श्री परमेश्वर भव्ययात्रा महोत्सव

महाशिवरात्र निमित्त श्रीपरमेश्वर देवस्थानच्या भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन ..
१ लाख ६१ हजाराच्या बक्षिसांची लयलूट 



हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध महाराष्ट्र - आंध्रप्रदेश - कर्नाटक परिसरात ख्यातीप्राप्त झालेल्या हिमायतनगर(वाढोणा - वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सदर यात्रेला दि.२५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तरी श्रीच्या यात्रा महोत्सवात तमाम भाविक - भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरून हजेली लावून श्री दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे. सदर यात्रा महोत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक - सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी १ लाख ६१ हजाराची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सव हा १५ दिवस चालणार असून, याची सुरुवात दि.२५ फेब्रुवारी पासून होऊन दि.१४ मार्च पर्यंत चालणार आहे. दरम्यान सात दिवस काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सोहळा, इर्तन, प्रवचनाने सप्ताह साजरा केला जाणार असून, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर हे सांभाळणार आहेत. या सात दिवसाच्या कालावधीत नामांकित कीर्तनकारांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जाणार आहे.  दरम्यान माघ कृ.१३ दि.२७ रोजी महाशिवरात्री दिनी मध्यरात्री १२ ते ०३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वराचा अभिषेक सोहळा, महापूजा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष मा.तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर मंगलमय सोहळ्यात श्रीचा अलंकार सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवसापासून भाविक - भक्तांना अलंकार रुपी श्री परमेश्वराचे दर्शन दि.०४ मार्च दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे. त्यानंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत, शालेय भाषण, विविध गुणदर्शन अश्या सांस्कृतिक व खेळ स्पर्धा संपन्न होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी पशु व कृषी प्रदर्शन यासह शंकर पाटाचे आयोजन करण्यात आले आहे. शंकर पटात प्रथम येणाऱ्या बैलजोडीस ११००१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच चिमुकल्या बालकांसाठी सुदृढ बालक स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच भजनी मंडळ व संगीत प्रेमींसाठी भव्य भजन स्पर्धा, संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. भजन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास ५००१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्धा व कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, कुस्ती स्पर्धेत मनाची कुस्ती होणार असून, यात जिंकणाऱ्या मल्लास प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपयाचे बक्षीस तर कब्बडी स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या संघास ७००१ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मंदिर समितीने ठरविल्या प्रमाणे दिले जाणार आहे.  

महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्या निमित्ताने मंदिर रंग रांगोटी करण्यात आली आहे. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या १५ समित्यांची स्थापना करण्यात येउन, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात अली आहे. आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात सर्व - भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मा.तहसीलदार साहेब, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर व गावकरी मंडळीनी केले आहे.     

  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी