फोडाफोडीवर भर

निवडणुकीच्या तोंडावर आमदार जवळगावकर यांचा फोडाफोडीवर भर
एकीकडे भूमिपूजनाचे नारळ तर दुसरीकडे इतर पक्षाचे पदाधिकारी

नांदेड(प्रतिनिधी)तोंडावर येवून ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी एकीकडे विकास कामाच्या भूमिपूजनाचा सपाटा लावत उद्घाटनाचे नारळ फोडण्यावर भर दिला. तर दुसरीकडे इतर पक्षातील स्थानिक पदाधिकारी फोडण्यावर जोर दिला असून, आगामी निवडणुकात काँग्रेस पक्षाचे मताधिक्य वाढविण्याचे जोरदार प्रयत्न चालविला आहे.

हिमायतनगर शहराच्या विकासासाठी आ. जवळगावकर यांनी कोटयावधीचा निधिखेचुन आणत तालुक्यातील अति दुर्गम असलेल्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी, भले मोठे फुगवलेले अंदाजपत्रकीय आकडे भल्या भल्यांचा अंदाज चुकवत असल्याचे दिसून येते आहे. विकास कामासाठी मिळणारा निधी तालुक्याच्या विकासासाठी आहे, कि अधिकारी आणि पदाधिकारी - गुत्तेदारांच्या विकासासाठी असा प्रश्न होत असलेल्या कामाच्या दर्जावरून दिसून येत आहे. गुत्तेदारीचे आमिष दाखवीत इतर पक्षातील पदाधिकार्यांना स्वपक्षात ओढण्याचा सपाटा जवळगावकर यांनी लावल्याने निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे भूमिपूजनाचा नारळ तर दुसरीकडे इतर पक्षातील कार्यकर्ते फोडण्यावर भर दिला असल्याची चविष्ठ चर्चा चावदारपणे चर्चिल्या जात आहे.

जाणारे नेते ना सुरळक ना धुरजड - राष्ट्रवादी

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या करणाऱ्या कार्यकर्त्यांची काय किंमत होते आणि कितपत त्यांना दुसर्या पक्षात सन्मान दिल्या जाइल या विषयी आताच भाष्य करणे उचित होणार नाही तर शिंदेच्या पक्षांतरामुळे काँग्रेस आमचा मित्र पक्ष असल्यामुळे ते नक्कीच आगामी निवडणुकीत आम्हाला सहकार्य करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नागोराव पतंगे यांनी व्यक्त केला. आणि ना सुरळक ना धुरजड अश्या कार्यकर्त्यामुळे पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी