NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

सोमवार, 25 जुलाई 2016

पोखरला जातो टेंभीचा माळ

अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने पोखरला जातो टेंभीचा माळ 

हिमायतनगर(प्रतिनिधी)महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित व स्वार्थी कारभारामुळे पांडवकालीन अबाबकरच्या माळातून सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांची मोड - तोड करून जेसीबी मशीन व 15 ते 20 ट्रकच्या सहाय्याने राजरोसपणे मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. परिणामी पर्यावरणाला हानी पोंचत असून, इतिहासकालीन माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हिमायतनगर शहरापासून दक्षिनेस असलेल्या टेभी, आंदेगाव, दरेसरसम, पवना रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या इतिहासकालीन आबाबकरचा माळ आहे. सादर माळातुन पांडवकालीन युगात माहूर गडाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला होता असे जुन्या जाणकारातून सांगितले जाते. त्यामुळे या माळाला इतिहासकालीन महत्व असून, आजही अनेक जण या माळावर पूजा - अर्चना करण्यासाठी येऊन जेवणाच्या पंगती उठवितात. मागील काळात झालेल्या मुसळधार पावसाने आजघडीला हा माळ हिरवळीने बहराला असून, विविध झाडे, फुलांच्या सुगंधाने दरवळला आहे. या ठिकाणी मागील सात वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपण केलेली झाडे अस्तित्वात आहे. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांना आसरा झाला  असताना गेल्या काही वर्षांपासून येथील माळावर विनापरवाना उत्खनन करून दगड, मुरूम काढले जात आहे. परिणामी 20 ते 30 फुटापर्यंतचे मोठे खड्डे पडले आहे. गेल्या काही दिवसापासुन या ठिकाणी गौण खनिज माफियांनी धुमाकूळ माजविला असून, जेसीबी मशीनच्या साहाय्याने 15 ते 20 ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुरुमाची वाहतूक करीत आहेत. काही जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती कार्यरत मंडळ अधिकारी, तलाठी याना दिली असताना अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मुरूमाचे सर्रास उत्खनन करून पर्यावरणाला बाधा पोंचविली जात आहे. खरे पाहता गौण खनिज काढण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरून परवाना मिळाल्यानंतर सूर्योदय ते सूर्य मावळणार पूर्वी करावयाचे आहे. परंतु या सर्व नियमन बगल देत माळ खोदल्या जात असल्याने इतिहासकालीन अबाबकरच्या माळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 

वन्य प्राण्यांच्या होतात शिकारी 
--------------------
या जंगल परिसरात असलेल्या घोरपड, ससे, हरीण, मोर लांडोर, नीळ आदींच्या शिकारी भी गौण खनिजाची करणाऱ्या तस्करांकडून केली जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. गौण खनिजाचे उत्खनन केले जात असताना सामाजिक वनीकरणासह महसूल विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. अनेकांनी गौण खनिजबाबतची माहिती तहसीलदार व मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठ्यांना दिली. यावरून दि. 25 रोजी या भागातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यानी गौण खनिजाचे वाहने पकडली होती. परंतु त्यांच्यावर काय कार्यवाही झाली, किती दंड लावला हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सुद्धा सायंकाळपर्यंत या भागातून मुरुमाचे उत्खनन सुरूच असल्याचे या भागातील नागरिकांनी नाव सांगण्याच्या अटीवर छायाचित्रासह आमच्या प्रतिनिधीला दिली. कार्यवाही टाळण्यासाठी मुरूम तस्करांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक देवाण घेवाण केल्याची चर्चा नागरीकातून करण्यात येत असल्याने जिलाधिकारी सुरेश काकांनी यांनी याकडे लक्ष देऊन उत्खनन केलेल्या मालाच्या ठिकाणची जायमोक्यावर पाहणी करून चौकशी करावी. आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून इतिहासकालीन अबाबकरच्या मालाचे अस्तित्व टिकवून ठेवावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.  

रविवार, 24 जुलाई 2016

नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद

पावसाचा हाहाकार.. जवळगाव - हिमायतनगरातील शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान  
आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच
2013 नंतर नदी - नाले - ओढे ओव्हर फ्लो 
पावसामुळे जनजीवन विस्कळीत... 
हिमायतनगर(अनिल मादसवार) मागील दहा दिवसाच्या विश्रांती नंतर दि. 24 रविवारी दुपारी शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसाने हाहाकार माजविल्याने सर्वच नाले  खळाळून वाहू लागले. तर अनेकांच्या शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.  पावसाचा जोर अधिक असल्याने नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल तीन तास वाहतूक बंद झाली होती. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हे मात्र खरे आहे. पुराची स्तिती उद्भवली असताना देखील महसुलाचे एकही कर्मचारी उपस्थित झाले नसल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच काय..? असा संतप्त सवाल पुराचा सामना करणार्यांनी उपस्थित केला आहे.  

सन 2013 नंतर हिमायतनगर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. तब्बल 2 तास चाललेल्या पावसामुळे पोटा, सोनारी, टेभी, सवना ज, महादापूर, सरसम बु, जवळगाव, कमारवाडी, पारवा, कांडली  भागात रविवारी दुपारी 3 वाजता पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेती व परिसर जलमय झाली. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढलेला नसल्याने पुराच्या पाण्याचे अनेकांच्या शेत जमिनी चिरून मार्ग काढला. त्यामुळे हदगाव - हिमायतनगर रस्त्यावरील जवळगाव ते कामारवाडी मध्ये असलेल्या तीनही पुलावरून पाणी जात होते. या पावसाने शेतीत काम करणाऱ्या शेतकर्याना रोखून धरले परंतु पाऊसामुळे आखाडे पाण्यात आल्याने जीव वाचविण्याच्या भीतीने शेतकरी, मजुरांनी घराची वाट धरली. मात्र घर गाठताना पुलावरून मार्ग काढण्यासाठी टोंगळ्या एवढ्या पाण्यातून एकमेकांना साखळी पद्धतीने धरून घर गाठावे लागले. या पावसाने जवळगाव येथील महावितरण कार्यालय, मोबाईल टॉवर व गावातील रस्ते आणि अनेक घरे पावसाच्या पुराणे व्यापल्याने जिकडे - तिकडे पाणीच पाणी दिसत होते. तसेच हिमायतनगर शहराजवळील रेल्वेस्थानक व भोकर - नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल 2013 नंतर ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने जवळपास 2 कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पोलीस पथक आल्यानंतर वाहनांना मार्ग काढून दिल्याने वाहतुक सुरळीत झाली. दरम्यान आज झालेल्या पावसाने 100 मिलिमीटरचा आकडा पार केला असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

२० गावांचा संपर्क तुटला..

हिमायतनगर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी - नालायच्या कार्थावरील पाणी काठावरील शेतात गेल्याने उभारी घेऊ पाहत असलेली पिके पुन्हा पाण्यात आली आहेत. पावसामुळे जवळगाव, घारापूर, जवळगाव, सोनारी, पोटा, विरसनी, टेंभी, सवना, अन्देगाव, जीरोणा, एकघरी, वाशी, गणेशवाडी, पार्डीसह हिमायतनगर शहरातील पुलावरून पाणी जात असल्याने जवळपास २० ते २५ गावाचा संपर्क तुटला होता. पाऊस ओसरल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता वाहतूक सुरळीत झाली असली तरी नदी, नाले, ओढे बंधारे तुडुंब भरून वाहत होते. रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील रस्त्यावर पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग अजूनही बंद आहेत. अनेकांच्या घरात व शेतीत पाणी घुसल्याने पुन्हा शेतकरी व गरीब, सामान्य नागरिक नुकसानीच्या गर्तेत सापडला असून, हिमायतनगर व ग्रामीण भागातील जुन्या इमारती व घरांच्या भिंती पाण्यामुळे भिजून जमीनदोस्त झाल्या आहे. एकूणच आजच्या पावसाने शेतकरी, मजुरदार, व्यापारी नौकरदार व सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी  निघालेल्या कुटुंबाना हैराण करून सोडले. आजच्या पावसाने हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला तिसऱ्यांदा पुर आल्याने मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली.   

शिक्षणासाठी विद्यार्थी संतप्त...

शाळेत जाणाऱ्या बसेस वेळेवर नसल्याने केला रास्तारोको
हिमायतनगर (प्रतिनिधी) मानव विकास मिशनच्या बसेस शाळा - कॉलेजच्या वेळेवर धावत नसल्याने सरसम येथील विद्यार्थ्यांनी आज सकाळी संतप्त होऊन हिमायतनगर कडे जाणाऱ्या बसेस रस्त्यात अडवून संताप व्यक्त केला. त्यामुळे जवळपास 2 तास नांदेड - किनवट रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

सविस्तर असे कि, हदगाव आगरकडून हिमायतनगर तालुक्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी 7 बसेस मंजूर केल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात केवळ 4 ते 5 बसेस पाठविल्या जात असून, त्याही वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत शाळेत पोन्चने अवघड होत आहे. मंजूर बसेसपैकी नव्या - कोऱ्या बसेस मोठ्या शहराच्या मार्गावर वळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खताच्या बसेस पाठविल्या जात आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या वेळी बस नसल्याने तसेच सकाळच्या वेळी एकच बस येत आहे. तालुक्यातील कामारी, कामारवाडी खैरगांव, जवळगांव, वाघी, दिघी, विरसणी, कंरजी, येथील ९२ विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच सरसम येथील ४२ विद्यार्थि विद्यार्थी / विद्यार्थीनी हिमायतनगर येथील कॉलेज मध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्या करीता हे सर्व विद्यार्थी हदगांव हिमायतनगर या महामंडळाच्या बसमधुन प्रवास करतात. परंतु कॉलेजच्या वेळात हि एकच बस धावत  आसल्याने सरसमच्या मुला -मुलीना बस मध्ये बस्नायुस्तही किंवा उभे राहण्यासाठी सुद्धा जागाच मिळत नाही. त्यामुळे सरसमसह अनेक विद्यार्थीचे शैक्षनिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सरसम बु. येथील विद्यार्थीनी आज दि.21 गुरुवारी सकाळी हदगांव हिमायतनगर बस मध्ये आम्हाला जागा द्या नसता आम्ही बस जावू देणार नाही.  असा पवित्र घेऊन महामंडळाची बस रोखून धरली तसेच आगार प्रमुखाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला . त्यामुळे सरसम बस्थानक राेडवर रस्ता राेखो झाला. तब्बल दोन तास झालेल्या या प्रकामुळे भाेकर बंदोबस्तावरुन परत येणाऱ्या ईस्लापुर, किनवट येथील पाेलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थाची समजात घातली. आणि संबंधित परिवहन अधिकारी यांच्याशी बस वाढविण्यास सांगीतले. यावरही हि समस्या न सुटल्यास उद्या येथील विध्यार्थी हदगांव - भाेकर आगरावर जॅम होऊन मागण्याचे निवेदन सादर करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ताठ परिवहन मंत्री दिवाकर रावते व विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष देऊन बस अभावी विद्यार्थ्यांचे होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. 

उंटअळीचा प्रकोप

पावसाच्या उघडीपनंतर सोयाबीन, मूग, उडीदावर उंटअळीचा प्रकोप   
हिमायतनगर(प्रतिनिधी) मागील आठवड्यात झालेल्या संततधार पावसांनंतर गेल्या चार दिवसापासून सोयाबीन, मूग उडीदारावर तीन नमुन्याच्या आळींचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महागडी औषधी फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. 

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या तर नदी - नाल्याच्या काठावरील काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कशीबशी पिके उगवल्यानंतर गेल्या आठवडयात सतत चार दिवस पावसाची संतधार सुरु होती. त्यामुळे कापूस, सोयाबिन, मूग, उडीद, तूर यासारख्या पिकांना बळ मिळले नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पिवळी पडली तर काहींची उन्मळून गेली आहेत. पिकांचा रंग बदलण्यासाठी फवारणी केली, परंतु याचा उपयोग झाला नाही त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर मिळालेल्या उघडीपने पिके वाऱ्यावर डोलताना पाहून शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु गेल्या चार दिवसापासून सोयाबीन, मुग, उडिदाच्या पिकावर पाने कुरतडणाऱ्या उंटअळी, हिरवी आळी व केसाळ आळी या तीन प्रकारच्या   अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली असून, आळ्या व किड्यांनी पाने कुर्तडल्यामुळे पिकांच्या पानाची चाळणी झाल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. अगोदरच गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी पिकांच्या नुकसानीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबला. यंदा चांगले उत्पन्न येईल ही अशा बाळगत असताना पिकांवर झालेल्या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला असून, पिकाच्या उत्पादनात घट होण्याच्या चिंतेने अडचणीत आला आहे. 

2013 मध्ये अश्याच अतिवृष्टीच्या फटक्याने शेतकरी अडचणीत आले होते, त्यावेळी सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला शेंगा लगडल्यानंतर त्या शेंगातून बीजांकुर फुटू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला बगल देऊन कपाशीची लागवड केली. दोन वर्ष अल्प पर्जन्यमानामुळे कापसाला धोका झाल्याने यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला. परंतु आता सोयाबीनसह अन्य पिकावर अळ्यांचे आक्रमण वाढत असल्याने निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांना साथ देत नाही असेच म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता यावर अंकुश मिळविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांवर होत असलेल्या उंटआळी व किडीच्या प्रादुर्भावर केल्या जाणाऱ्या उपपयोजनांची माहिती देऊन चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दिलासा द्यावा अशा मागणी केली जात आहे. 

अफवेने विद्यार्थी व तरुणाई सैराट

सहस्रकुंड पर्यटनस्थळी आर्ची येणारच्या अफवेने विद्यार्थी व तरुणाई सैराट

हिमायतनगर (प्रतिनिधी) नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध असेलल्या सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी सैराट फेम प्रणिता उर्फ पिंकू राजगुरू अर्थात आर्ची येणार असल्याच्या अफवेने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहस्रकुंडकडे ओढ वाढली आहे. त्यामुळे अर्चिच्या नादात खुळे झालेले विद्यार्थी व तरुण सैराट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्याचे झाले असे कि, समाजमाध्यमातून कोणीतरी अफवा पसरविला कि शनिवारी विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी सैराट फेम आर्ची येणार आहे. सोशियल मीडियावरून ही पोस्ट व्हायरल झाली व गेल्या चार दिवसापासून या विषयावर खल सुरू झाली. लाईक आणि कमेंटचा यावर पाऊस पडल्याने आर्ची येणार... आर्ची येणार... हा विषय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणाईपर्यंत पोहोचल्याने दि.22 व 23 जुलै रोजी विद्यार्थी व तरुणांनी शाळेला दांडी मारून तर कुणी सुट्टी घेऊन सहस्रकुंड गाठले. ते अर्चिच्या प्रतीक्षेत सायंकाळ पर्यंत वाट पाहून आर्ची आली नसल्याने माघारी फिरले. काय तर आर्चीची एकंदरीत लहान बालकांसह तरुणांना " याड " लागल्याने सारेच सैराट झालायचे चित्र दिसून आले. तर हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर येथून अनेकांचे दूरध्वनी खणखणत असून जो तो " बीएमडब्लू गाडीने " आर्ची येणार आहे असे समजले. किती वाजताच टाइम आहे..विचारून आम्हाला सांगा असे फोन आमच्या प्रतिनिधीला विचारले आहे. त्यावरून प्रस्तुत प्रतिनिधीने सहस्रकुंड संस्थानचे सचिव सतीश वाळकीकर यांच्याशी फोनकरून विचारणा केली. त्यांनी सांगितले कि आम्ही सुद्धा या चर्चेने हैराण झालो आहे. खात्री करून घेण्यासाठी भोकर, नांदेड विश्राम ग्रह व पोलिसांना माहिती विचारली. परंतु ते सर्व अफवाच आहे असे त्यांनी सांगितले.  

बुधवार, 13 जुलाई 2016

पैनगंगेला महापूर...

नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्यात... 
विदर्भ - मराठवाड्याचा एक संपर्क तुटला तर दुसरा बंदच्या मार्गावर

     
हिमायतनगर (अनिल मादसवार) चार दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेला महापूर आला असून, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तर गांजेगाव पुलावरून ५ ते ६ फुट पाणी वाहत असल्याने विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क दोन दिवसापासून तुटला आहे. तर हिमायतनगर - उमरखेड मार्गावरील बोरी पुलाखालून पाणी जात असल्याने हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता बळावली आहे.  

पाण्याचा प्रवाह असाच वाढत राहिला तर नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदी काठावरील घारापुर, कामारी - डोल्हारी, कोठा, एकंबा, सिरपल्ली, बोरगडी, धानोरा ज, यासह विदर्भातील गावाला पुराचा धोका होण्याची शक्यता आहे. महापुराचा फटका नदी, नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर शेतीला बसला असून, पाण्याची पातळी तास - तासाने वाढत असल्याने अन्य काही गावाला पुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस थांबला असला तरी पाण्याचा प्रवाह चालूच असून, ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा पाऊस होण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे. वृत्त लिहीपर्यंत तालुक्यात कोणतीही वित्त अथवा जीवित हानी झाली नाही. परंतु पैनगंगेला आलेल्या पुराची स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांनी नदी काठावरील गावकर्यांना तहसीलदारच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला असून, स्थानिक तहसील गजानन शिंदे, मंडळ अधिकारी राठोड यांच्यासह सर्व तलाठी बांधवाना स्थानिकला तळ ठोकून राहावे असे आदेशित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

वरील ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांचा जीव टांगणीला आला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचे पथक अद्याप कार्यरत झाले नसल्यामुळे नदीकाठावरील गावकर्यांची चिंता वाढली असून, सन २००६ साली अश्याच महापुराने तालुक्यातील कामारी, घारापुर, डोल्हारी, पळसपूर, सिरपल्ली, एकंबा, कोठा तांडा, कोठा ज, बोरगडी तांडा नंबर - ०१ व तांडा नंबर - ०२, विरसनी, दिघी, यासह अन्य गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक गावातील नागरिकांना स्थलांतरित करून, अन्न व निवार्याची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली होती. तीच परिस्थिती 2016 साली पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत आहे. 

याबाबत तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधून पुरस्थितीबाबत यंत्राना सक्रिय आहे काय..? असे विचारले असता नाही नाही...काहीच नाही, अजून काहीच नाही... पुराचा धोकाच नाही, पाऊस नाही... वरून पाणी येणार नाही, त्याच्यामुळे घाबरायचे काही कारण नाही असे म्हणून फोन बंद केला. यावरून येथील तहसीलदार महाशयांना नदीकाठावरील नागरिकांच्या सुरक्षेबाबत काहीच देणे घेणे नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. 

सोमवार, 11 जुलाई 2016

पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीत

नांदेड(अनिल मादसवार)गेल्या चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून बसला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती समाधान कारक आहे. दरम्यान गोदावरी नदी व तिच्या उपनद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. 

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी रात्रीपर्यंत होता. सोमवारी थोडी उघडीप झाल्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. परंतु इसापूर धरणाच्या वरच्या बाजूने पाण्याची आवाका कमी असल्याने पाणी साठा कमी आहे. चुकून इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली होती. परंतु अजूनही धरणात पाणीसाठा कमी असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग, नांदेड यांनी कळविले आहे. पैनगंगा नदी जरी धोक्याची पातळी ओलांडलेली असली तरी हे पाणी पावसाचेच असून, इसापूर धरणाचे नाही. पावसाच्या पाण्याने नदी भरून वाहत असली तरी धोका पत्करून एक शेतकरी आपल्या गुरांसह गांजेगाव बंधाऱ्याच्या पुलावरून पैलतीर गाठत पैनगंगा नदी पार करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दि.11 रोजी पाण्याचा प्रवाह वाढला असून, व्रत लिहीपर्यंत सध्यातरी बंधाऱ्याचे गेट जैसे थेच असून, पुराणे धोक्याची पातळी ओलांडली असून, कोणत्याही क्षणी पूल तुटेल अथवा बाजूने बांध फोडून पाणी निघण्याची शक्यता नाकारता येत नासल्याची माहिती सिरपल्लीचे पोलीस पाटील संभाजी पाटील यांनी दिली.

आजघडीला पुलाच्या वरून पाणी जात असल्याने ढाणकी मार्गे विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुंटल्याने गेल्या आठ दिवसापासून एस.टी.बस बंद पडली आहे. यामुळे दळण - वळणासह जनजीवन विस्कळीत झाले असून, पुराचे पाणी वाढल्यास परिसरातील शेती व गावांना नुकसानीचा सामना करावा लागणार असल्याचे मदनराव जाधव यांनी सांगितले.  

गुरुवार, 7 जुलाई 2016

डीपी चोरी

तीन वर्षानंतर हिमायतनगरात पुन्हा डीपी चोरी
हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यात 2012 च्या घटनेनंतर थांबलेल्या डीपी चोरीच्या प्रकाराला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. बुधवारच्या मध्यरात्री विदुत पुरवठा सुरू असताना अज्ञात चोरटयांनी खाडाखोड करून तांब्याचा तार आणि ऑईल लांबवीले आहे. ही घटना शहरापासून हाकेच्या अंतरावरील खडकी बा. रस्त्यावरील शेतात घडली. 

शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या पाठीमागून खडकी बा.गावाकडे जाणारा पांदण रस्ता असून, या रस्त्यावर येथील नगराध्यक्ष अ. अखिल अ.हमीद यांच्या वडिलांच्या नावाने जमीन आहे. त्यांच्या सर्वे क्रमांक 373 मध्ये असलेल्या महाराष्ट्र राजय विद्दुत महामंडाळाच्या वतीने 25 के.व्ही. रोहित्र बसविले असून, परिसरातील 8 ते 10 शेतकऱ्यांना विद्दुत पुरवठा केला जातो. परंतु दि. 06 बुधवारच्या मध्यरात्रीच्या अज्ञात चोरट्याने विद्दुत पुरवठा सुरू असलेल्या डीपीमध्ये खाडाखोड करून पुरवठा बंद केला. आणि खांब्याच्या मधोमध बसविलेली 25 के.व्ही.रोहित्राची तोडफोड करून त्यातील महागडे ऑईल, तांब्याचा तयार व अन्य किमती साहित्य लांबवीले आहे. सदर घटना ही शहरापासून हाकेच्या अंतरावर घडली असून, जवळपास 45 हजार रुपये किमतीचे डीपी कॉपर, 10  हजार रुपये किमतीचे ऑईल असे 65 हजाराचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. यामुळे सदर डीपीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असून, डीपीवरील कीट- कैट, लोखंडी डब्बा, जश्यास तास फेकून देऊन चोरटे पसार झाले आहेत. सकाळी शेतकरी अ.हमीद हे शेतात आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला, याबाबतची माहिती त्यांनी महावितरण कंपनीच्या संबंधितास दिली. वृत्त लिहीपर्यंत याबाबत गुन्ह्याची नोंद झाली नसल्याने महावितरणचे अधिकारी याबाबत उदासीन असल्याचे बोलले जात आहे.   

चोरटे पुन्हा सक्रिय
----------------------
हिमायतनगर तालुक्यात तीन वर्षांपूर्वी सहा महिन्यात तब्बल 16 डीपीतील तांब्याची तार व ऑईलची चोरी झाली होती. असाच प्रकार करताना तालुक्यातील पार्डी - टेभी रस्त्यावर एक चोरट्याचा शोक लागून दि.19 ऑकटोबर 2012 रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर डीपीतील तारा चोरांच्या टोळीचा पारडं फाशी झाला. त्यात जवळपास 5 ते 7 लाखाचा मुद्देमालाही पोलिसांनी जप्त केला होता. तेंव्हापासून तालुक्यात डीपीचोरीचा घटना थांबल्या. परंतु तीन वर्षांनंतर पुन्हा डीपी चोरीची घटना घडल्याने चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचॆ शंका व्यक्त केली जात आहे. 

नाम फॉडेशन वृक्षारोपण कार्यक्रम

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे - नाईक 

किनवट(प्रतिनिधी)भविष्यात मानवी जिवन सुरक्षीत राहणे राहून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान आपल्या कुटुंबाच्या संख्येनुसार एक झाड लावुन त्याचे संवर्धन करावे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, निसर्गाच्या भरवशावर शेती करणा-या शेतक-यांना पाण्याचे संकट कधी ओढवणार नाही. उत्तम आरोग्यासाठी मानवी जिवणाला लागणारे ऑक्सीजन हे वृक्षवेली देऊ शकते हे जाणून नाम फॉडेशनने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो अभिनंदनिय असल्याचे प्रतिपादन आ.प्रदिप नाईक यांनी केले.

ते गुरुवार दि.07 रोजी नाम फॉउडेशन, भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परीवाराच्या वतीने किनवट माहुर रस्त्यावरील बैलबाजार परीसरात वक्षारोपन व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाप्रसांगीं बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपन व संवर्धन उपक्रम राबविने काळाची गरज आहे. वृक्षारोपन करतांना जास्त ऑक्सीजन देणारी झाडे लावावी, तसेच आपल्या घराच्या अंगणात औषधी वनस्पती असलेल्या तुळशीचे झाड लावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रसांगी मंचावर मा.आ.भिमराव केराम, प्रा.किशनराव किनवटकर, ता.कृ.अधिकारी संजय कायंदे, नगर परीषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, पो.नि. डॉ. अरुन जगताप यांची प्रमुख उपस्थितीती होती. प्रास्ताविक भाषणातुन बोलतांना डॉ.अशोक बेलखोडे म्हणाले कि, आज आम्ही शहरातील बैल बाजार मार्केट, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्मशानभुमी आदी ठीकाणी वृक्षारोपन करीत आहोत लवकरच किनवट शहरात उपलब्ध असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन शहराच्या सुंदरतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ट्रीगार्ड सह ५० झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास रीपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगरध्यक्ष सुनिल पाटील, मा.नगरध्यक्ष के. मुर्ती, मा. नगरध्यक्ष अरुन आळणे, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग प्रभाकर नेम्मानिवार, उपाध्यक्ष अभय महाजन, नगरसेवक गजानन बोलचेट्टीवार, संजय सिरमनवार, प्रा.बेंबरेकर सर, कचरु जोशी, महेश चव्हाण तंबाखुवाला, ता.आरोग्य अधिकारी डॉ.टोंम्पे, सुनिल आयनेनीवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी रुग्णालय परीवाराचे संजय बोलेनवार, नितीन टापरे, मनोज चनमनवार, संदिप चनमनवार, रजत अवसात, कुलदीप चव्हाण, अरविंद जाधव, केदार महाजन, कोंडे काकु यांनी तथा प्रा.सुनिल व्यवहारे, प्रा.आनंद भंडारे, प्रा.अंजुश राव , प्रा.वायाळ यांनी परीश्रम घेतले. तर उपस्थितांचे आभार नामचे तालुका समन्वयक गिरिष नेम्मानिवार यांनी मानले.

रमजान ईद साजरी

ईदगाह मैदानावर रमजान ईद साजरी...
खरीप हंगाम चांगला येऊ दे..
हिमायतनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात एकतेचा संदेश देणाऱ्या हिमायतनगर शहरातही रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून, त्या नमित्ताने येथील मुस्लिम बांधवानी शहराबाहेरील इदगाह मैदानात सकाळी ९.३० वाजता सामुहिक नमाज अदा केली. यावेळी शांतातेसह यंदाचा खरीप हंगाम चांगला येऊ दे आणि बळीराजावर कृपादृष्टी करण्याची विनवणी (दुवा) करण्यात आली. त्यानंतर लहान थोरांनी एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.  

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवाना महत्वपूर्ण रमजान ईदचा गेल्या महिन्याभराच्या उपवासानंतर दि.07 गुरुवारी आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी इदगाह मैदानावर जमलेल्या समाज बांधवाना मुफ्ती वसीम अहेमद शेकूल हदीस यांनी मार्गदर्शन करून सर्व धर्मासोबत शांततेने नंदान्याबरोबर भाईचार्याची परंपरा कायम ठेऊन अल्लाहने दाखविलेल्या भक्ती मार्गावर चालण्याचा संदेश दिला. तसेच ईद - उल - फित्रची नमाज अदा करून गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सावरण्याची संधी मिळावी आणि शहराची कायमसवरूपी पाणी टंचाईचे संकट दूर व्हावे अशी दुवा करण्यात आली. यावेळी मजहर मौलाना यांच्यासह शहरातील सर्व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात लावण्यात आलेल्या आकाश पाळण्याचा आनंद लहान चिमुकल्यांनी घेतला. दरम्यान आमंत्रिताना शिरकुर्मा फराळ देवून मुस्लिम बांधवानी एकमेकाविषयी प्रेम भावना प्रकट केली. यावेळी शहरात यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून आले. तर वडीलधार्या माणसासह चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ईदच्या सणाचा उत्साह दिसत होता.
 
चहा - फराळासह हिंदू बांधवानी दिल्या शुभेच्छा 
---------------------------- 
ईदच्या निमित्ताने श्री परमेश्वर मंदिर व गावातील हिंदू बांधवाच्या वतीने इदगाव मैदानावरून नमाज आदा करून परत येणाऱ्या मुस्लिम बांधवांचे स्वागत करून शुभेच्छा देणार आल्या. तसेच चहा - फराळाचे आयोजन करून एकमेकांप्रती प्रेम भावना प्रगट केली.  

मंगलवार, 5 जुलाई 2016

शेतकरी मदतीपासून वंचीत

कापसाच्या दुष्काळी अनुदान व पीकविमा 
न काढलेले शेतकरी मदतीपासून वंचीत
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात सन २०१४ / १५ या खरिप हंगामातील कापसाच्या ४० % अनुदानापासुन शेतकरी वंचीत राहीले असुन, महाराष्ट्र शासनाने हिवाळी अदिवेशनात घाेषना करताना ६० % साेयबीनला तर ४० % कापसाला दुष्काळी अनुदान दाेन हेक्टर पर्यतची मर्यादा ठरवुन घाेषना केली हाेती. विराेधकानी वेळाेवेळी विधानसभेत शेतकर्याचा आवाज उठवुन दुष्काळी अनुदान मिळवून दिले. यातून साेयाबीनचे अनुदान शेतकर्याच्या बँक खात्यात जमा झाले, मात्र दिलेल्या घाेषने प्रमाणे कापसाचे ४०%दुष्काळी अनुदान शेतकर्याना आजपर्यत मिळाले नसून, पीक विमा न काढलेले कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा मदतीपासून वंचित राहिले आहेत.

सध्या तालुक्यात पावसाने एकाच दिवसात १०४ मि मि पाऊस झाल्याने अतीव्रष्टी फटका नदी - नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्याने पेरण्या केल्या साेयाबीन, कापुस, तुर, उडीद, मुग, ज्वारी यासह सर्वच पिके जमीन खरडून वाहुन गेले, तर काही पिके मातीत दबुन गेली. त्यामुळे शेतकर्याना दुबार पेरणीचे संकट आले आहे, होते नव्हते ते पैसे खर्च केलं तर घरातील लक्ष्मीच्या गळ्यातील दागीने विकुन बियाणे खरेदी केले हाेते. ते पेरलेले बियाणे वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणी करण्यासाठी शेतकर्याकडे पैसे नाहीत. बँक कर्जाचे पुर्नगठण करण्यास तयार नाही सावकार जवळ येवु देत नाही. अश्या दुहेरी जर संकटात शेतकरी सापडला आहे. 

महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ४०% कापसाचे अनुदानाच्या याद्या वेळेत पुर्ण केल्या असत्या तर आज पर्यत शेतकर्यानी पेरणीसाठी अनुदानाची रक्कम कामी आली असती. परंतु सते संबधित महसुल अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता कापुस अनुदानाच्या याद्या करण्याचे काम चालु असल्याचे सांगतात. आणि महसुलाचे अधिकारी अद्याप रक्कम उपलब्ध झाली नसल्याचे सांगून हातवर करून शेतकर्याना चकरा मारायला लावत आहेत. तर बैंकेत अधिकारी व दलाल शेतकर्यां वेठीस धरून अनुदानातील रक्कमेवर डोळा ठेवून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार करीत आहेत. अश्या वृत्तीमुळे अनेक शेतकरी शासनाच्या दुष्काळी अनुदानापासून वंचीत असून, यास कारणीभूत महसुल अधिकारी, कर्मच्यार्यावर याेग्य कार्यवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तसेच विमा न काढलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने 50 पैस्या पेक्षा कमी आणेवारी असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 2015 च्या निर्णयानुसार दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या मंडळ निहाय जाहीर केलेल्या रक्कमेच्या 50 टक्के रक्कम मिळण्याची प्रतीक्षा आहे. परंतु या रक्कमेत भेदभाव केला जात असल्याची चर्चा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, नियमाप्रमाणे सर्वाना कापसाच्या क्षेत्राप्रमाणे समान लाभ मिळवून तातडीने वितरित करण्यात यावे. अशी रास्त मागणीही दुष्काळग्रस्त शेतकरी करीत आहेत. 

रक्कम अद्याप प्राप्त नाही - गजानन शिंदे 

सन 2015 साली पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रक्कमेत 50 टक्के रक्कम देण्याचे शासनाने याआधीच घोषित केले. हिमायतनगर तालुक्यातील 180 हेक्टरवरील कापूस उत्पादक शेतकरी यांनी कापसाचा विमा उतरविला नव्हता. परंतु अवर्षणाच्या त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या शेतकर्यांना सुद्धा नुकसान भरपाई पोटी 10.30 कोटी रक्कमेची मागणी शासन स्तरावर प्रलंबित असून, अद्याप सदरील अनुदान प्राप्त झाले नसल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले.

चुकीच्या ठिकाणी बंधारा उभारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

जलशिवारच्या निकृष्ट व अर्धवट बंधाऱ्याने 
आवळला शेतकऱ्यांच्या कासरा 
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे किरमगाव - टेभुर्नी शिवाराला जोडणाऱ्या कासार नाल्यावर गेल्या महिन्यात सुरू केलेल्या बंधाऱ्याचे काम गुत्तेदाराने अर्धवट ठेवून पलायन केले आहे. त्यामुळे तालुक्यात जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा बोजवारा उडाला असून, पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन बाळसे धरलेल्या पिकांच्या कुळवणीसाठी फिरणारा वखर बंद पडला असून, या नुकसानीची भरपाई देऊन बंधाऱ्याचे काम पूर्ण करून संबंधितांवर कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.   

हिमायतनगर तालुक्यातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातून मौजे किरमगाव ते खडकी बा. नाल्याला जोडणाऱ्या कासार नावाच्या नाल्यावर लाखोंच्या निधीतून बंधारा उभारण्यात आला. परंतु संबंधित गुत्तेदार व अभियंता यांनी मिलीभगत करून नाल्याचे सरळीकरण न करता बंधाऱ्याचे काम केले. खरे पाहता नाल्यातून वाहणाऱ्या पाणी जाण्यासाठी नाल्याचे खोदकाम करून यातील झाडे - झुडपे तोडणे गरजेचे होते. तसेच परिसरातील शेतकर्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनुसार जास्तीत जास्त पाणी साठून जमिनीत मुरले पाहिजे यासाठी नाल्याच्या चढावर बंधारा उभारणे गरजेचे होते. परंतु संबंधित गुत्तेदार व अभियंत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून केवळ निधी लाटण्याच्या उद्देशाने नाल्याच्या वळणावर बंधारा बांधला. 


तसेच बंधाऱ्याचे काम दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे असताना काम अर्धवट ठेवले आहे. तेही काम अत्यंत निकृष्ठ पद्धतीचे व चुकीच्या ठिकाणी करण्यात आले असून, या दर्जाहीन कामामुळे पहिल्याच पावसात बांध फुटून पिकांसह जमीन खरडून गेली आहे. सदर बंधाऱ्याचे काम गुत्तेदार व अभियंत्यांनी स्वतः आणि आपल्या मर्जीतील एक शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करून आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान केल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. तेंव्हा या कामाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आणि चुकीच्या ठिकाणी थातुर - माथूर पद्धतीने बंधारा उभारणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी राधाबाई रावते, नामदेव उट्टलवाड, श्याम नारखेडे, खंडू दंतलवाड, गजानन राणे, नेव्हल साहेब, माधव माने यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

अन्यथा न्यायालयात धाव घेणार - नारखेडे

चुकीच्या व अर्धवट बंधाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची चौकशी करवून भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन घेऊन लघु पाटबंधारे विभागाकडे गेलो. मात्र त्यांनी निवेदन घेण्यास नकार देऊन सगळे बंधारे असेच झाले, याच्याने काय होणार..? असे म्हणून आम्हाला बाहेर काढले. नुकसानीचा मोबदला मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत. यावरही न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेतकरी श्याम नारखेडे यांनी प्रस्तुत बोलून दाखविले. 

शिवीगाळ प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रार

पदार्पणातच पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी ओढवून घेतला वाद
साबांच्या शाखा अभियंत्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ 

हिमायतनगर(कानबा पोपलवार)येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याने पदार्पणालाच चव्हाण यांनी वाद ओढून घेतला असून, याबाबतची तक्रार शाखा अभियंता लहानकर यांनी पोलीस आयुक्तांच्या दरबारात पोहचविली आहे.

सविस्तर असे की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्वी हिमायतनगर येथे विश्रामग्रह होते. परंतु मागील वर्षी सदरील इमारतीत सार्वजनिक बांधकाम खात्याने उपविभागाचा दर्जा देऊन उपअभियंत्याचे कार्यालय विश्रामग्रहात सुरू केले. यामुळे सदरील विश्रामग्रह खाजगी व शासकीय व्यक्तींना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत नाही. आणि तशी सूचना बांधकाम खात्याकडून सांगण्यात येतेय. परंतु हिमायतनगर येथे नव्यानेच ईतवारा पोलीस ठाण्यातून बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक हिमायतनगर येथे येणार असल्याने त्यांच्या थांबणे व जेवणासाठी विश्राम गृहातील एक दालन उपलब्ध करून देण्याची मागणी शाखा अभियंता अजीज लहानकर यांच्याकडे दि.02 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान केली होती. सदरील इमारतीत उपअभियंत्याचे कार्यालय थाटण्यात आल्याने लहानकर यांनी विश्रामग्रह देण्यास नकार दिला.

त्यामुळे संतापलेल्या पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अजीज लहानकर यांना भ्रमण ध्वनीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांनी पदार्पणालाच वाद ओढून घेतला असल्याने त्यांच्या स्वभावाची तालुका भरातून चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान या प्रकरणाची तक्रार अजीज लहानकर यांनी पोलीस आयुक्ताकडे केली असून, उद्धट वर्तणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासकीय अधिकाऱ्यास अपमानाची वागणूक दिल्याप्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रसंगी न्यायालयात जाणार  - लहानकर

चव्हाण यांच्या अश्लील व अर्वच्च भाषेने व्यतीत झालेल्या लहानकर यांनी न्यायाच्या अपेक्षाने पोलीस आयक्तकडे तक्रार केली. परंतु सदरील तक्रारीची दखल न घेतल्यास वेळ प्रसंगी न्यायालयात धाव घेणार व अपमान कदापि खपवून घेणार नसल्याचेही लहानकर यांनी सांगितले. लहानकर हे निष्ठेने सेवा करणारे व कडक शिस्तीचे म्हणून बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध असून, ते गेल्या दोन वर्षांपासून येथे कार्यरत आहेत.

एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे - पो.नि.चव्हाण

या संदर्भात पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याशी भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधून सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता लहानकर यांना मी विनंती केली होती. अनेक वेळा विनंती करूनही ते न मानल्याने रागाच्या भरात एखादा शब्द तोंडातून निघून गेला असेल. परंतु आम्ही दोघेही शासकीय अधिकारी आहोत, कार्यालये आमच्या दोघांच्याही घराची नाहीत. वेळप्रसंगी एकमेकास मदत कार्याला हवी रागात बोललो असेल मी मान्य करतो. परंतु अपमान करण्याचा किंवा धमकी देण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले.  

60 वर्षांपासून शहरवासीयांना बसस्थानकाची प्रतीक्षा

हिमायतनगरला बसस्थानक केंव्हा होणार...? 
60 वर्षांपासून प्रवाशी व शहरवासीयांना प्रतीक्षा
 

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी मागील  60 वर्षापासून   बसस्थानक नसून प्रवाशांना बसण्यासाठी साधे टीन शेडही नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मंदिराच्या मैदानात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली व समाधीच्या ओट्यावर उन्हात व पावसात बसून प्रवाश्यांना एस.टी. बसची वाट बघावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. परिणामी श्रीक्षेत्र असेलल्या परमेश्वर नगरीत ये - जा करणार्यांना अनंत अडचनीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात आजवर अनेक पुढारी होऊन गेले तरी सुद्धा हा प्रश्न अजूनही रेंगाळत असून, हि प्रलंबित मागणी कधी पूर्ण होईल..? असा सवाल जनता विचारत आहे. 
 
तालुका तिथे आगार.. या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी मागील दहा वर्षाच्या काळात सर्वत्र झाली. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बसस्थानका बरोबर आगराचाही प्रश्न निकाली काढल्या गेला होता. मात्र नव्याने तालुका होऊन 17 वर्ष लोटलेल्या हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आगार तर नाहीच. परंतु साधे बस स्थानक सुद्धा बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात एस.टी.बसेस उभ्या केल्या जातात. या ठिकाणाहून विदर्भ - तेलंगणा आंध्रप्रदेश - मराठवाडा आदी ठिकाणच्या गाड्यांची वर्दळ नेहमीच सुरु असते. तसेच रेल्वे रुंदीकरणानंतर एक्सप्रेस व पैसेंजर रेल्वगाड्या ह्या सकाळ, दुपार व सायंकाळी ठराविक वेळेत येतात. जास्तीत जास्त प्रवाश्यांना बसचे वेळापत्रक कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. तर जेष्ठ नागरिक मात्र बसने प्रवास करण्यासाठी तासनतास भर उन्हात व पावसात वाट पाहत बसतात. प्रवाश्यांची हि समस्या लक्षात घेता परमेश्वर मंदिर कमेटीने बस उभ्या करण्याची सोय केलेली आहे. मात्र येथे टीनशेड नसल्यामुळे उन्हाळ्यात ऊन आणि पावसाळ्यात  पावसाचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या वाडी - तांड्यातील व बाहेरगावाहून ये - जा करणाऱ्या प्रवाश्यांना एस.टी.महामंडळाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील 60 वर्षापासून येथिल काही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामुळे झालेल्या ओढाताणीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. खरे पाहता बसस्थानक हे रेल्वे लाईन नजीक असायला हवे मात्र या राजकीय व्यक्तींच्या मतभेदामुळे बसस्थानकाचे भिजत घोंगडे अजूनही जैसे थेच दिसत आहे. हिमायतनगर तालुका केवळ रस्ते, नाल्या, बांधकामाच्या विकासात आघाडीवर असून, महत्वाच्या बसस्थानकाच्या प्रश्नात अजूनही मागेच आहे. आगामी काळात हिमायतनगर शहरात बसस्थानक होईल कि..? नाही.. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या तालुक्याचे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत, मागील शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्या कार्यालयात हिमायतनगर ला तालुक्याचा दर्जा मिळाला. आता नविर्वाचीत आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकाळात तरी हिमायतनगर येथील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागेल का..? अशी रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

रस्ता बनला मृत्यूचा सापळा...

गुत्तेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हिमायतनगर - पार्डी - एकघरी - वाशी रस्ता बनला मृत्यूचा सापळा...

हिमायतनगर(वार्ताहर)आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रयत्नाने 34 लाखाच्या खर्चातून हिमायतनगर - वाशी रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली. परंतु संबंधित गुत्तेदाराने हे काम अर्धवट ठेवून काढता पाय घेतल्याने खड्डेमय दयनीय झालेल्या रस्त्यातून प्रवास करणे म्हणेज मृत्यूला आमंत्रण देण्याजोगे  ठरत असल्याच्या स्नातपत प्रतिक्रिया नागरिक व वाहनधारकातून उमटत आहेत. 

मागील 7 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्कालीन ग्रामविकास मंत्री ना.सूर्यकांताताई पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधींच्या निधीतून या रस्त्याचे काम झाले होते. त्यावेळी संबंधित गुत्तेदाराने निकृष्ठ पद्धतीने काम केल्यामुळे देखरेखीची काळातच मोठं - मोठाले खड्डे पडले. तेंव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला हे सर्वश्रुत आहे. तरीदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे उन्हाळ्यात जाताना अनेक दुचाकी स्वारांना कमर लचकने, मानेची नस दबने, यासह अन्य विकार जडले आहेत. त्यामुळे पळसपूर, एकघरी, डोल्हारी, पार्डी येथील नागरिकांनी आ.नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेऊन गार्हाणे मांडले. त्यांनी नागरिकांचीच समस्या जाणून घेऊन तात्काळ संबंधित विभागास संपर्क करून दुरुस्तीची उर्वरित 34 लाखाच्या रक्कमेतून खड्डे - बुजवून समस्या तात्काळ दूर करण्याचे सुचविले. त्यावरून या वर्षी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम विशेष दुरुस्ती अंतर्गत दोन महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले आहे. ११२५० स्क्वेयर मीटर मंजूर असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामात २२५० मीटर खड्डे बुजून पैचेस मारण्याचे काम करावयास परभणी येथील एस.एस. कंट्रक्शन कंपनीच्या गुत्तेदाराने सुरुवात केली. परंतु गुत्तेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामात मुरूम मिश्रित खाडी व रस्ता स्वच्छ न करता टोळके दगड वापरून खड्डे बुजविण्यात येत असल्याने सुमार दर्जाचे काम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याची दाखल घेऊन यावर नियंत्रण ठेवणारे अभियंता सुधीर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामच दर्जा वाढविण्याच्या सूचना सादर गुत्तेदारास दिल्या होत्या. परंतु गुत्तेदाराने केवळ हिमायतनगर शहरापर्यंत काम करून पुढील काम अर्धवट ठेऊन काढता पाय घेतला आहे.

त्यामुळे ऐन पावसाळ्यात हिमायतनगर ते वाशी रस्त्यावरील खड्डेमय रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यातून खड्ड्यातून मग काढताना अनेकांना घाण पाण्यात पडून विविध आजाराला बळी पडावे लागले आहे. तर या रोडवून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना तर कुठे पाय ठेऊन चालावे हे कळायला मार्गाचा राहिला नसल्याने अल्पश्या पावसामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. या सर्व खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन धारकांना हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत असल्याचा भास होत असून, गावातील नागरिकांना बाहेरगावी जाताना वाहने घरी ठेवून २१ व्या शतकात बैलगाडीचा वापर करण्याची वेळ आली असल्याचे बोलून दाखवीत आहे. ही बाब लक्षात घेता पलायन केलेल्या गुत्तेदारच्या कामाची चौकशी करून रस्त्यावरील खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी हिमायतनगर, बऱ्हाळी तांडा, पार्डी, एकघरी, वाशी येथील गावकऱ्यांसह वाहनधारक करीत आहेत. 

शनिवार, 2 जुलाई 2016

विद्यार्थी गणवेशापासून वंचित

अजूनही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचित
नांदेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील जवळपास तीन हजारांच्या जवळ विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नसल्याने केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केली आहे.

शनिवारी दि.२ रोजी  शिक्षण व आरोग्य समितीची मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला १२ सदस्यांपैकी ११ सदस्य उपस्थित होते. यावेळी मालेगाव येथील मुख्याध्यापक एच.एस. कार्ले यांच्या निलंबनावरून नागोराव इंगोले यांनी प्रश्न उपस्थित केला असता सौ. जयश्री पावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये बळवंतराव पाटील बेटमोगरेकर आणि उपशिक्षणाधिकारी शिवाजी खोडे यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभापती बेळगे यांनी दिले. याच बरोबर आरोग्य विषयाच्या बाबतीत सध्या पावसाळा सुरू असून साथीचे रोग उद्‌भवू नयेत म्हणून आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यात जि.प. शाळेअंतर्गत १ लाख ६४ हजार ८०३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या मोफत शिक्षण कायद्यांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकणाऱ्या मुलींना व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. यातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत. याचे नेमके काय कारण असा प्रश्न उपस्थित करून तत्काळ केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी बैठकीत दिल्या आहेत. 

केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी - सभापती बेळगे

जि.प.च्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी शेतकऱ्यांचे असून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि पुस्तके शासनाकडून उपलब्ध करून दिली असतानाही मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्या निष्काळजीपणामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागत आहे. केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण सभापती बेळगे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांची निदर्शने
मुख्याध्यापक निलंबित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण सभापती यांच्या दालनासमोर निदर्शने करून निलंबनाची कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी सभापतींच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

विद्यार्थी संख्या वाढल्याने गणवेश अपुरे- शिक्षणाधिकारी सोनटक्के
गणवेश खरेदी करीत असताना विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन खरेदी केली जाते. पण पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मात्र मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोजली जाते. पण यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. कारण सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोठ्या प्रमाणात डिजिटल करण्यात आल्याने याचा फायदा झाला आहे. यामुळे गणवेश अपुरे पडले असले तरी विद्यार्थ्यांना लवकरच देण्यात येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली.

15 दिवसात जवळगाव शिवारात दुसरी मृत्यूची घटना

कुत्र्याच्या हल्लयात काळवीटाचा मृत्यू...
15 दिवसात जवळगाव शिवारात दुसरी घटना
हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे जवळगाव शिवारात 02 जुलै रोजी कुत्र्याच्या हल्ल्यात काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे. 15 दिवसातील ही दुसरी घटना असून, वनविभागाच्या हलगर्जी पानाबाबत वन्यप्रेमी नागरिक ताशेरे ओढत आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील जंगल वनविभागाच्या आशिर्वदाने नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने वन्य प्राणी आसरा शोधण्यासाठी शेत -शिवार मानवी वस्तीकडे भटकत आहेत. याचाच फायदा घेत शिकारी व वन्य प्राण्यांचे मास तस्करी करणाऱ्या टोळ्या घेत असून, हरीण, काळवीट ससे, रोही व दुर्मिळ वन्य प्राण्यांची शिकार करण्यात येत असल्याचे मागील काळात सिरंजणी रस्त्यावर झालेल्या एका शिकाऱ्याच्या मृत्यूवरून उघड झाले आहे. तेलंगना राज्याला लागून असलेल्या पोटा, दुधड, वाळकेवाडी, टाकराळा, वाशी परिसरातील जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात झाल्याने जंगल परिसर भकास झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी सध्या उगवलेल्या शेत - शिवारातील पिकांवर ताव मारण्यासाठी रानात येत आहेत. असेच हरीण व काळवीट कळप दि.02 जुलै रोजी जवळगाव शिवारात आले होते. दरम्यान उड्या मारत पाळणाऱ्या हरणाच्या कळपातील एका काळवीचा पाय चिखलात रुतल्याने फसून बसले होते. याच संधीचा फायदा घेत गेल्या अनेक महिन्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु शिकार करताना निदर्शनास आल्याने कुत्र्यांनी हल्ला केल्याचा बेबनाव शिकारी टोळ्या करीत असल्याचा संशय वन्यप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.   

वनविभागाच्या काही अधिकारी - कर्मचाऱ्यांचा शिकारी टोळ्यासोबत छुपी युती असल्याचा आरोपही वन्य प्रेमी नागरिक करीत आहेत. त्यामुळे आज मृत्यू झालेल्या त्या काळवीटाचा मृत्यू कुत्र्याच्या हल्ल्याने की..? शिकाऱ्याच्या हल्ल्यात असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. या घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जगन पवार, वनरक्षक एस.जी.जाधव यांनी केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी धंनजय मांदळे  यांनी शवविच्छेदन केल्यानंतर शासकीय नियमानुसार प्रेत जाळून टाकण्यात आले आहे.
      
मोकाट कुत्र्यामुळे पुन्हा एक हरिनाचा मृत्यू 

गेल्या महिन्यातील 17 जून रोजी सकाळी याचा परिसरात याच शिवारात एक हरिनाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या भागातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु अद्याप कोणतेही ठोस पाउल स्थानिक ग्रामपंचायत अथवा वन विभागाने उचलले नसल्याने 15 दिवसानंतर एका नर जातीच्या हरीण (काळविटाला) जीव गमवावा लागला असल्याचे नागरीक बोलून दाखविले जात आहे.

उपकेंन्द्र उदघाट्नच्या प्रतीक्षेत

पळसपुर - वडगांव येथील ३३ के व्हि उपकेंन्द्र
 उदघाट्नच्या प्रतीक्षेत
हिमायतनगर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या पळसपुर व वडगांव ज.येथील नव्याने उभारण्यात आलेल्या ३३ कें व्हि उपकेंन्द्राची चाचणी पूर्ण होऊन 15 दिवस लोटले असून, उदघाट्नच्या प्रतीक्षेत आहे. 

आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी पळस पूर, वडगाव ज.येथे 33 केव्हीचे उपकेंद्र मंजूर झाले. याची निर्मिती इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून तब्बल 5 कोटीच्या खर्चातून नांदेड येथील कंठेवाड नामक ठेकेदाराकरवी करण्यात आले. गत 15 दिवसापूर्वी या दोन्ही उपकेंद्राचे चाचणी वरिष्ठ अभियंत्यांनी केली असून, अद्याप याचे उदघाटन झाले नसल्याने परिसरातील नागरिकांना भर पावसाळ्यात खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या उपकेंद्रात चाचणी पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा येथील रोहित्रात आला आहे. मात्र उदघाटना अभावी वीज ग्राहकाना वीजेचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागात उपकेंद्राची निर्मिती होऊनसुद्धा हिमायतनगर येथील उपकेंद्रांद्वारे ग्रामीण भागात वीजपुरवठा होत असल्याने वादळी वारे, पावसाच्या  काळात विजेचा लपंडाव होऊन वीजग्राहकाना अडचणींचा सामना करत रात्र अंधारात काढावी लागत आहे. या ठिकाणी कर्मचारयांच्या अभाव असल्यामुळे सदरचे वीज केंद्र शोभेची वस्तू बनल्याच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरीकातून केल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेता तात्काळ वीजकेंद्राचे उदघाटन करून पळसपुर वीजकेन्द्राअंतर्गत पळसपुर, डाेल्हारी, सिरपल्ली, शेल्लाेडा, सिंरजनी, एकंबा, काैठा, तर वडगांव ज. वीजकेन्द्रा अंतर्गत मंगरूळ, सिंबदरा, वारंगटाकळी, धानाेरा, खैरगांव, बाेरगडी, सिबदरा, वडगाव सह अन्य गावच्या नागरिक व शेतकर्याना सुरळीत व सुरक्षित विज पुरवठा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

कामाच्या साशंकतेमुळे उदघाटन करण्यास विलंब...!

सदरचे काम करताना संबंधित ठेकेदाराने निकृष्ठ साहित्य व हलक्या दर्जाचे मटेरियल वापरल्याचे ओरड नागरिकांनी केली होती. परंतु नागरिकांच्या सूचना तक्रारींकडे गुत्तेदाराने दुर्लक्ष करून वरिष्ठ अभियंते व राजकीय नेत्यांशी संगनमत करून थातुर - मातुर पद्धतीने काम पूर्णत्वास नेले. याबाबतचे वृत्त अनेक दैनिकातून प्रकाशित होऊन सुद्धा याची चौकशी तर सोडाच कोणत्याही वरिष्ठ धिकाऱ्यानी भेट देऊन पाहणी सुद्धा केली नाही. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले विद्दुत उपकेंद्र वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देऊ शकेल काय याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. म्हणूनच की काय..? काम पूर्ण होऊन सुद्धा या दोन्ही उपकेंद्राचे उदघाटन करण्यास विलंब होतोय..? स सवाल नागरिक विचारीत आहेत. 

आरोग्याची काळजी घेण्याच्या आश्रम शाळा प्रशासनाला सूचना

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह आरोग्याची काळजी
 घेण्याच्या आश्रम शाळा प्रशासनाला सूचना

हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वादिष्ठ जेवणाबरोबर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि आश्रम शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या आरोग्याची जबादारी ही प्रशासनाची आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या सर्व सोई - सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात यात हयगय करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही अश्या सक्त सूचना आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी संबंधितांना   दिल्या.

ते दि. 01 जुलै रोजी महाराष्ट्र्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा एकाघरी येथील नूतन इमारतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार गजानन शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव कदम, हदगाव प.स.सभापती बाळासाहेब कदम, मंडळ कृषी अधिकारी जाधव, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, सत्यव्रत ढोले, राम राठोड, आदींसह अनेकांची उपस्थित होती. निसर्गरम्य परिसरात असलेल्या आदिवासी आश्रम शाळा व मुला - मुलीचे वसतिगृहाच्या नूतन इमारतीसाठी जवळपास 5 कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आले आहे. याचा उदघाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने आयॊजीत 200 हून अधिक झाडे लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील विद्यार्थी - विद्यार्थिनींना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी वसतिगृह व शाळेच्या इमारतीच्या कामाची व सोई सुविधांची पाहणी केली. 

दरम्यान येथे स्वच्छता, विद्यार्थी - विद्यार्थींना पुस्तकाचा अभाव, पाण्याची समस्या, पिण्याचे शुद्ध पाणी, शाळेचे अर्धवट सुरक्षा भिंत आणि महिला अधीक्षक व सफाई कामगाराची कमतरता दिसून आली. तसेच निवासी विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी येथील क्वार्टरमध्ये महिला शिक्षकांनी स्थानिकला राहून आपले कर्तव्य बजवावे आणि मुला - मुलींना स्वच्छ, उत्तम आहार व शासनाकडून उपलब्ध होणारे मेनूवर जेवण देण्यात यावे अश्या सूचना प्रभारी मुख्याध्यापक एम.एच राठोड, वरदान व्ही.बी.नहारे यांना केल्या. तसेच विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींना  कोणत्याही जेवणासह कोणत्याही बाबीची कमतरता अथवा अडचणी भासल्यास कोणतीही भीती न बाळगता थेट संपर्क करण्याचे आवाहन करून सर्वाना मोबाईल क्रमांक दिला. तसेच याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने महिला अधीक्षक, सफाई कामगार नियुक्त करून पिण्याच्या शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मदनराव पाटील, बंडू पाटील आष्टीकर, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, प्रकाश जाधव, पाटकर अनिल मादसवार, साईनाथ धोबे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी खादी दालनात

जिल्हाधिकारी काकाणी जेव्हा
खादी खरेदी करतात, दालनास भेट

          नांदेड(प्रतिनिधी)उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उबदार राहणाऱ्या खादीच्या वापराला तसेच खादी तयार करणाऱ्या भारतीय कारागिरांच्या हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी खादी खरेदी करा आणि वापरा असे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. त्यासाठी राज्य सरकारनेही खादीची वस्त्रे परिधान करण्यास प्राधान्य देण्याबाबतचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही आठवड्यातून एक दिवस खादी वापरावे, असे निर्देशीत करण्यात आले आहे. त्याला अनुसरून आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथील वजिराबाद बाजारपेठेतील खादी ग्रामोद्योग समितीच्या विक्री दालनातून खरेदी केली.

याप्रसंगी प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे विशेष उपस्थित होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव तथा माजी आमदार ईश्वराव भोसीकर, महाव्यवस्थापक अरून किनगांवकर, राजेश्वर स्वामी, महाबळेश्वर मठपती, विश्वनाथ नांदेडे आदींची उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांचे तसेच श्री. डोईफोडे यांचे खादी ग्रामोद्योगच्या परंपरेप्रमाणे स्वागत करण्यात आले. श्री. काकाणी यांनी दालनातील विविध विभागांना भेटी देऊन माहिती घेतली. श्री. भोसीकर यांनी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वैशिष्टयांबाबत माहिती दिली. तसेच खादीचा वापर वाढवा यासाठीच्या प्रयत्नांबाबतही, तसेच समितीतर्फे करण्यात येत असलेल्या विविध उत्पादनांची माहिती दिली. यावेळी श्री. काकाणी यांनी विविध प्रकारच्या कापडाची माहिती घेऊन, त्यातील वैविध्यपुर्ण प्रकारच्या कापडाचीही खरेदी केली. ग्रामोद्योग समितीच्या सदस्यांनीही जिल्हाधिकारी काकाणी यांच्याशी संवाद साधला.

शुक्रवार, 1 जुलाई 2016

वृक्षारोपणाची धूम

उज्वल भविष्यासाठी वृक्ष व जलसंवर्धन करा - 
आ.नागेश पाटील आष्टीकर 

हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीच्या संदेशाला हिमायतनगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दि. 01 जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भविष्यातील दुष्काळ व हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे तरच भविष्यकाळ उज्वल होईल असे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.


ते हिमायतनगर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण, पंचायत समितीच्या सभागृहास वसंतराव नाईक यांचे नामकरण कार्यक्रमाप्रसांगीं बोलत होते. यावेळी मंचावर हिमायतनगर प.स.सभापती आडेलाबाईं हातमोडे, हदगाव प.स.सभापती बाळासाहेब कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार गजानन शिंदे, उपसभापती पंडित रावते, वामनराव वानखेडे, बालाजी राठोड, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, शासनाने जलसिंचनचा उद्देश लक्षात घेऊन जलयुक्त शिवार हा उपक्रम हाती घेतला आहे, मोठ्या प्रमाणात ही कामे झाली असून, जिकडे तिकडे पाणी साठवलेले दिसून येत आहे. यामुळे शेतीच्या सिंचनाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला आहे, काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी जलयुक्तमुळे जमीनीत पाणी मोठ्या प्रमाणात मुरले आहे, त्यामुळे आगामी काळात पाण्याची टंचाई भासणार नाही हे तेवढेच खरे आहे. काही ठिकाणची कामे राहिली असून, आगामी काळात ते पूर्ण करून संपूर्ण मतदार संघातील जलस्रोत वाढवून सिंचनाची कायम संशय सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. वरून राजाची कृपा दृष्टी व्हावी आणि उष्णतेचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत निकडीचे आहे. शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवीडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी सर्वानी यात सहभागी होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या वतीने ट्री - गार्ड व वृक्ष संवर्धनासाठी एक कर्मचारी नेमण्यात येणार आहे. पर्जन्यमान व ऑक्सिजन वाढण्यासाठी आणि तापमान नियंत्रित ठेवणे आपल्या हातात आहे. शेतकऱ्यांसह सर्वानी वृक्ष लागवड व संवर्धन करून हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करावी असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर पंचायत समिती व तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार गायकवाड, देवराई, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर, राम राठोड, सत्यव्रत ढोले, मदनराव पाटील, बंडू पाटील आष्टीकर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, संदीप पळशीकर, बाळू चवरे, साईनाथ धोबे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषी अधिकारी एम.पी.सुळे, पुंडलिक माने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अनेक शेतकरी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 
  
महावितरणसह सर्वच ठिकाणी वृक्षारोपणाची धूम


तसेच महावितरण कार्यालयात आ.नागेश पाटील आष्टीकर, उपकार्यकारी अभियंता भोंगाडे, सहाय्यक अभियंता पंडित राठोड, बाबुराव कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसमतकर, डॉ. डी.डी. गायकवाड व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. पशुवैद्यकीय कार्यालतात पशुधन विकास अधिकारी धनंजय मांडले, भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, भाजपचे सरचिटणीस डॉ.प्रसाद डोंगरगावकर, अनिल भोरे, कांतागुरु वाळके, बालाजी ढोणे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. नगरपंचायत कार्यालायत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, उपनगराध्यक्ष सौ सविता अनिल पाटील, प्रभारी मुख्याधिकारी गजानन शिंदे, शे.मेहबूब शे.बंदगी साब, मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर, विठ्ठल शिंदे, शासकीय अन्नधान्य गोदाम येथे  गोदामपाल गौतम राऊत, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दशरथ गोसलवाड, पातुरकर संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, अनंता देवकते, नंदू आप्पा पळशीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय टेभी येथे सरपंच रवींद्र कदम, उपसरपंच बुद्धेवाड, ग्रामसेवक राहुलवाड यांनी तर जिरोणा येतेच ग्रामपंचायत कार्यालयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सरपंच नागन राठोड, उपसरपंच सुरेश वानखेडे, पोलीस पाटील ज्योती गंगाधर मिराशे, ग्रामसेवक नितेश ताटीकुंडलवाड, तलाठी माने व पत्रकार कानबा पोपलवार यांच्या हस्ते तर उत्कर्ष फोटो गैलरी येथे आकांक्षा मादसवार, अनिल मादसवार, उत्कर्ष मादसवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आयटी आय कार्यालयात प्राचार्य बिराजदार व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, वनपरिसक्षेत्र अधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात वरक्षारोपण करण्यात आले.