बालाजी मानसपुरे सातासमुद्रापार !

मोटारी दुरुस्ती करणारा 'मेक्यानीक' बालाजी मानसपुरे सातासमुद्रापार !

लोहा(हरिहर धूतमल)रेल्वेच्या एसी थ्री टायर मध्ये कधी बसले नाही त्यांनी थेट विमानात बसायचे आणि चक्क विदेशी जायचे...हे तसे स्वप्नातच...परंतु मेहनत आणि कोणतीही अभिलाषा, मनाशी न धरता आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित करणाऱ्यांचे जीवनात यश दारात उभे राहते. लाईट फिटिंग करणाऱ्या बत्तीस वर्षीय लोह्याच्या तरुणाने जिद्द व कष्टातून 'ब्यान्कोक' जाण्याचे भाग्य मिळविले आहे. त्या तरुणाचे नाव बालाजी तुकाराम मानसपुरे.

लोह्यातील तुकाराम व गोदावरीबाई मानसपुरे यांचा हा मुलगा. वडील सेवक आई गृहिणी. बालाजी इलेक्ट्रिक चे रोजंदारीवर काम करणारा. काही वर्ष त्यांनी 'होळ्गे' यांच्या येथे नोकरी केली. घरोघरी जावून लाईट फिटिंग,नळ फिटिंग करत त्यांनी आपल्या एक-दोन मित्रांना सोबत घेतले..काम मिळाले त्यांच्या कामाच्या दर्जामुळे...मेहनतीमुळे..

मागील वर्षी बसस्थानका समोरील गोविंदराव कॉम्प्लेक्सं मध्ये सूर्यवंशी यांच्या दुमजली इमारतीत बालाजीने 'ओम' इलेक्ट्रिकल्स टाकले. त्याने 'प्रेसपिट' नावाच्या स्विच बटनाची जास्त विक्री केल्यामुळे त्याला रविवार २३ फेब्रुवारी रोजी विदेश म्हणजे ब्यान्कोक'ला जाण्याची संधी मिळाली.

बालाजी कधी एसी डब्यात बसला नाही. त्यान कधी स्वप्नहि पाहिलं नसाव कि तो विमानात बसेल म्हणून..पण जीवनाची रीत तशी न्यारीच..कधी काय होईल..दैव कुणी कधी जाणिले नाही..एक नोकर पोरगा..नोकरी करत घरोघरी जावून नळ-लाईट फिटिंग करतो..त्यान कधी स्वप्न हि पहिले नसावे कि, आपण विदेशात सूट-बूट..घातलेल्या हाय-फाय हॉटेलात...तेथील संस्कृतीचा जीवनाचा अनुभव घेवू म्हणून...हि गोष्ट साध्य झाली ती केंव्हा त्याच्या अथक परिश्रमातून...

घामाचे 'मोती' होतात ते या रूपाने..बदलत्या काळात 'जग' मुठीत झाले आहे. विमान प्रवास..विदेश वारी तशी 'दुर्मिळ' राहिली नाही. पण ज्या समाजात ज्या भागात माणूस जगण्यासाठी संघर्ष करतोय..जेथे आजही 'मी पणाचा' टेंभा मिरविला जातोय अशा व्यवस्थेत बालाजी ने स्वबळावर केलेली विदेशी वारी आजच्या सुखी आरामदायी जीवन जगणाऱ्या शाळकरी मुलानाही..गावात फिरणाऱ्या 'लाडोबासाठी' अंतर्मुख करायला लावणारी आहे.

मेहनत,कामाप्रती असलेली श्रद्धा या बळावर अशक्य गोष्ट शक्य होत. आपण न पाहिलेली स्वप्न आपल्या पुढ्यात उभे राहते. आज बालाजी ने भाऊ मनोज यालाही ष्ट्य़ाड केले. त्याच्या कडे चार सहा मूले काम करतात..इतर काही कंपन्यांचे,सोलार ची एजन्सी आहे. मोटारी दुरुस्ती करणारा मेक्यानिक विदेश वारी वर जातो याचा अभिमान वाटायला हवा कारण त्यांच्या कष्टाचे मोल आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी