पल्स पोलिओ मोहिम

पोलिओचा डोस पाजवून सुरक्षित करणे हि सर्वांची जबाबदारी... आ.जवळगावकर



हिमायतनगर(वार्ताहर)भारत देश पोलिओ निर्मुलाणाकडे वाटचाल करीत असून, आता हे कार्य अंतिम टप्प्यात आली आहे. २०१४ मध्ये पोलिओचे निर्मुलन झाले अशी घोषणा देश पातळीवरून करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ० ते ५ वर्षाच्या वयोगटातील १०० टक्के मुलांना पोलिओचा डोस पाजवून सुरक्षित करणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत     आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ मोहिमेच्या दुसरा टप्प्यातील शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी जी.प.सदस्य समद खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, ळीराम देवकते, प्रभाकर मुधोळकर, गौतम पिंचा, ज्ञानेश्वर शिंदे, बाबुराव होनमाने, यांच्यासह अनेक मान्यवर व लाभार्थी पालकांची उपस्थिती होती.     

दि.२३ रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ तालुक्यातील सोनारी येथील ट्रान्जीट बुथवर हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते चिमुकल्या बालकास लस देवून करण्यात आला. आज दिवसभरात पार पडलेल्या मोहिमेत तालुक्यातील १२७ बुथवर ० ते ०५ वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचि लस पाजण्यात आली. माहे जानेवारी मध्ये तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी ११५४१ पैकी ११९५५ लाभार्थ्यांना याचा लाभ झाल्याबद्दल माधवराव पाटील यांनी समाधान व्यक्त करून, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचार्यांचे अभिनदन केले. पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दामोधर राठोड, आरोग्य अधिकारी डॉ. एस.बी.चव्हाण, डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यवेक्षक श्री.एम.व्ही.चव्हाण, श्रीमती सिडाम, यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी