राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म दिन

हिमायतनगर(वार्ताहर)केवळ तुकडोजी महाराजांची जयंती साजरी करणे हा ग्रामजयंतीचा उद्देश नसून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेले ग्रामगीतेतील तत्वांचे पालन सर्वांनी करावे हा हवे. तरच खर्या अर्थाने तुकडोजी महाराजांचा जन्म दिन तथा ग्राम जयंती साजरी केल्याचे फळ मिळेल. त्यासाठी आजच्या युगात सर्वांनी ग्रामगीतेतील ओव्यांचे आचरण करावे, असे आवाहन श्री गोपाळ महाराज मुळझरेकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे आयोजित ग्राम्हीता सप्ताह दरम्यान बोलत होते. यावेळी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल देशमवाड, ग्रामगीता तत्वज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव फुलके महाराज, सचिव एल.पी.कोस्केवार, उपाध्यक्ष विठ्ठल कोस्केवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीतेवर प्रबोधन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गोपाळ महाराज म्हणाले कि, जन सेवा हीच ईश्वरसेवा आहे.. मानवातची देव पाहावा.. असे म्हणणारे दोनची संत एक गाडगे बाबा .. तर दुसरे तुकडोजी बाबा... होत. त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत विविध पद्धतीने जनमानसाला समजण्यासारखे लिहिले आहे. त्यात महत्वाचे म्हणजे गीता बोधली अर्जुनाला ..ग्राम गीता हि सर्व ग्रामाला...राहू नये कोणी मागासला .. म्हणुनी बोलला देव माझा ... अरे उठा उठा अधिकायानो...श्रीमंतानो, पंडीतानो, सुशिक्षीतानो , साधुजनानो, हक आली क्रांतीची गाव गावाशी जगवा भेद भाव हा समूळ मितवा...उजाळा ग्रांमोनतीचा दिवा.. तुकड्या म्हणे, हि ओवी सर्वात जास्त प्रचलित झाली. यासह अनेक ग्रामगीतेतील ओव्यांचे पठण करून उपस्थितांना ग्रामगीतेचे महत्व पटउन दिले. त्याच बरोबर अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी परंपरा, व्यसनमुक्ती अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आंदेगाव, टेंभी, सवना ज. पवना, सरसम, पार्डी आदींसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. सायंकाळच्या कार्यक्रमानंतर दुसया दिवशी सकाळी सामुदायिक ध्यान, ग्रामसफाई त्यानंतर रामधून असे सर्व कार्यक्रम पार पाडून पुढील गावातील प्रबोधन कार्यासाठी ग्रामसप्ताह दिंडी मार्गस्त झाली. दिंडीसोबत सुभाषराव वानखेडे, संतोष गुंडे, गणेश वानोळे, ज्ञानेश्वर चव्हाण, विश्वबंधु ग्रामगीता प्रचारक, साहेबराव पाटील पोटेकर, परमेश्वर अक्कलवाड टेम्भीकर यांची उपस्थिती होती. सदर ग्रामगीता दिंडीचे आगमन हिमायतनगर शहारात होताच येथील प्रतिष्ठित व्यापारी रवींद्र दमकोंडवार यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी नांदेड न्युज लाइव्ह्चे संपादक अनिल मादसवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, पत्रकार कानबा पोपलवार, प्रकाश जैन, दत्ता शिराने, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, परमेश्वर शिंदे, छायाचित्रकार धम्मपाल मुनेश्वर, माधव यमजलवाड, ज्ञानेश्वर गोडसेलवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी