कॉंग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांत तू तू- मै मैं
गाडीपूरा येथील रेणूका मातेच्या मंदीपासून शोभा यात्रा निघाली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.ओमप्रकाश पोकर्णा व कॉंग्रेसचे इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते.ते येण्यापूर्वी लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डी.बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कोैडगे व शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा शोभा यात्रेत सहभाग दिसताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नमो नमोचा नारा देण्यास प्रारंभ केला. या घोषणेमुळे शोभा यात्रेत चांगलेच तणावाचे वातावरण पसरले होते. यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मोंढ्याच्या पुढे शोभा यात्रा येवू द्या,पाहून घेवू, अशी धमकी दिली. दरम्यान शोभा यात्रा जुना मोंढा परिसरात येताच या परिसरासह महावीर चौकापर्यंंत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे हिंदू देवतांच्याच कार्यकर्त्यांत हिंदूच व्यत्यय आणत असल्याचा प्रत्यय यावेळी दिसून आला.
सूड भावनेतून कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला-दिलीपसिंघ सोडी
भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी यांच्याशी संपर्क साधला असता सूड भावनेने कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत करून श्री राम नवमीच्या शोभा यात्रेत व्यत्यय आणल्याच्या आरोप केला.