तलाठ्यांच्या लाचखोरीमुळे

हिमायतनगर तालुक्यातील तलाठ्यांच्या लाचखोरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त 


हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यात कार्यरत असलेल्या महसूल विभागातील लाचखोर तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी व सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले झाले असून, कोणतेही छोटे - मोठे काम घेऊन गेल्यास पैश्याशिवाय काम होत नसल्याचे तलाठ्यांकडून सांगण्यात येत असल्याने लाभधारक शेतकरी वैतागला आहे. या प्रकाराकडे नूतन तहसीलदार श्री जरड यांनी लक्ष देऊन, तलाठ्यांच्या लाचखोरीला आवर घालावा अशी मागणी होत आहे.

हिमायतनगर तालुक्यात ९ तलाठी सज्जे आहेत. या सर्वांकडे आगामी खरीप हंगामाच्या काळात कृषी कर्जासाठी सातबारावर बोजा टाकणे, शालेय कामासाठी उत्पन्न प्रमाण पत्र, नवीन रेशन कार्ड, विक्री केलेल्या शेतीचा फेरफार व अन्य कामासाठी शेतकरी लाभार्थ्यांना जावे लागते. तलाठी महाशयांकडे गेले असता, बेडरपणे पैश्याची मागणी केली जात आहे. ज्यांच्याकडून रक्कम दिली जाते त्यांची कामे तातडीने करण्यात येउन अन्य नागरिक लाभार्थ्यांना सोमवारी ये..बुधवारी ये...मी लग्नाला चाललोय...चार दिवसांनी या असे सांगून कामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तालुक्यात बोटावर मोजण्याइतके तलाठी हे प्रामाणिकपणे शेतकरी- लाभार्थ्यांची कामे करतात. मात्र बहुतांश तलाठी हे देवाण - घेवाण केल्याशिवाय कोणत्याच लाभार्थ्यांचे काम करीत नाहीत. असा अनुभव तालुक्यातील प्रत्येकाना आलेला आहे. साधे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी केली जात असून, फेरफार रेशन कार्ड या सारख्या कामासाठी तर चक्क तीन ते चार आकडी रक्कमे शिवाय कामेच केली जात नाही. असाच काहींसा अनुभव मंगरूळ, धानोरा, पळसपूर, हिमायतनगर सज्जातील नागरिकांना आला असल्याचे त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले आहे.      

शासनाची महेवार गल्लेलठ पगार उचलूनही सदर म्हशी हे वर कमाईसाठी गरीब व गरजू लाभार्थ्यांची पिळवणूक करीत आहेत. अगोदरच निसर्गाच्या दुष्ट्चक्रामुळे नागवल्या गेलेला शेतकरी पुन्हा अधिकाऱ्यांच्या लाचखोर वृत्तीमुळे पुन्हा नागविला जात असून, या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराकडे नूतन तहसीलदार यांनी लक्ष देवून कायद्याचा बडगा उगारून शिस्त लावावी अशी मागणी आर्थिक पिळवणूक झालेल्या लाभार्थी नागरीका मधून व्यक्त होत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी