सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला साथ द्या...जवळगावकर
बुधवार दि.०९ रोजी इस्लापूर येथील सभेसाठी जाताना कॉंगेसचे उमेदवार राजीव सातव हिमायतनगर शहरात आले असता, मुख्य रस्त्यावरून कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार रेली काढण्यात आली होती. येथील श्री परमेश्वर मंदिरात जाऊन सातव यांनी दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला. तसेच पुढील सभेसाठी ते पुढे रवाना झाले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना जवळगावकर पुढे म्हणाले कि, विरोधी पक्ष हा जाती धर्माच्या नावाखाली जनतेत फुट निर्माण करीत आहे. केवळ भाषण बाजीने विकास होत नसून, यासाठी नियोजनपूर्ण कार्य करावे लागते. आता तर हे महाशय मतदार स्नाघात फिरून मोदीच्या नावाने मते मागत आहेत. अश्या प्रकारे जनतेला भूल - थापा देऊन निवडून येण्याची दिवा स्वप्ने पाहत आहेत. आता तरी जनतेनी जागृत होऊन विकास कामे करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारास प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन केले. या प्रसंगी लक्ष्मण शक्करगे, जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी जी.प.सदस्य समद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, बाबुराव बोड्डावार, माजी सरपंच चांद भाई, गौतम पिंचा, प्रभाकर मुधोळकर, गणेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, रफिक सेठ, कानबा पोपलवार, पांडुरंग गाडगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नाराज राष्ट्रवादी काँग्रेस गटातील प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित दिसून आले.