NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 25 फ़रवरी 2014

यात्रा महोत्सवाला सुरुवात

अखंड हरीनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात

हिमायतनगर(वार्ताहर)येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवाला एकादशीच्या मुहूर्तावर अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने सुरुवात करण्यात आली आहे. यात ३०० हून अधिक महिला, पुरुष व लहान बालकांनी सहभाग घेतला आहे. यात्रा उत्सवाच्या काळात होणार्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती लावून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.

माघा करू.१२ दि.२५ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजताच अर्चक कांतागुरू वाळके यांच्या मधुर वाणीत श्री परमेश्वर मूर्तीचा अभिषेक महापूजा करण्यात येवून काकडा आरतीने यात्रा महोत्सव तथा सप्ताहास सुरुवात करण्यात आली. तसेच अखंड हरीनाम विना पारायण सोहळ्यासह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व्यासपिठाचार्य हभप. ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या पारायण सोहळ्यास ५०० हून अधिक भाविक - भक्तांनी उपस्थिती दर्शवून सहभाग घेतला आहे. सप्ताहाच्या आठ दिवस दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी व विना पारायण, प्रवचन, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन आदी कार्यक्रम परमेश्वर भजनी मंडळाच्या सहकार्याने नित्यनियमाने होणार आहेत. पहिल्या दिवशी श्री दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना येथील व्यापारी रामराव सूर्यवंशी यांच्या तर्फे केळीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

पारायण सोहळ्याची सुरुवात मंदिर समितीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर, महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे सचिव अनिल मादसवार, कानबा पोपलवार, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, धम्मपाल मुनेश्वर व गावकरी मंडळीच्या उपस्थिती करण्यात आली आहे. 

कोई टिप्पणी नहीं: