टर प्लान बनविण्यात आला आहे. त्यातून पर्यटकांना निवार्याची सोय, ८० फुट उंच हवाई मनोरे, मंदिराचे बांधकाम, हिरवेगार गालीच्यानी सजलेले गार्डन, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व पर्यटकांची सुरक्षितता आदींसह अन्य कामे होणे अपेक्षित होते. परंतु सदरचे काम करणाऱ्या गुत्तेदाराकडून पर्यटन विकासाचे काम अत्यंत संत गतीने केले जात असल्यामुळे भर उन्हाळ्यात पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

एवढेच नव्हे तर या ठिकाणी येणाया पर्यटकांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली आहे. कारण या ठिकाणी पोलिस चौकी नसल्यामुळे हौशे युवक - युवती नदी पत्रातील पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मागील दोन महिन्यापूर्वी आदिलाबाद येथील युवकांच्या मौज मजेत एकास आपला प्राण गमवावा लागला. हि बाब माहित असताना अद्याप या ठिकाणी केलाव सूचना फलक लावण्याव्यातिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अधून - मधून या ठिकाणी दुदैवी घटना घडत आहेत, यावर अवर घालण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या वतीने तातडीने विकास कामे पूर्णत्वास नेउन पर्यटकांना सुरक्षेची हमी देणे गरजेचे असल्यचे मत काहींनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

तरुणांचा धुडघूस ... महिला मुलींसह भाविकांची कुचंबना 

पर्यटन स्थळाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या कुटुंबातील अनेक महिला मुलीना या ठिकाणी येणाऱ्या टवाळखोर युवकांमुळे अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही तरुण युवकांचे टोळके या ठिकाणी तर केवळ पार्टी करून पार्टन स्थळी येणाऱ्या मुली - महिलांची छेड काढण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अनेकदा अश्या तक्रारी मंदिर समितीच्या लोकांकडे व येथील व्यापार्यानाकडे झाली असून, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी नाल्यामुळे या दारुड्यांचा नाहक त्रास भक्तांना सहन करावा लागत आहे. या बाबीची दाखल घेऊन पोलिस प्रशासनाने पर्यटक महिला -मुलींच्या सुरक्षा व होणार्या नुचीत घटना टाळण्यासाठी पोलिस चौकी उभारणे गरजेचे असल्याचे मत अनेक पर्यटक, व्यापारी व नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केले आहे.       

सोमवार, 21 अप्रैल 2014

तलाठ्यांच्या लाचखोरीमुळे

हिमायतनगर तालुक्यातील तलाठ्यांच्या लाचखोरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त 


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात कार्यरत असलेल्या महसूल विभागातील लाचखोर तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी व सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले झाले असून, कोणतेही छोटे - मोठे काम घेऊन गेल्यास पैश्याशिवाय काम होत नसल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात येत असल्याने लाभधारक शेतकरी वैतागला आहे. या प्रकाराकडे नूतन तहसीलदार श्री जरड यांनी लक्ष देऊन, तलाठ्यांच्या लाचखोरीला आवर घालावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर तालुक्यात ९ तलाठी सज्जे आहेत. या सर्वांकडे आगामी खरीप हंगामाच्या काळात कृषी कर्जासाठी सातबारावर बोजा टाकणे, शालेय कामासाठी उत्पन्न प्रमाण पत्र, नवीन रेशन कार्ड, विक्री केलेल्या शेतीचा फेरफार व अन्य कामासाठी शेतकरी लाभार्थ्यांना जावे लागते. तलाठी महाशयांकडे गेले असता, बेडरपणे पैश्याची मागणी केली जात आहे. ज्यांच्याकडून रक्कम दिली जाते त्यांची कामे तातडीने करण्यात येउन अन्य नागरिक लाभार्थ्यांना सोमवारी ये..बुधवारी ये...मी लग्नाला चाललोय...चार दिवसांनी या असे सांगून कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यात बोटावर मोजण्याइतके तलाठी हे प्रामाणिकपणे शेतकरी- लाभार्थ्यांची कामे करतात. मात्र बहुतांश तलाठी हे देवाण - घेवाण केल्याशिवाय कोणत्याच लाभार्थ्यांचे काम करीत नाहीत. असा अनुभव तालुक्यातील प्रत्येकाना आलेला आहे. साधे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली जात असून, फेरफार रेशन कार्ड या सारख्या कामासाठी तर चक्क तीन ते चार आकडी रक्कमे शिवाय कामेच केली जात नाही. असाच काहींसा अनुभव मंगरूळ, धानोरा, पळसपूर, हिमायतनगर सज्जातील नागरिकांना आला असल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले आहे.      

शासनाची महेवार गल्लेलठ पगार उचलूनही सदर म्हशी हे वर कमाईसाठी गरीब व गरजू लाभार्थ्यांची पिळवणूक करीत आहेत. अगोदरच निसर्गाच्या दुष्ट्चक्रामुळे नागवल्या गेलेला शेतकरी पुन्हा अधिकाऱ्यांच्या लाचखोर वृत्तीमुळे पुन्हा नागविला जात असून, या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराकडे नूतन तहसीलदार यांनी लक्ष देवून कायद्याचा बडगा उगारून शिस्त लावावी अशी मागणी आर्थिक पिळवणूक झालेल्या लाभार्थी नागरीका मधून व्यक्त होत आहे. 

रविवार, 20 अप्रैल 2014

हिंगोलीचा खासदार कोण..?

हिंगोलीचा खासदार कोण..? चर्चेला उधान... 
सट्टेबाजीच्या या व्यवहारात लाखोची उलाढाल..हिमायतनगर(अनिल मादसवार)हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान दि.१७ एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्यात पार पडले असून, ११ तालुक्यांमधील १५ लाख ८६ हजार ४६५ मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान करुन आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या २३ उमेवारापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एड. राजीव सातव व शिवसेना, भाजप, रिपाई आठवले गट महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. ऐन प्रचाराच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी कॉंगेसच्या माजी खा.सूर्यकांताताई पाटील यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीचे खा. म्हणून सुभाष वानखेडे हेच " लक्की मैन " ठरणार... कि शेवटच्या टप्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे राजीव सातव निवडून येणार..अशी चर्चा ग्रामीण भागातील चौक चौकात व चावडीवर रंगली आहे. चर्चेच्या गुऱ्हाळ्यात या वक्तव्याला विरोध करणाऱ्यांमध्ये चक्क हिंगोलीचा खासदार कोण..? यावर पैजा लावण्यास सुरुवात केल्याने सट्टेबाजीच्या या व्यवहारात लाखोची उलाढाल होणार हे मात्र खरे आहे. 

उमेदवारी मिळाल्यानंतर खा. वानखेडे यांना पक्षातील अनेक दिगज्जानी विरोध करून बंड पुकाला होता. मात्र विधानसभा क्षेत्रात सर्वच भागात यंदा नमो ची हवा असल्याने व सुभाष वानखेडे यांनी मोठ्या चतुराईने अंतर्गत बंडाळीला हाताळून सर्वाना आपलेसे करून घेतले होते. एवढेच नव्हे तर प्रतिस्पर्धी उमेदवारास निवडणुकीत कश्या पद्धतीने मात करता येईल यात बुद्धिबळाचा उपयोग करून विरोधी पक्षातील नाराज दिग्गज नेते व कार्यकर्त्यांना जवळ करून छुप्या पद्धतीने पाठींबा मिळविला याचे चित्र काँग्रेस वाल्यांसह राजकीय क्षेत्रात रस ठेवणाऱ्या अनेक मतदार व कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहे. तर काँग्रेस चे उमेवार राजीव सताव यांनी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराची आखणी केली होती. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदार संघात त्यांचीच चालती असल्याचे दिसत होते. खास करून किनवट व हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील दोन्ही आमदार महोदयांनी जीवाचे रान करून राजीव सातव यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रमही घेतले. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात " मराठा हि जात फैक्टर "(जाती पातीचे राजकारण) झाल्याने बहुतांश मते हि सुभाष वानखेडे यांच्या पारड्यात जाऊन पडल्याचे बोलले जात आहे. एवढेचे नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वानखेडे यांच्यासाठी अंग झटकून काम केल्याने १६ मे च्या निकालात पुन्हा एकदा खा.सुभाष वानखेडे हेच लक्की मैन ठरतील असा अंदाज वर्तविला जात आहे. तर माळी आणि मुस्लिम बांधवांचे एक गठ्ठा मतदान व ओ.बी.सी.फैक्टर चे मतदान राजीव सातव यांना गेल्यामुळे शिवसनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लाऊन, काँग्रेस उमेदवार निवडून येईल अश्या प्रतिकिया काँग्रेस प्रनितांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहेत. 

घड्याळाची मते " हाताला कि बाणाला " 

मागील अनेक वर्षापासून हिंगोली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस च्या काही दिग्गजांनी राष्ट्रवादीच्या हक्काची जागा हिरावून घेतली. याचा राग मनात धरलेल्या हिंगोलीच्या माजी खा. सुर्यकांताताई पाटील व खा. शिवाजी माने यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाचे काही समर्थक सोडल्यास त्यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणी प्रचारानंतर म्हणजे पोलचीट वाटण्यापासून जीव ओतून सेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचे काम केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाची मते " हाताला कि बाणाला " या चर्चेला उधान आले असून, त्यांची मते ज्या उमेदवाराला मिळाली तोच उमेदवार निवडून येईल अशी चर्चा होताना दिसून येत आहे. 

सुभाष वानखेडेंचाच विजय निश्चित...? 

कोणत्या गावात किती मतदान झाले...कोणत्या भागात धनुष्य बाण जोरात चालले.. याची सविस्तर चर्चा त्या त्या गावातील कार्यकर्ते करीत आहेत. नांदेड मध्ये काहीही होवो पण हिंगोली मध्ये नामोच्या वादळामुळे सुभाष वानखेडे निवडून आले पाहिजे अशी जनभावना ग्रामीण भागात दिसते आहे. मतदान कसे झाले कोणत्या गावात काय परिस्थिती याचा आढावा वानखेडे समर्थक घेत असून, आकडेवारीच्या मेळ घालीत नक्किच सुभाष वानखेडेंचाच विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत. 

राजीव सातव निवडून येणार ..? 

तर राजीव सातव निवडून कसे येतात याचा दावा काँग्रेस व त्यांचे समर्थक कायकर्ते करीत आहेत. आमच्या भागात एक गठ्ठा मतदान हे काँग्रेसच्या हातालाच झाले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राजीव सातव यांचाच विजय निशित असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. असे दावे करताना दोन्ही गात एकत्रित आले कि, चर्चेवरून एकमेकात बाचाबाची होत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. मात्र तिऱ्हाईत व्यक्तीमुळे या चर्चेला त्याचा ठिकाणावर पूर्ण विराम देवून आगामी १६ मे २०१४ लाच यावर चर्चा करू असे बोलून भांडण मिटविले जात आहेत. 

एकुनच काँग्रेस अघाडीचे राजीव सातव आणि शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांच्यात झालेल्या हिंगोली लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या तुल्यबळ लढतीमध्ये चांगलीच रंगत आली होती. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले आहे.

एक लाख रुपयासाठी विवाहीतेचा छळ

एक लाख रुपयासाठी विवाहीतेचा छळ करून दुसरीशी घरोबा केला..१३ जणांवर गुन्हे दाखल 


इस्लापुर(वार्ताहर)येथून जवळच असलेल्या नांदगाव येथील एका विवाहितेस सासरच्या मंडळीनी ०१ लाखाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ कौन महान केली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून नवर्यासह इतर १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत सव्सिअतर वृत्त असे कि, 11 नोव्हेबर 2003 ते 06 जुन 2014 पर्यत, मौ. नंदगाव ता. किनवट येथील फिर्यादी विवाहितेस तिच्या रहाते सासर घरी, आरोपी (1) पुंडलीक विठ्ठल लव्हाळे व इतर 13 जण यांनी संगणमत करुन दुकान टाकण्यासाठी माहेरहुन 1,00,000/- रु.घेऊन ये म्हणुन उपाशी पोटी ठेवून तिचा शारीरीक व मानसिक छळ केला. तसेच मारहान करुन पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह केला. अशी फिर्यादी छायाबाई पुंडलीक लव्हाळे, वय 25 वर्षे, राहणार मौ. नंदगाव ता. किनवट हल्ली मुक्काम मौ. वारंगटाकळी ता. हिमायतनगर हिने दिलेल्या फिर्यादवरून इस्लापुर पोलिस स्थानकात कलम 498 (अ), 323, 494, 504, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास सपोउपनि कदम हे करीत आहेत.

शनिवार, 19 अप्रैल 2014

स्वत:कडील सोयाबीन बियाणाचा

औरंगाबाद(प्रतिनिधी)यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबिनचे स्वत:जवळील जास्तीत जास्त बियाणे पेरणीकरिता वापरावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालकांनी केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक असून यामध्ये सर्वच वाण हे सरळ आहेत. त्यामुळे अशा वाणांचे बियाणे प्रत्येक वर्षी बदलणे आवश्यक नसते. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन ते तीन वर्षापर्यंत वापरता येते. असे विभागीय कृषि सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात सन 2013 चे सप्टेंबर/ऑक्टोंबर महिन्यात अधिक पर्जन्यमान व आर्द्रतेमुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला आहे. या वर्षीचे बियाणे तपासणी प्रयोगशाळेचे अहवालानुसार प्रमाणित सोयाबीन बियाणामध्ये उगवणशक्ती मध्ये नापास होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. खरीप हंगाम 2014 मध्ये या पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून सार्वजनिक व खाजगी क्षेत्रामार्फत पूरवठा होणारे बियाणे उपलब्ध असले तरी खरीप 2014 मध्ये सोयाबीन बियाणाची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाबीचा विचार करुन शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास शेतकऱ्याचा बियाणे खरेदीवरील खर्च कमी होऊन खात्रीशीर बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.

पेरणीपूर्वी बियाणाची उगवण क्षमता चाचणी फार गरजेची आहे. त्यावरुन चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटु शकते. उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणी करीता वापरावे. प्रती हेक्टर सोयाबीन बियाणे दर 70 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पध्दतीने किंवा प्लॉटरच्या सहाय्याने पेरणी करावी. बियाणे साठवणुकीचे वेळी आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के असावे. साठवलेल्या बियाणावर कोणत्याही प्रकारचा दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पोत्याची साठवणुक फार उंचीपर्यत न करता जास्तीत जास्त पाच पोत्यांची थप्पी करावी. मळणी केलेल्या बियाणाची प्लॅस्टीकच्या पोत्यामध्ये साठवणुक करु नये. 

मंगलवार, 15 अप्रैल 2014

मतदार जागृती

समाजिक बांधिलकी जपत पत्रकार संघटनेने केली मतदार जागृती


हिमायतनगर(वार्ताहर)भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या अधिकाराची सर्व सामान्य नागरिकांमध्ये जाणीव व्हावी याच उद्देशाने होणार्या  निवडणुकांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे. हे समजून मतदारांनी मतदान करावे असे आवाहन हिमायतनगर येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्यांनी केले. 

सकाळी नऊ वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून रेली काढून पत्रकार बांधवांनी एका पत्रकाद्वारे लोकशाहीत आपल्याला मिळालेला मताचा अधिकार याचा वापर सर्व मतदारांनी करावा लोकशाही टिकून ठेवण्यासठी प्रत्येकांनी मतदान करणे गरजेचे असून, मताचा अधिकार आहे म्हणून आपस लोकशाहीत किंमत आहे. मतदान हे राष्ट्रीय कार्य समजून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असे जाहीर आव्हान एका परिपत्रकान्वये शहरातील व ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना बाजार लाईन, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणीवाटप करून मतदान करा व करायला लावा अशी विनंती पत्रकार बांधवांनी केली. यावेळी महराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग गाडगे, उपाध्यक्ष दत्ता शीराने, परमेश्वर शिंदे, सचिव अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, दिलीप शिंदे, सल्लागार प्रकाश जैन, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, फाहद खान, धम्मा मुनेश्वर, संजय कवडे, साईनाथ धोबे, चांदराव वानखेडे, असद मौलाना, विष्णू जाधव, ज्ञानेश्वर गोडसेलवार आदींची उपस्थिती होती.   

हनुमान जयंती

बोरगडी- वटफळी बजरंगबली मंदिरात भक्तांची मंदियाळी 


हिमायतनगर(वार्ताहर)चैत्र पोर्णीमा दि.15 मंगळवारी विदर्भ -मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द बोरगडी मारेाती मंदिर, सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह हिमायतनगर तालुक्यातील गावागावातील मंदिरात संकटमोचन श्री बजरंगबली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असुन, दर्शनासाठी विदर्भ- मराठवाडा- अंध्राप्रदेशातून हजारेा श्रध्दाळु भक्तांची मंदियाळी दाखल झाली होती. यावेळी जय हनुमान.. बजरंग बली की जय...पवनसुत हनुमान की जय.. अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन अभीषेक महापुजेनंतर प्रसाद अर्पण केला.

मंगळवारी जन्मलेले बजरंगबली नेहमी सर्वंच भक्तांचे मंगल करतात. प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा-मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो असे सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंग बली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारेातीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी बजरंगबलीला प्रीय असलेली रुचकीच्या फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी अर्पण करुन संकट दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात. त्याच संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात बोरगडी येथील मारेाती मंदिर, वटफळीचे हनुमान मंदिरात पुरोहीतांच्या मंगलमय मंत्रोच्चारात पार पडला. तालुक्यासह शहरातील पवनसुत, दक्षीन मुखी हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, टाकराळा, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, कार्ला पी.पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, यासह अन्य छोट्या मोट्या गावात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानीमीत्ताने सर्वच मंदिरात भजन- किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्या. यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यानीमीत्ताने लागणारे नारळ, बेलफुल,पेढा, साखरेचा पेढा आदीचे भाव वाढलेले असल्याने भक्तांना महागाईचा फटका सहन करावा लागला होता.

दि.16 बुधवारी सकाळी 10 वाजता बोरगडी येथील हनुमान मंदिरात हभप.चिन्मय महाराज सातारकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी 02 कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटक होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे पऱदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी तलुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन गांवकर्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


पारंपारीक बैलगाडीतुन हनुमान दर्शनासाठी भक्तगण दाखल 

विदर्भ - मराठवाड्यात ख्याती प्राप्त श्री बोरगडीच्या मारुती दर्शनासाठी पारंपारीक पध्दतीने बैलगाडीतुन हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले असुन, या ठीकाणी आलेल्या भक्तांना पिण्याच्या पाण्यासह प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारों खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची व आकाश पाळने, ब्रेक डान्स, फुगे निशाना यासह चिमुकल्यांना आकर्षीत करणारे खेळणी साहीत्यानी व भक्तांच्या गर्दीने यात्रा फुलली होती.

शनिवार, 12 अप्रैल 2014

युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आ. जवळगावकरच्या गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेशहदगांव(वार्ताहर)हदगांव येथील सभेत कॉग्रेसचे कार्यकर्ते, जवळगाव येथील रहिवासी व आ. जवळगावकर यांचे कटटर समर्थक युवकांनी खा. सुभाष वानखेडे, खा. भावना गवळी, जिल्हा प्रमुख संतोष बांगर, तालुका प्रमुख नागेश पाटील यांच्या उपस्थितीत कैलास सुर्यवंशी, वैजनाथ पांचाळ, सुभाष पवार, सुभाष नाथारे, गौतम कांबळे, गंगाधर बोईनवाड, श्याम लोसलवाड व तसेच धोतरा येथील अमोल अवधुतराव वानखेडे, शंकर दत्तराव वानखेडे, संभाजी सुभाषराव वानखेडे, तुशील वसंतराव वानखेडे, नारायण जांबुतराव वानखेडे, भाउराव किशनराव वानखेडे, विनायक वानखेडे, दत्ता ग्यानबाराव वानखेडे, कोंडबाराव तुकाराम शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

या सभेस ऍड. उत्तमराव टिकारे, ऍड. पंडीतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष मारोतराव डुरके, माजी सभापती लता कदम, माजी नगराध्यक्ष शिवा चंदेल, माजी सभापती शामराव चव्हाण, सभापती दिलीप देबगुंडे, मा. जि. प. सदस्य बाबुराव कदम, जि. प. सदस्य रमेश घंटलवार, जावेद खतीब, जाफरभाई पठाण, शिवसेना महिला प्रमुख लता फाळके, आरपीआय तालुका प्रमुख प्रितीताई दवणे, पं.स. सदस्य जयश्री देशमुख, शांताबाई इंगळे, सुभाष जाधव, बाळु महाजन, सादीकभाई, सुभान बागवान, बशीरभाई, बाबुभाई, कलीमभाई, जमीलउर रहेमान, गजानन पवार, संभाजी लांडगे, राजु देशमुख, सुषमा उदावंत, सुजाता सोनुले, शिला गंधारे, कराळे मॅडम, प्रकाश राठोड, बालाजी राठोड, संदीप पालकर, चंद्रपाल ठाकुर, अरुण मिटकरे, बजरंग भरकड, राजु तावडे, अभिजीत तालंगकर, विश्वाभर गोदजे, बालाजी घाळाप्पा आदी उपस्थित होते. 


होणार किती मतांची कमाई?

नेत्यांत झाली दिलजमाई.. होणार किती मतांची कमाई?


प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात अखेर दिलजमाई झाली आहे. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकरांचे वडील यांचे घनिष्ठ संबंध. पण काळाच्या ओघात राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे या दोघांमध्ये आलेले वितुष्ट शुक्रवारी दूर झाले आहे. अशोकरावांच्या विरोधकाला भाजपा जवळ करीत होती. मुखेडचे राठोड बंधू मुंडेच्या गळाला लागले होते.मुदखेडमध्ये भाजपा सोडून कांग्रेस मध्ये आलेले मुदखेड नगरपरिषदेचे  माजी नगराध्यक्ष राम चौधरी स्वगृही परत आले होते.आणि काही महिन्यापूर्वी भाजपा सोडून राष्ट्रवादीत गेलेले भाजपाचे माजी खासदार डी.बी. पाटील ह्यांना पुन्हा पक्षात घेऊन गोपीनाथ मुंडे यांनी नांदेड लोकसभेची पुन्हा उमेदवारी दिल्याने ,राष्ट्रवादीनेच नांदेड जिल्ह्यातून कांग्रेसला संपविण्यासाठी आपला मित्र भाजपात पाठविला आहे अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. १३ तारखेच्या गोपीनाथ मुंडे यांच्या  नांदेड दौऱ्यात आणखी काही  राष्ट्रवादीचे शिलेदार मुंडे यांच्या जाहीर सभेत भाजपात प्रवेश करतील असे सांगण्यात येत असताना दहा तारखेला अशोक चव्हाणांसाठी प्रचाराला आलेल्या शरद पवारांनी अशोकरावांची अवघडलेली स्थिती आपल्या डोळ्यांनी बघितली होती. जे कांग्रेसचे हुकमी मुस्लीम मतदार होते ते सभेतून उठून जात होते. आणि अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि हास्य खरेखुरे नसून उसने आहे हे राजकारणात  मुरलेल्या पवारांना ओळखायला वेळ लागला नाही आणि त्यांनी अशोक चव्हाण यांना अस्वस्थ करीत नांदेडला मुक्काम करून रात्रीतून कांग्रेसच्या बाजूने हवा वळविण्याचा उद्योग तत्काळ सुरु केला. बहुदा नांदेडला येण्याआधीच पवार व अशोक चव्हाण यांच्यात या कथित दिलजमाई संदर्भात चर्चा झाली असावी आणि म्हणूनच त्यांनी नांदेडला  मुक्काम करून प्रतापरावांना त्यांच्या घरी जाऊन आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्याआधी अशोक चव्हाण यांनीही आपल्या बाजूने प्रयत्न सुरु ठेवले होते.

मोदीच्या त्सुनामी लाटेत आपला विजय वाहून जाता काम नये, यासाठी अशोक चव्हाण यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा पराभव करण्यासाठी बंडखोर उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडुन आणून बापूसाहेबांना पाच वर्षांच्या  राजकीय वनवासात पाठविण्यात यश मिळविले होते त्यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडे सत्तेची  पावर होती. पण दरम्यान ते स्वत:च आदर्शचे निमित्त होऊन विजनवासात गेलेले असल्याने या निवडणुकीत त्यांनी आपले राजकीय पुनर्वसन होण्यासाठी अथक परिश्रम करून आणि अनेक डावपेच खेळून प्रचंड विरोध असताना लोकसभेचे तिकीट मिळविले असल्याने त्यांच्यासाठी ही लोकसभेची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. आणि या निवडणुकीत प्रखर मोदीलाट असताना, राष्ट्रवादीचे शिलेदार भाजपला छुपी रसद पुरवित असलेले दिसत आसताना एकेक खिंड लढवून विजय मिळवायचा तर आधी बापूसाहेब गोरठेकर यांना त्यांनी आपल्या बाजूने प्रचारात आणले आणि मागच्या विधानसभेत प्रभावाने  सुंभ जाळला असला तरी पीळ कायम असणारे प्रताप पाटील जोपर्यंत आपल्या बाजूने येत नाहीत तोपर्यंत विजयासाठी अनुकूल वातावरण होणार नाही याची तीव्र जाणीव झाल्यानेच  अशोक चव्हाणांनी शरद पवारांची मदत घेत आघाडीचा धर्म पाळण्याच्या हेतूने का होईना प्रताप पाटील यांना आपल्या प्रचारात सोबत आणलेअसल्याचे चित्र दिसत आहे.  

चिखलीकर आणि चव्हाण यांच्यातली वर्चस्वाची लढाई अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण निवडणुकांच्या निमित्ताने  झालेल्या या दिलजमाईने  चव्हाणांची बाजू काहीसी  भक्कम झाली हे मान्य करावे लागते. एकेकाळी राजकीय संघर्षातून चिखलीकरांच्या समर्थकांनी शंकर आण्णा यांच्या रालीत सहभागी झालेल्या अशोक  चव्हाणांच्या दिशेने  चप्पलही भिरकावली  होती. नेत्यांची युती झाली तरी कार्यकत्यांचे मनोमिलन होत नाही, असा संदेश काल देण्यात आला. एकेकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रताप पाटील-चिखलीकर 'प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेसचा' आरोप करीत चव्हाण यांच्यापासून काही वर्षांपूर्वी दुरावले. श्री. चव्हाण यांच्यापासून दुरावलेल्यापैकी बहुतांश नेत्यांनी अन्य पक्षांचा आश्रय घेत आपले अस्तित्व निर्माण केले; परंतु श्री. चिखलीकर यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व तर निर्माण केलेच; शिवाय काँग्रेसचे सहयोगी आमदार असूनही वेगवेगळ्या प्रकरणांत अशोकरावांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रतापाला बळ देण्याचे लातूरकरांनी काम पार पाडले. ज्या ज्या वेळी चिखलीकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत मागतील; त्या त्यावेळी लातूरकरांनी सढळ हाताने त्यांना रसद पुरविली.

श्री. चव्हाण यांच्या जिल्ह्य़ात त्यांच्याच एका जुन्या समर्थकाला लातूरहून पाठबळ मिळाल्याने चव्हाण-चिखलीकर वाद विकोपाला गेला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वाना सोबत घेण्याचा निर्धार केलेल्या श्री. चव्हाण यांनी प्रतापरावांशी हातमिळवणी केली. 'झाले गेले विसरून जा आणि मदत करा,' असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन करताच श्री. चिखलीकर यांनी शेवटच्या टप्प्यात हाताला साथ दिली आहे . राजकारणात " कोणी कायम शत्रू तर कोणी कायम मित्र नसतो " हे वचन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोहा-कंधार भागात प्राबल्य असलेल्या माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत कॉंग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांची 'दिलजमाई' झाली असली कार्यकर्त्यांमधील राजकीय वैर  येत्या पाच दिवसात संपूष्टात येईल असे वाटत नाही. अगदी या नेत्यांच्या घरातील मतेही कांग्रेसला पडतील की नाही याची शंका वाटते आहे. म्हणूनच ही दिलजमाई प्रताप पाटलांसाठी भविष्यात 'आमदारकीच्या तिकीटाची कमाई' ठरणार असली तरी विद्यमान आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासाठी 'राजकीय खाटाई' तरणार आहे. अशोक चव्हाण यांनी दोघानाही न्याय देऊ असे म्हटले असले दोघातील राजकीय हाडवैर पाच दिवसात मिटेल याची खात्री देता येत नाही. कारण काल पेठवडज येथील दिलजमाईच्या सभेतही धोंडगे आणि चिखलीकर यांनी एकमेकांसाठी 'वाघ' आणि 'लांडगे' असे शब्द वापरले आहेत. 

मागच्या निवडणुकीत बापूसाहेब गोरठेकर आणि प्रतापपाटील चिखलीकर यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अशोक चव्हाणांना प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर हे कसे विसरू शकतात? याचा बोधच अद्याप कार्यकर्त्यांना झाला नाही.१९९९ मध्ये कांग्रेस पक्षात असताना कांग्रेस पक्षाकडेच असलेल्या कंधार -लोहा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मागतील होती तेंव्हा अशोक चव्हाणांनी खेळी करून २००४  मध्ये कंधार-लोहा मतदार संघ राष्ट्रवादीकडे देऊन टाकला होता आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शंकरअण्णा धोंडगे यांनी ही निवडणूक लढविलीहोती. त्यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आणि त्या निवडणुकीत आपल्या बळावर विजय संपादन केला होता. सन २००४ मध्ये अपक्ष आमदारांची गरज सरकार स्थापण्यासाठी होती. म्हणून आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कृपाछत्राखाली प्रताप पाटील चिखलीकर यांनी सरकारला पाठिंबा दिला. आमदार झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रस्थ आणखीन वाढले होते. 

सर्वजन अशोकराव यांच्या पावर समोर नतमस्तक झालेले असताना प्रताप पाटलांचे  बंडखोर  राजकारण अशोकरावांच्या डोळ्यात काटा बनून सलत होते. त्यांना संपविण्याचे सूडाचे राजकारण अशोक चव्हाण खेळत असले तरी प्रताप पाटील चिखलीकर त्यांच्या डावपेचांना त्यांना पुरून उरले होते. नांदेड महानगर पालिका निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकभारती पक्षाच्या माध्यमातून मनपामध्ये उमेदवार उभे केले होते. याही परिस्थितीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी लातुर्कारांचे सहकार्य घेऊन अशोक चव्हाणांना बेजार केले होते. २००९ ची निवडणूक येण्यापूर्वी लोहा येथे माजी आमदार रोहिदास चव्हाण मुलीचे  लग्न झाले. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी त्या लग्नाला जवळपास एक दिवसांचा वेळ दिला होता. आणि त्या लग्नातील प्रत्येक बाबीची देखरेख अशोक चव्हाण करत असलेले जनतेने पाहिले आहे. आपल्या चारचाकी वाहनांच्या शो रूममधून एक नवी कोरी करकरीत गाडी रोहिदास चव्हाणांच्या मुलीला भेट दिली होती. त्याच दिवशीच प्रताप पाटील चिखलीकर यांचे २००९  मधील भवितव्य ठरले होते. २००९ मध्ये कंधार-लोहा मतदार संघ कॉंग्रेसला सुटावा आणि काँग्रेसने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी आपल्या जीवाची मुंबई करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले होते. तरी पण न डगमगता पुन्हा प्रताप पाटील चिखलीकर विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले पण अशोक चव्हाणांची खेळी यशस्वी ठरली. आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पराभव झाला . प्रताप पाटील चिखलीकर यांचा एक-एक मोहरा अशोक चव्हाण आपल्या तंबूत आणला तरी पण प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या अस्मितेला तडा जावू दिला नाही. 

त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचे सर्वात प्रिय अमरनाथ राजूरकर यांना विरोध करण्याचा प्रयत्न एकट्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला होता. तेंव्हा अशोक चव्हाणांनी त्यांच्याशी मिळते घेतले होते आणि  पुढे प्रताप पाटलांनीही आपल्या मुलाचे प्रवीण पाटलाचा सभापती रोहन समारंभ चव्हाणांच्या कृपेनेच पदरात पडून घेतला होता. आपल्या सत्तेच्या पत्रावळीवर अशोकरावानी प्रतापरावानाही द्रोण मांडू दिला होता. त्यामुळेच सध्या प्रवीण पाटील चिखलीकर हे जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य खात्याचे सभापती आहेत. 

नुकतीच लोहा नगर पालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुद्धा प्रताप पाटलांचे अस्तित्व संपविण्यासाठी अशोक चव्हाणांनी रोहिदास चव्हाण यांच्यासोबत एक ' गुप्त खलबत ' केले परिणामी तुला ना मला घाल मनसेला या पद्धतीने महाराष्ट्रात मनसेचा झेंडा लोह नगर परिषदेवर फडकला त्यात राज ठाकरे यांच्या पेक्षा अशोक चव्हाणांचे कर्त्तृत्व  मानले जाते. आज देशात मोदीची लाट आहे भले भले कांग्रेस पुढारी आणि केंद्रातील मंत्री धास्तावलेले असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभेचे आव्हान स्वीकारले आहे. अशा वेळी लोकसभेने भाजपाचे खाते पुन्हा उघडले गेले आणि महायुतीची पावर वाढली तर दोन्ही कांग्रेसच्या हाती कटोरा येणार आहे.ही गोष्ट दूरदृष्टी असणारे शरद पवार यांना उमगल्याने आता भांडत बसण्याची हे वेळ नाही आता जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर विधानसभेच्या वेळी आणखी बिघाडी वाढणार आहेत. या आधी राजकारणाच्या पटलावर एकमेकांचे विरोधक असणारे शरद पवार आणि शंकरराव चव्हाण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यात अडचणीत विरोधी पक्षाला मात देण्यासाठी दिलजमाया झाल्याचा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती काल शुक्रावारी ११ एप्रिल रोजी झाली आहे.   

हीच दिलजमाई शेजारच्या हिंगोली लोकसभा मतदार संघात झाली असते तर कांग्रेसचे बळ तिथेही वाढले असते पण शरद पवार नांदेडला आलेले असताना सूर्यकांता पाटील मात्र बाहेर गावे गेल्या होत्या. शरद पवार प्रताप पाटलांना आघाडीचा धर्म पाळायचा आदेश देता आहेत मग हिंगोली मतदार संघात सूर्यकांता पाटील यांना ते असा आदेश का देत नाहीत? तिथे त्यांचा रिमोट कंट्रोल का चालत नाही? अजितदादा सूर्यकांता ताईला या आघाडी धर्मावर काहीच कसे बोलत नाहीत ? या प्रश्नाची उत्तरे मतदारांना मिळाली असती तर बरे झाले असते....... "अभी नही तो कभी नही लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना चव्हाण यांनी ' डॅमेज कंट्रोल ' मोहीम सुरू केली. आधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यापाठोपाठ गोरठेकरांचे मित्र असलेल्या प्रतापरावांशीही दिलजमाई झाली आणि आघाडे धर्माचे पालनही झाले भाजपचे डी. बी. पाटील यांचे ' कमळ ' कोमेजल्याचे जाणवत असले तरी ही कथित दिलजमाई अशोक चव्हाण यांच्यासाठी किती मतांची कमाई करते ही गोष्ट आगामी १७ तारखेला ठरणार असून निकालावर या दिलजमाईचा नक्की काय परिणाम होईल हे जाणण्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे.

शुक्रवार, 11 अप्रैल 2014

प्रथमच एका व्यासपीठावर

अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर प्रथमच एका व्यासपीठावर  


नांदेड(प्रतिनिधी)नांदेड लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर हे आज एका व्यासपीठावर प्रथमच दिसल्याने पुन्हा एकदा या निवडणुकीत दिलजमाईचे नवे पर्व सुरु झाले असे मानले जात आहे. आज अशोक चव्हाण यांच्या पेठवडज येथील प्रचार सभेत दोघे  नेते एका व्यासपीठावर आले . यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका पुढील शब्दात मांडली.

आघाडीचा धर्म पाळणे हे प्रथम कर्तव्य आहे व ते मी मुख्यमंत्री असल्या पासून पाळतो आहे. सर्वांचे सहकार्य  घेऊन मी महाराष्ट्राचे राजकारण केले आहे .वैचारिक मतभेद असू शकतात पण मी आयुष्यात कधीही कुणाचाही व्यक्तिगत द्वेष केला नाही त्यांमुळे आज एकत्र येण्यास कुठलाही  अडथळा  नाही . माजी आमदार प्रताप पाटील यांनी आपल्या भाषणात " आपण विरोधही प्रामाणिकपणे विरोध केला होता आणी आता मैत्रीही प्रामाणिकपणे करणार आहोत अशी ग्वाही जाहीर पणे दिली .ही  निवडणूक अशोक चव्हाण यांच्या साठी निर्णायक असल्याने ओठात एक आणि पोटात एक असे न वागता कार्यकर्त्यासह त्यांना निवडून आण्यासाठी मी प्रयत्नशील राहील " 
आपसातील मतभेद बाजूला ठेवून नांदेड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा, प्रतापराव आघाडीचा धर्म पाळून अशोक चव्हाण यांच्या प्रचाराला उघडपणे कामाला लागा असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष ना. शरदचंद्र पवार यांनी शुक्रवारी दिला.

राष्ट्रवादीचे नेते ना. शरदचंद्र पवार हे माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील ‘साई-सुभाष’ निवासस्थानी शुक्रवार दि.11एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नाश्ता करण्यासाठी दाखल झाले. पवार साहेब हे चिखलीकर यांच्याकडे नाश्त्यासाठी येणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानीक नेते माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब देशमुख गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष रामनारायण काबरा आदिंची उपस्थिती होती. त्यानंतर प्रतापराव तुमच्यात व अशोक चव्हाण यांच्यात कांहीही मतभेद असतील ते बाजूला ठेवून आघाडीचा धर्म तुम्हाला पाळावा लागणार आहे. चव्हाणासोबत तुम्ही जाहीर प्रचार सभा घ्या. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत असा आदेश त्यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना दिला.

चिखलीकराकडे नाश्ता करताना शरद पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थीती जाणून घेतली. कॉंग्रेसचे आमदार किती, जि.प. सदस्य, नगर पालिका किती ताब्यात आहेत यावर चर्चा करण्यात आली. कंधार-लोहा तालुक्याचा कोणता भाग नांदेडला जोडला गेला. गेल्या लोकसभा निवडणूकीत कंधार-लोहा तालुक्यातून कॉंग्रेसला मताधिक्य कमी का झाले असा प्रश्न उपस्थित केला तेंव्हा चिखलीकर म्हणाले, मी आमदार होतो. मला विरोध म्हणून राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा या सर्व पक्षांनी छुपी युती करुन कॉंग्रेसला विरोध करण्याचे कटकारस्थान रचविले गेले. त्यामुळे भाजपाला या तालुक्यातून मताधिक्य मिळाले. कॉंग्रेस राष्ट्रवादी भाजपाला मदत करण्याचे कारण काय? प्रश्न विचारला असता गंगाधरराव कुंटूरकर म्हणाले, विलासराव देशमुख यांना विरोध म्हणून अशोक चव्हाणांनी भाजपाला मदत केली असा गौप्यस्फोट केला.शरद पवार यांचा चिखलीकर कुटूंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

वानखेडेंच्या धनुष्य बनसामोरील बटन दाबा .. रामभाऊ ठाकरे

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी वानखेडेंच्या धनुष्य बाणासामोरील बटन दाबा .. रामभाऊ ठाकरे

हिमायतनगर(वार्ताहर)नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खा.सुभाष वानखेडे यांच्या धनुष्य बाण या निशानिसामोरील बटन दाबून मताधिक्याने निवडून आना असे मत रामभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले. ते वानखेडे यांच्या हिमायतनगर तालुक्यातील गाव गावात प्रचारासाठी मतदारांशी संवाद साधून आगामी काळाची गरज लक्षात आणून देताना बोलत होते.

हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी रामभाऊ यांची नव्याने नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. त्यांचे सर्व खांदे समर्थक खा.सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र गाव गावात वाडी तांड्यात भेटी देऊन मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मागील आठ दिवसापासून रामभाऊ ठाकरे यांनी तालुक्यातील सिरंजणी, एकंबा, पळसपूर, डोल्हारी, घारापुर, शेलोडा, कोठा ज, कोठा तांडा आदिसह तालुक्यातील अन्य भागात दौरे करीत आहेत. रामभाऊ ठाकरे हे हिमायतनगर तालुक्यातील युकांचे प्रेरणास्थान असून, त्यांच्या हिंदुत्ववादी कार्यामुळे शहरासह ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असल्याने त्यांच्या प्रचाराला मतदांसह सामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मागील काळात त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले होते. आज घडीला त्यांच्या सुविद्ध पत्नी शिवानीताई ठाकरे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. रामभाऊ ठाकरे यांनी मागील काळात दोन वेळा जी.प.ची अपक्ष निवडणूक लढविली होती. एक वेळा त्यांचा अवघ्या काही मतांनी निसटता परभव झाला. तर दुसर्यांदा त्यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात असताना अल्पश्या मताने पराभव पत्करावा लागला होते. परंतु त्यांनी अजूनही हार न मानता एकनिष्ठेने सक्रिय होते. त्यांच्या या कार्याची दाखल घेवून खा.सुभाष वानखेडे यांनी टाकली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खा. सुभाष वानखेडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सोबत तालुका प्रमुख डॉ.प्रकाश वानखेडे, बंडू पाटील टेंभीकर, हनुसिंघ ठाकूर, अनिल भोरे, ज्ञानेश्वर शिंदे, राम नरवाडे, खंडू चव्हाण, शंकर पाटील, रामदास रामदिनवार, पंडित ढोणे, जावेद खतीब, श्याम जक्कलवाड, गंगाधर बासेवाड, केवळदास सेवनकर, फुलके, आदींसह अनेक कार्यकर्त्यांची फळी दिसून येत आहे. 

बुधवार, 9 अप्रैल 2014

आचार संहीतेची ऐशी - तैशी..

नांदेड जिल्हयात आदर्श आचार संहीतेची ऐशी - तैशी..
दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जिल्हयातील अवैध देशी-विदेशची विक्री नांदेड(अनिल मादसवार)संपुर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका चालु असल्याने आदर्श आचारसंहीता लागु आहे. या आदर्श आचार संहीतेची सर्वच प्रशासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी अश्या सूचना जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आल्या असतांनाही जिल्हयात मात्र दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाकडुन सुचनांचे पालन न करता जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी जिल्हयातील 70 टक्के गावात आजही अवैध दारू विक्री मोठया प्रमाणात चालु आहे. जिल्हयातील बोटावर मोजण्या र्इतक्या लोकांवर कारवार्इ करून संबंधीत प्रशासकीय विभागाने औपचारीकता पुर्ण केली आहे. त्यामुळे येणा:या काळात दारूडयांच्या जोरावर निवडणुकीच्या काळात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी कर्मयोगी फाउंडेशन सरसम बु.च्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाश संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.

प्रत्येक निवडणुकीच्या काळात जिल्हयातील विविध पक्षांच्या कार्यकत्यांकडुन मोठया प्रमाणात पैसे व दारू पाजुन पाहीजे त्या पक्षाच्या पदरात मतदान मिळवुन घेतल्या जाते ते याही निवडणुकीच्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यांच्या पाठीमागे कुनीही नाही असे लोक हप्ते देवुन आदर्श आचारसंहीतेत दररोज जिल्हयात हजारो लिटर दारू विकत आहेत. निवडणुकीच्या काळात तर स्वत:राजकीय नेतेच दारू वाटप करीत असतात त्यामुळे नांदेड जिल्हयात मोठया प्रमाणात गावागावात आतापासुनच दारूची साठवणुक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा निवडणुन अधिकारी आणि मतदार जाग्रती आभियान समीतीच्या माध्यमातुन अनुकुल परीस्थितीतही विविध स्तरावर जनजागरणाचे कार्यक्रम घेवुन मोठया प्रमाणात नागरीकांचे जनजागरण करण्याचे काम आपल्याकडुन करण्यात आले व जनतेला दारू पिवुन मतदान व पैसे घेवुन मतदान न नकरण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केलेले आहे आणि हे ऐकुन ग्रामीन भागातील व्यसनाधिन व्यक्तीेच्या कुटुंबातील व्यक्तीनी कीमान आचार संहीता संपेपर्यंत आपल्या कुटुंबात शांतता राहील असे हजारो कुटुंबातील महीला व सदस्यानी ग्रहीत धरले होते परंतु आदर्श आचार संहीतेचीे जाणीवपुर्वक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आज गावागावत दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील लहान लहान मुलं जे शाळेत जातात ते देखील गावातच दारू मिळत असल्याने दारूचे सेवन करीत आहेत ती दारू सुध्दा बनावट असन्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण रासायणीक प्रक्रीया करून तयार केरण्याची पध्दत आता नवीन राहीलेली नाही जिल्हयात बनावट पॅकींग करून देशी दारूच्या बॉटल्स पोलीस प्रशासनाने मागील काळात धाडी टाकुन पकडल्या होत्या म्हणुन अशी आरोग्यास घातक असलेली दारू मोठया प्रमाणात नागरीकांच्या घशी राजकारण्यांकडुन उतरवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच काही दिवसांपुर्वीवाजेगाव स्थित दारूच्या गोदामात चोरी होवुन शेकडो बॉक्स चोरी झाल्याचे व्रत्त वर्तमान पत्रातुन प्रकाशीत झालेले आहे. परंतु त्यातील आरोपी अजुन पर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नाही आणि लागणारही नाही कारण तर ती चोरी नसन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण आता निवडणुकीचा कालावधी आसल्याने सर्वांनी संगनमत करून ही घटना घडवुन आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन आपणास या निवेदनाच्या माध्यमातुन विनंती करण्यात येत आहे की जिल्हयात कोणतीही अनुचीत घटणा घडु दयायची नसेल तर सर्वात पहीले जिल्हयातील अवैध दारू बंद होणे गरजेचे आहे. आणि यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलले तरच हे शक्य आहे. बिट जमादारांच्या माध्यमातुन ही सर्व माहीती हस्तगत करता येवु शकते त्यांना कोणत्या गावात कोण अवैध दारू विकतो हे माहीत आहे. आणि जर त्या त्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांकडुन हे होणार नसेल तर आमच्या जिवीत्वाची हमी पोलीस प्रशासनाने घ्यावी व निशुल्क पोलीस संरंक्षण देण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावीे आमची संस्था जिल्हयातील शेकडो गावातील शेकडो अवैध दारू विक्रेत्यांची माहीती उपलब्ध करून देवुन प्रशानास मदत करण्यास तयार आहोत. जिल्हयात पोलीस निरीक्षक श्री अनिलसिंह गौतम यांची ज्या ज्या ठिकाणी बदली होत आहे ते त्या पोलीस स्थानकाचे इंचार्ज असेपर्यंत त्या ठिकाणची अवैध दारू 100 टक्के बंद होत आहे. मग एक अधिकारी असे करू शकतो तर बाकी पोलीस प्रशासन का नाही करू शकत..? असा सवाल करून प्रशासणाने प्रामाणीकपणे प्रयत्न केल्यास जिल्हयातील अवैध दारू बंद होउु शकते असेही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निएदनत म्हंटले आहे. 

जिल्हाभरात होत असलेल्या या सर्व प्रकरणात स्वत: जातीने लक्ष घालुन योग्य ते कठोर पावले उचलुन सामान्य नागरीकांना निवडणुकीच्या काळात कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. गरज वाटल्यास गावागावतुन तरूण वर्गास मतदार जाग्रती अभियान समीतीच्या माध्यमातुन आवाहन करून स्वयंसेवक नेमुन दारू व पैसे वाटपाच्या हालचालीवर अंकुश ठेवुन्यासाठी मदत घेऊन जिल्हयातील निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या द्रटीने योग्य ते पावले उचलावीत अशी मागणीही अध्यक्ष कर्मयोगी फाउंडेशन सरसम बु, ता.हिमायतनगर यांनी केली आहे.

विकास कोणाचा?

हदगांव/हिमायतनगर(वार्ताहर)शेतकरी, शेतमजुर, मराठा, दलित, मुस्लीम, अदिवासी, बंजारा व बेरोजगार युवकांच्या मुळावर उठलेल्या जातीयवादी आघाडी सरकारला गाडुन टाका असे प्रतिपादन हदगांव तालुका शिवसेना प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगांव तालुक्यातील मनाठा, बामणीफाटा, शेंदन, डाक्याची वाडी, तामसा, हिमायतनगर, निवघा, वाळकी, कव्हळी, नेवरी, दुधड, जिरोणा अशा अनेक सभातुन आघाडी सरकारवर तोफ डागत आपला झांझावती प्रचारातुन वानखेंडेसाठी मत मागत आहेत.

केंद्रात, राज्यात कॉग्रेसचे सरकार जिल्हयाचा मुख्यमंत्री तालुक्याला कॉंग्रेसचा आमदार असतांना काय विकास साधला व कोणाचा विकास साधला असा खोचक सवाल करत हदगांव तालुक्यात कधी नव्हे ते टक्केवारीच्या माध्यमातुन पाहतापाहता कॉंग्रेसच्या पुढार्‍याचा मात्र विकास झाला पुढारी तुपाशी तालुका उपाशी अश्या भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवुन देण्याची वेळ आली असल्याचे आष्टीकर म्हणाले. मागील विधानसभेत जिल्हयाचा मुख्यमंत्री होणार व आपल्या भागाचा विकास होईल व आपले प्रश्‍न मार्गी लागतील या आशेने हदगांव हिमायतनगर तालुक्यातील जनतेने मताधिक्याने कॉग्रेसचे आमदार निवडुन दिला पण निवडुन आल्यावर तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच पडली एकही प्रश्‍न मार्गी लागला नाही. शेतकरी, मराठा समाज, दलित, अल्पसंख्याकचे प्रश्‍न तसेच कायम राहीले. या कॉग्रेसच्या पुढार्‍याकडुन घोर निराशा झाली आमदार झाल्यावर मतदाराकडे पाठ फिरविणार्‍या व त्यांच्या प्रश्‍नाला बगल देणार्‍या कॉग्रेसच्या आमदाराला त्याची जागा दाखवुन दया.

याच धरतीचे नेते आ. सातवांची सुध्दा अशाच पध्दतीची वागणुक असुन त्यांच्यावर कळमनुरी मतदार संघातील मतदार नाराज असुन निवडुन आल्यावर आपल्या मतदारसंघात फिरकले नाही. खा. सुभाष वानखेडे हे सर्वसामान्यात राहणारा व सर्वसामान्याचे दु:ख जाणणारा नेता असुन हिमायतनगर तालुक्याचा प्रश्‍न निकाली काढणारा व आपल्या प्रश्‍नाला तालुक्याला न्याय मिळवुन देण्यासाठी विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवणार्‍या खा. वानखेडेंना विजयी करण्याचे भावनिक आवाहन आष्टीकर यांनी केले.

हदगांव तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर खोटे आश्‍वासने देत नारळे फोडत फिरणार्‍या कॉग्रेसच्या आमदाराला आजच का तालुक्याच्या प्रश्‍नाची आठवण झाली? तालुक्यातील जनतेला वार्‍यावर सोडुन मुंबईत राहणार्‍या व शेतकरी, शेतमजुर, मराठा, दलित, मुस्लीम, अदिवासी, बंजारा, ओबीसी व बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नाला साडेचार वर्षात न्याय देता आला नाही व याबाबत त्यांनी विधानसभेत तोंडही उघडले नाही. अश्या कॉग्रेसच्या आमदाराकडुन कॉग्रेसच्या लोकसभा उमेदवारासाठी मते मागली जातात व खोटी आश्वासने दिली जातात या कॉग्रेसच्या खोटारडयावर विश्वास ठेवु नये व महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडेंना विजयी करुन संसदेत पाठवुन शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.

काँग्रेसला साथ द्या...जवळगावकर

हिमायतनगर(वार्ताहर)भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करून गेल्या २० वर्षापासून फसवणूक करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा असे आवाहन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. ते हिमायतनगर शहरातून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधीकृत उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचार रेलीनंतर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. 

बुधवार दि.०९ रोजी इस्लापूर येथील सभेसाठी जाताना कॉंगेसचे उमेदवार राजीव सातव हिमायतनगर शहरात आले असता, मुख्य रस्त्यावरून कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार रेली काढण्यात आली होती. येथील श्री परमेश्वर मंदिरात जाऊन सातव यांनी दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला. तसेच पुढील सभेसाठी ते पुढे रवाना झाले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जवळगावकर पुढे म्हणाले कि, विरोधी पक्ष हा जाती धर्माच्या नावाखाली जनतेत फुट निर्माण करीत आहे. केवळ भाषण बाजीने विकास होत नसून, यासाठी नियोजनपूर्ण कार्य करावे लागते. आता तर हे महाशय मतदार स्नाघात फिरून मोदीच्या नावाने मते मागत आहेत. अश्या प्रकारे जनतेला भूल - थापा देऊन निवडून येण्याची दिवा स्वप्ने पाहत आहेत. आता तरी जनतेनी जागृत होऊन विकास कामे करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारास प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन केले. या प्रसंगी लक्ष्मण शक्करगे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी जी.प.सदस्य समद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, बाबुराव बोड्डावार, माजी सरपंच चांद भाई, गौतम पिंचा, प्रभाकर मुधोळकर, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, रफिक सेठ, कानबा पोपलवार, पांडुरंग गाडगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नाराज राष्ट्रवादी काँग्रेस गटातील प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित दिसून आले.

मंगलवार, 8 अप्रैल 2014

कॉग्रेसवाल्यासारखे दिल्लीला राहुन गल्लीचा कारभार पाहत नाही


हदगांव(शिवाजी देशमुख)कॉग्रेसपक्ष सर्वसामान्याचा पक्ष नसुन कॉग्रेसचे नेतेसुध्दा सर्वसामान्य जनतेचे कधीच होवु शकत नाहीत असा आरोप करीत कॉग्रेस म्हणजे शायनिंग इंडीया असल्याचे सांगत कॉग्रेसची मंडळी निवडुन आल्यानंतर दिल्लीला राहुन गल्लीचा कारभार पाहतात असाही आरोप त्यांनी कॉग्रेसवाल्या नेतेमंडळीवर करत आपण राजकारणात प्रवेश केला तेव्हापासुन आजतागायत कधीच मी मतदारसंघाबाहेर राहीलो नाही माझे घर, माझे कुटूंब सर्वचजण मतदारसंघात वास्तव्यास असतो. मतदारसंघात राहुनच दररोज माझ्या घरी दरबार भरवतो. जनतेच्या अडीअडचणी ऐकुन घेतो व लगेचच त्यांच्या समस्यांची सोडवणुक करतो मी लोकांमध्ये राहणारा जनतेचा जनसेवक आहे म्हणुनच मतदार मला प्रत्येक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडुन देतात असे मत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. तथा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आपली भुमिका मांडतांना स्पष्ट केले. 


हिंगोली मतदारसंघात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हदगांव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव, माहुर, किनवट असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुक 2009 लढविण्यापुर्वी दोन अडीच वर्ष आगोदरपासुन सर्व मतदारसंघ पिंजुन काढला. लोकांना भेटलो माझी शिवसेनेची स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख मा. उध्दवजी ठाकरेया नेत्यांच्या भुमिका पटवुन सांगीतल्या. सतत तीन वेळा आमदार म्हणुन जनता मला निवडुन देत असतांना कयाधु, पैनगंगा या नदयांना महापुर आल्यानंतर त्या महापुराला पाहुन अंगावर शहारे उमटायचे प्रचंड भिती वाटायची त्या महापुरात उतरुन अनेकांचे प्राण वाचविले. स्वत:च्या मरणाची भिती मनामध्ये न बाळगता पत्नीचे कुंकू पुसुन पुरामध्ये उतरलो. मतदारसंघातील जनता माझी असुन माझे कुटूंब आहे. त्या कुटूंबातील एकालाही मरु देणारनाही अशी शपथ घेवुन हाडामासाच्या शिवसैनिकांना सोबत घेवुन पुरात अडकलेल्या प्रत्येकाला बाहेर काढले अशा पध्दतीने जीवावर बेतुन मतदारसंघात काम करतो म्हणुनच जनता मला कहो दिलसे वानखेडे फिरसे म्हणुन चाहते. ही वस्तुस्थिती आहे. पक्षातील माझ्या वरिष्ठ नेत्यांना सुभाष वानखेडे ग्रांउड लेवलवर काम करतो, पब्लीकमध्ये घुसुन पक्षकार्य करतो याची चांगल्या तर्‍हेने जाण्‌ीव आहे. म्हणुन तर माझ्या उमेदवारीला डोळे झाकुन होकार देतात.

मराठवाडयात सतत तीन वेळा आमदार नंतर लगेचच एक वेळा खासदार म्हणुन निवडुन येणारा पहिलाच जनसेवक मीच असेल असे मी छातीठोकपणे सांगतो. कधीच अंगामध्ये नेतेगीरी येवु दिली नाही. नेतेपणा अंगात आणुन कधीच जॅकेट अंगात परिधान केले नाही. साधेपणाने राहतो म्हणुनच जनता जनार्धन माय-बाप मला आपल्यातील माणुस, आपल्या माणुस मला प्रथम पसंती देतात हे ही आवर्जुन सांगावेसे वाटते.महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा हदगांवची एकमेव नगरपालिका ही शिवसेना पक्षाची, एकहाती सत्ता स्थापन करणारी होती. माझ्या 20 वर्षाच्या सततच्या राजकिय कारकिर्दीत हदगांव पंचायत समितीवर सतत विस वर्षापासुन एकहाती सत्ता असुन हदगांव नगरपरिषदेवर दहा वर्ष सतत सत्ता होती.

हदगांव बाजार समिती, सेवा सोसायटया, ग्रामपंचायती आदीवर शिवसेनेचेच वर्चस्व असल्यामुळे हीच आपल्या कार्याची पावती जनतेने मला दिली असे मला ठामपणे याप्रसंगी सांगावेसे वाटते. 1985 ते आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहुन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयात जागा करुन त्यांनी वेळोवेळी जी काही जबाबदारी आपल्यावर दिली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनाप्रमुखांचे धोरण डोळयासमोर ठेवुन समाजातील सर्वसामान्याच्या अडीअडचणींची त्यांच्या समस्यांची सोडवणुक करीत गेल्यानंतर जनता-जनार्दन शायनिंग इंडीया च्या कॉंग्रेस नेतेमंडळीना दुर लोटुन आपणास जवळचा माणुस आपला माणुस म्हणुन मला जवळ करु लागली. माझ्याशी जवळीकता साधु लागली अशा पध्दतीने मी जनतेचा जनसेवक म्हणुन जनतेची कामे करु लागलो. भ्रष्टाचारी बेरोजगारी व महागाई या कॉंग्रेसी सरकारने सर्वसामान्य जनतेला एवढया मोठया प्रमाणात वेठीस धरले की, जनता हतबल होवुन गेली आहे. मतदार बंध्‌-भगिनी यावेळी बदल घडवुन आणण्याच्या मनस्थितीत आहेत हे मला जागोजागीच्या प्रचंड गर्दीतील सभातुन दिसुन येत आहे.

कॉंग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांत तू तू- मै मैं

नांदेड(प्रतिनिधी)राम जन्मोत्सवानिमित्त गाडीपूरा येथील रेणूका माता मंदीरापासून मंगळवारी सायंकाळी शोभा यात्रा काढण्यात आली होती.या शोभा यात्रेनिमित्त माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,त्यांचे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले.दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी "नमो नमो''च्या घोषणा देताच कॉंग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांत चांगलीच तु तू मै मै झाली होती.हा प्रकार घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी पाहून घेतो,असे म्हणून चक्क जुना मोंढा ते महावीर चौक दरम्यान वीज पुरवठा खंडीत करून शोभा यात्रेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराचा भाजपा कार्यकर्त्यांनी कडाडून निषेध नोंदविला. 

गाडीपूरा येथील रेणूका मातेच्या मंदीपासून शोभा यात्रा निघाली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.ओमप्रकाश पोकर्णा व कॉंग्रेसचे इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते.ते येण्यापूर्वी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डी.बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कोैडगे व शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा शोभा यात्रेत सहभाग दिसताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नमो नमोचा नारा देण्यास प्रारंभ केला. या घोषणेमुळे शोभा यात्रेत चांगलेच तणावाचे वातावरण पसरले होते. यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मोंढ्याच्या पुढे शोभा यात्रा येवू द्या,पाहून घेवू, अशी धमकी दिली. दरम्यान शोभा यात्रा जुना मोंढा परिसरात येताच या परिसरासह महावीर चौकापर्यंंत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे हिंदू देवतांच्याच कार्यकर्त्यांत हिंदूच व्यत्यय आणत असल्याचा प्रत्यय यावेळी दिसून आला.

सूड भावनेतून कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला-दिलीपसिंघ सोडी

भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी यांच्याशी संपर्क साधला असता सूड भावनेने कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत करून श्री राम नवमीच्या शोभा यात्रेत व्यत्यय आणल्याच्या आरोप केला.

रामजन्मोत्सव साजरा


हिमायतनगर(वार्ताहर)येथील राम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, परमेश्वर मंदिर, साई मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर यासह शहर तालुक्यातील सर्वच देवी देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीच्या दिनी दि.०८ मंगळवारी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल शाखेच्या युअकनै शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य अशी मोटार सायकल रेली काढली, यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. 


सकाळी १२ वाजता शहरातील सर्वच देवी देवतांच्या मंदिरात राम नामाचा जप करीत प्रभू श्री रामचंद्राच्या जीवन चरित्रावर आधारित भक्ती गीते महिला व पुरुष मंडळीनी सादर केली. तर बजरंग दलाच्या युवकांनी शहरतील मुख्य रस्त्यावरून प्रभू रामचंद्र कि जय नावाचा जयघोष करीत मोटार सायकल रेली काढली होती. यावेळी युवकांनी भगवे झंडे लाऊन रेलीत सहभाग नोंदविला होता. यावेळी बजरंग दलाचे गजानन चायल, कुणाल राठोड, योगेश चीलकावर, देविदास शिंदे, सुधाकर चीटेवार, यांच्यासह शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता. तर येथील विजय बंडेवार यांच्या फार्म हौस वरील श्री साई मंदिरात स्वर संगीताचा कार्यक्रमाने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिला, पुरुष भक्तांनी हजेरी लावली होती.

तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील सरसम बु, टेंभी, सिरंजणी, कामारी, पोटा बु, सह सर्वच गावातील मंदिरामध्ये भजन - कीर्तन अश्या भक्ती संगमात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात

हिमायतनगर(अनिल मादसवार)प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे बोरगडी येथील मारुतीरायाच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दि.०८ मंगळवार पासून झाली असून, उत्सव चैत्र प्रतिपदा दि.१६ बुधवार पर्यंत चालणार आहे. उत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक - भक्तांनी उपस्थित राहून हनुमंतरायाचे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर कमेटी गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सदर सप्ताह कार्यक्रम हभप माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. सप्ताहभर दररोज सकाळी काकडा भजन, सकाळी ६ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ हभप ज्ञानेश्वर माउली महाराज हे सांभाळीत आहेत. सकाळी ९ ते ११ गाथा भजन, संध्याकाळी ५.३० ते ६.३० हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० या वेलेत्त हभप पांडुरंग महाराज येहळेगावकर, डॉ.लक्ष्मीकांत रावते, साहेबराव मारडगेकर, सुदाम महाराज पिंपळदरीकर, गणेश महाराज राठोड, निळोबा महाराज हरबलकर, भगवती महाराज सातारकर, व्यंकटेश महाराज कामारीकर, व शेवटच्या दिवशी हभप. योगेश महाराज वसमतकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच रामजन्मोत्सव कथा हभप. बाळासाहेब पांपटवार यांच्या मधुर वाणीतून केले जाऊन रामजन्मोत्सव साजरा होणार आहे.


तसेच दि.15 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी ५ ते ६.३० च्या वेळेत मारुतीरायाचा जन्म सोहळा व अभिषेक सोहळा पुरोहित दासा गुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीतून संपन्न होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 4.३० ते ६.३० या वेळेत हभप. चिन्मय महाराज यांचे हनुमान जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. जन्मोत्सवानंतर दर्शनार्थी भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. दुसर्या दिवशी सकाळी १२ वाजता काठाल्याची हर्राशी त्यानंतर कुस्त्यांची दंगल सुरु होणार आहे. यात जिंकणाऱ्या मल्लास ४००१ रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, दुसर्या क्रमांकास २००१ रुपये व तिसर्या क्रमांकाच्या मल्लास ११०१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त अन्य 500,100, 50 च्या कुस्त्या खेळल्या जातील.