डी.पी.ला आग ..

महावितरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे डी.पी.ला आग ..
व्यापारी व बाजारकरुंची धावपळ

हिमायतनगर(अनिल मादसवार)महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला ऐन आठवडी बाजारात असलेल्या महावितरणच्या डी.पी.ला अचानक आग लागल्याने व्यापारी व बाजारकरुंची एकच धावपळ उडाली होती. तर परिसरातील व्यापार्यांनी डी.पी.फुटेल या भीतीपोटी आपली प्रतिष्ठाने बंद केली होती. हि घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असून, यास महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरात महावितरण कंपनीच्या अभियंत्यासह लाईनमन कर्मचार्यांनी नागरिकांच्या सुविधेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या तारा तुटून पडणे, डी.पी.ला आग लागणे ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. सध्या शहराचे आराध्य दैवात श्री परमेश्वराच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून, दि.२६ दुसर्या दिवशी आठवडी बाजार व यात्रेकरू हजारोच्या संखेत आले होते. उन उतरल्यानंतर सायंकाळी ४ नंतर बाजारात एकच गर्दी झाली होती. यावेळी अचानक परमेश्वर चौकातील मुख्य डी.पी. ने पेट घेतला. याकडे कोणाचेही लक्ष जाण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केल्याने डी.पी.ची आग वाढून संपूर्ण डी.पी. आगीच्या लोटात सामावला होता.

हा प्रकार व्यापारी व बाजार करूंच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरु झाली. जीवाला धोका होवू नये म्हणून सैरा - वैरा धावपळ करताना अनेकजण तोंडघशी पडल्याने किरकोळ दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. तर व्यापार्यांनी आपली शेड वाचविण्याच्या गडबडीत भाजीपाले व अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. तर काही हाथगाडे वाल्यांचे अंगूर, चिकू , मासले पदार्थ आदी धुळीस मिळाले होते. हा आगीचा खेळ जवळपास तासभर चालू होता, काहींनी दूरध्वनीवरून महावितरण कंपनीस कळविल्याने विद्दुत पुरवठा खंडित करण्यात येवून आगीवर नियंत्रण मिळविले. दैव बलवात्तराने या पळा- पाळीच्या घटनेत किरकोळ वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अश्या घटना होत असताना सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व लाईनमन कर्मचार्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे आजची हि घटना घडली असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित नागरीकातून समोर आल्या आहेत. पुढील काळात या घटना टाळण्यासाठी जीर्ण तर बदलून, अधिकचा भार कमी करावा तसेच शहरातील नागरिकांना वसुली प्रमाणे सुविधा द्याव्यात अशी रास्त मागणी अनेकांनी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी