प्रथमच एका व्यासपीठावर

अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर प्रथमच एका व्यासपीठावर  


नांदेड(प्रतिनिधी)नांदेड लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर हे आज एका व्यासपीठावर प्रथमच दिसल्याने पुन्हा एकदा या निवडणुकीत दिलजमाईचे नवे पर्व सुरु झाले असे मानले जात आहे. आज अशोक चव्हाण यांच्या पेठवडज येथील प्रचार सभेत दोघे  नेते एका व्यासपीठावर आले . यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका पुढील शब्दात मांडली.

आघाडीचा धर्म पाळणे हे प्रथम कर्तव्य आहे व ते मी मुख्यमंत्री असल्या पासून पाळतो आहे. सर्वांचे सहकार्य  घेऊन मी महाराष्ट्राचे राजकारण केले आहे .वैचारिक मतभेद असू शकतात पण मी आयुष्यात कधीही कुणाचाही व्यक्तिगत द्वेष केला नाही त्यांमुळे आज एकत्र येण्यास कुठलाही  अडथळा  नाही . माजी आमदार प्रताप पाटील यांनी आपल्या भाषणात " आपण विरोधही प्रामाणिकपणे विरोध केला होता आणी आता मैत्रीही प्रामाणिकपणे करणार आहोत अशी ग्वाही जाहीर पणे दिली .ही  निवडणूक अशोक चव्हाण यांच्या साठी निर्णायक असल्याने ओठात एक आणि पोटात एक असे न वागता कार्यकर्त्यासह त्यांना निवडून आण्यासाठी मी प्रयत्नशील राहील " 
आपसातील मतभेद बाजूला ठेवून नांदेड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा, प्रतापराव आघाडीचा धर्म पाळून अशोक चव्हाण यांच्या प्रचाराला उघडपणे कामाला लागा असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष ना. शरदचंद्र पवार यांनी शुक्रवारी दिला.

राष्ट्रवादीचे नेते ना. शरदचंद्र पवार हे माजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील ‘साई-सुभाष’ निवासस्थानी शुक्रवार दि.11एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नाश्ता करण्यासाठी दाखल झाले. पवार साहेब हे चिखलीकर यांच्याकडे नाश्त्यासाठी येणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानीक नेते माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब देशमुख गोरठेकर, शहर जिल्हाध्यक्ष रामनारायण काबरा आदिंची उपस्थिती होती. त्यानंतर प्रतापराव तुमच्यात व अशोक चव्हाण यांच्यात कांहीही मतभेद असतील ते बाजूला ठेवून आघाडीचा धर्म तुम्हाला पाळावा लागणार आहे. चव्हाणासोबत तुम्ही जाहीर प्रचार सभा घ्या. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत असा आदेश त्यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना दिला.

चिखलीकराकडे नाश्ता करताना शरद पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थीती जाणून घेतली. कॉंग्रेसचे आमदार किती, जि.प. सदस्य, नगर पालिका किती ताब्यात आहेत यावर चर्चा करण्यात आली. कंधार-लोहा तालुक्याचा कोणता भाग नांदेडला जोडला गेला. गेल्या लोकसभा निवडणूकीत कंधार-लोहा तालुक्यातून कॉंग्रेसला मताधिक्य कमी का झाले असा प्रश्न उपस्थित केला तेंव्हा चिखलीकर म्हणाले, मी आमदार होतो. मला विरोध म्हणून राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा या सर्व पक्षांनी छुपी युती करुन कॉंग्रेसला विरोध करण्याचे कटकारस्थान रचविले गेले. त्यामुळे भाजपाला या तालुक्यातून मताधिक्य मिळाले. कॉंग्रेस राष्ट्रवादी भाजपाला मदत करण्याचे कारण काय? प्रश्न विचारला असता गंगाधरराव कुंटूरकर म्हणाले, विलासराव देशमुख यांना विरोध म्हणून अशोक चव्हाणांनी भाजपाला मदत केली असा गौप्यस्फोट केला.शरद पवार यांचा चिखलीकर कुटूंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी