NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

सोमवार, 24 फ़रवरी 2014

नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात शिवजयंती साजरी

छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज - कानबा पोपलवार   
नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात शिवजयंती साजरी

 

हिमायतनगर(वार्ताहर)बहुजनांचे उद्धारकर्ते छत्रपति शिवाजी महाराजांनी जाती - पतीचा विचार न करता केवळ स्वराज्य स्थापनेसाठी तमाम बहुजनांना एकत्र करून जुलमी राजवटीच्या विरुद्ध रणशिंग फुंकले होते. त्यामुळे सध्याच्या युगात छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष कानबा पोपलवार यांनी केले. 

ते येथील नांदेड न्युज लाइव्ह कार्यालयात दि.२३ रविवारी आयोजित रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त बोलत होते. प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, महाराजांनी सर्व धर्मीय लोकांना एक करून त्यांना समतेची व एकात्मतेची शिकवण दिली. हिंदू व मुस्लिम मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. एवढ्यावरच महाराज थांबले नाही तर त्यांनी तमाम बहुजन समजाला नैतिकतेची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या काळात छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचाराची देशाला गरज असल्याचेहि श्री पोपलवार म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, कार्याध्यक्ष प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्ष दत्ता शिराने यांच्यासह अनेकांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. यावेळी ग्रामीण उपाध्यक्ष परमेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष अनिल भोरे, सहसचिव साईनाथ धोबे, सहकोषाध्यक्ष फाहद खान, सल्लागार भास्करकाका दुसे, प्रकाश जैन, चांदराव वानखेडे, सदस्य दिलीप शिंदे, संजय कवडे, धम्मपाल मुनेश्वर, छायाचित्रकार म्हणून विष्णू जाधव, ज्ञानेश्वर गोडसेलवार, प्रेस फोरम संघटनेचे सचिव शे.इस्माईल, सहसंघटक रवि राठोड यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.    

कोई टिप्पणी नहीं: