NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

शुक्रवार, 28 फ़रवरी 2014

बनावट नोटा,

रिझर्व्ह बॅंकेने दोन महिन्यात दुसऱ्यांदा पाठविल्या बनावट नोटा, 
नांदेड पोलिसांना कार्यवाही करण्याच्या सूचनानांदेड(अनिल मादसवार)भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एकूण 28 नोटा बनावट असल्याचे पत्र नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. या नोटा एकूण 13 हजार सहाशे रुपयांच्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी सुध्दा आठ हजार रुपये किंमतीच्या नोटा बनावट असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने पोलीस अधीक्षकांना दिली होती.

नांदेड जिल्हा पोलीस दलाला पाठविलेल्या पत्रात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे प्रबंधक सी.एम.राव यांनी म्हटले आहे की, दि.7 जानेवारी 2014 रोजी नांदेडच्या स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद शाखेत जमा झालेल्या पाचशे रुपये दराच्या 27 नोटा व शंभर रुपये दराची एक नोट असे एकूण 13 हजार सहाशे रुपये हे भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे परिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यानुसार या नोटा बनावट असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. 

भारतीय दंडसंहितेच्या कलम 489 (अ) ते (ई) पर्यंत या बनावट नोटा चलनात आणणे हा अपराध आहे. या नोटा बनावट आहेत, परंतु या नोटांना न्यायालयात गुन्हेगारी कारवाई करण्यासाठी पुरावा म्हणून वापरायचे असेल तर या नोटा बॅंक नोट प्रेसचे महाप्रबंधक जे देवास मध्यप्रदेशमध्ये आहेत तसेच महाप्रबंधक करेन्सी नोटप्रेस नाशिक महाराष्ट्र येथे पाठवावे. तेथून अभिमत आल्यानंतर ते भारतीय दंडसंहितेच्या 292 नुसार न्यायालयात प्रस्तुत करावे. न्यायालयाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या न्यायालयीन निर्णयाची प्रत रिझर्व्ह बॅंकेला पाठवावी, असेही आपल्या पत्रात रिझर्व्ह बेँकेने म्हटले आहे.

या एकूण 28 नोटांच्या नंबरासह या नोटा रिझर्व्ह बॅंकेने पुढील कार्यवाहीसाठी नांदेड पोलीस दलाला पाठविल्या आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी अशाच सात हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या 14 नोटा रिझर्व्ह बॅंकेने नांदेड जिल्हा पोलिसांकडे पाठविल्या होत्या, परंतु त्याच्यावर काहीच कारवाई अद्याप झाली नाही. दोन महिन्यात 22 हजार रुपये बनावट नोटा ज्या रिझर्व्ह बॅंकेने परिक्षण करुन पाठविल्या आहेत त्या मिळाल्या असताना अद्याप तरी काही कारवाई झाली नाही. यासंदर्भाने कोणीच पेालीस अधिकारी काही सांगण्यास तयार नाहीत. नुतन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं: