NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

शुक्रवार, 28 फ़रवरी 2014

बनावट नोटा,

रिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यात दुसऱ्यांदा पाठविल्या बनावट नोटा, 
नांदेड पोलिसांना कार्यवाही करण्याच्या सूचनानांदेड(अनिल मादसवार)भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एकूण 28 नोटा बनावट असल्याचे पत्र नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. या नोटा एकूण 13 हजार सहाशे रुपयांच्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी सुध्दा आठ हजार रुपये किंमतीच्या नोटा बनावट असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने पोलीस अधीक्षकांना दिली होती.

नांदेड जिल्हा पोलीस दलाला पाठविलेल्या पत्रात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे प्रबंधक सी.एम.राव यांनी म्हटले आहे की, दि.7 जानेवारी 2014 रोजी नांदेडच्या स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखेत जमा झालेल्या पाचशे रुपये दराच्या 27 नोटा व शंभर रुपये दराची एक नोट असे एकूण 13 हजार सहाशे रुपये हे भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे परिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या नोटा बनावट असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. 

भारतीय दंडसंहितेच्या कलम 489 (अ) ते (ई) पर्यंत या बनावट नोटा चलनात आणणे हा अपराध आहे. या नोटा बनावट आहेत, परंतु या नोटांना न्यायालयात गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी पुरावा म्हणून वापरायचे असेल तर या नोटा बॅंक नोट प्रेसचे महाप्रबंधक जे देवास मध्यप्रदेशमध्ये आहेत तसेच महाप्रबंधक करेन्सी नोटप्रेस नाशिक महाराष्ट्र येथे पाठवावे. तेथून अभिमत आल्यानंतर ते भारतीय दंडसंहितेच्या 292 नुसार न्यायालयात प्रस्तुत करावे. न्यायालयाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या न्यायालयीन निर्णयाची प्रत रिझर्व्ह बॅंकेला पाठवावी, असेही आपल्या पत्रात रिझर्व्ह बेँकेने म्हटले आहे.

या एकूण 28 नोटांच्या नंबरासह या नोटा रिझर्व्ह बॅंकेने पुढील कार्यवाहीसाठी नांदेड पोलीस दलाला पाठविल्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी अशाच सात हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या 14 नोटा रिझर्व्ह बॅंकेने नांदेड जिल्हा पोलिसांकडे पाठविल्या होत्या, परंतु त्याच्यावर काहीच कारवाई अद्याप झाली नाही. दोन महिन्यात 22 हजार रुपये बनावट नोटा ज्या रिझर्व्ह बॅंकेने परिक्षण करुन पाठविल्या आहेत त्या मिळाल्या असताना अद्याप तरी काही कारवाई झाली नाही. यासंदर्भाने कोणीच पेालीस अधिकारी काही सांगण्यास तयार नाहीत. नुतन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसाने पिकांची वाट लावली

जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून पिकांची वाट लावली

नांदेड(प्रतिनिधी)जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हैदोस घातला असून, रब्बी हंगाम पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. जिल्ह्यात कालपासून जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सरासरी 19.16 मि.मी.पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात वादळी वाऱ्यासह, गारपिटीसह जोरदार पाऊस सुरु आहे. काल सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगाम पूर्णतः हातातून गेल्याचे चिन्ह दिसत आहे. शेतावर उभा असलेला गहू आडवा झाला तर तूर, हरभरा या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. उन्हाळी ज्वारी पूर्णतः शेतावर आडवी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सुसाट वेगातील वाऱ्याने पपई, केळी या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. तर जागोजागी झाडे, विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विज पुरवठाही खंडीत झाला आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरावर असलेले पत्रे उडून गेली असून, शहरातही या पावसाने हैदोस घातला आहे. काल रात्री तब्बल तीन तास जोरदार पाऊस झाल्याने आज सकाळी सखल भागातील नाल्या, ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे घाणीचे पाणी रस्त्यावर साचले. पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली असून ती पुढीलप्रमाणे आहे. नांदेड-15.88, मुदखेड-26, अर्धापूर-24.66, भोकर-28, उमरी-22.33, उमरी-22.33, लोहा-15.17, कंधार-17, किनवट-22.72, हदगाव-29.40, मुखेड-15.14, धर्माबाद-20, हिमायतनगर-17, बिलोली-23.20, देगलूर-4.33 असा एकूण 306.64 मि.मी. व सरासरी 19.16 अशी नोंद झाली आहे

जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)भोळ्या स्वभावाची पत्नी आहे म्हणून लग्नानंतर दोन वर्षातच तिचा खून करणाऱ्या नवऱ्यास येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश एस.बी.म्हस्के यांनी जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

डोंगरगाव ता.किनवट येथील परमेश्वर नारायण डाके (25) याचे लग्न पेंदा ता.किनवट येथील उषाबाई उर्फ लक्ष्मीबाई हिच्यासोबत सन 2009 मध्ये झाले होते. लग्नानंतर तिचा नवरा परमेश्वर आणि नणंदा संगीता नारायण डाके (27) व सौ.अनिता उर्फ कृष्णा किशन भुरके (22) या तिघांनी तिला नेहमी छळले. तु भोळ्या स्वभावाची आहेस, तुला चांगले बोलता येत नाही, तू मला पसंद नाहीस असे म्हणून तिला हिणवत असत व मारहाण करत असत. 2010 मध्ये ती आखाडीच्या सणासाठी माहेरी आली होती. तिला 2011 च्या होळीपूर्वी घेवून जाण्यासाठी सासरची मंडळी आली. त्यावेळी बाप नसलेल्या उषाबाईची आई धोंडाबाई केशव भरकाडे यांनी पेंदा येथील आपल्या नातलगाच्या समक्ष मुलीला त्रास देणार नाही या अटीवर तिला नांदावयास पाठविले. 

25 जुलै 2011 रोजी धोंडाबाईला दूरध्वनीवरुन उषाबाई मेल्याची खबर सांगण्यात आली. ती आपल्या नातलगांसह डोंगरगाव येथे आली. तेंव्हा उताण्या अवस्थेत उषाबाई बाजेवर पडलेली होती आणि तिच्या नाकातून, तोंडातून व कानातून रक्त बाहेर आले होते. यावरुन उषाबाईच्या मृत्यूबाबत धोंडाबाईला संशय आला आणि तिने उषाचा नवरा परमेश्वर डाकेसह नणंदा संगीता डाके व अनिता भुरके यांच्याविरुध्द किनवट पोलीस ठाण्यात तक्रार दिली की तिघांनी शेल्याने (मोठ्या दस्तीने) गळा आवळून उषाबाईचा खून केला आहे. त्यावरुन किनवट पोलिसांनी तिघांविरुध्द भादंविच्या कलम 302,498, 34 नुसार गुन्हा दाखल केला आणि तिघांना 1 ऑगस्ट 2011 अटक केली.

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोन्ही महिलांना जामीन मिळाला होता. परमेश्वर डाके अटकेपासून तुरुंगातच होता. न्यायालयात उषाबाईचा मृत्यू प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश म्हस्के यांनी परमेश्वर डाकेला आपली पत्नी उषाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड ठोठावला. या प्रकरणातील महिलांची सुटका करण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ऍड.सौ.अल्का कुर्तडीकर यांनी मांडली. तर आरोपीच्या वतीने ऍड.आर.जी.परळकर यांनी काम पाहिले.

अंगणवाडीच्या मुलाखती अचानक रद्द

अध्यक्ष - सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे अंगणवाडीच्या मुलाखती अचानक रद्द, अर्थकारणासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून नवी शक्कल../ 


हिमायतनगर(अनिल मादसवार)एकात्मिक बाल विकास योजनांच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, मिनी अंगणवाडीच्या एकूण २३ जगांच्या रिक्त पदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या संदर्भात दि.२८ रोजी पंचायत समिती कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेल्या १०० हून अधिक महिला चिमुकल्या सह पतिराजांना घेवून तहसील आवारात आल्या होत्या. परंतु अचानक मुलाखती रद्द करण्यात आल्याने उलट -सुलट चर्चेला उधान आले आहे. या प्रकारामुळे आर्थिक उलाढालीतून खर्या व गुणवत्ता पूर्ण लाभार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता बळावली आहे. 

तालुक्यातील अंगणवाडी सेविकेच्या ०३ जागेसाठी १६, मदतनीसांच्या १३ जागेसाठी तब्बल ६८ महिलांनी प्रस्ताव दाखल केले होते. मिनी अंगणवाडीच्या ०७ जागेसाठी १७ महिला असे एकूण २३ जागेसाठी १०० हून अधिक प्रस्ताव दाखल झाले होते. अर्ज दाखल करताना अगदी शुल्लक कारणावरून लाभार्थ्यांना छालाण्याची संधी येथील बालविकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी यांनी सोडली नाही. त्यामुळे " भिक नको पण कुत्रे आवर "  असे म्हणायची वेळ अनेक इच्छुक उमेदवारावर आली. अनंत अडचणीचा सामना करत प्रस्ताव दाखल केले, अर्जाच्या छाननीत आपली पोळी भाजण्याच्या उद्देशाने निवड समिती व अधिकार्यानि संगनमताने बहुतांशी महिलांचे अर्ज रद्द केल्याची ओरड होत असून, तश्या काही तक्रारी वरिष्ठ स्थरापार्यंत पोचल्या आहेत. यात आपल्या मर्जीतील उमेदवाराची निवड करण्याचा खटाटोप संबंधितानी केला असून, मुलाखतीचे ऑर्डर हाती देण्यासाठी सुद्धा भाव ठरविण्यात आल्याचे एका लाभार्थ्याने खाजगीत बोलताना सांगितले. हा सर्व प्रकार निवड समितीच्या संगनमताने केलाजात असल्याने अनेकांना विद्यमान अध्यक्षांची मनधरणी करावी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व रिक्त जागेवरील महिलांची निवड भरती प्रक्रियेत अनेकांवर अन्याय होण्याचे चित्र दिसून येत आहे. 

आज दि. २८ शुक्रवारी रिक्त पदाच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आपल्याच्या नातेवाईकांची तथा राजकीय क्षेत्रातील हितसंबंधातील महिलांची वर्णी लावण्यासाठी विद्यमान निवड समितीच्या पदाधिकारी व अधिकार्यांना जाणीवपूर्वक मुलाखती रद्द करून आपला उद्देश सध्या करण्याचा खटाटोप सुरु केल्याचे मुलाखतीस येउन परतलेल्या काहींनी नांदेड न्युज  लाइव्हशि बोलताना सांगितले. याबाबत माहिती घेतली असता निवड समितीचे अध्यक्ष - सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे अंगणवाडीच्या मुलाखती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

राजकीय वरद हस्त प्राप्त काही दलालांनी निवड समितीच्या पदाधिकार्यांना हाताशी धरून अर्थकारणाला पुरेसा अवधी मिळावा म्हणून आजच्या मुलाखती रद्द केल्या. तसेच गुणवत्तेचे सर्व नियमधाब्यावर ठेवून रिक्त पदे भरण्याची तयारी सुरु केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी बोलून दाखविल्या आहेत. यामुळे खर्या व गरजू महिला शैक्षणिक गुणवत्ता असताना वंचित राहणार असून, या मनमानी निवड प्रक्रियेत वरिष्ठांनी लक्ष देवून गुणवत्ता पूर्ण भरती प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी होत आहे. 

याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी श्री भिसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दूरध्वनी बंद करून ठेवला.  

कार्यकर्त्यांची नाराजी आ. जवळगांवकरांना भोवणार...

निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी आ. जवळगांवकरांना भोवणार...
हिमायतनगरात कॉंग्रेस आणि आप एकाच घरात...।हिमायतनगर(अनिल मादसवार)लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी चालु असुन, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी मध्येच सरळ लढत होणार असली तरी हिंगोलीची जागा कोणाची यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेस मध्ये खल सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवर टोकाची चर्चा सुरु असतांना विधानसभेचीही चर्चा जोरकसपने होतांना दिसुन येत आहे. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर असतांना कॉंग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांचा गट तयार झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यंाचीकदर करण्यात आ. जवळगांवकर अयशस्वी झाले असल्याने आगामी विधानसभेचा निवडणुकीत आ.जवळगांवकर कॉंग्रेसचे उमेदवार राहीलेच तर त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी भोवणार असल्याचे जाणकारातुन बोलले जात आहे.

हदगांव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघ तसा शिवसेनेचा बालेकील्ला राहीला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक पर्वामुळे या तटबंदी बालेकील्याला कॉंग्रेसने सुरुंग लावला. यामध्ये आ.माधवराव पाटील जवळगांवकरांचा आमदार म्हणुन उदय झाला. जवळगांवकर अशोक पर्वाने विक्रमादीत्य ठरले खरे, परंतु सत्येच्या सारीपाठात खरे कोण आणि खोटे कार्यकर्ते कोण..। जवळचा आधिक कोण याची पारख आमदारांना राहीली नसल्याने भवीष्यात त्यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षातील नाराजांचा मोठा गट तयार झाला आहे. आमदार जवळगांवकरांनी केलेली विकास कामे ही त्यांच्याच मागेपुढे पळणा-या चांडाळ - चौकडीकडुन केली जात असल्याने विकास कामांचा दर्जा पुरता ढासळला आहे. त्यामुळे येणारा काळ आ.जवळगांवकरांसाठी पश्‍चातापाचा असेल असे सुजाननागरीकांतुन बोलल्या जात आहे. 

हिमायतनगरात कॉंग्रेस आणि आप एकाच घरात           

केजरीवालांचा आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाचे राजकीय सख्य सर्वश्रुत असतांना हिमायतनगरात मात्र वेगळी प्रचीती येतआहे. एकाच घरातील दोन सख्खे भाऊ मोठे भाऊ कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत तर धाकटे आम आदमी पक्षाचे दिल्लीत परस्पर विरोधकअसले तरी, येथे मात्र आपन दोघे भाऊ भाऊ सार काही मिळुन खाऊ असेच चित्र राठोड बंधुचे दिसुन येत आहे. 

दरेसरसम येथील राठोड बंधु हे पुर्वीपासुनच कॉंग्रेसशी व आ. जवळगांवकरांशी एकनीष्ठ म्हणुन ओळखले जातात. यातील जेष्ठ बंधु सुभाष आला राठोड हे कै.आ.निवृत्ती पाटील जवळगांवकर यांच्यावर नित्तांंत श्रध्दा असलेले व त्यांच्या नंतर कै.पंजाबराव पाटील यांच्या कर्तत्वाने प्रभावीत होऊन कार्य करणारे निष्ठावान म्हणुन ओळखले जातात. त्यांच्या नंतर विदयमान आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांचे ते खांदे समर्थक, पडत्या काळात माधवराव पाटलांच्या मागे समर्थपने उभे राहुन साथ देणारे सुभाष राठोड यांना जवळगांवकरांनी आपल्या आमदारकीच्या काळात मागील काळातील कोनतीही उणीव न ठेवता भरभरुन दिले. आज ते कॉंग्रेस पक्षाचे सरसम जि.प.गटातील विदयमान जि.प.सदस्य आहेत. कोट्यावधी रुपयांच्या विकासाची कामे त्यांच्या हातुन केली जात असुन, तांड्यातील एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या सुभाष राठोड यांना जवळगांवकरांमुशळे संपुर्ण जिल्हा ओळखत आहे. 

तर धाकटे बंधु दिलीप आला राटोड हे सिप्रा सामाजीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचीव...वास्तवीक पाहता त्यांचा आणि राजकीय पक्षाचा चार वर्ष कोनताही संबंध नसतो. हिमायतनगर तालुका आणि परिसरात त्यांच्या संस्थेचे कार्य उल्लेखणीय आहे. चार वर्ष कोनत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवणारे दिलीप राठोड मात्र निवणुकीच्या काळात सेवेची संधी न सोडता कोणत्या तरी पक्षाशी जुळउन घेत कधी कॉंग्रेस, कधी बसपा, तर इतर पक्षाच्या प्रचाराला लागतात हे त्यांचे कसबच होय. आता मात्र दिलीप आला राठोड हे आम अदमी पक्षात प्रवेश करुन हिंगोली लोकसभा मतदार संघातुन आपच्या तिकीटावरुन निवडणुक लडवीण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेला भ्रष्टाचार पुसुन काढण्यासाठी हिमायतनगर शहरात झाडु रँली काढुन भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था झाडुने साफ करण्याचा प्रयत्न केला.परंतु राठोड बंधुचे हे देखावे केवळ नाटक असल्याच्या प्रतीक्रीया इतर पक्षातील अनेक पदाधीका-यांनी व्यक्त केल्या आहेत. कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बेंबीच्या देठापासुन दिल्लीत आरडणा-या आपच्या कार्यकर्त्यांचा मात्र येथे होत असलेल्या विकास कामाच्या बाबतीत गळा बसल्याचे दिसुन येत आहे. येथे काम करणारेही आपलेच आणि सांभाळणारे आप आपलेच...असल्याने राठोड बंधुचे हे आपण दोघे भाऊ भाऊ सार काही मिळुन खाऊ हे गणीत जुळलेल्या दिसत असल्याच्या प्रतीक्रीया राजकीय विश्‍लेषकाकडुन एैकवीत येत आहेत.  

पात्र उमेदवारास डावलले...

आपत्याच्या कारण पुढे करून पात्र उमेदवारास डावलले... 
मुलाखतिची संधी देण्याची मागणी

हिमायतनगर(वार्ताहर)सन २००१ पूर्वीचे आपत्य असताना जाणीवपूर्वक तिसरे आपत्य असल्याचा बहाणा करून इच्छुक उमेदवारास मुलाखातीपासून दूर ठेवल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याबाबतची तक्रार सदर महिलेने जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करून मुलाखतीसाठी निवड करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा ज.येथील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी शांताबाई कानबा शेळके या महिलेने बालविकास प्रकल्प अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे रीतशीर प्रस्ताव दाखल केला होता. ऐन मुलाखतीच्या तोंडावर तीन आपत्य असल्याचे कारण समोर करून अर्ज रद्द केला आहे. खरे पाहता शासन निर्णयाप्रमाणे सन २००१ पूर्वीचे आपत्य असलेल्यांना तीन अपत्याचा नियम लागू होत नाही. तरी देखील निवड समिती व प्रकल्प अधिकार्याने मागासवर्गीय असल्याच्या कारणाने जाणीवपूर्वक या पदापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने माझा अर्ज रद्द केला आहे. तसेच मदतनीस या पदासाठी मी सर्व नियम व गुणवत्तेत परिपूर्ण आहे. केवळ स्वार्थापोटी अन्य व्यक्तीची निवड करण्याच्या हेतूने मला डावलून आपला डाव साध्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

येथील एका मदतनीस पदाच्या जागेसाठी चार अर्ज आलेले असून, त्यापैकी एकीला २००१ नंतरचे आपत्य असल्याने डावलण्यात आले. तर मला २००१ पूर्वीचे अपत्य असताना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला आहे. मला असलेल्या तीन अपत्याची प्रत्यक्ष चौकशी करून माझा अर्ज मंजूर करून मदतनीस या पदासाठीच्या मुलाखतीची संधी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.

गुरुवार, 27 फ़रवरी 2014

श्रीचे दर्शन

महाशीवरात्रीच्या पर्वावर लाखो भावीकांनी घेतले श्रीचे दर्शन

हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन संबध जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.27 गुरुवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- आंध्रप्रदेशातील भक्तांनी घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. शहरात सवर्त्र भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांची मध्यरात्री 3 वाजल्या पासुनच दर्शनासाठी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने विषेश सुवीधा व चहा- फराळ पाण्याची सोय केली होती.

या नीमीत्ताने मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह बैलगाडी, जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढेच्या - लोंढे दाखल झाले होते. शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले असुन, महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु - पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन आहेे.महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री चे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार मंडळी सांगतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्रीचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.उफाडे महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. त्यानंतर मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्षांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न होणार आहे.

श्रीच्या मुर्तीला अलंकार विभुषीत केल्यानंतर दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त ठेवन्यात येतो. यावेळी अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर ,उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव राजेश्वर चिंतावार,सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर, गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत चढविण्यात येतात.हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ,मराठवाडा, कर्नाटक , आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक परमजितिसंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र सोनवणे यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

आ.जवळगांवकर यांनी घेतले श्रीचे दर्शन घेतले 

शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी श्रीचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या हस्ते शहर व परीसराच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे भूमिपूजन केल्या गेले. यावेळी मंदिरात उपस्थित भावीक-भक्त व नागरीकांना संबोधीत करतांना ते म्हणले की जनतेच्या आर्शीवादानेच विकास कामाचा धडका सुरु असुन, अश्याच प्रकारे जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील्यास हिमायतनगर तालुक्यातील तमाम देवी - देवतांच्या मंदिराबरोबर गाव- वाडी- तांडे- शहराचा कायापालट करण्याठी सदैव प्रयत्नशील राहील. तसेच गुत्तेदारानेही विकास कामात पारदर्शकता ठेऊनच कमे करावी अन्यथा त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगून कामाचा दर्जा वाढवीण्याच्या सुचना दिल्या.

बुधवार, 26 फ़रवरी 2014

डी.पी.ला आग ..

महावितरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे डी.पी.ला आग ..
व्यापारी व बाजारकरुंची धावपळ

हिमायतनगर(अनिल मादसवार)महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला ऐन आठवडी बाजारात असलेल्या महावितरणच्या डी.पी.ला अचानक आग लागल्याने व्यापारी व बाजारकरुंची एकच धावपळ उडाली होती. तर परिसरातील व्यापार्यांनी डी.पी.फुटेल या भीतीपोटी आपली प्रतिष्ठाने बंद केली होती. हि घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असून, यास महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरात महावितरण कंपनीच्या अभियंत्यासह लाईनमन कर्मचार्यांनी नागरिकांच्या सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या तारा तुटून पडणे, डी.पी.ला आग लागणे ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. सध्या शहराचे आराध्य दैवात श्री परमेश्वराच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून, दि.२६ दुसर्या दिवशी आठवडी बाजार व यात्रेकरू हजारोच्या संखेत आले होते. उन उतरल्यानंतर सायंकाळी ४ नंतर बाजारात एकच गर्दी झाली होती. यावेळी अचानक परमेश्वर चौकातील मुख्य डी.पी. ने पेट घेतला. याकडे कोणाचेही लक्ष जाण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केल्याने डी.पी.ची आग वाढून संपूर्ण डी.पी. आगीच्या लोटात सामावला होता.

हा प्रकार व्यापारी व बाजार करूंच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरु झाली. जीवाला धोका होवू नये म्हणून सैरा - वैरा धावपळ करताना अनेकजण तोंडघशी पडल्याने किरकोळ दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. तर व्यापार्यांनी आपली शेड वाचविण्याच्या गडबडीत भाजीपाले व अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. तर काही हाथगाडे वाल्यांचे अंगूर, चिकू , मासले पदार्थ आदी धुळीस मिळाले होते. हा आगीचा खेळ जवळपास तासभर चालू होता, काहींनी दूरध्वनीवरून महावितरण कंपनीस कळविल्याने विद्दुत पुरवठा खंडित करण्यात येवून आगीवर नियंत्रण मिळविले. दैव बलवात्तराने या पळा- पाळीच्या घटनेत किरकोळ वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अश्या घटना होत असताना सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व लाईनमन कर्मचार्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आजची हि घटना घडली असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित नागरीकातून समोर आल्या आहेत. पुढील काळात या घटना टाळण्यासाठी जीर्ण तर बदलून, अधिकचा भार कमी करावा तसेच शहरातील नागरिकांना वसुली प्रमाणे सुविधा द्याव्यात अशी रास्त मागणी अनेकांनी व्यक्त केली आहे. 

महाशिवरात्री रोजी श्रीचा अलंकार सोहळा

वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात होणार मध्यरात्री श्रीचा अलंकार सोहळा

                                         
हिमायतनगर(अनिल मादसवार)  येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन जिल्ह्यासह मराठवाडा- विदर्भ - आंध्रप्रदेश परीसरात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.27 गुरुवारच्या मद्यरात्री वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात श्रीच्या मुर्तीचा महाअभीषेक पुजा अर्चनाने येथील विदयामान तहिसलदार यांच्या उपस्थीतीत अलंकार सोहळा संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्याप्रसंगी पंचक्रोशीतील भावीकांनी उपस्थीत राहण्याचे अव्हाण मंदिर कमेटीने केले आहे. 

महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन भावीक भक्तांची सकाळी 3 वाजल्या पासुनच दर्शनासाठी मंदिर प्रांगणात गर्दी होणार असल्याने मंदिर समीतीने विषेश सुवीधा व बंदोबस्तासह चहा- फराळ पाण्याची सोय केली आहे. या नीमीत्ताने मंदिराच्या कळसावर, मुख्य कमानीवर तसेच कडे-कपा-याच्या भींतीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली आहे. सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखों भक्त श्रीचे दशर्न घेणार असुन, या नीमीत्ताने शिवरात्रीच्या पुर्वसंध्येला शहरात वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह बैलगाडी, जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांची मंदियाळी दाखल झाली असुन, शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले होते. महाशीवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु -पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन येत आहेे. महाशीवरात्रीच्या दिनी दिवसातुन 3 वेळा श्री चे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते असे जुने जानकार मंडळी सांगतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर उपस्थीत राहणार असुन, श्रीचे दर्शन घेणार आहेत. 

दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.उफाडे महाराज शिर्डी यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव-पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न होईल. त्यानंतर मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोष व मंगलमय सोहळ्यात अभीषेक व महापुजा केे ली जाणार आहे. त्यानंतर लगेच श्री परमेश्वराच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात येणार आहेत. अलंकार विभुषीत श्रीच्या देखण्या मुर्तीचे दर्शन भक्तांना दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त घेता येणार आहे. या सगुनरुपातील परमेश्वराचे दर्शन घेऊन सर्वांनी पुण्य प्राप्त करावे असे आवाहन मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर ,उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव राजेश्वर चिंतावार,सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर, गावकरी मंडळीनि केले आहे.

फोडाफोडीवर भर

निवडणुकीच्या तोंडावर आमदार जवळगावकर यांचा फोडाफोडीवर भर
एकीकडे भूमिपूजनाचे नारळ तर दुसरीकडे इतर पक्षाचे पदाधिकारी

नांदेड(प्रतिनिधी)तोंडावर येवून ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी एकीकडे विकास कामाच्या भूमिपूजनाचा सपाटा लावत उद्घाटनाचे नारळ फोडण्यावर भर दिला. तर दुसरीकडे इतर पक्षातील स्थानिक पदाधिकारी फोडण्यावर जोर दिला असून, आगामी निवडणुकात काँग्रेस पक्षाचे मताधिक्य वाढविण्याचे जोरदार प्रयत्न चालविला आहे.

हिमायतनगर शहराच्या विकासासाठी आ. जवळगावकर यांनी कोटयावधीचा निधिखेचुन आणत तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी, भले मोठे फुगवलेले अंदाजपत्रकीय आकडे भल्या भल्यांचा अंदाज चुकवत असल्याचे दिसून येते आहे. विकास कामासाठी मिळणारा निधी तालुक्याच्या विकासासाठी आहे, कि अधिकारी आणि पदाधिकारी - गुत्तेदारांच्या विकासासाठी असा प्रश्न होत असलेल्या कामाच्या दर्जावरून दिसून येत आहे. गुत्तेदारीचे आमिष दाखवीत इतर पक्षातील पदाधिकार्यांना स्वपक्षात ओढण्याचा सपाटा जवळगावकर यांनी लावल्याने निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे भूमिपूजनाचा नारळ तर दुसरीकडे इतर पक्षातील कार्यकर्ते फोडण्यावर भर दिला असल्याची चविष्ठ चर्चा चावदारपणे चर्चिल्या जात आहे.

जाणारे नेते ना सुरळक ना धुरजड - राष्ट्रवादी

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांची काय किंमत होते आणि कितपत त्यांना दुसर्या पक्षात सन्मान दिल्या जाइल या विषयी आताच भाष्य करणे उचित होणार नाही तर शिंदेच्या पक्षांतरामुळे काँग्रेस आमचा मित्र पक्ष असल्यामुळे ते नक्कीच आगामी निवडणुकीत आम्हाला सहकार्य करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नागोराव पतंगे यांनी व्यक्त केला. आणि ना सुरळक ना धुरजड अश्या कार्यकर्त्यामुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

महाशिवरात्री विशेष लेख

सामाजिक - धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिर 
शंकररुपी अवतारातील परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकच....


हिमायतनगर(अनिल मादसवार) वाढोणा नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री ची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणुन विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त झाला असुन, या मंदिराशी तसेच जनतेशी भावनीक नाळ जुळालेली आहे. म्हणुन महाशीवरात्रीच्या दिवशी श्रीच्या दशर्नासाठी लाखों भवीकांची दर्शनासाठी मंदियाळी होते. 

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ( वाढोणा ) नगरीतील श्री परमेश्वर मुर्ती बाबत एक आख्याईका सांगीतली जाते की, येथील शेतकरी श्री गणपत माळी शेतात नांगर हाकत असतांना नांगराला एक भली मोठी शिळा लागली. येवढया मोठा काळ्या पाशानाचा दगड कशाचा आहे, म्हणुन जमीन खोदुन शिळा बाहेर काढली असता, श्री परमेश्वराची अत्यंत सुरेख आणि रेखीव अशी मुर्ती आढळुन आली. हि वार्ता वाढोणा गाव व परिसरात वार्‍यासारखी पसरली. गाव व ग्रामीण परीसरातील नागरीक परमेश्वराची देखनी मुर्ती पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी करु लागले. त्यावेळी काही प्रतीष्ठीत व्यक्तींनी ज्या ठिकाणी मुर्ती नांगराला लागली त्याच ठिकाणी विधीवत प्रतीष्ठापणा करुन पुजा - अर्चना केली. 

त्यावेळी पुरण पोळीच्या पंगती केल्या, तो काळ अंदाजे 700 वर्षाहुन अधिकचा असावा, त्या काळी येथे मोगल राजवट होती. मुर्तीची प्रसीध्दी दुर- दुरवर झाल्याने गावातील प्रतीष्ठीत नागरीक व भावीक भक्तांच्या मदतीने विडुळ उमरखेड येथील तात्या पौळकर यांनी सन 1309 साली परमेश्वराचे मंदिर मोठ- मोठ्या दगडी शिळाने उभारले. मंदिराच्या अंदाजे 10 फुट खोल  भुयारात शंकररुपी अवतारातील चतुर्भुज श्री परमेश्वराची मुर्ती उभी केली. मुर्तीची उंची 5 फुट, रुंदी 3 फुट 1 इंच आहे. वरिल उजव्या हातात जायफळ- त्रीशुळ, डाव्या हातात फना काढलेला शेषनाग व पार्थ धारण केलेला आहे. खालील उजव्या हातात रुद्राक्षाची जपमाळ, डाव्या हातात शंख आहे. मस्तकावर कोरीव मुकुट असुन, मध्यभागी दोन सुर्य व शीरोभागी शिवलींगाची शिवपींड आहे. श्रीच्या पायाजवळील एक बाजुस गरुड तर दुस-या बाजुस नंदि उभा आहे. मुर्तीच्या आजुबाजुला अनेक प्रभावशाली देवी- देवतांच्या मुर्तीचे अवतार आहेत. मुर्तीला पहाणा-या भक्तांना दहा अवतार दिसत असुन, कच्छ, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौध्द व घोडयावर स्वार असलेला कळंकी अवताराचा समावेश आहे. अशी ही मुर्ती हरीहर (शंकर आणि विष्णु रुपात) दिसत असल्यामुळे देवाच्या मुर्तीला श्री परमेश्वर असे नाव दिल्या गेले जाते. मंदिराच्या गाभार्‍याचे बांधकाम पुर्वीच्या काळात अत्यंत कलाकुसरीने करण्यात आले असुन, त्यामद्ये मोठ-मोठ्या रेखीव शिळांचा उपयोग केल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसत आहे.गाभार्‍याच्या पुर्व आणि पश्‍चीम दिशेला झरोके असुन सुर्योदयाच्या वेळी सुर्याची पहीली किरणे श्रीच्या मुर्तीवर पडतात. 

आणि सुर्य मावळतीच्या वेळी पश्‍चीम बाजुच्या झरोक्यातुन सुर्य किरणे मु्र्तीच्या पाठमोर्‍या भागावर पडतात. हे आजच्या विज्ञान युगातील अभियंत्याना सुध्दा आश्‍चर्य चकीत करणारे बांधकाम आहे. याच मंदिरात शिवापतीचे मंदिर असुन,महादेवाची भली मोठी पिंड ,निद्रावस्थेतील शेषनारायण (विष्णुची)मुर्ती, बाजुस लक्ष्मीनारायण, गणेशमुर्ती, चिंतामणी नंदि आहे. तसेच मंदिरात अन्य देवी -देवतांच्या पुरातन काळातील रेखीव मुर्त्या आहेत. मंदिराच्या आवारात काळेजी महाराजांची समाधी, नंदादीप- दिपमाळी, चिरेबंधी बारव (विहीर)असुन पुर्वी त्यामद्ये उतरण्यासाठी पायर्‍याही होत्या.याच बारवच्या शेजारी अंदाजे साढेतिनशे वर्षापुर्वीचे उंबराचे झाड आहे. मंदिराचा संपुर्ण भाग अंदाजे 2 एकर येवढा असुन आवाराच्या चारी बाजुने सुरक्षा भिती उभारलेल्या असुन, पुर्व आणि उत्तरेस भव्य प्रवेश व्दार आहे.जुन्या काळात गावातील प्रतीष्ठीत लोकांची समीती नेमुन मंदिराचा कार्यभार पाहील्या जात होता.त्या काळी गावातील माली पाटील, पोलीस पाटील आणि काही प्रतीष्ठीत लोक समीतीत सदस्य म्हणुन सहभागी होते. 

ई.स.1962 पासुन ट्रस्ट कमेटी निवडण्यात आली व सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड येथील कार्यालयात हिमायतनगर येथील जागृत देवस्थान परमेश्वर मंदिराची नोंद करण्यात आलीप्राचीण काळापासुन महाशिवरात्रीच्या दिवशी श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी विदर्भ,मराठवाडा आंद्रप्रदेश, कर्नाटकासह दुर-दुर वरुन भावीक लाखोच्या संख्येने हाजेरी लावतात. सकाळी 3 वाजल्या पासुन श्रीच्या दर्शनासाठी भावीकांची रिघ लागुन असते. महाशिवरात्रीला श्रीचा विधीवत अभिषेक व आलंकार सोहळा केला जाउन सोन्या चांदीचे भव्य दागीने मुर्तीस चढवील्या जातात. पाच दिवस दहीहंडी काल्या पर्यंन्त ही दागीने श्रीच्या मुर्तीवर असतात. तेंव्हा हि अलंकारमय परमेश्वराची मुर्ती अत्यंत देखणी व सुंदर दिसत असल्याने भक्तांचे मन प्रसन्न होउन डोळ्याचे पारणे फिटते. ह्या मंदिराला महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी आ.जवळगांवकरांच्या प्रयत्नाने तीर्थ क्षेत्राचा दर्जा दिला आहे. सध्य स्थितीत मंदिराचा कारभार श्री परमेश्वर ट्रस्टकमेटीचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर ,उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव राजेश्वर चिंतावार,सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर यांच्या माध्यमातुन सर्वांगीन विकासाची घौडदौड भावीक -भक्तांच्या मदतीने सुरु आहे.
       
सध्याचे हिमायतनगर प्रा़चीण कळातील वाढवणे हे पैनगंगा नदिपासुन दिड मैल तर मातापुर(माहुर) या शक्तीपीठापासुन 30 मैलावर वसलेले आहे. भारतात 12 जेातीर्लींगे असुन, त्यापैकी एकट्या महराष्ट्रात पाच त्यापैकी तिन जोतीर्लींगे मराठवाडयाच्या मातीत असुन, महाराष्ट्रातच नव्हे संबध देशात शंकर महादेवाची अनेक मंदिरे - देवस्थाने आहेत. परंतु शंकराच्या अलंकृत विभुशीत उभी चतुर्भुज मुर्ती वाढोणे नगरीशीवाय भारतात कुठेही पहावयास मिळत नाही असे, पान - 03 वर आजवर सदर मंदिरास भेट दिलेल्या विवीध प्रसिध्द साधु- महंतांचे म्हणने आहे. प्रचीण कालीन वरणावती, मध्यंतराचे वाढोणे आणि सध्याचे निजाम राजवटीतुन जन्मास आलेले हिमायतनगर होय. 

माहुरच्या जगदंबा मातेचे एक परम भक्त कवी विष्णुदास यांनी परमेश्वराची मुर्ती पाहुन तीथल्या तीथे रचलेली आरती भावीक भक्तांत लोकप्रीय ठरली.

// श्री परमेश्वराची आरती // 

जयशिवशंकर,सर्वेशा / परमेश्वर,हरिहरवेषा // धृ //
कर्पुरगौरा,शुभवंदना / श्रीघननीळा, मधुसुदना सदाशिव, शंभोत्रिनयना/
केेशवाच्युता, अहीशयना अखंड, मी शरण मदनदहना /
दाखवी चरण गरुड वाहना दयाळा हिमनगजामाता /
कृपा कर श्रीलक्ष्मीकांता स्तविंतो दिनवाणि, पाव निर्वाणी,गजेंद्रवाणि सोडवी तोडुनि भवपाशा /
धाव अवलिंबे जगदिशा // जय.//1//
सुशोभितजटामुकुटगंगा / धृतपदलांच्छनभुजंगा वामकरतलमंडितलिंगा /
त्रिशुळ,जपमाळ,भस्म अंगा निरंजन.निर्गुण,नि:संगा /
सगुण रुप सुंदर आभंगा,क्षितितळवंटी जगदोध्दारा /
करुणामृतसंगमधारा जाहली प्रकट,चिंतीतां लगट,शीघ्र सरसकट करी नटखट चट गट क्लेशा /
पालटवी प्राक्तनपटरेषा // जय //2 // लाविती कर्पुरदिप सांभा /
आरती करिती पद्मनाभा, दिसतसे इंद्रभुवन शोभा,कीर्तने होति,गाति रंभा निरसुन काम क्रोधलोभा /
लाभति नर दुर्लभ लाभा,व्दिजांच्या सहस्त्रावधि पंक्ति /
प्रसादें नित्य तृप्त होती,चंद्रदिप भडके,वाद्य ध्वनी धडके,पुढे ध्वज फडके,पतित जन होति निर्देाषा /
ऐकुनि भजनाच्या घोषा // जय // 3 //
दीन ब्रिद वत्स वाढविणें /यास्तव रचिलें वाढवणें,प्रभुच्या चरणाश्रयिं रहाणें /
वांच्छिति सनकादिक शाहणे,कशाला भागिरथिंत न्हाणें /
तरि नको पंढरपुर पाहणे,पहातां समुळ द:ख विसरे /
भुलोकीं वैकुंठचि दुसरें,गरुड बैलास,वाटे कैलास,चढे उल्हास विंष्णुदास पावे हर्षा /
करिता नमन आदिपुरुषा // जय // 4 // ....
कवि विष्णुदास
                                         अनिल मादसवार, हिमायतनगर, जि.नांदेड.
 anilmadaswar@gmail.com, nandednewslive.com
                                       संपर्क - 9764010107,9767121217

मंगलवार, 25 फ़रवरी 2014

'सुंगध संस्कृतीचा'

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित 'सुंगध संस्कृतीचा'
कार्यक्रमास रसिकांचा उत्तम प्रतिसाद

नांदेड(अनिल मादसवार)महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद नांदेड यांच्या सहकार्याने नांदेड येथे तीन दिवसीय 'ग्रंथोत्सव 2014' च्या निमित्त विविध कार्यक्रमांची मेजवाणी देण्यात आली. शेवटच्या दिवशी म्हणजे सांगता समारोह प्रसंगी 'सुगंध संस्कृतीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडच्या स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतुने याची आखणी करण्यात आली होती. या कार्यक्रमास रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संयोजक सौ. ज्योती जैन, नृत्य शिरोमणी व लय स्कूल ऑफ परफॉर्मींग आर्टस्चे संचालक भरत जेठवाणी यांचा हा कार्यक्रम भारतीय संस्कृतीला उज्वल करणारा ठरला. कार्यक्रमाची सुरुवात जेठवाणी यांच्या विद्यार्थींनी ईषा जैन व राष्ट्रीय विजेत्या मोहिनी वैजवाडे यांनी नटराज देवतेला वंदन करुन नटरंग उभा या गीतावर भरतनाटयम सादर केले. पुढे लय स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, गोंधळ, भारुड सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. लय स्कूलचे ट्रेनर शुभम बिरकुरे यांनी सादर केलेल्या मेरी मॉ व काठी घोंघड घेऊ द्या या गितांवर सादर केलेल्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ईषा जैन व मोहिनी वैजवाडे यांनी सादर केलेल्या चला जेजुरीला जाऊ, दुर्गा अंबोरे व साक्षी मनियार यांनी सादर केलेल्या मला इश्काचा गुलकंद खिलवा आणि आम्ही नाही जा, नाद खुळा मा या लावणींनी प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. याचबरोबर काही पाश्चात्य नृत्य, राजस्थानी, गुजराथी नृत्य पण सादर करण्यात आली. तनया प्रसाद आलुरकर हीने सादर केलेली लावणीही रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. सुनो गौर से दुनियावालो, मे मेरा इंडिया या नृत्यांना वेगळया आकर्षण ठरल्या. माँ तुझे सलाम या बहारदार नृत्याने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल उबाळे हीने केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शूभम बिरकुरे, अमोल काळे, व्यंकटेश काकडे, नईम खान यांनी सहकार्य केले. संयोजक श्रीमती जैन आणि श्री. जेठवाणी यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल रसिक श्रोत्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचे विशेष आभार मानले. 

माजी मनसे अध्यक्ष दोनकेवार यांना दिला बेदाम मार ..

संपर्क अध्यक्ष्याच्या अंगावर काळे ओईल ओतल्याने कार्यकर्ते आक्रमक
माजी मनसे अध्यक्ष दोनकेवार यांना दिला बेदाम मार ..

[
किनवट(विजय जोशी)तालुक्यातील मांडवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याच्या व्यासपीठावर मनसेचे संपर्क प्रमुख अध्यक्ष देवदत्त काळसेकर यांच्या डोक्यावर मनसेचे माजी तालुकाध्यक्ष दत्ता दोनकेवार यांनी काळे ओइल टाकल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार करून निघून जाणार्या दोनकेवार यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून बेदम मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले आहेत.या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माहूर, किनवट, येथून विशेष पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आला आहे. अचानक झालेल्या गोंधळामुळे येथील मेळावा होऊ शकला नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटाध्यक्ष, शाखाध्यक्ष, पदाधिकारी यांच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा असा संयुक्त कार्यक्रम मनसेचे जिल्हा सचिव धनलाल पवार यांनी आज दि.२५ रोजी मांडवी येथे आयोजित केला होता. या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार आटोपल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा कार्यक्रम सुरु होता. व्यासपीठावर मनसेचे संपर्क अध्यक्ष देवदत्त काळसेकर बसले असताना अचानक मनसेचे माजी तालुकाध्यक्ष दत्ता दोनकेवार यांनी काळसेकर यांच्या डोक्यावर काळे ओइल ओतले. व्यासपीठावर काय होत आहे हे, कोन्हाच्या लक्षात आले नाही. ओइल ओतून दोनकेवार सभ्स्थलवरुन निघून जाताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोनकेवार यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना मांडवीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. अचानक झालेल्या गोंधळामुळे हि सभा अर्धवटच राहिली असून, मनसेचे कार्यकर्ते व मनसेचे माजी तालुकाध्यक्ष दत्ता दोनकेवार यांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या. दरम्यान दत्ता दोनकेवार यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मांडवी पोलिस स्थानकावर मोर्चा वळविला. यावेळी मनसेचे नूतन तालुकाध्यक्ष मनोज कराळे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. मांडवी पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत दोनकेवार म्हणाले कि, ७ वर्षापासून मी मनसेचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केल्यानंतरही धनलाल पवार यांच्या सांगण्यावरून संपर्क प्रमुख देवदत्त काळसेकर यांनी मला अध्यक्ष पदावरून काढून टाकले. आर्थिक व्यवहारातून काळसेकर यांनी हे काम केल्याने माझा संताप अनावर झाला. राग व्यक्त करण्यासाठी मी काळसेकर यांच्या अंगावर काळे ओइल फेकले. यानंतर मनसेचे जिल्हा सचिव धनलाला पवार, तालुकाध्यक्ष मनोज कराळे, व धानलाल पुत्राने मला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर घटनेबाबत संपर्क अध्यक्ष देवदत्त कस्लेकर म्हणाले कि, दत्ता कोनकेवार यांचे काम समाधानकारक नसल्याने पक्षस्रेष्ठीने त्यांना पाय उतार केले. आणि नवीन तालुकाध्यक्ष निवडला. याचा राग मनात धरून दोनकेवार यांनीच हे निंदनीय कृत्य केले आहे. नाराज झालेल्या कार्यकर्ते असा प्रकार करताच असतात, त्यात काही विशेष नाही. या कृत्यामुळे माझ्याव

यात्रा महोत्सवाला सुरुवात

अखंड हरीनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात

हिमायतनगर(वार्ताहर)येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवाला एकादशीच्या मुहूर्तावर अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सुरुवात करण्यात आली आहे. यात ३०० हून अधिक महिला, पुरुष व लहान बालकांनी सहभाग घेतला आहे. यात्रा उत्सवाच्या काळात होणार्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती लावून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.

माघा करू.१२ दि.२५ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजताच अर्चक कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीत श्री परमेश्वर मूर्तीचा अभिषेक महापूजा करण्यात येवून काकडा आरतीने यात्रा महोत्सव तथा सप्ताहास सुरुवात करण्यात आली. तसेच अखंड हरीनाम विना पारायण सोहळ्यासह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपिठाचार्य हभप. ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या पारायण सोहळ्यास ५०० हून अधिक भाविक - भक्तांनी उपस्थिती दर्शवून सहभाग घेतला आहे. सप्ताहाच्या आठ दिवस दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी व विना पारायण, प्रवचन, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन आदी कार्यक्रम परमेश्वर भजनी मंडळाच्या सहकार्याने नित्यनियमाने होणार आहेत. पहिल्या दिवशी श्री दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना येथील व्यापारी रामराव सूर्यवंशी यांच्या तर्फे केळीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

पारायण सोहळ्याची सुरुवात मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर, महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे सचिव अनिल मादसवार, कानबा पोपलवार, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर व गावकरी मंडळीच्या उपस्थिती करण्यात आली आहे. 

सोमवार, 24 फ़रवरी 2014

बालाजी मानसपुरे सातासमुद्रापार !

मोटारी दुरुस्ती करणारा 'मेक्यानीक' बालाजी मानसपुरे सातासमुद्रापार !

लोहा(हरिहर धूतमल)रेल्वेच्या एसी थ्री टायर मध्ये कधी बसले नाही त्यांनी थेट विमानात बसायचे आणि चक्क विदेशी जायचे...हे तसे स्वप्नातच...परंतु मेहनत आणि कोणतीही अभिलाषा, मनाशी न धरता आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित करणाऱ्यांचे जीवनात यश दारात उभे राहते. लाईट फिटिंग करणाऱ्या बत्तीस वर्षीय लोह्याच्या तरुणाने जिद्द व कष्टातून 'ब्यान्कोक' जाण्याचे भाग्य मिळविले आहे. त्या तरुणाचे नाव बालाजी तुकाराम मानसपुरे.

लोह्यातील तुकाराम व गोदावरीबाई मानसपुरे यांचा हा मुलगा. वडील सेवक आई गृहिणी. बालाजी इलेक्ट्रिक चे रोजंदारीवर काम करणारा. काही वर्ष त्यांनी 'होळ्गे' यांच्या येथे नोकरी केली. घरोघरी जावून लाईट फिटिंग,नळ फिटिंग करत त्यांनी आपल्या एक-दोन मित्रांना सोबत घेतले..काम मिळाले त्यांच्या कामाच्या दर्जामुळे...मेहनतीमुळे..

मागील वर्षी बसस्थानका समोरील गोविंदराव कॉम्प्लेक्सं मध्ये सूर्यवंशी यांच्या दुमजली इमारतीत बालाजीने 'ओम' इलेक्ट्रिकल्स टाकले. त्याने 'प्रेसपिट' नावाच्या स्विच बटनाची जास्त विक्री केल्यामुळे त्याला रविवार २३ फेब्रुवारी रोजी विदेश म्हणजे ब्यान्कोक'ला जाण्याची संधी मिळाली.

बालाजी कधी एसी डब्यात बसला नाही. त्यान कधी स्वप्नहि पाहिलं नसाव कि तो विमानात बसेल म्हणून..पण जीवनाची रीत तशी न्यारीच..कधी काय होईल..दैव कुणी कधी जाणिले नाही..एक नोकर पोरगा..नोकरी करत घरोघरी जावून नळ-लाईट फिटिंग करतो..त्यान कधी स्वप्न हि पहिले नसावे कि, आपण विदेशात सूट-बूट..घातलेल्या हाय-फाय हॉटेलात...तेथील संस्कृतीचा जीवनाचा अनुभव घेवू म्हणून...हि गोष्ट साध्य झाली ती केंव्हा त्याच्या अथक परिश्रमातून...

घामाचे 'मोती' होतात ते या रूपाने..बदलत्या काळात 'जग' मुठीत झाले आहे. विमान प्रवास..विदेश वारी तशी 'दुर्मिळ' राहिली नाही. पण ज्या समाजात ज्या भागात माणूस जगण्यासाठी संघर्ष करतोय..जेथे आजही 'मी पणाचा' टेंभा मिरविला जातोय अशा व्यवस्थेत बालाजी ने स्वबळावर केलेली विदेशी वारी आजच्या सुखी आरामदायी जीवन जगणाऱ्या शाळकरी मुलानाही..गावात फिरणाऱ्या 'लाडोबासाठी' अंतर्मुख करायला लावणारी आहे.

मेहनत,कामाप्रती असलेली श्रद्धा या बळावर अशक्य गोष्ट शक्य होत. आपण न पाहिलेली स्वप्न आपल्या पुढ्यात उभे राहते. आज बालाजी ने भाऊ मनोज यालाही ष्ट्य़ाड केले. त्याच्या कडे चार सहा मूले काम करतात..इतर काही कंपन्यांचे,सोलार ची एजन्सी आहे. मोटारी दुरुस्ती करणारा मेक्यानिक विदेश वारी वर जातो याचा अभिमान वाटायला हवा कारण त्यांच्या कष्टाचे मोल आहे.

नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात शिवजयंती साजरी

छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज - कानबा पोपलवार   
नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात शिवजयंती साजरी

 

हिमायतनगर(वार्ताहर)बहुजनांचे उद्धारकर्ते छत्रपति शिवाजी महाराजांनी जाती - पतीचा विचार न करता केवळ स्वराज्य स्थापनेसाठी तमाम बहुजनांना एकत्र करून जुलमी राजवटीच्या विरुद्ध रणशिंग फुंकले होते. त्यामुळे सध्याच्या युगात छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष कानबा पोपलवार यांनी केले. 

ते येथील नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात दि.२३ रविवारी आयोजित रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त बोलत होते. प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराजांनी सर्व धर्मीय लोकांना एक करून त्यांना समतेची व एकात्मतेची शिकवण दिली. हिंदू व मुस्लिम मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. एवढ्यावरच महाराज थांबले नाही तर त्यांनी तमाम बहुजन समजाला नैतिकतेची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या काळात छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज असल्याचेहि श्री पोपलवार म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्ष दत्ता शिराने यांच्यासह अनेकांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. यावेळी ग्रामीण उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष अनिल भोरे, सहसचिव साईनाथ धोबे, सहकोषाध्यक्ष फाहद खान, सल्लागार भास्करकाका दुसे, प्रकाश जैन, चांदराव वानखेडे, सदस्य दिलीप शिंदे, संजय कवडे, धम्मपाल मुनेश्वर, छायाचित्रकार म्हणून विष्णू जाधव, ज्ञानेश्वर गोडसेलवार, प्रेस फोरम संघटनेचे सचिव शे.इस्माईल, सहसंघटक रवि राठोड यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.    

उपसभपतिसह नऊ जणांवर गुन्हे दाखल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभपतिसह नऊ जणांवर गुन्हे दाखल


हिमायतनगर(वार्ताहर)सुनेला सतत मारहाण करून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभपतिसह नऊ जणांवर विवाहितेला मरणास प्रवृत्त केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक वर्षापासून मयत विवाहिता सौ.सुरेखा सुरेश पवार हिस सासरच्या लोकांकडून या - ना त्या शुल्लक कारणावरून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास केला जात होता. हि बाब विवाहितेने माहेरच्यांना सांगितली होती. यावरही विवाहितेच्या नातेवाईकांनी सासरा व पतीस समजावून सांगून मयत विवाहितेस सासरी पाठविले होते. त्यानंतर संसाराचा गाडा चालवीत असताना अचानक दि.२३ रोजी शुल्लक कारणावरून सुरेखास मारहाण करून छळण्यात आले. हे सर्व असह्य झाल्याने सासरच्या लोकांकडून सतत होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने कोणताही विचार न करता गावाजवळील तलाव शेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन यात्रा संपविली.  हि बाब माहेरच्यांना लक्षात येताच सुरेखाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला तिचा पती - सुरेश परसराम पवार, सासरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती परसराम पवार, सासू - शांताबाई परसराम पवार, दीर - सुभाष परसराम पवार, दीर - गोविंद परसराम पवार, दीर  संजय परसराम पवार, जावू - आशाबाई सुभास पवार, जावू - सुरेखाबाई गोविंद पवार, दिलीप पडू राठोड रा.सर्व वायवाडी तांडा ता.हिमायतनगर यांच्या त्रासामुळे विवाहितेने विहिरित उडी घेवून जीवन यात्रा संपविली. अश्या आशयाची तक्रार नातेवाईक किशन सोमाला राठोड, वय ५० वर्ष रा. मखलमा आबूनाईकतांडा , ता. भोकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस स्थानकात नऊ जणांवर कलम ४९८(अ), ३०६, ३४ भदवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण हे करीत आहेत.  

  

रविवार, 23 फ़रवरी 2014

पल्स पोलिओ मोहिम

पोलिओचा डोस पाजवून सुरक्षित करणे हि सर्वांची जबाबदारी... आ.जवळगावकरहिमायतनगर(वार्ताहर)भारत देश पोलिओ निर्मुलाणाकडे वाटचाल करीत असून, आता हे कार्य अंतिम टप्प्यात आली आहे. २०१४ मध्ये पोलिओचे निर्मुलन झाले अशी घोषणा देश पातळीवरून करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ० ते ५ वर्षाच्या वयोगटातील १०० टक्के मुलांना पोलिओचा डोस पाजवून सुरक्षित करणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत     आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ मोहिमेच्या दुसरा टप्प्यातील शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी जी.प.सदस्य समद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, ळीराम देवकते, प्रभाकर मुधोळकर, गौतम पिंचा, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुराव होनमाने, यांच्यासह अनेक मान्यवर व लाभार्थी पालकांची उपस्थिती होती.     

दि.२३ रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील सोनारी येथील ट्रान्जीट बुथवर हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते चिमुकल्या बालकास लस देवून करण्यात आला. आज दिवसभरात पार पडलेल्या मोहिमेत तालुक्यातील १२७ बुथवर ० ते ०५ वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचि लस पाजण्यात आली. माहे जानेवारी मध्ये तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी ११५४१ पैकी ११९५५ लाभार्थ्यांना याचा लाभ झाल्याबद्दल माधवराव पाटील यांनी समाधान व्यक्त करून, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचार्यांचे अभिनदन केले. पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दामोधर राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. एस.बी.चव्हाण, डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यवेक्षक श्री.एम.व्ही.चव्हाण, श्रीमती सिडाम, यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.  

शनिवार, 22 फ़रवरी 2014

नांदेडच्या विनिता साहू सिंधदुर्गला

राज्यात 7 सहाय्यक पोलिस अधीक्षकांना अपर पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती
नांदेडच्या विनिता साहू सिंधदुर्गला


नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)राज्यातील 7 सहाय्यक पोलिस अधीक्षक या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना राज्य शासनाने पदोन्नती देवून नवीन नियुक्ता जाहीर केल्या आहेत.त्यात नांदेडच्या विनिता साहू यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने शुक्रवारी उशिरा रात्री जारी केेलेल्या आदेशानुसार 7 सहाय्यक पोलिस अधीक्षकांना पदोन्नतीसह नवीन पद स्थापना देण्यात आली आहे.त्यात नांदेडला येणारे पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या जागी राज्यपालांचे एडीसी म्हणून डॉ.सौरभ त्रिपाठी यांची नियुक्ती झाली आहे.त्रिपाठी हे सध्या अमरावती येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक आहेत.त्रिपाठी यांच्या नियुक्तीने दहिया यांचा नांदेडला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक विनिता साहू यांची अपर पोलिस अधीक्षक सिंधदुर्ग जिल्ह्यात पद स्थापना करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातील औसा उपविभागाच्या नियती ठाकर यांना परभणी येथे अपर पोलिस अधीक्षक करण्यात आले आहे.चांदूर रेल्वे येथील अंकित गोयल यांना कोल्हापूर येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.औरंगाबादच्या कन्नड उपविभागातील शैलेश बलकवडे यांना अहमदनगर येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून स्थापित करण्यात आले आहे.उमरगा उपविभागातील सहाय्यक पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे पाठविण्यात आले आहे.पाचोरा उपविभागातील सहाय्यक पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांना औरंगाबाद ग्रामीण येथे अपर पोलिस अधीक्षक या पदावर पाठविण्याचे आदेश जारी झाले आहेत.

शेतकऱ्याची आत्महत्या..

कर्जबाजारी युवक शेतकऱ्याची आत्महत्या.. हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे धानोरा ज. येथील एका युवक शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना दि.२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत हिमायतनगर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून धानोरा ज. गावातील हि तिसऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या होय. 

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी किनारी असलेल्या तालुक्यातील धानोरा ज. येथील अल्पभूधारक मयत शेतकरी अर्जुन लक्ष्मण पतलेवाड वय २६ वर्ष यांनी खरीप हंगामात भारतीय स्टेट बैन्केकडून कर्ज काढून शेतीत पेरणी केली होती. परंतु मुसळधार पाऊस व नदी, नाल्याला आलेल्या पुराने शेतातील पिके पाण्यात होती, त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. तसेच बैन्केकडून काढलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो नेहमी असायचा. दि.२२ रोजी याच चिंतेने बेचैन झालेल्या अर्जुनने शेतातील विषारी औषध प्राषण करून जीवन यात्रा संपविली. हि बाब घरच्यांना समजताच तातडीने त्यास येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येवून विषारी औषधाचा प्रभाव जास्त झाल्याने तातडीने नांदेडला पाठविण्यात आले होते. परंतु सोनारी फाट्यानजीक जाताच युवक शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यू पश्चात आई, वडील, भावू, भावजयी, पत्नी असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून, यातून सावरण्यासाठी शासनाने कुटुंबियांना मदतीचा हाथभार लावावा अशी मागणी गावकऱ्यामधून व्यक्त होत आहे. शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूमुळे धानोरा ज. गावावर शोककळा पसरली असून, शनिवारी सायंकाळी उशिरा युवक शेतकऱ्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.      
      

जीवे मारण्याची धमकी

शालेय पोषण आहार प्रकरणातील शासकीय साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी 
पत्रकार संघटनेने केली आरोपींना अटक करण्याची मागणी 


हिमायतनगर(वार्ताहर)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील खव्वा सेंटरवर शालेय पोषण आहाराचे धान्य व साहित्य काळ्या बाजारात जात असताना पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले. सदर घटनेत शासकीय साक्षीदार म्हणून पत्रकार गोविंद गोडसेलवार हे होते. हि बाब आरोपीच्या लक्षात येताच सरसम गावातील त्यांच्या नातेवाईकांनी आमच्या विरोधात साक्ष का देतो असे म्हणत अंगावर धावून येत धक्का - बुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील सदगुरु खव्वा सेन्टरवर दि.१४ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शालेय पोषण आहारचे धान्य काळ्या बाजारात नेण्याच्या उद्देशाने उतरविताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. यातील प्रमुख सूत्रधार हा चार जिल्ह्यांचा शालेय पोषण आहाराचा पुरवठाधारक गुत्तेदार प्रदीप चाडावार असून, त्यांच्यासोबत वाहतूकदार गिरिधर मदरेवार, खवा सेंटर मालक शंकर देशमुख, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सुनील वानखेडे व तीन ते चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रक चालक शिवाजी तोंडसुरे, अशोक सुरनर, बालाजी पंढरीनाथ येरनाडे, यांना घटनास्थळी पोलिसांनी अटक केली आहे. पोषण आहार हेर - फेरी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह बडे मासे पोलिसांना गुंगारा देवून अद्यापही पसार आहेत. यातील मुख्य आरोपी अटक पूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत आहेत, याबाबतचे वृत्त अनेक दैनिकातून प्रकाशित होताच, आरोपितांचे पित्त खवळले आहे. याचा राग मानता धरून सर्सम गावातील आरोपी असलेल्याचे नातेवाईक संतोष वानखेडे यांनी या घटनेतील साक्षीदार गोविंद गोडसेलवार यांना धमकी देवून पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हि बाब निंदनीय असून, येथील मराठी तालुका पत्रकार संघ, प्रेस फोरम व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या घटनेतील साक्षीदार गोविंद गोसेलवार हे पत्रकार तथा इलेक्ट्रिक वायरमनचे काम करतात, त्यामुळे त्यांना ये - जा करताना रात्री उशीर होता, त्यामुळे आरोपींकडून व धमकी देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडून धोका होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोरातील कठोर कार्यवाही करून तातडीने अटक करावी. तसेच शालेय पोषण आहार काळा बाजार  प्रकरणातील शासकीय साक्षीदार तथा पत्रकारास संरक्षण द्यावे अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. 

झाडूमारो आंदोलन

आम आदमी पार्टीच्या झाडूमारो आंदोलन रैलिने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण 
हिमायतनगर(वार्ताहर)दिल्लीचा तख्त गाजवून सोडणाऱ्या आम आदमी पार्टीने नांदेड जिल्ह्यासह आता ग्रामीण भागात पाय रोवले असून, दि.२२ रोजी शहरात राबविण्यात आलेल्या झाडूमारो आंदोलन रैलिने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.

शहरात दि.२२ रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने झाडू मारो आंदोलनाची रेली मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली होती. सदर रेली हि हिंगोली लोकसभेचे इच्छुक उमेदवार, आम आदमी पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते, दिलीप राठोड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या रैलित उमरखेड, किनवट, हदगाव, माहूर येथील संयोजक सामील झाले होते. रैलिचे बस स्थानक परिसरात परत आल्यानंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना राठोड म्हणाले कि, स्वराज आनण्यासाठी लोकांसमोर एकच पर्याय आहे. ते म्हणजे आम आदमी पार्टी, या पार्टीत उभ्या असलेल्या उमेदवाराला लोकसभेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. देशातील भ्रष्टाचाराचे समूळ नष्ठ करणे हाच आमचा उद्देश आहे. यावेळी किनवट तालुक्याचे संयोजक शिंदे, माहूरचे मनोज पुरी, उमरखेड येथील श्री मुनेश्वर, इच्छुक उमेदवार श्री कदम, हदगाव येथील भगवान देशमुख, अभिजित कदम, गजानन तावडे, आंबोरे, हिमायतनगर तालुक्यातील गोविंद कांबळे, नजीर भाई, परमेश्वर नीलकंठे, मधुकर जाधव, जगदीश सूर्यवंशी, आनंद मोरे, यांच्यासह ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते रैलित सामील झाले होते. या रैलित कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण शहर दणाणले होते.      

तीन वर्षानंतरहि पेन्शन मिळेना

पेन्शन अभावी मयत शिक्षकाच्या पत्नीवर मजुरीची वेळ..
लेखा विभागातील लालची कारकुनाची करामत

हिमायतनगर(वार्ताहर)मयत शिक्षकाचे मृत्युच्या तीन वर्षानंतरहि पंचायत समितीच्या लेख विभागातील लालची कर्मचार्यामुळे शिक्षकाच्या विधवा पत्नी व मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे पवना येथील राजेश्वर गोणारे हे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात विद्यादानाचे काम शिक्षक या पदावरून करत होते. शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात काम करीत असतांना राजेश्वर गोणारे याचं दि.२९ सप्टेंबर रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याची पत्नी सुलोचना यांच्यावर आली. एक मुलगी व दोन मुले यांच्या शिक्षणाची व उदरनिर्वाहाची, संगोपनाची पूर्णतः जबाबदारी त्यांच्यावर आल्याने कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी केवळ शंभर रुपये मिळणाऱ्या शेतातील कामात रोजंदारीवर जावून उदर भरण करावे लागत आहे. पतीच्या निधनानंतर तीन वर्षानंतरही पेन्शन न मिळाल्याने संसाराची आबाळ होत असून, उपवर झालेल्या मुलीचे लग्न खोळंबले आहे. पंचायत समिती कार्यालयाकडे पेन्शनसाठी वारंवार खेटे घालून कार्यालयातील लालची कारकून पवार यांच्याकडे काम होण्यासाठी दोन हजारची लाच देवूनही या ना त्या कारणाने कारकून पवार यांनी पेन्शन बिले काढण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार मयत शिक्शक्चि पत्नी सुलोचना यांनी गटशिक्षण अधिकारी यांना दि.१३ रोजी केली आहे.

केवळ पेन्शन अभावी एका शिक्षकाच्या पत्नीवर मोल - मजुरी करून जीवन व्यथित करण्याची वेळ यावी, याच्या पेक्षा शिक्षण विभागासाठी व शासनाच्या कर्मचार्यांसाठी शरमेची गोष्ठ दुसरी असू शकत नाही असा सवाल काही कर्मचार्यांनीच विचारला आहे. तर लालची कारकून पवार यांच्यावर तत्काळ कार्यवाही करून पेन्शन न दिल्यास सहकुटुंब उपोषणास बसणार असल्याचे मयत शिक्षकाची पत्नी सुलोचना राजेश्वर गोणारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शुक्रवार, 21 फ़रवरी 2014

श्री परमेश्वर भव्ययात्रा महोत्सव

महाशिवरात्र निमित्त श्रीपरमेश्वर देवस्थानच्या भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन ..
१ लाख ६१ हजाराच्या बक्षिसांची लयलूट हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध महाराष्ट्र - आंध्रप्रदेश - कर्नाटक परिसरात ख्यातीप्राप्त झालेल्या हिमायतनगर(वाढोणा - वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सदर यात्रेला दि.२५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तरी श्रीच्या यात्रा महोत्सवात तमाम भाविक - भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरून हजेली लावून श्री दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे. सदर यात्रा महोत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक - सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी १ लाख ६१ हजाराची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सव हा १५ दिवस चालणार असून, याची सुरुवात दि.२५ फेब्रुवारी पासून होऊन दि.१४ मार्च पर्यंत चालणार आहे. दरम्यान सात दिवस काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सोहळा, इर्तन, प्रवचनाने सप्ताह साजरा केला जाणार असून, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर हे सांभाळणार आहेत. या सात दिवसाच्या कालावधीत नामांकित कीर्तनकारांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जाणार आहे.  दरम्यान माघ कृ.१३ दि.२७ रोजी महाशिवरात्री दिनी मध्यरात्री १२ ते ०३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वराचा अभिषेक सोहळा, महापूजा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष मा.तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर मंगलमय सोहळ्यात श्रीचा अलंकार सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवसापासून भाविक - भक्तांना अलंकार रुपी श्री परमेश्वराचे दर्शन दि.०४ मार्च दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे. त्यानंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत, शालेय भाषण, विविध गुणदर्शन अश्या सांस्कृतिक व खेळ स्पर्धा संपन्न होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी पशु व कृषी प्रदर्शन यासह शंकर पाटाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर पटात प्रथम येणाऱ्या बैलजोडीस ११००१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच चिमुकल्या बालकांसाठी सुदृढ बालक स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच भजनी मंडळ व संगीत प्रेमींसाठी भव्य भजन स्पर्धा, संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. भजन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास ५००१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्धा व कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, कुस्ती स्पर्धेत मनाची कुस्ती होणार असून, यात जिंकणाऱ्या मल्लास प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपयाचे बक्षीस तर कब्बडी स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या संघास ७००१ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मंदिर समितीने ठरविल्या प्रमाणे दिले जाणार आहे.  

महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्या निमित्ताने मंदिर रंग रांगोटी करण्यात आली आहे. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या १५ समित्यांची स्थापना करण्यात येउन, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात अली आहे. आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात सर्व - भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मा.तहसीलदार साहेब, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर व गावकरी मंडळीनी केले आहे.     

  

गुरुवार, 20 फ़रवरी 2014

पायी दिंडी

आदिलाबाद - कंधार पायी दिंडीचे हिमायतनगर शहरात जोरदार स्वागत

हिमायतनगर(वार्ताहर)मागील आठ वर्षापासून काढण्यात येणाऱ्या आदिलाबाद ते कंधार पी दिंडीचे आगमन आज सायंकाळी हिमायतनगर शहरात झाले असून, परमेश्वर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे संचालक माधवराव पाळजकर यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी पत्रकार अनिल मादसवार , नागेश शिंदे, देवराव वाडेकर, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

वारकरी सांप्रदाईक महिला -पुरुष भक्त मंडळीकडून मागील आठ वर्षापासून सोपानराव मुतनुर जी. आदिलाबाद ते उमरज बोरी ता.कंधार अशी ३०० कि.मी.पायी दिंडी श्री गुरु नामदेव महाराज महाधीपती यांच्या दर्शनासाठी काढली जाते. दि.१८ मंगळवारी टाळ मृदंगाच्या गजरात निघालेली दिंडी हिमायतनगर शहरात दि.२० गुरुवारी शहरात दाखल झाली. हि दिंडी मजल - दरमजल करीत दि.२६ रोजी म्हणजे महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला उमरज बोरी येथे पोहोन्चते. या दिंडीसोबत दिनकर नागरगोजे, गोकुळ काजेवाड, किशनराव मुंडे, मुरलीधर मुंडे, बाबू केंद्रे, शामसुंदर रेडेवार, साखळबाई मुंडे, लक्ष्मीबाई मुंडे, प्रयागबाई मुंडे, गोदावरीबाई काजेवाड, धुरपताबाई मुंडे यांच्यासह ५० ते ५५ महिला -पुरुष बालकांचा समावेश आहे. शहरात दहल झालेल्या या दिंडीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच मंदिर समितीच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांच्या भोजनाची सोय करण्यात आली.रात्रीचा मुक्काम हिमायतनगर येथे करून सकाळी ६ वाजता हि दिंडी पुढील गावाकडे प्रस्थान होणार आहे. तसेच महाशिवरात्री दिनी महाराजाचे दर्शन घेवून एक दिवसाच्या मुक्कामानंतर सदर दिंडी परत आदिलाबादकडे परत निघणार आहे.अशी माहिती दिंडी प्रमुखाने नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.

नांदेड ग्रंथोत्‍सवाची उत्‍साहात सांगता

मराठीचा अभिमान आणि अस्‍सल मराठीपण जपा 
ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा. लक्ष्‍मीकांत तांबोळी यांचे आवाहन


नांदेड ग्रंथोत्‍सवाची उत्‍साहात सांगता 
ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीला प्रचंड प्रतिसाद 

नांदेड(अनिल मादसवार)आपल्‍या मराठीचा अभिमान बाळगतानाच आपली अस्‍सल मराठी जीवंत ठेवण्‍यासाठी सर्वांनी छत्रपतींच्‍या जयंतीदिनी निर्धार केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ मराठी साहित्यिक आणि राज्‍य भाषा सल्‍लागार समितीचे सदस्‍य प्रा. लक्ष्‍मीकांत तांबोळी यांनी केले. 'नांदेड ग्रंथोत्‍सव 2014' च्‍या सांगत समारंभात ते अध्‍यक्षस्‍थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव, राज्‍य साहित्‍य संस्‍कृती मंडळाचे सदस्‍य आणि कवी डॉ. सुरेश सावंत, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती. 

महाराष्‍ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ, जिल्‍हा परिषद नांदेड आणि जिल्‍हा माहिती कार्यालय नांदेड यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत 'नांदेड ग्रंथोत्‍सव-2014' चे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यांची सांगता शिवछत्रपतींच्‍या जयंतीदिनी झाली. 
यावेळी बोलताना ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव म्‍हणाले की, मराठी भाषेतला पहिला ग्रंथाचा मान मराठवाड्याला आहे. शालीवाहन काळात 'गाथा शालीवाहन' हा सातशे कथांचा तो संग्रह होता. हा उज्‍वल ऐतिहासिक वारसा मराठीला आहे. 

डॉ. सुरेश सावंत यांनी ग्रंथाचे महत्‍व सांगून ग्रंथ विचारांची साठवणूक करतात म्‍हणून 'राकट देशा, कणखर देशा' प्रमाणे आता 'वाचकांच्‍या देशा' अशी आपली ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्‍हणाले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमावाड, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले. तर प्रास्‍ताविकात जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी ग्रंथोत्‍सवातील कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रारंभी शिवजयंतीनिमित्‍त छत्रपती शिवरायांच्‍या प्रतिमेचे पूजन सर्व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

यावेळी ग्रंथोत्‍सवात घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धा व वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतील विजेत्‍यांना पारितोषिकांचे वितरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले तर व्‍यंकट कल्‍याणपाड यांनी आभार मानले. यानंतर ज्‍योती जैन आणि भरत जेठवाणी यांच्‍या संचाने सुगंध संस्‍कृतीचा हा सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर केला. 

विजेते स्‍पर्धक 
-------------- 
नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्‍यांसाठी 'मराठी भाषेच्या समृद्धीसाठी माझी भुमिका' या विषयावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत प्रथम क्रमांक किरण देशमुख, द्वितीय अक्षय पंतगे, तृतिय क्रमांक मिलींद वाघमारे यांनी पटकावला आणि मुक्‍ता पवार, माणिक पावडे, बाबु जिंकलोड, सचिन मगर, अविनाश खैरगे यांना उत्‍तेजनपर पारितोषिके प्रदान करण्‍यात आली. 

शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांसाठी 'मराठी भाषा ही शासकीय कामकाजात समृद्ध कशी होईल' या विषयावर आयोजित निबंध स्‍पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती ज्‍योती कदम, द्वितीय क्रमांक पी. एच. रावके आणि तृतीय क्रमांक श्रीमती सारिका कदम यांनी पटकावला तर श्रीमती संध्‍या तुंगेवार, स्‍नेहलता स्‍वामी, राम शेळके, शिशिर सिबदरकर यांना उत्‍तेजनपर पारितोषिके प्रदान करण्‍यात आली. सर्व विजेत्‍यांना रोख पारितोषिके, सन्‍मा‍नचिन्‍ह आणि प्रशस्‍तीपत्रे देवून गौरविण्‍यात आले. 

मंगलवार, 18 फ़रवरी 2014

बालकुमारांसाठी कवीसंमेलन

'उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले' ग्रंथोत्‍सवात रंगले बालकुमारांसाठी कवीसंमेलन 

नांदेड(अनिल मादसवार)'आभाळाचे छत डोईवर, जे दैवाने दिले, उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले, या आणि अशा कितीतरी बालकवितांनी कवीसंमेलन रंगत गेले आणि मुलांचा उत्‍साह कवितेगणिक वाढत गेला. निमित्‍त होते नांदेड ग्रंथोत्‍सवानिमित्‍त आयोजित बालकुमारांसाठी कवीसंमेलनाचे. कवीसंमेलनाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रसिद्ध कवी डॉ. सुरेश सावंत यांची उपस्थिती होती, तर कवीपिठावर जेष्‍ठ बालकवी सुधाकर गाजरे, शं. ल. नाईक, शंकर वाडेवाले, माधव चुकेवाड, प्रा. रवीचंद्र हडसनकर, अरुणा गर्जे, ललिता शिंदे, अशोक कुरुडे, वीरभद्र मिरेवाड, शेषराव जाधव यांची उपस्थिती होती.

महाराष्‍ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य व संस्‍कृती मंडळ, जिल्‍हा परिषद नांदेड व जिल्‍हा माहिती कार्यालय नांदेड यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित 'नांदेड ग्रंथोत्‍सव-2014' निमित्‍त बालकुमारांसाठी कवीसंमेलनाचे आयोजन जिल्‍हा परिषदेच्‍या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृहात करण्‍यात आले होते.

सुरुवातीला बालकांना चंद्राची सफर करवून आणताना बालकवी शेषराव जाधव यांनी कविता सादर केली. 'चला मुलांनो बांधुया चंद्रावरती घर, जागा नाही घरे बांधयला गर्दीचे शहर ', जेष्‍ठ कवी शं. ल. नाईक यांनी 'प्राण्‍यांची शाळा सुरु झाली, लगबग सारी गोळा झाली ' ही कविता सादर करुन बच्‍चेकंपनीला खूश केले. कवी माधव चुकेवाड यांनी बालरसिकांना गुदगुल्‍या करणारी 'फार फार वर्षांपूर्वी कुत्रा होता फारच खोडी, तेंव्‍हापासून झाली शेपूट त्‍याची वाकडी ' ही कविता सादर केली. कवयित्री ललिता शिंदे यांनी 'झिमपोरी झिम, झिम..झिम..झिम ' आणि 'चला मुलांनो चला मुलींनो शाळेत जाऊ' या नवयुगाचे ज्ञान जगाचे मंत्र दाऊया ' ही कविता गाऊन मुलांना ठेका धरायला लावला. कवियित्री अरुणा गर्जे यांनी 'शारदाई माझी शारदाई, शब्‍दसुरांची तू आई, कुणी म्‍हणती वेदवजी कुणी सरस्‍वती ' ही कविता सादर केली. शंकर वाडेवाले यांनी 'वा-या रे वा-या ' ही कविता मुलांना गायला लावत सादर केली. 'वा-या रे वा-या मार जरा फे-या, बागेत जरासा येशील का, सुगंध घेऊन जाशील का '. यावेळी अशोक कुरुडे यांनी 'आई अमर जगती ' ही रचना सादर केली. जेष्‍ठ कवी सुधाकर गाजरे यांनी पावसाची कविता सादर केली. 'येरे येरे पावसा, तुला देणार नाही पैसा '. प्रा. रवीचंद्र हडसनकर यांनी खेड्यातल्‍या मुलांच्‍या वेदना दर्शवणारी रचना सादर केली. 'बगळ्या बगळ्या पाटी दे, गरीब दुबळ्यांसाठी दे, गगनाच्‍या त्‍या भेटी दे, पुस्‍तकांची पेटी दे ' या कवितेला बालरसिकांनी भरभरुन दाद दिली. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालक आणि नव्‍या दमाचे बालकवी वीरभद्र मिरेवाड यांनी सुरेख सूत्रसंचालन करतानाच 'आई म्हणाली ताईला घासून फरशी पूस, संस्‍कृती बिघडली म्‍हणून निघून गेली घूस ' ही रचना सादर करुन सभागृहात खसखस पिकवत ठेवली. मिरेवाड यांच्‍या 'सरांच्‍या छडीचा केला त्‍यानं साप.. सर पळत म्‍हणाले बाप रे बाप ' ह्या 'जादुगार ' रचनेला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

संमेलनाचे अध्‍यक्ष अणि प्रसिद्ध बालकवी डॉ. सुरेश सावंत यांनी उपदेशपर आणि रंजन करणा-या कविता सादर केल्‍या. त्‍यांनी सादर केलेली 'सूर्यपत्र व्‍हा ' या कवितेला रसिकांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिलीच. त्‍यांनी सादर केलेल्‍या 'आभाळाचे छत डोईवर, जे दैवाने दिले, उजाड उघड्या रानावरची आम्‍ही रानफुले ' या रचनेला बालरसिकांनी मोठी दाद दिली. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन वीरभद्र मिरेवाड यांनी केले.

प्रारंभी दीपप्रज्‍वलनानंतर जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, विजय होकर्णे, पद्माकर कुलकर्णी, व्‍यंकट कल्‍याणपाड, अलका पाटील, आशा बंडगर, के. आर. आरेवार आदींनी मान्‍यवर कवींचे स्‍वागत केले. याच कार्यक्रमात कवयित्री अरुणा गर्जे यांच्‍या 'छोट्या दोस्‍तांसाठी काय पणं ' या काव्‍यसंग्रहाचे प्रकाशनही संपन्‍न झाले. उपस्थितांचे आभार दिपक महालिंगे यांनी मानले.

" बौद्धधम्म महिला परिषद "

" बौद्धधम्म महिला परिषद " उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
विहारासाठी १५ लाखाचा निधी देणार ... आ.जवळगावकर

हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे दि.बुद्धीष्ट ऑफ इंडिया(संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) अखिल भारतीय भिक्कू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने " बौद्धधम्म महिला परिषद दि.१६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

दि.१६ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी ९.३० वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात येवून गौतम बुद्द्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. तद्नंतर हदगाव - हिमायतनगर मतदार संघाचे विद्यमान आ.माधवराव पाटील यांनी अचानकपणे कार्यक्रम स्थळी भेट देवून गौतम बुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, नालंदा बौद्ध विहाराचे अनेक वर्षापासून अर्धवट स्थितीत असलेले बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.

त्यानंतर द्वितीय सत्रात आयु प्रा.भदन्त हर्षबोधी औरंगाबाद, भदन्त बी.अश्वजित्य आर्णी, भिक्खू सत्यधम्म पुसद, भिक्षुणी बोद्धिशिल नागपूर, भिक्खू सरिपुत हिमायतनगर, आदी भिक्खू गण यांनी उपस्थित उपासक व उपसिकाना धम्मदेसना दिली. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष पुंडलिक कदम, प्रताप लोकडे, मधुकर वाडेकर, राहुल लोने, सुरेश वाघमारे, संजय सोनसळे, सुरेश गडपाले, अशोक पाटील, नामदेव भरणे, छाया उमरे, केवलाबाई कांबळे, पुष्पाबाई भरणे, प्रवेश दवणे, आदींनी परिसराम घेतले आहे.