मतदानाची आकडेमोड सुरु..

वाढीव मतदानाच्या टक्केवारीचा फायदा सेनेला कि काँग्रेसला .... मतदानाची आकडेमोड सुरु..




नांदेड(अनिल मादसवार)हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान दि.१७ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर आता कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील व कोणाचा विजय होईल यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरु केली असून, गत निवडणुकी पेक्षा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हि वाढीव मताची टक्केवारी कोणासाठी लाभदायक ठरेल व कोणता उमेदवार निवडून येईल याची एकच चर्चा सुरु आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेस पक्षाकडे गेल्याने व उच्च शिक्षित उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे निकात्वार्तीय राजीव सातव यांना उमेदवारी दिल्या गेल्याने २०१४ हि लोकसभा निवडणूक विशेष करून प्रकाश झोतात आली होती. कारण मागील काळात काभार पाहिलेले खा.सुभाष वानखेडे यांच्यावर स्वपक्षासः सामान्य नागरिकात असमाधानाचे वातावरण होते. परंतु मोदी लाटेच्या वादळाचा फायदा त्यांनाच होणार असल्याने शिवसनेने पुन्हा वानखेडे यांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षाचे प्राबल्य उमेदवार असल्याने दोघात काट्याची लढत होणार हे निश्चित होते. हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण २३ उमेवार उभे होते. त्यापैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार एड. राजीव सातव व शिवसेना, भाजप, रिपाई आठवले गट महायुतीचे उमेदवार खा. सुभाष वानखेडे या दोघांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. या निवडणुकीची  मतदान प्रक्रिया राज्यातील दुसर्या टप्प्याच्या १७ एपिल रोजी पार पडली. त्यात शिवसेनेच्या नाराज व जवळील सर्वच कार्यकर्त्यांनी अंग झटकून सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तर राजीव सातव यांना निवडून आणण्यासाठी मातब्बर पुढारी तथा विद्यमान आमदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत मतांचा जोगवा मागितला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सावांचे लक्ष लागलेले आहे.

हिंगोली लोकसभेच्या ११ तालुक्यांमधील १५ लाख ८६ हजार ४६५ पैकी १० लाख ४८ हजार ८९७ मतदारांनी मतदान हक्क बजावला असून, एकूण सरसरी ६६.६१ टक्के मतदान झाल्याने गत निवडणुकीत ११ तालुक्यातून ०८ लाख १७ हजार ५५३ मतदारांनी हक्क बजावल्याने एकूण ५९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत चक्क ०२ लाख ३१ हजार ३३४ मतदारांची आकडेवारी  वाढून ७.६१ टक्के मतदानाचा टक्का वाढला आहे. विशेष म्हणजे यात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढली असून, ती पुढील प्रमाणे आहे.

उमरखेड २००९ मध्ये ०१ लाख ४८ हजार ८६१ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ८० हजार ६३५ मतदान झाले. किनवट २००९ मध्ये ०१ लाख २० हजार ६१५ तर, २०१४ मध्ये ०१ लाख ५८ हजार ६५९ मतदान झाले. हदगाव २००९ मध्ये ०१ लाख ३२ हजार २१० तर, २०१४ मध्ये ०१ लाख ६८ हजार ४०० मतदान झाले. वसमत २००९ मध्ये ०१ लाख ४५ हजार ७९५ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ७९ हजार ९९४ मतदान झाले.कळमनुरी २००९ ला ०१ लाख ३२ हजार ०४५ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ८५ हजार ७५३ मतदान झाले. हिंगोली २००९ मध्ये ०१ लाख ३७ हजार ७५२ तर,२०१४ मध्ये ०१ लाख ७५ हजार ३५६ मतदान झाले आहे. या सर्वच मतदार संघात गत मतदानाच्या तुलनेत प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या मतदान जन -जागृतीमुळे सरासरी १० टक्के मतदान जादा झाले आहे. यावरून दोन्ही पक्षातील कार्यकते आकडे मोड करीत आपलाच उमेदवार विजयी होईल असे छाती ठोकपणे सांगत आहेत. परंतु या निवडणुकीत वाढीव मतदानाचा टक्केवारीचा आकडा ज्या उमेदवाराच्या मतपेटीत जाऊन पडेल तोच उमेदवार विजयी होणार आहे.

ऐन प्रचाराच्या सुरुवातीलाच हिगोलीच्या राष्ट्रवादी कॉंगेसच्या माजी खा.सूर्यकांताताई पाटील यांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला तर उघडपणे माजी खा. शिवाजी माने यांनी सेनेचा प्रचार केला. तसेच अबकी बार...मोदी सरकार... या नावाचे वादळ हे ग्रामीण भागातील कोण्या - कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोंचले होते, तर अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या आजीबाई सुद्धा अरे.. बाबा यातील मोदीचे बटन कोणते..? असे स्पष्टपणे विचारीत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा एकदा हिंगोलीचे खा. सुभाष वानखेडेच होतील अशी आशा जनमानसात दिसून येत आहे. तर शेवटच्या टप्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे राजीव सातव निवडून येणार..अशी चर्चा खुद्द काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करीत असल्याने हिंगोलीचा खासदार कोण..? या बाबतची उत्कंठा मतदारांमध्ये सध्या तरी दिसून येत आहे. या २०१४ च्या निवडणुकीची मतमोजणी हि हिंगोली येथे दि.१६ मे रोजी होणार असून, अजून तरी निकालासाठी आणखी २३ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी