आचार संहीतेची ऐशी - तैशी..

नांदेड जिल्हयात आदर्श आचार संहीतेची ऐशी - तैशी..
दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने जिल्हयातील अवैध देशी-विदेशची विक्री 



नांदेड(अनिल मादसवार)संपुर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका चालु असल्याने आदर्श आचारसंहीता लागु आहे. या आदर्श आचार संहीतेची सर्वच प्रशासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी अश्या सूचना जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आल्या असतांनाही जिल्हयात मात्र दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाकडुन सुचनांचे पालन न करता जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी जिल्हयातील 70 टक्के गावात आजही अवैध दारू विक्री मोठया प्रमाणात चालु आहे. जिल्हयातील बोटावर मोजण्या र्इतक्या लोकांवर कारवार्इ करून संबंधीत प्रशासकीय विभागाने औपचारीकता पुर्ण केली आहे. त्यामुळे येणा:या काळात दारूडयांच्या जोरावर निवडणुकीच्या काळात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी कर्मयोगी फाउंडेशन सरसम बु.च्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाश संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.

प्रत्येक निवडणुकीच्या काळात जिल्हयातील विविध पक्षांच्या कार्यकत्यांकडुन मोठया प्रमाणात पैसे व दारू पाजुन पाहीजे त्या पक्षाच्या पदरात मतदान मिळवुन घेतल्या जाते ते याही निवडणुकीच्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यांच्या पाठीमागे कुनीही नाही असे लोक हप्ते देवुन आदर्श आचारसंहीतेत दररोज जिल्हयात हजारो लिटर दारू विकत आहेत. निवडणुकीच्या काळात तर स्वत:राजकीय नेतेच दारू वाटप करीत असतात त्यामुळे नांदेड जिल्हयात मोठया प्रमाणात गावागावात आतापासुनच दारूची साठवणुक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. जिल्हा निवडणुन अधिकारी आणि मतदार जाग्रती आभियान समीतीच्या माध्यमातुन अनुकुल परीस्थितीतही विविध स्तरावर जनजागरणाचे कार्यक्रम घेवुन मोठया प्रमाणात नागरीकांचे जनजागरण करण्याचे काम आपल्याकडुन करण्यात आले व जनतेला दारू पिवुन मतदान व पैसे घेवुन मतदान न नकरण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केलेले आहे आणि हे ऐकुन ग्रामीन भागातील व्यसनाधिन व्यक्तीेच्या कुटुंबातील व्यक्तीनी कीमान आचार संहीता संपेपर्यंत आपल्या कुटुंबात शांतता राहील असे हजारो कुटुंबातील महीला व सदस्यानी ग्रहीत धरले होते परंतु आदर्श आचार संहीतेचीे जाणीवपुर्वक काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आज गावागावत दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील लहान लहान मुलं जे शाळेत जातात ते देखील गावातच दारू मिळत असल्याने दारूचे सेवन करीत आहेत ती दारू सुध्दा बनावट असन्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण रासायणीक प्रक्रीया करून तयार केरण्याची पध्दत आता नवीन राहीलेली नाही जिल्हयात बनावट पॅकींग करून देशी दारूच्या बॉटल्स पोलीस प्रशासनाने मागील काळात धाडी टाकुन पकडल्या होत्या म्हणुन अशी आरोग्यास घातक असलेली दारू मोठया प्रमाणात नागरीकांच्या घशी राजकारण्यांकडुन उतरवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच काही दिवसांपुर्वीवाजेगाव स्थित दारूच्या गोदामात चोरी होवुन शेकडो बॉक्स चोरी झाल्याचे व्रत्त वर्तमान पत्रातुन प्रकाशीत झालेले आहे. परंतु त्यातील आरोपी अजुन पर्यंत पोलीसांच्या हाती लागलेला नाही आणि लागणारही नाही कारण तर ती चोरी नसन्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण आता निवडणुकीचा कालावधी आसल्याने सर्वांनी संगनमत करून ही घटना घडवुन आणल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणुन आपणास या निवेदनाच्या माध्यमातुन विनंती करण्यात येत आहे की जिल्हयात कोणतीही अनुचीत घटणा घडु दयायची नसेल तर सर्वात पहीले जिल्हयातील अवैध दारू बंद होणे गरजेचे आहे. आणि यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलले तरच हे शक्य आहे. बिट जमादारांच्या माध्यमातुन ही सर्व माहीती हस्तगत करता येवु शकते त्यांना कोणत्या गावात कोण अवैध दारू विकतो हे माहीत आहे. आणि जर त्या त्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्‍यांकडुन हे होणार नसेल तर आमच्या जिवीत्वाची हमी पोलीस प्रशासनाने घ्यावी व निशुल्क पोलीस संरंक्षण देण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावीे आमची संस्था जिल्हयातील शेकडो गावातील शेकडो अवैध दारू विक्रेत्यांची माहीती उपलब्ध करून देवुन प्रशानास मदत करण्यास तयार आहोत. जिल्हयात पोलीस निरीक्षक श्री अनिलसिंह गौतम यांची ज्या ज्या ठिकाणी बदली होत आहे ते त्या पोलीस स्थानकाचे इंचार्ज असेपर्यंत त्या ठिकाणची अवैध दारू 100 टक्के बंद होत आहे. मग एक अधिकारी असे करू शकतो तर बाकी पोलीस प्रशासन का नाही करू शकत..? असा सवाल करून प्रशासणाने प्रामाणीकपणे प्रयत्न केल्यास जिल्हयातील अवैध दारू बंद होउु शकते असेही जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निएदनत म्हंटले आहे. 

जिल्हाभरात होत असलेल्या या सर्व प्रकरणात स्वत: जातीने लक्ष घालुन योग्य ते कठोर पावले उचलुन सामान्य नागरीकांना निवडणुकीच्या काळात कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. गरज वाटल्यास गावागावतुन तरूण वर्गास मतदार जाग्रती अभियान समीतीच्या माध्यमातुन आवाहन करून स्वयंसेवक नेमुन दारू व पैसे वाटपाच्या हालचालीवर अंकुश ठेवुन्यासाठी मदत घेऊन जिल्हयातील निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या द्रटीने योग्य ते पावले उचलावीत अशी मागणीही अध्यक्ष कर्मयोगी फाउंडेशन सरसम बु, ता.हिमायतनगर यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी