NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

गुरुवार, 31 जुलाई 2014

बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

गरिबांना बेघर करत आय. टी.आय.ची टोलेजंग इमारत उभी..

रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन नाही
बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा 

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील पळसपूर रस्त्यावर बांधण्यात आलेल्या आय.टी.आय. इमारतीच्या जागेवरील ३८ गरिबांना बेघर करत इमारत बांधण्यात आली असून, येथील मूळ रहिवाशी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आय टी आय ची इमरात उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवर्यात आली आहे.  

हिमायतनगर शहरात औद्योगिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने बांधण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीच्या जागी पूर्वी अंदाजित सन १९८५ साली ग्रामपंचायत कार्यालयाने इंदिरा आवास योजने अंतर्गत एकूण ३८ घरकुल बांधून लाभार्थ्यांना वितरीत केले होते. यासाठी तत्कालीन जागा मालक दिगांबर तांबोळी यांनी सदरील जागा स्वखुशीने वस्तीवाड करण्यासाठी ग्राम पंचायत हिमायतनगरला दानपत्र दिल्याचे येथील रहिवाश्यांनी सांगितले. तत्कालीन सरपंच लक्ष्मणराव शक्करगे यांनी येथील गरिबांना घर मिळावे म्हणून मोलाचे सहकार्य केले. परंतु त्यांच्या नंतर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने सदरील वस्तीसाठी कोणत्याही नागरी सुविधा पुरविल्या नाहित. येथील ३८ घरांसाठी केवळ एका हातपंपा शिवाय कोणतीही सोय ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली नाही. परिणामी येथील नागरिकांना असुविधेच्या गर्तेत आपले आयुष्य वेचावे लागले. यातील लाभार्थी सदाशिव रामराव वानखेडे यांचे वय आज ६० वर्ष आहे. दान म्हणून मिळालेल्या घरात एकदाचा देह टाकावा अशी त्यांची इच्छा.., परंतु उतारवयात ग्राम पंचायतीच्या लालची पदाधिकार्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे गरिबांच्या घरावर दोजर फिरवत आर्थिक तडजोड करून आमची हक्काची जागा हडप केल्याचा आरोप या रहिवाश्यांनी केला आहे. या ठिकाणी गोर - गरीब मागासवर्गीय नागरिकांच्या झोपड्या व घरे अस्तित्वात होत्या.  म्हणून पुनर्वसनचा कोणताही विचार न करता ग्राम पंचायतीच्या पदाधिकार्यांनी सदरील जागा गुत्तेदाराच्या घश्यात घातली. 
             
जागा हस्तांतरणात ग्राम पंचायतीची मनमानी

२१ मार्च २००९ च्या गाव नमुना सात अधिकार अभिलेख पत्रकानुसार सरपंच ग्राम पंचायत कार्यालय हिमायतनगर भोगवटादार वर्ग ०१ असलेल्या सर्वे न.४८/२ मधील एक हेक्टर २० आर हि जम्नीन हस्तांतरणासाठी उपमुख्या कार्यकारी अधिकारी (पंचायत) जी.नांदेड यांनी दि.२२ जानेवारी २०१०रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर यांना दिलेल्या पत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी कायमस्वरूपी जागा देण्यासाठी नमून न.८ भूमिअभिलेख कार्यालायचा अभिप्राय व पंचायत समिती हिमायतनगर सभेचा ठराव आदी कागदपत्रांची मागणी केल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येते. परंतु सदरील कागदपत्रासंबंधी कोणतेही दस्तावेज जी.प.नांदेड यांना दिल्याचे निदर्शनास येत नसून, केवळ स्वार्थापोटी सदरील जागेचा व्यवहार केला असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.       

आय. टी.आय. इमारतीच्या जागेची चौकशीची मागणी

संबंधित इमातीच्या बांधकामासाठी ग्राम पंचायतीने सदर जागा जबरदस्तीने ताब्यात घेतली असून,  या प्रकारची चौकशी करून संगनमताने घरकुलाची जागा हडप करणार्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत. अन्यथा १५ ऑगस्ट २०१४ पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे अण्णाभाऊ साठे क्रांतीदल महाराष्ट्र राज्याचे संस्थापक पुरुषोत्तम दादा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

याबाबत ग्रामसेवक शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, म्हणाले कि, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने सदर जागा तत्कालीन सरपंच ग्रामसेवकाने  हस्तांतर केल्याचे सांगितले.    

बुधवार, 30 जुलाई 2014

वृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढाहिमायतनगर(अनिल मादसवार)मातेची महंती महान आहे, काही वितुष्ठ पुत्रांनी माता - पित्यांसाठी वृद्धाश्रम चालाविण्यावर भर दिला आहे. परंतु वृद्धाश्रम म्हणजे समजाला लागलेला एक अभिशाप व मायबापाला मुलांनी लावलेला कलंक आहे, हा कलंक पुसून काढण्यासाठी सर्वांनी माता -पित्यांची सेवा करावी, कारण त्यांच्या सेवेत ईश्वराची सेवा केल्याची पुण्याई मिळते असेही आवाहन भागवत कथाकार डॉ.शिवयोगी कृष्णकांत स्वामी महाराज यांनी प्रबोधनातून स्पष्ठ केले. ते परमेश्वर मंदिरात आयोजित संगीतमय भागवत कथा प्रबोधन प्रसंगी उपस्थितांना संबोधित कताना बोलत होते.

यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविराचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, सौ.मुलंगे ताई, राजेश्वर रायेवार, अक्कलवाड सर, प्रकाश चव्हाण, मीराताई बंडेवार, ज्योतीताई पार्डीकर, श्रीमती जन्नावार, सौ.पळशीकर, सौ.हरडपकर, सौ.रुघेबाई, सौ.मारुडवार, सौ.चिंतावार आदींसह हजारो महिला पुरुष श्रोतेगन उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि, भगवंतानी धारण केलेले दशावतार हे अंतर जगतातील असून, हे अवतार प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अनुभवला येतात. पहिला अवतार गर्भ धारणेतील पहिल्या मासातून सुरु होतो. पहिला - मत्स्यावतार, दुसरा- कच्छ, तिसरा - वराह, चौथा - नृसिंह, पाचवा - वामन, सहावा - पशुराम, सातवा - राम, आठवा- कृष्ण, नववा - कलंकी, दहावा - मनुष्य या अवतारात बाहेर पडतो. जस जशी वाढ होते तश्यापद्धतीने हर मनुष्याला दशावताराची अनुभूती येते. असे सांगून भगवान श्रीकृष्ण लीलांचे वर्णन करीत जन्मापासून ते ग्राहस्ताश्रम प्रवेश पर्यंतचा वृतांत कथन केले. तसेच श्रावण मासात शिवाची आराधना केली जाते, जगात पिता मातृ शंभो भवानी...जगताची माता -पिता हे शंभू - भवानी आहे. त्यांच्या पुण्याईने मनुष्य जन्माला आले आहेत. शिवलिंगाची पूजा म्हणजे, जन्म देणारे आई - वडील संबोधून केली जाते असेही त्यांनी सांगितले. यावेळी आजच्या कार्यक्रमात राधा - श्रीकृष्णाची झाकी प्रस्तुत करण्यात आली. हे दृश पाहून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

दि. २९ मंगळवार पासून येथील परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त सकाळी ९ ते ११ दुपारी ३ ते ६ पर्यंतच्या वेळेत संगीतमय भागवत कथा डॉ.शिवयोगी कृष्णकांत स्वामी महाराज मु.पो.शिंदी, जी.अमरावती यांच्या मधुर वाणीत सांगितली जात आहे. या भक्तिमय कार्यक्रमात दिवसेंदिवस भक्तांची मांदियाळी होत असून, भागवत कथासार प्रवचनाने शहरात मंगलमय वातावण निर्माण झाले आहे.

सोमवार, 28 जुलाई 2014

श्री परमेश्‍वराचे दर्शनहिमायतनगर(अनिल मादसवार)हर हर महादेव... जय भोलेनाथच्या गजरात सकाळी ५ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणावासीयांचे श्रध्दास्थान शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणर्या श्री भोळ्या शंकरच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवाराचं व्रत करणार्यांसह हजारो पहिला- पुरुष भक्तांनी दर्शनासाठी गर्द्दी केली. सायंकाळपर्यन्त जवळपास 25 हजार भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.

वृत्त वैकल्याचा महीना श्रावण मासाची सुरवात दि.२७ रविवार पासुन झाली. यात आलेल्या पहील्या सोमवारी हजारो भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विदर्भ -मराटवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर(वाढेणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्‍वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात सातशेहून अधिक वर्षापुवीची श्री परमेश्‍वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे. भारतात कुठेही परमेश्‍वरची मुर्ती नसल्याने वाढोण्याच्या परमेश्‍वर दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, कर्नाटकासह दुर - दुरहुन भावीक भकत महाशीवरात्र, श्रावण मासात अवर्जुन हजेरी लावतात. तसेच मंदीरात लक्ष्मीनारायण, भव्य शिवलीग, निद्रीस्थ नारायण, भैरवनाथ, गणपती, हनुमान, आदिंसह अन्य देवी- देवतांच्या प्राचीन मुर्त्या आहेत. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवार महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाठी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते. वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या ठीकाणी करतात. मंदीर परीसरात पिंपळ, वड, उंबर, गुलमोहर, लिंब, बदाम आदिसह अन्य फुलांची झाडे आहोत. यामुळे श्रावण मासात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मंदीरीचे सौदर्य खुलले असुन, परीसरातील वातावरण मंगलमय झाले आहे. मंदीर संस्थानकडुन महाशीवरात्रीला 15 दिवसाची भव्य यात्रा भरवीली जाते. विशेषता श्रावण मासात दर सोमवारी सकाळी 5 वाजताच भकत अभीषेक महापुजा करन पुण्य पदरात पाडुन घेतात. दरम्यान श्रावणात मंदिर समीतीने आजपासून संगीतमय कथासार आणि संगीतमय रामायण कथेसह विविध धार्मिक प्रबोधनपर कार्यकम आणि महिलांच्या आरोग्य तपासणी शिबीर आदी कार्यक्रम दि.३० जुलै पासून चालु होणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.

सबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम

हिमायतनगर(बी.आर.पवार)विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालीन जीवनात यश संपादन करण्यासाठी नितांत परिश्रम करून मुलीनी स्पधेच्या युगात अबला होऊन जगण्यापेक्षा सबला होऊन जगा. असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी येथील राजा भगीरथ विद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना मागदर्शन शिबिराप्रसंगी बोलताना केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, सल्लागार प्रकाश जैन, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, संघटक कानबा पोपलवार, असद मौलाना, जांबुवंत मिराशे, ज्ञानेश्वर पंदलवार, वसंत राठोड, धम्मपाल मुनेश्वर, ग्रा.प.सदस्य हनुसिंग ठाकूर, गजानन चायल, राम सूर्यवंशी, शकील भाई, शाम ठाकरे, रामदास रामदिनवार आदींची उपस्थिती होती.

दि.२८ सोमवारी येथील राजा भगीरथ विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक अनगुलवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, विद्यार्थी व विद्यार्थीनिनी जीवनात यश संपादन करण्यासाठी नित्य अभ्यास करून स्पर्धात्मक परीक्षणं सामोरे जाण्याची तयारी करावी. भ्रमणध्वनी व दूरदर्शनचा अति वापर टाळावा. स्वदेशी खेळ खो खो, कब्बड्डी, कुस्ती, होलिबॉल, सुरपाट्या आदी खेळावर लक्ष केंद्रित केल्याने शरीरासह बुद्धिमत्तेला सुद्धा प्रोत्साहन मिळते. विज्ञान युगात विद्यार्थीनिनी अनेक क्रांती घडविली असून, थोर माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची प्रेरणा घेऊन सबल होऊन जगण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धी व शक्तीचा वापर समाज व देश हितासाठी करावा असेही ते म्हणाले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी खास चीडीमार पथकाची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थीनीना सुरक्षा प्रदान करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रा.चौधरी, जी.एम.मुठेवाड, कापसे सर, डी. एल.कोंडामंगल, शंकर नरवाडे, आहीरवाड सर, कमलाकर, दिक्कतवार, के.बी.शन्नेवाड, उत्तरवार मैडम, तीप्पणवार मैडम, आदींसह शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर उत्तरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सुरेश जाधव यानी मानले.

बुधवार, 23 जुलाई 2014

घाणीचे साम्राज्य...

सरपंचाच्या वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात 
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नाल्या जागोजागी तुंबल्या असल्याने अल्पश्या पावसाने नालीतील घाण रस्त्यावर येउन नागरिकांच्या घरात जात असून, परिणामी सरपंचाच्या वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र कोर्ट परिसराच्या पाठीमागे दिसून येत आहे. 
येथील लाकडोबा चौक परिसरातील न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या वार्ड क्रमांक ३ मधील वस्तीत सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावली नसल्याने जागोजागी गटार तुंबलेले आहे. याचा वार्डातून सरपंचांसह तीन सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांनी स्वार्थ असलेल्या रस्ते निर्मित्ती तथा गुत्तेदारीमध्ये व्यस्त राहत असल्याने नागरी समस्यांचे काही देणे घेणे नाही अश्या तोर्यात वावरत आहेत. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अल्पश्या पावसाचे पाणी सुद्धा नागरिकांच्या घरात घुसत असल्याने या भागातील रहिवाशियंचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्यासंबंधी वारंवार अर्ज विनंत्या करूनही सदरील वस्तीत रस्ते, नाली बांधकाम करण्यास ग्राम पंचायत टाळाटाळ करीत असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे डोक्यावर घेऊन गटारातून मार्ग शोधावा लागत असल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इकडे ढुंकूनही पहात नसून केवळ नावापुरतेच असल्याचे नागरीकातून सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे पुढारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न पाहत असल्यने चमकोगिरीवर त्यांचा अधिक जोर असल्याचा येथील नागरीक सांगत आहेत. 

अनेक वेळा ग्रामपंचायतीत खेटे मारूनही निद्रिस्त पुढारी जागे होत नसल्याने ग्रामपंचायतीसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिला आहे.

याबाबत सरपंच शिंदे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, अलीकडची जागा हि लकडोबा मंदिर आणि सोसायटीची आहे. त्यांनी जागा दिली तर दोन दिवसात येथे नालीचे बांधकाम करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास सोयीचे होईल.

मंगलवार, 22 जुलाई 2014

पर्यटकांचा हिरमोड

पैनगंगा कोरडी पडल्याने सहस्रकुंड धबधबा बंद..पर्यटकांचा हिरमोड 


हिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी जुलै महिन्याच्या शेवटी सुद्धा कोरडीठाक पडली आहे. परिणामी याच नदीवर अवलंबून असलेला तथा पर्यटकांना आकर्षित करणारा  निसर्गनिर्मित्त सहस्रकुंड धबधबा पावसाअभावी बंद पडल्याने निसर्गसौंदर्य लोप पावल्यागत चित्र दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला असून, आता सुरु असलेल्या  पावसाने आगामी श्रावण मासात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यास मिळेल काय या प्रतीक्षेत पर्यटकांच्या नजरा आहेत.

तिसर्यांदा पेरणीला सुरुवात
हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील अनेक दिवसापासून रुसलेल्या पावसाने तीन दिवसापासून रिमझिम प्रकारे सुरुवात केली असून, दोन वेळा पेरलेली बियाणे वाया गेल्याने काळजावर दगड ठेऊन.. अखेर शेतकर्यांनी तिसर्यांदा पेरणीला सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

मृग नक्षत्र कोरडे गेले, आर्द्राने दगा दिला, सरते शेवटी आषाढी एकादशीच्या दिनी मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र नांदेड जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे दोन वेळा पेरणी केलेली बियाणे पावसाभावी कुजून गेली. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, शासनही मदत करीत नाही अश्या प्रतिक्रिया अल्पभूधारक शेतकर्यांमधून पुढे येत आहेत. अश्या परीस्थितीत गत दोन दिवसापासून पावसाचे रिमझिम आगमन झाले असून, पावसाच्या सारी पडत असल्याने बहुतांश बोर- गरीब शेतकर्यांनी उसनवारी, व्याजी दिडी करून बियाणे व खत आणून पेरणीला सुरुवात केली आहे. यावरही वरून राजाने पुन्हा दडी मारल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येशिवाय अन्य पर्यायाच उरणार नाही अशी प्रतिकिया काही शेतकऱ्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलून दाखविल्या आहे.

आज घडीला ज्यांची ऐपत नाही अश्या गरीब शेतकर्यांनी दोन वेळा पेरणी करूनही पाऊस पडला नसल्याने शेतातील ९० टक्के पिके गेल्याने रान-शिवार काळेकुट्ट दिसत आहेत. यावरून हिमायतनगर तालुक्यातील पिके, चारा, पाणी टंचाईची समस्या किती भीषण आहे, हे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नांदेड जिल्ह्यातून हिमायतनगर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पिके उगवालीच नाहीत, बोअर, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, चारा टंचाईने सुद्धा उग्ररूप धारण केले आहे. आता तरी शासनाने जागृत होऊन हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, शेतकरी वर्गाना नुकसान भरपाई, वीज बिल माफी, मजुरांच्या हाताना काम द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

शनिवार, 19 जुलाई 2014

पेरलेल्या बियांना कोंब फुटेना...

कोरडा दुष्काळ जाहीर करा
प्रती हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
तिबार पेरणीने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

हिमायतनगर(अनिल मादसवार)रोज भरून येणारे नभ रुसल्यागत फिरून जात असल्याने तीबार पेरणीचा संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. भरून आलेले आभाळ रीत होईना..पेरलेल्या बियाला कोंब फुटेना...अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून, शासन काही कोरडा दुष्काळ जाहीर करेना. असे म्हणत आभाळाबरोबर जमिनीतील कोम्बे पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाला कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारची नुकसान भरपाई द्यावी असे साकडे घालण्याची वेळ आली आहे.

जून संपला..जुलै शेवटला आला..मात्र पाऊस काही पडेना..त्यामुळे अल्पशा पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. सततची हुलकावणी देणारा पाऊस आणि वाढत्या महागाईने उधारी व व्याजाने बी- बियाणाची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावर निसर्गाच्या अवकुपेने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मात्र तरीदेखील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी चार छावणी व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रभावशाली पाऊल उचलले नाही. एवढेच नव्हे पाऊस पडत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना देखील कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही. त्यामुळे निसर्गाप्रमाणे आघाडी शासन सुद्धा शेतकर्याचा अंत पाहतो कि काय..? असा प्रश्न तिबार पेरणीच्या संकटात सापडलेला बळीराजा आभाळातील पळणारी ढगे आणी जमिनीतील न उगवलेली कोम्बे पाहून विचारीत आहे.

आता तरी शासासाने जागे होऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अंध्रप्रदेशाच्या धरती प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांना देखील मोफत वीज पुरवठा करून वीज बिल माफ करावे, चाराछावण्या उभाराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कोरड्या जमिनीचे सर्वे करून प्रती हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. अश्या मागणीचे निवेदन ग्रामीण व शहरी भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी येथील तहसील प्रशासनाकडे दिले आहे. यावर सटवाजी चवरे, संतोष गाजेवार, पामेश्वर पानपट्टे, हनुसिंग ठाकूर, बाळू वारकड, परमेश्वर इंगळे, मधुकर चव्हाण, साहेबराव देवसरकर, स.हरून स.हबीब, नारायण गायके, रामराव मादसवार, लक्ष्मण ढोणे, रामराव कुपटे, दिगंबर वानखेडे, अनंता तुंबलवाड, आबाराव जोगदंड, दत्ता दंडेवाड, यांच्यासह पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, एकम्बां, सीरंजणी, शेलोडा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, शिबदरा, वडगाव, सरसम, टेंभी, घारापुर, रेणापूर, हिमायतनगर, टेंभी, अन्देगाव आदीसह तालुक्यातील अनेक वाडी तांडे, गावागावातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.


शुक्रवार, 18 जुलाई 2014

परंपरा कायम जपा

आदर्श गावाची परंपरा कायम जपा...अनिलसिंह गौतम

हिमायतनगर(अनिल मादसवार)सर्व जाती - धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच गावात लक्ष्मी नांदेल.. टेंभी हे गाव गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराने प्रभावित असल्याचे पाहून मनोमन आनंद झाला आहे. गावाचा आदर्शापणा जापण्यासाठी कायम प्रयत्न करा असे आवाहन हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील गावकर्यांना शांतता कमेटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, अशोक अनगुलवार, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, मुन्शी आनेबोईनवाड  आदींसह गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. 

हिमायतनगर येथे रुजू झाल्यापासून अनेक लोकप्रिय कामे हाती घेतल्याने अनिलसिंह गौतम हे सर्व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. रमजान ईद, गणेशोत्सव, पोळा यासह, आगामी विधानसभा निवडणुका शांततेत व्हाव्या यासाठी गत तीन दिवसापासून गौतम यांनी गाव - खेडे - पाडे, वाडी - तांडे तथा १०० घरांची वस्ती असलेल्या सर्वच ठिकाणी जाऊन शांतता कमेटीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावातील वातावरण प्रदूषित करून भांडण तंट्यास खतपाणी घालणाऱ्या सर्व अवैद्य धंदेवाल्यांनी आपले बस्तान गुंडाळून चांगल्या कामास सुरुवात करावी अन्यथा अश्या दुर्जनांची यथेच्छ धुलाई करण्यात येईल. माझे काम शिस्तबद्ध व कडक आहे, मी काळे कागद करण्यात वेळ वाया घालात नाही, जो चुकला त्याला ठोकला असे माझे काम आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे. 


तसेच ग्रामीण भागातील पालकांनी पाल्याच्या शिक्षणावर अधिक भर द्यावा, कारण हे स्पर्धेचे युग  आहे, परंतु बहुतांश विद्यार्थी हे तासानतास टी.व्ही.समोर बसून अमुल्य वेळ वाया घालतात. हे सर्व करीत असताना वेळेचे भान ठेवून मैदानी, खेळ, कुस्तीचे  आखाडे, नियमित व्यायाम व अभ्यास करावा. तरच स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी टिकू शकेल. तसेच संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराजांची शिकवण चांगली आहे, गावातील जेष्ठांनी गावात धार्मिक, प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन संतांचे महात्मे, विचार सर्वांपर्यंत पोन्चविण्यासाठी गावात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य वाढवावे. त्यासाठी लहान थोरांनी माणूस म्हणून जगण्यासाठी माणुसकी जपा, भांडण तंटे, करून घेऊ नका, माझे घर..माझा शेजारी...माझे गाव..समजून सन उत्सव आनंदाने पार पडा असेही ते म्हणाले.   


तसेच आगामी काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, त्यासह अन्य सन उत्सव काळात दारू, जुगार, मटका यासह अन्य अवैद्य धंदे बंद झाले पाहिजे. निवडणूक काळात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी दाखूउ नये, असा कोणी पर्यंत करीत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही. कारण मी कोणाचेही ऐकत नाही. तसेच गावच्या सुरक्षेसाठी १८ ते ३५ वर्ष वायोगटातील युवकांचे ग्रामसुरक्षादल कार्यरत ठेवल्यास चोर्या, लुटमार होणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन आदर्श गावाची परंपरा कायम ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गावातील तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष्या, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते   आणि गावातील महिला पुरुष व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन गणपत महाराज यांनी केले उपस्थितांचे आभार सर्पांचा साईनाथ राजरवाड यांनी मानले.

गुरुवार, 17 जुलाई 2014

आता मिळणार शहरात परवाना

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी..आता मिळणार शहरात परवाना


हिमायतनगर(वार्ताहर)ग्रामीण भागातील नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना मिळावा व पोलिस कार्यवाहीतून नागरिकांची सुटका व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेऊन सामाजिक हित जोपासणाऱ्या पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या प्रयत्नाने वाहन चालविण्याचा परवाना हिमायतनगर शहरात मिळणार आहे. दि.१७ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक एस.बी.जोशी यांनी ( कैम्प)शिबिरासाठी जागेची पाहणी केली आहे. 

येथे नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी अनेक स्तुत्य कामाची सुरुवात केली असून, शहरव तालुक्यातील अनेक वाहन धारकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे असून, त्यांची समस्या सोडविणे हि सामाजिक बांधिलकी आहे. असे सांगत शक्य तोवर या महिन्यापासूनच वाहन चालविण्याचा परवाना मिळून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी शहरातील परमेश्वर मंदिर मैदान, तहसील कार्यालय व शासंकीय विश्रामग्रह येथील जागेची पाहणी करून योग्य असणाऱ्या विश्राम गृहातील जागेची निवड काणे योग्यराहील असे सांगितले.  सावजानिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र यासाठी मिळणे गाजेचे आहे, ते मिळताच शिबिराची सूवत केली जाईल असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष दत्ता शिराने, संघटक कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, असद मौलाना, फाहद खान, राम सूर्यवंशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.     

उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा


शहरातच परवाना देण्यासाठी कैम्प लावण्यात येणार असून, याबाबत जागेची पाहणी नंतर  उपविभागिय अधिकारी दीपक घाडगे यांच्याशी आर.टी.ओ. इन्स्पेक्टर एस.बी.जोशी, पो.नि.अनिलसिंह गौतम यांनी चर्चा केली. यावेळी घाडगे यांनी येथील जागेत कैम्प लावण्यास काहीच हाकत नसल्याचे सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार गायकवाड, नायब तहसीलदार संजय देवराय आदीसह, मंडळ अधिकारी, तहसीलदार व अनेक नागरिक उपस्थित होते. 

बुधवार, 16 जुलाई 2014

एका तासात पकडले

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील आठवडी बाजारात मोबाईल, पाकीटमार, मंगळसूत्र चोरट्यांनी धुमाकूळ माजविल्याने सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण होते. मात्र पोलिस स्थानकाचा कारभार अनिलसिंह गौतम यांनी सांभाळतच नागरिकांनी निडरपणे वावरण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काळातील पहिल्या आठवडी बाजात मोबाईल खरेदीच्या बहाण्याने हातचालखी करणाऱ्या चोरट्यास फक्त एका तासात पकडून ५ हजाराची रक्कम हस्तगत करून दुकानदारास परत दिल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. आजच्या घटनेमुळे आगामी काळात शहरातील आठवडी बाजारात होणार्या चोरट्यांच्या उच्छादाला लगाम बसेल अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील सहा महिण्यापासून हिमायतनगर येथील बुधवारच्या आठवडी बाजारात ऐड्रोइड मोबाईल, रोख रक्कम आणि महिलांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना भर दिवस घडत होत्या. तसेच बाजारातून येथील तीन नामवंत पत्रकारांसह शेकडो लोकांचे मोबाईल चोरी गेल्यानंतर तक्रारीचा ओघ सुरु झाला. तरीदेखील आठवडी बाजाराच्या गस्तीसाठी नेमण्यात आलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी हे कर्तव्यात कसूर करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढून चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत होती.

१५ दिवसापूर्वी आठवडी बाजारात तालुक्यातील मौजे जीरोना येथील सौ.सुरेखा प्रभाकर वानखेडे हि महिला भाजीपाला खरेदी करताना एका महिलेने गळ्यातील पोत कापण्याच्या उद्देशाने ब्लेडनेवार करून जखमी केले होते. नागरिकांनी पोत लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र दुसया दिवशी पोलिसांनी पावबंद करून सोडून दिले होते.

त्यानंतर अचानक येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक सोनवणे यांची बदली झाली आणि, त्यांच्या जागेवर कर्तव्यदक्ष सिंघम स्टाईलचा वापर करीत अवैद्य धन्देवाल्यासह दारुडे, चोरट्यांना सुंदरीचा प्रसाद देऊन वठणीवर आणणारे अनिलसिंह गौतम यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या येण्याने बहुतांश अवैद्य धंदे कोणतेही प्रयत्न न करताच बंद झाले आहेत. त्यांची कारकीर्द माहित नसलेल्या चोरट्यांनी दि.१६ रोजी आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत येथील वर्धमान मोबाईल शोपिवर मोबाईल खरेदीच्या नावाखाली हातचलाखी करून एका २५ वर्षीय युवकाने सोबत एका आठ वर्षीय मुलास घेऊन दुकानदाराच्या खिश्यातून पाच हजाराची रक्कम पळविली. हा परका दुकानदारास ते दुकान सोडल्यानंतर लक्षात आला. त्यांनी तातडीने गौतम यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. आणि अवघ्या एका तासाच्या आत सदर चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गौतम यांच्या सुंदरीच्या प्रसादाने चोरट्याने मुलाजवळ दिलेली चोरीची रक्कम पोलिसाच्या स्वाधीन केली. हिमायतनगर शहरात प्रथमच चोरीला गेलेली रक्कम तासाभरात हस्तगत करून दुकानदारास परत केल्या गेल्याने गौतमच्या या कामगिरीने सामान्यांना दिलासा मिळाला असून, त्यांचे सर्व स्तरातील नागरीकातून कौतुक केले जात आहे.

वृत्त लिहीपर्यंत सदर घटने बाबत गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र या चोरट्याने अगोदर कुठे कुठे चोरी केली, याची चौकशी करून अन्य गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री गौतम यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

मंगलवार, 15 जुलाई 2014

सक्तताकीद सुध्दा देऊ शकते !

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)दोन दिवसापुर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवडणुक आयोगाने अपात्रतेची नोटीस दिल्या नंतर वेगवेगळ्या कारणांनी त्यावर चर्चा झाली. आता अशोकराव चव्हाणांची खासदारकी जाणार अशी चर्चा ही झाली. वास्तवात ही खरच घाई असून अशोक चव्हाणांना सक्त ताकीद देऊन निवडणुक आयोग त्यांना दिलासा पण देऊ शकते यावर कोणीच विचार करत नाही.

पेड न्युज प्रकरणात आलेल्या एका निर्णयात तीन निवडणुक आयुक्ताच्या पिठाने निर्णय जाहीर केला असून त्यात अशोक पर्व या वर्तमान पत्रात सन 2009 मध्ये आलेल्या जाहीराती आणि इतर जाहीरातीवर 85 भोकर विधानसभा मतदार संघातून सन 2009 मध्ये पराभूत उमेदवार आणि माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी आक्षेप घेतला होता. माधवराव यांनी दाखल केलेल्या आक्षेपांमध्ये दोन प्रकार होते. एक आक्षेप असा होता की अशोकरावांनी निवडणुक यंत्रासोबत गडबड केली आणि कोणत्याही पक्षाला दिलेले मत कॉंग्रेसला जात होते. माधवरावांचा हा आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळला होता. दुसऱ्या आक्षेपा नुसार माधवरावांनी सन 2009 मध्ये टाईम्सऑफ इंडिया ते गल्लीतील सर्वात कमी वितरणाचा पेपर यामध्ये आलेल्या ' अशोक पर्व" या जाहीरातावर आक्षेप उचलला होता. हा आक्षेप माधवरावांनी निवडणुक आयुक्तासमोर मांडला. तसेच त्यात प्रसिध्द अभिनेता सलमानखान, कॉंग्रेसचे नेते ज्योतीरादित्य सिंधीया, आणि सोनिया गांधी यांच्या नांदेडमधील झालेल्या कार्यक्रमांमधील जाहीरातीचा खर्च निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे जनप्रतिनिधीत्व कायद्यानुसार वेळेत दाखल केला नाही, असा आक्षेप होता.

या चार वर्षापासून सुरु असलेल्या पेड न्युज प्रकरणातील चर्चा एक अल्पविराम रविवारी निवडणुक आयोगाने जारी केलेल्या 111 पानी निकाल पत्रांने लागला. त्यावर सुध्दा प्रसार माध्यमांनी बातम्यांसाठी जोरदार हालचाली केल्या आणि प्रसार माध्यमांनी एका आर्थि या प्रकरणात निर्णय देऊन टाकला की, अशोकरावांची खासदारकी जाणार ? खरे तर एखाद्या विषयाचा न्यायालयीन निकाल पूर्णपणे वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया लिहीणे, दाखवणे संयुक्तीक असते. पण प्रसार माध्यमांना त्याची घाई होती 111 पानी निकाल पत्र वाचण्यासाठी वेळ नव्हता म्हणून सर्वचजण अशोकरावांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते. आणि अशोकराव आपल्याला जेवढे बोलायचे आहे तेवढेच बोलत होते. कारण असे की, मागे अशोकरावांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून अशोकराव आता एखाद्या सोनाराच्या भट्टीमध्ये तप्त होऊन निघालेल्या सोन्यासारखे उजळले होते. प्रसार माध्यमासमोर काय बेालावे याचा भरपुर अभ्यास अशोकरावांना झाला आहे. दोन वेगवेगळ्या बाबींना कसे विकेंद्रीकृत करावे आणि ते मांडावे याची भरपूर समजदारी अशोकरावांमध्ये आलेली आहे. आणि त्याचाच परिणाम ते बोलतांना नेहमी सावध असतात आणि आपल्याला पाहिजे तेच बोलतात.

माधवरावांचा निवडणुक यंत्रावरील आक्षेप फेटाळल्यानंतर अशोकरावांनी प्रसारमाध्यमांना सांगितले हेाते की, माधवराव हरले पण हा अर्धा भाग होता. दुसरा भाग निवडणुक आयोगा समोर होता त्यावेळी अशोकरावांनी निवडणूक आयोगासमोर असलेल्या अर्ध्या भागाला बेमालूमपणे लपवले होते. निवडणुक आयोगाला माझ्या विरुध्द माधवरावांनी घेतलेला आक्षेप चालवता येणार नाही, हा मुद्दा घेवून अशोकराव स्वतः दिल्लीच्या उच्चन्यायालयात गेले होते. तेथे अशोकराव हरले हेाते. हा मुद्दा सुध्दा अशोकरावांनी बोलतांना अत्यंत चातुर्यांने लपवला होता. आताच रविवारी निवडणुक आयुक्तांनी जारी केलेल्या निर्णयात त्यांना अशोक पर्व या जाहीराती बाबत ही जाहीरात कॉंग्रेस पक्षाचा सर्वसाधारण प्रचार करण्याचा प्रकार असल्याचे निवडणुक आयोगाच्या निकालात म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की, अशोक पर्व या जाहीराती बाबत निवडणुक आयोगाला काही अडचण नाही आणि त्यासाठी अशोकराव दोषी नाहीत. दुसरा मुद्दा 16 हजार 924 रुपयांच्या तीन जाहीरातींचा हिशोब अशोकरावांनी वेळेत निवडणुक अधिकाऱ्याकडे दाखल केला नाही म्हणून त्यांना अपात्र का ठरवू नये अशी नोटीस देण्यात आली. याचा अर्थही असाच होतो की, या तीन जाहीरातींच्या 16 हजार 924 रुपये प्रकरणात अशोकराव दोषी आहेत. आणि त्यामुळेच त्यांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. त्यासाठी 20 दिवसाचा वेळ अशोकरावांना देण्यात आला आहे. वेळेत अशोकराव त्याचे उत्तरही देतील.

अशोकरावांनी उत्तर दिल्यानंतर जनप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार अशोकरावांना सध्या असलेले पद सोडावे लागेल आणि सहा वर्षासाठी त्यांना कोणतीही निवडणुक लढविता येणार नाही. तरीपण न्यायपीठाला एक अधिकार असतो त्या अधिकारात कायद्यातील शिक्षेची तरतुद ही लवचीक असते आणि त्या लवचीकतेचा फायदा अशोकरावांना मिळणारच नाही असे आजतरी सांगता येत नाही. त्यानुसार अशेाकरावांना निवडणुक आयोग "सक्तताकीद' देऊन पुढे असे करु नये अशी समज सुध्दा देऊ शकते. या बाबीवर कोणीच विचार करत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय अंतिमतः येण्या अगोदर त्यावर लिखाण अथवा भाष्य करणे आयोग्यच असते एवढेच या शब्दप्रपंचातून मांडायचे आहे.

अंगारक संकष्ट चतुर्थी

अंगारक संकष्ट चतुर्थीला हजारो भाविकांनी घेतले वरद विनायकाचे दर्शन 

हिमायतनगर(वार्ताहर)वर्षातून दोन वेळा मंगळवारची अंगारक संकष्ट चतुर्थीला गणेश दर्शनाला अनन्य साधारण महत्व असून, उमरखेड रस्त्यावरील पांडव कालीन तलावाच्या काठावर वसलेल्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. परंतु मंदिराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर रिमझिम पावसामुळे झालेला चिखल व दुर्गधीयुक्त वातावरणामुळे अक्षरश्या भक्तांना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. तातडीने या खडतर रस्त्याकडे विकासप्रेमी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष देऊन गणेश उत्सवापूर्वी काम मार्गी लाऊन भाविकाची समस्या सोडवावी अशी मागणी दर्शनार्थी भक्तांनी केली आहे.


शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गनिर्मित्त पांडवकालीन युगातील तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात जमा झालेले पान्यात जिवंत पांढर्या कमळाचे अस्तित्व असून, हे निसर्गरम्य वातावरण भक्तांना मोहित करते. मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे येथील निसर्ग सानुनाद्या लोप पावते कि काय अशी भीती भाविकांना लागली आहे. याच श्री कनकेश्वर तलावाच्या काठावर नवसाला पावणाऱ्या पांडव कालीन श्री वरद विनायकाचे मंदिर आहे. दर महिन्याची चतुर्थी व गणेशोत्सवाला दर्शनासाठी हजारो भाविक - भक्त गर्दी करतात. परंतु या ठिकाणी दर्शनार्थीना पाऊस व उन्हापासून बचाव करण्याची आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीच सोय नाही. विशेषतः मंदिराकडे जाणार्या शहरातील जी.प.शाळेपासूनच्या   रस्त्यावर चिखलाचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच उमरखेड रस्ता ते मंदिरापर्यंत जाणारा हा रस्ता देखील अतिशय अडचणीचा असल्याने याचे काम देखील पांदन रस्त्याच्या माध्यमातून करावे अशी मागणी केली जात आहे.

दिलेला शब्द पळणारच...आ.जवळगावकर      


मागील चार महिन्यापूर्वी आ.जवळगावकर यांनी वरद विनायक मंदिराला भेट देऊन पाहणी केली आणि तलावाचे अस्तित्व जोपासण्यासाठी व मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी अभियंत्यांना पाठून इस्टीमेट बनविण्याचे काम हाती घेण्याचे आश्वसन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास बोलताना दिले होते. परंतु याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने भक्तांना अडचणीचा सामना करवा लागत आहे, असे सांगून विचारणा केली असता माधवराव पाटील म्हणाले कि, जुने गोडाऊन ते नडव्या पर्यंतच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल, राहिला प्रश्न वरद विनायक मन्दिर सुशोभीकरणाचा तर तेही लवकरच मार्गी लागेल त्यामुळे दिलेले शब्द मी पाळणारच असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत सरपंच शिंदे यांच्याशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या कि, उद्याच या रस्त्यावरील घाण सफाईसाठी जेसीबी मशीन लाऊन सफाई करून, रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजविण्यात येतील. नंतर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून तातडीने रस्त्याचे काम केले जाईल अशी माहिती त्यांनी दिलि. 

मंडळ कृषी अधिकारी नामोहरम

योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोंचेनात
कामे फक्त कागदावरच..
५० लाखाचा भ्रष्टाचार..
कार्यालय रामभरोसे.. 


हिमायतनगर(अनिल मादसवार)मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील सुपर पॉवर सुपरवायजर पवार यांच्या राजकीय पॉवर मुळे मंडळ कृषी अधिकारी दावलबाजे नामोहरम झाल्याने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामात लाखोचा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरीकातून होत आहे. 

शासनाने मोठा गाजावाजा करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक पाणलोट विकास अभियान हातही घेतले. सदरील कार्यक्रमाचा शेतकर्यांना फायदा होऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा शासनाचा जरी प्रयत्न असला तरी शासनाने नियुक्त केलेलेच कर्मचारी पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. सदरील कार्यक्रमाविषयी नागरिकांना अंधारात ठेऊन एकतर्फी कामाचा सपाटा लावला असून, कागदोपत्री मोठ्या प्रमाणात कामे अरण्यात येत आहेत. अंदाजपत्रकीय मुल्य पायदळी तुडवून पंलोतातील पैश्याचा लोट अधिकारी - कर्मचारी खिश्याकडे वळवीत आहेत असा आरोप दरेसरसम येथील जेष्ठ नागरिक कामाजी रायपलवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. या भागाकडे नियुक्त करण्यात आलेले कृषी सहाय्यक, सुपरवायजर, गावाकडे सहा - सहा महिने फिरकत नसून केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील मंडळ कुशी अधिकारी श्री दावलबाजे हे केवळ नामधारी असून, सुपरवायजर पवार हेच कार्यालय चालवितात कि काय..? असा सवाल तालुक्यातील शेतकरी विचारीत असून, त्यांच्या पॉवरमुळे कृषी अधिकारी नामोहरम असल्याचे दिसून येत आहे. एकात्मिक पाणलोट विकास कायाक्रमाअंतर्गत कोणती कामे केली जात आहेत याची सविस्तर माहिती देण्यास अधिकायांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. अनेक कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. 

तालुक्यातील एका गावात पाणलोट अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड होत असताना शहानिशा करण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधला असता माहिती घेऊन काय करता..? असा सवाल अधिकारी विचारीत असल्याने सदरील गावात किमान ५० लाख रुपयाचा अपहार झाल्याची चर्चा आहे. २०१२-१३ या वर्षात झालेल्या अपहार प्रकरणी लवकरच एक शिष्टमंडळ वरिष्ठांना भेटून कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, सिरंजणी, कोठावाडी, अन्देगाव यासह अनेक ठिकाणी चालू असलेल्या एक्मात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात येथील शेतकऱ्यांची कृषी खात्यामार्फत मातीबंद, शेती सापतोकरण, नाले बांधकाम, बंधारे बांधकाम, आदी योजनांच्या नावाखाली कृषी अधिकारी दावलबाजे यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची अथिक लुट करून लाखो रुपये हडप केल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. 

कार्यालय रामभरोसे 

शेतकऱ्यांसाठी आलेल्या शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोंचत नसून केवळ काही दलालांना हाताशी धरून मर्जीतील लोकांना सग्या- सोयरयाना कृषी विभागाच्या योजनांची खिरापत वाटण्यात येत आहे. तर गरजू लाभार्थी शासनाच्या योजनापासून वंचित राहत आहेत. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी असलेल्या योजना फस्त करण्याचे काम अधिकारी आणि कर्मचारी करीत असून, शेतकर्यांना समधानकारक साधे उत्तरही देण्याची तत्परता अधिकारी दाखवीत नाहीत. केवळ दोन चार कर्मचारी सोडले तर कार्यालयात अधिकारी भेटणे मात्र लाभार्थ्यांच्या नशिबानेच. 

सोमवार, 14 जुलाई 2014

वाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार

हिमायतनगर(वार्ताहर)येथील पोलिस स्थानकाचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी रुजू होताच वाहनधारकांना शिस्त लावत मोटारवाहन परवाना नसलेल्या चालकांना परवाना मिळून देण्यासाठी अथक प्रयत्न सुरु केले आहे. आणि एकाच दिवसात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला फळ मिळाले आहे.

हिमायतनगर तालुका हा तसा मागासलेला तालुका येथे काम करण्यासाठी बरेचशे कर्मचारी आणि अधिकारी नाक मुरडत असतात. परतू येथे नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यानी अनेक स्तुत्य कामांची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील अनेक वाहन धारकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने गौतम यांच्या धास्तीने अनेक अनुभवी तथा नवशिके चालक शहरात वाहने चालविणे टाळत आहेत. कारण विनापरवाना वाहन चालविता आढळून आल्यास मिळणारा प्रसाद म्हणजे गौतम साहेबांची कार्यवाही या कार्यवाही पोटी अनेक नागरिक वाहन चालविणे पसंद करीत नाहीत. जुन्या ओकेल मिश्रीत इंधनावर चालणार्या गाड्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत.

विनापरवना वाहन चालवणार्यांना परवाना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने गौतम यांना विनंती केली होती. त्यांनी यास दुजोरा देत तात्काळ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना संपर्क साधून येथे कैम्प लावण्यासंदर्भातील मागणी लाऊन धरली. आज दि.१४ रोजी तातडीने पत्र मेल करण्याचे सांगून हि मागणी मंजूर केली आहे. दि.१५ रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.व्ही.सागरे हे हिमायतनगर येथे कैम्प लावण्यासंदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर दर महिन्याला एक दिवस येथे वाहन परवाना शिबीर घेण्यासाठी वाहन निरीक्षक यांना पाठविणार आहेत. यामुळे तालुक्यातील वाहनधारकांच्या वेळेसह पैश्याची बचत होऊन हिमायतनगर शहरातच परवाना मिळणार आहे. पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सव स्तरातून कौतुक व आगामी काळात अश्या प्रकारचे अनेक उपक्रम राबून समस्यांचे माहेर घर बनलेल्या हिमायतनगरातील कचरा साफ करवा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहेत.

कुठे ढगाळ तर कुठे पाऊस

नांदेड(अनिल मादसवार)तीन दिवसाच्या फरकानंतर जिल्हयात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन कुठे पाऊस तर कुठे केवळ ढगाळ वातावरण दिसून आले आहे. सर्वत्र पहिल्यांदा मंगळवारच्या रात्री 8 तारखेला पावसाचे आगमन झाले होते.

यावर्षी मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले, त्यानंतरच्या नक्षत्रात ऐन आषाढी एकादशीपासून पांडुरंगाच्या कृपेने मराठवाड्यात पावसाला दुरुवात झाली. मात्र पुन्हा चार दिवस उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला होता. परंतु काल पासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आता पाऊस असाच बरसत राहील अशी अशा शेतकर्यांना लागली आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात ५० टक्याहून अधिक पेरण्य होणे बाकी असल्याचे चित्र उजाड रानोमाळाच्या चित्रावरून दिसून येत आहे. उशीराने का होईना पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे.

रविवारच्या रात्री तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये पुढील प्रमाणे आहे. नांदेड- 16.25, मुखेड-3.67, अर्धापूर-8.67, भोकर-6.5, उमरी-2.00, कंधार-0.83, लोहा-3.50, किनवट-5.14, माहूर-4.25, हदगाव-7.85, देगलूर-11.67, हिमायतनगर-1.67, धर्माबाद-1.0, नायगाव-13.0, बिलोली-17.60, मुखेड-1.71मी मी.पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात रविवारच्या रात्री एकूण 105.31 मि.मी. पाऊस, झाला त्याची सरासरी 6.58 मि.मी. एवढी आहे.

यात सर्वात कमी पाऊस म्हणजे हिमायतनगर तालुक्यात झाला असून, मागील ४ मी.मी.व कालचा १.६७ मी.मी. म्हणजे केवळ ६ मी.मी.अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या वर्षीचा दुष्काळ शेतकर्यांना वेठीस धरणारा ठरला असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

अजूनही पाण्यासाठी महिलांच्या दिंड्या

पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने सध्या तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाई बरोबर चार टंचाई चे सावट दिसून येत आहे. आगामी काळात होणारी पाण्याची चिंता लक्षात घेता महिला, मुले व वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ देवी देवतांना साकडे घालत आहेत. आज दि.१४ सोमवारी तालुक्यातील सवाना जा येथील महिलांची ७ कि.मी.वरून हिमायतनगर शहरात दाखल झालेल्या पाई दिंडीने परमेश्वराला साकडे घालून पाऊस पाणी पडू दे अशी विनवणी केली आहे.

कापूस लागवडीचे दिवस गेल्याने केवळ चार उगवण्याची वेळ

कापूस लागवडीचे नक्षत्र गेल्यामुळे आता कपाशीची लागवड होणे शक्य नाही. तर मुग, उडीद, सोयाबीन, ज्वारी सुद्धा उत्पन्न देऊ शकत नाही. पाऊस झाला नसल्यामुळे कापूस या नगदी पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अनेक पिके कोमेजून गेली. आता काय करावे.. बेन्केचे व साहुकारांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी किमान जनावरांचा चारा तरी निघेल या दृष्टीने ज्वारी पेरणीवर भर देणार असल्याचे काहींनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

रविवार, 13 जुलाई 2014

बदलीचा घाट

माझा सत्कार करू नका सहकार्य करा...
अनिलसिंह गौतम 


हिमायतनगर(वार्ताहर)पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकाताचा अनेक चाहत्यांनी त्यांना भेटून स्वागत केले तर आपल्या आशा - आकांक्षाही बोलून दाखविल्या. यावेळी नगरीक व पत्रकारांना संबोधित करताना माझा सत्कार करू नका.. सहकार्य करा. तरच शहरातील सर्व अवैद्य धंदे, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यश मिळेल असे उद्गार अनिलसिंह गौतम यांनी काढले. तसेच माझ्यावर नाखूष असलेल्या काहींनी बदलीचा घाट घातल्याचेही सांगितले. 

हिमायतनगर शहरात नव्याने आलेले गौतम यांचा सत्कार करून त्याच्या अतिशय जवळचा मीच आहे असे दाखविण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जणू गुत्म यांचा सत्कार करण्यासाठी हिमायतनगर शहरात चढ ओढ लागल्याच्या संयुक्त प्रतिकिया काही जागरुकानी बोलून दाखविल्या आहेत. त्यामुळे केवळ माझा सत्कार करण्याने शहरातील समस्या सुटणार नाहीत. यासाठी माल रात्रंदिवस काम करावे लागेल. माझ्या कामाची पद्धत वेगळी असली तरी अगोदर ती सर्वाना रुचणारी आहे. त्यामुळे माझा सत्कार काऊ नका माझ्या कामात अडथळे निर्माण करण्यापेक्षा मला माझ्या पद्धतीने काम करू द्या. तरच शहराला दुषित करून पाहण्यार्या सर्व अवैद्य धंद्यांना आळा घालण्यात मदत होईल. यासाठी अगोदर मी आमच्या कार्मचार्यापासून केली आहे. पोलिस, पोलिस पाटील यांना सक्त सूचन देऊन प्रथमतः अवैद्य दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पयत्न केले जात आहे. त्यासाठी परवानाधाकाना सुद्धा नियमाप्रमाणे दुकाने उघडणे व बंद काणे बंधनकारक केले आहे. सूचनेकडे दुर्लक्ष करणार्यांना याचा दंड भरावा लागणार आहे. तसेच शहरासह तालुक्यातील मटका जुगार अवैध गुटका विक्री अवैध दारुविक्री स्वस्त धान्यांचा काळा बाजार रॉकेलचा काळाबाजार अवैध प्रवासी वाहतूक यासह रोडरोमीयोंचा नक्कीच बंदोबस्त करून या सर्वच नंबर दोनच्या धंद्याचा कायमचा लगाम घालू. तर दुचाकी, चारचाकी चालकांनी आपल्याकडे वाहनाची कगदपत्रे, लाईसेन सोबत ठेवून नियमांचे पालन करावे. नियम तोडणार्यांना धडा शिकविला तर जाईलचा, त्यांच्यासाठी आता महिन्यातून एका वेळा दुचाकी, चारचाकी परवन मिळून देण्यासाठी हिमायतनगर शहातील एखाद्या  मोकळ्या ठिकाणी आर.टी.ओ. ची एक दिवस भेटीची तारीख ठरविली जाणार असल्याचे गौतम, यांनी सांगितले.          

येथील मराठी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस.पी.घुगे व पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, ज्ञानेश्वर पंदलवाड, पाशा खतीब, शुध्दोधन हणवते, मारोती वाडेकर, बसंत राठोड, सुनिल सुवर्णकार, छायाचित्रवार सोपान बोंपीलवार, दत्ता पोपुलवाड, जांबुवंत मिराशे आदी उपस्थित होते. 

तर महाष्ट्राराज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी गौतम म्हणाले कि, हिमायतनगर शहरात पत्रकारांची संख्या जास्तीची दिसत आहे. त्यामुळे खरे कोण ha प्रश्न आहे, करिता पत्रकारांची शोध मोहिमेसाठी वरिष्ठांचे मार्गदशन घेऊन सर्वांचे ओळखपत्र व यादी  मागविली जाणार आहे. मला येउन पाच दिवस झाले माझ्या कामावर काही जन खुश तर काही जन नाखूष आहेत. येथील स्थानकाचा पदभार माझ्याकडे दिल्यामुळे काम करणे भाग आहे. माझ्या कामाची पद्धत हि शिस्तप्रिय व कडक आहे. यामुळे ज्यांना हे खटकत आहे, त्यापैकी काहींनी  माझ्या बदलीचा घाट घातला आहे. परंतु मी जोवर येथे आहे, तोपर्यंत सर्वाना नियमानुसार आपले कार्य करून मला सहकार्य करावे. अन्यथा नियम तोडणारा कोणीही असो, त्याची कदापि गैर केली जाणार नाही असे यांनी स्पष्ठ केले. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गाडगे, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, पामेश्वर शिंदे, सचिव तथा नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, कानबा पोपलवार, प्रेमकुमार धर्माधिकारी, अनिल भोरे, दिलीप  शिंदे, असद मौलाना, फाहद खान, धम्मपाल मुनेश्वर, माधव यमजलवाड आदींसह अनेक पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते.

मागील पंधर वाड्यात या ठिकाणी तहसीलदार म्हणून उजू झलेल्या आबासाहेब चौरे यांची बदली अवघ्या तीन तासात केली होती, हे सर्वश्रुत आहे. आता या ठिकाणी अनिलसिंह गौतम येणार हे समजताच ते इकडे येण्यापुर्वीच बदलीचा घाट घालण्यात अलायची चर्चा होती. मात्र त्यांनी येथील स्थानकाचा पदभार स्वीकारला त्यामुळे सामान्य जनतेला शहरासह ग्रामीण भागात बोकालेल्या अवैद्य धंद्याच्या दुर्गंधी पासून मुक्तता मिळाल्याचे संधान लाभले. मात्र आज गौतम यांनी स्वतः माझ्या बदलीचा घाट घातल्याचे स्पष्ट करताच सामान्य नागरिकात यासाठी जबाबदार असलेल्या लोकांबाबत तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील राजकीय नेत्यांना चांगले अधिकाई नको आहेत हे यावरून स्पष्ठ होत आहे. मात्र गौतम यांना तीन महिन्यासाठी पदभा दिले असले तरी आता त्यांना कायम स्वरूपी या ठिकाणी नेमणूक करावी या मागणीसाठी जनतेचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकार्याच्या भेतीसः वेळ प्रसंगी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे काही नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.  

धोंडी.. धोंडी पाणी दे

नांदेड(अनिल मादसवार)जुलै महीना आर्धा संपत आला असतांना वरुन राजाने पाठ फिरवील्याने बळीराजासह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. शेतकरी पावसासाठी देवी -देवतांना साकडे घालत असुन, चिमुकले बालके धोंडी..धोंडी..पाणी दे..चा नारा देउन वरुण राजाला विनवणी करीत असल्याचे चित्र जील्ह्यातील बहुतांश तालुक्यात दिसून येत आहे.

पावसाच्या हुलकावनीने पहील्या टप्यात लावलेली कापसाची पिके नुकसानीत आली असुन, ती जगवीण्यासाठी शेतकर्‍यांना भांड्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. तरीसुध्दा पिके वाळु लागली असुन, येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट येण्याच्या भिती व्यक्त होत आहे. मृग नक्षत्राच्या पहील्याच पावसावर हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठ परीसरातील जवळपास सर्वच शेतक-यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या. परंतु मागील दिड महन्यापासुन वरुन राजाने पाठ फिरवील्यामुळे पावसाअभावी पिके वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातुर झाला आहे. रोहीण्या, मृग, आर्द्रा नक्षत्रातही समधानकारक पाऊस पडलाच नाही. आभाळात आलेली ढग वादळी वा-याने पुढे पळत आहेत. प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतक-यांसह सर्वसमान्य नागरीक वाढत्या उकाडयाने हैरान झाले आहेत. त्यातच जनवरांच्या चा-याचाही प्रश्‍न गंभीर बनला असुन, वेधशाळेच्या अंदाजाने कोरडवाहु शेतक-यांनी पेरलेली बियाणे जमीनीतच गुदमरुन जात आहेत. तर काही शेतक-यांच्या जमीनीतील ओलाव्याने पिके वार्‍यावर डोलु लागली, तर काहींची बियाणे बाळसे धरण्यापुर्वीच कोमेजुन गेली आहेत. जी बिजांकुरे वर आली ती ही वाढत्या तापमानामुळे सुकन जात असल्याचे चित्र परीसरात दिसत आहे. 

चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी पिकांना जगवीण्यासाठी भांड्याने पाणी देत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या शेतक-यांना शासनाकडुन थोडीफार मदत मिळाली मात्र, ती अत्यल्प असल्याने गरीब शेतकरी आर्थीक संकटात आला आहे. यावर्षीच्या पेरणीसाठी अनेक शेतकर्यांना साहुकार व बैंकेच उंबरठे झिजवावे लागल आहे. ती वेळ पुढील वर्षात येऊ नये म्हणुन पाण्यासाठी शेतकरी देवी - देवतांना साकडे घालत असुन, ग्रामीण भागात अन्नदानाच्या पंगती, महिलांकडून घट मांडण्यावर भर दिला जात आहे. तसेच शहरातील बालके वरुन राजाला खुश करण्यासाठी लिंबाच्या फरोळ्यावर बेंडुक बांधुन धोंडी...धोंडी पाणी दे..साई माई पिकु दे..धोंडी बाई धोंडी ..धोंडीचे दिवसं..पाणी मोठ हिवस...असा नारा देत येरे..येरे...पावसा तुला देतो पैसा.. अशी विनवणी वरुन राजाकडे करीत धान्य गोळा करुन सायंकाळी जेवनाच्या पंगती उठवत आहेत.

हिमायतनगर तालुक्यात हीच परिस्थिती असून, या वर्षी तर आत्ता पर्यंत केवळ ६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अजूनही शेतकरी चिंतेत असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने ५० टक्क्याहून अधिक क्षेत्रातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याचे 48 हजार 543 हेक्टर भौगोलीक क्षेत्र असुन, 33 हजार 200 हेक्टर जमीन लागवडी खाली येते. गत वर्षी जुलै महीन्यात 100 टक्के खरीप पेरणी झाली होती. त्यात 20 हजार 600 हेक्टर जमीनीवर कापुस लागवड करण्यात आली होती. तर 6 हजार 600 हेक्टरमध्ये सोयबीन, तुर 2432 हेक्टर, मुग 390 हेक्टर, उडीद 404 हेक्टर, तळ 59 हेक्टर, ज्वारी 3 हजार 317 हेक्टर, भात 25 हेक्टर, उस 790 हेक्टर अशी पेरणी करण्यात आली होती. परंतु या वर्षी पावसा्भावी पेरण्या लंाबणीवर गेल्या असुन, शेतक-यांनी चांगला पाऊस होईपर्यंन्त पेरण्या करुनये. तसेच कृषी विभागाशी संपर्क साधुन पिके घ्यावीत असे आवाहण तालुका कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे.

कुऱ्हाडीने मारहाण

हिमायतनगर(वार्ताहर)शेतातून बैलगाडी का घेऊन जातो असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दोघांना कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याची घटना रमनवाडी शेतशिवारात दि. ०९ बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी येथील पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील चव्हाण करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे रमनवाडी येथील अर्जुन धावजी आडे हे रान कोरडे असल्याने मध्य मार्ग शेतातून बैलगाडी घेऊन जात होते. त्यावेळी शेतमालक शिवाजी महादू बिलेवाड याने आमच्या शेतातून बैलगाडी का नेतोस अशी विचारणा केली. यावेळी सध्या रान कोरडे असल्याने नेत आहे, पुन्हा येणार नाही असे सांगितले असताना देखील बिलेवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत महान केली. हा प्रकार पाहून मधुकर रामसिंग आडे सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करून आरोपी शिवाजी महादू बिलेवाड, अवधूत महादू बिलेवाड, आडेलू महादू बिलेवाड या तिघांनी संगनमताने कुर्हाडी व काठ्याने मारहाण करून डोके फोडले.

अश्या गंभीर अवस्थेत जखमींनी हिमायतनगर पोलिस ठाणे गाठल्याने आठवडी बाजारच्या दिवशी हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गाडी जमली होती. या बाबत अजून आडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिघा बिलेवाड बंधूवर हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल कण्यात आले आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, ८ ते१० टाके पडल्याचे समजते. मारहाण करणाऱ्या पैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोन आरोपी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी फरार झाले आहेत.

सदर मारहाणीची घटना घडलेल्या दिवशीच अनिलसिंह गौतम यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे हा गुन्हा तातडीने दाखल करण्यात आला आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे असे घडलेले गुन्हे पोलिस व आरोपींच्या देवाण घेवाणीतून फिर्यादीवर दबाव आणीत रफा- दफ़ा केल्या गेले असते अशी प्रतिक्रिया स्थानकात उपस्थित नाग्रीकातून ऐकावयास मिळाली आहे.

याबाबत अनिलसिंह गौतम यांच्याशी विचारणा केली असता फरार दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन, अटक आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चौकशी अथवा तपासासाठी १४ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सांगितले.

शनिवार, 12 जुलाई 2014

स्वर झंकारच्या सुरात

हिमायतनगर(अनिल मादसवार)आषाढी एकादशीच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयोजित स्वर झंकार अभंगवाणीच्या कार्यक्रमातील गीतांच्या सुराने उपस्थित श्रोतेगण अक्षरश्या न्हाऊन निघाल्याचा अनुभव हिमायतनगर वासियांना आला आहे. 

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी येथील श्री परमेश्वर मंदिरात पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दि.११ शुक्रवारी रात्री ओंकार संस्था पुणे निर्मित्त " स्वर झंकार " हा अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर झंकारचे संयोजक गायक श्री परमेश्वर तीप्पणवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ हे होते. तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रकाश शिंदे, प्रतिष्ठित व्यापारी श्री पांडुरंग तुप्तेवार, परमेश्वर पानपट्टे व इतर नागरिक व श्रोतेगन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माउलीच्या मूर्तीला नमन करून संगीत कार्यक्रमास प्रतिष्ठित गायक ज्ञानेश्वर तोशेटवार यांनी " पर्वत जळतील पापाचे ".. आणि " बाजे मुरलिया बाजे "...हि भक्तिरचना सदार करून सवाना मंत्रमुग्ध केले. तसेच स्वर झंकार कार्यक्रमाचे प्रमुख परमेश्वर यांनी पंचपदीतील जय जय विठोबा रखुमाई हि भक्तिरचना सदर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच या कार्यक्रमात बोलवा विठ्ठल... पाहावा विठ्ठला...करावा विठ्ठला..जीव भावे..., येवो विठ्ठले...अबीर गुलाल उधळीत रंग...तसेच पेक्षकांच्या आग्रहास्तव दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... हे भावगीत सदर करून वाहवा मिळविली. कार्यक्रमात तबला मृदंगावर सचिन बोम्पीलवार, कृष्णा बोम्पीलवार, ऑर्गन वादक चंद्रकांत चीद्रावार, हार्मोनियम पोषट्टी यम्मलवाड, यांनी उत्तम साद दिली. 

मी जनतेचा सेवक...

मी जनतेचा सेवक... पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम 


हिमायतनगर(अनिल मादसवार)ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाची सूत्रे स्वीकारलेल्या अनिलसिंह गौतम यांच्या रुजू होण्यानंतर कोणतेही विशेष प्रयत्न न करता अविद्या धंदे वाल्यांनी आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे घरपोच मिळणारी देशी दारू परवानाधारक दुकानातून दुकान उघडण्याच्या वेळे नंतरच मिळू लागली आहे. गुटखा, मटका, आणि जीवाला चटका लावणाऱ्या घटना आपोआपच बंद झाल्या आहेत. अवैद्य धंदेवाल्यांना चाप बसल्याने या मागचे रहस्य काय..? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मी शासनाचा पगार घेतो आणि घेत असलेल्या पगाराचा मोबदला म्हणून इमाने इतबारे जनतेची सेवा करणे हे माजे अद्य कर्तव्य असून, मी जनतेचा सेवक आहे असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांना दिले.

आतिशय कडक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाचे, गुन्हेगारांना सळो कि पळो करणारे, राजकारण्यांच्या  दबावाला बळी न पडणारे पोलिस निरीक्षक म्हणून अनिलसिंह गौतम ख्याती आहे. वर्दीतील माणुसकी दाखविणारे गौतम या अधिकायाचे कर्तव्य सर्व सामन्य नागरिकांच्या हिताचे असले तरी ते राजकारण्यांना न रुचणारे आहे. त्यामुळे हिमायतनगर पोलिस स्थानकाचा त्यांचा कार्यकाळ किती दिवसाचा असणार..? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर मी आहे तोपर्यंत चोख काम करणार असून, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसून, आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व्हावी यासाठी मोठी तयारी केली आहे. येत्या महिन्याभरात तालुक्यातील सर्व वाडी - तांड्यात जाऊन प्रत्यक्ष नागरिकांची भेट घेणार आहे. तसेच गावातील हालचाली व समस्यांची माहिती घेऊन गोरागारीबना न्याय मिळून देणे यावर माझे प्रमुख लक्ष असणार आहे. विशेषतः महिला - मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलणार असून, ग्रामीण व शहरी भागात होत असलेली अविद्या दारू विक्रीवर कायाम्स्वुपी लगाम घालणार आहे. यासाठी नुकतीच सर्व पोलिस पाटलांची बैठक घेऊन कडक सूचना देण्यात आल्या असून, सर्वप्रकारची माहिती संकलित करणे चालू आहे. या सर्व अवैद्य कारनाम्यावर अंकुश ठेवण्यासाठी सर्व पोलिसांची परेड घेऊन सक्त ताकीद दिली आहे. पोलिस स्थानकातील सर्व कर्मचारी व अधिकारी जनतेचे सेवक असल्याने कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मला थेट संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.   

धास्तीने अनेक धंदे सावरले .. महिलांमध्ये समाधान 

गौतम यांच्या येण्याने शहरतील वर्दळीचे रस्ते खुले झाले असून, दुकानदारांनी रस्त्यावर येणारे आपले सामान दुकानात ओढले आहे. असता व्यस्त लागण्यार्या दुचाकी, फुटोस्तोर मनसे कोंबनाऱ्या काळी - पिवळी, बंदी असली तरी वाढीव दराने मिळणारा गुटखा, दिवसा ढवळ्या दुचाकी वरून खेड्या - पाड्या पर्यंत पोंचणारी देशी दारू अगदी चुटकी सरशी बंद झाली आहे. या प्रकारामुळे सर्व सामान्य महिला, नागरीकातून गौतम यांच्या कार्यपद्धतीवर समाधान मानले जात असून, कोण आहे हा गौतम असे उत्सुकतेचे शब्द दारूड्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या महिलांमधून विचारला जात   आहे.      


शुक्रवार, 11 जुलाई 2014

टोळी सक्रिय..?

नीळ हरणाच्या हत्येची शंका..
गंभीर हरणास उपचारासाठी नांदेडला हलविले..
शव विच्छेदन न करताच प्रेताची विल्हेवाट 

हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील कारला पाटीच्या फाट्या जवळ दि.११ शुक्रवारी सकाळच्या प्रहरी एक वर्षीय हरणाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून, हत्या करून अपघात दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत वनविभागाकडून वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मृत हरणाच्या अंगावरील कातडी व मास काढून केवळ सांगाडा घटनास्थळी आढळून आल्याने हरणाचा गूढ मृत्यू वन्यप्रेमी नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. याच परिसरात काही तासात आणखी एक हरीण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व घटनेवरून हरणाची शिकार करणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

हिमायतनगर - इस्लापूर जंगल परिसरात हरीण - नीळ, रोही, नील गाय, ससे, घोरपड, राष्ट्रीय पक्षी मोर यासह अन्य वन्य प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला असून, म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पाणी व खाद्याच्या शोधत हरणाचे कळपे मानवीवस्ती व पाणी - पिके असलेल्या शेत - शिवाराकडे धाव घेत आहेत. अश्याच परिस्थितीत आलेल्या वन्य प्राण्यांच्या कळपावर पिछोंडी, हिमायतनगर, सवना, कारला परिसरात काही शिकार्यांनी जाळे पसरविले आहे. धावणाऱ्या कळपावर लाठ्या काठ्यांनी हल्ला करून जखमी करून त्यांची शिकार केली जात असल्याची चर्चा आहे. एवढेचे नव्हे तर काही शिकार्यांनी तर खवय्यांसाठी हरण व मोरांचे मांस १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री करीत असल्याचे आजच्या घटनेतून बोलले जात आहे. 

मागील तीन वर्षापूर्वी पिछोंडी परिसरातील रेल्वे पट्टीवर हरणाची हत्या करून खाद्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हि बाब काहींही पाहतच हरणाचे शव त्यच ठिकाणी ठेऊन शिकारी फरार झाले होते. तर नांदेड - किनवट राज्य रस्त्याजवळ हिमायतनगर शिवारात हरणाचे शीर खड्ड्यात फेकून धड गायब करण्यात आले होते. तर कारला शिवारात एकाच दिवशी ५० ते ३५ मोराची कत्तल केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यात वन्य प्राण्यांची कत्तल होत असल्याचे वृत्त आम्ही प्रसिद्ध केले होते. परंतु वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष न देत अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच कि काय पुन्हा तालुक्यात शिकारी सक्रिय झाल्याचे आजच्या घटनेतून दिसून येत आहेत. अश्या प्रतिक्रिया घटनास्थळावर उपस्थित काही वन्यप्रेमी नागरिकांनी विचारल्या आहेत. त्यामुळे कि काय..? प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून वनविभागाने नीळ हरनाच्या मृत्यूचा आपल्याच अखत्यारीत पंचनामा करून परस्पर प्रेताची विल्हेवाट लावली आहे. आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र हरणाचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप गूढ आहे. 

जखमी हरीण पुढील उपचारासाठी नांदेडला 

वन विभागाच्या कर्मचार्यांनी शव विच्छेदन न करताच हरणाचे प्रेत जाळून नष्ठ केले आहे. त्याच्या काही वेळानंतर याच परिसरात हरणाची शिकार करणारी टोळी कारला येथील काही युवकांना दिसली, त्यांचा पाठलाग करताच त्यांनी एका जखमी हरणास झुडपात लपऊन ठेऊन पळ काढला आहे. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर त्या जखमी हरीनास ताब्यात घेऊन येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यास गंभीर दुखापत झाली असून, समोरील डावा पाय तुटला तर कम्ब्रेतही चांगलाच मार लागल्याने उठून उभे राहणे कठीण असून, मृत्यूशी झुंज देत असल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी नांदेडला नेण्याचा सल्ला वनकर्मचार्यांना दिला आहे. 


हरणाच्या मृत्यूची चौकशी व्हावी... पाटील 

हरणाची कातडी काडलेली दिसते आणि त्याच्या अंगावरचा मास काढून या हथ्याखोरांनी खालेले आहे, मृत हरणाचे तोंड सुस्थितीत आहे. हा प्रकार हत्येचाच आहे. हे वानविभागवाले असेच म्हणणार आहेत. कारण त्यांना काम लागते ना.. परंतु याची चौकशी वनविभागाने केली पाहिजे खरे हत्येखोर कोण आहेत, हरणाचे प्रेत जाळून टाकण्यात वनपाल, वनरक्षकाने घाई का केली..? हे वन विभागाने समोर आणले पाहिजे अशी मागणी पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संस्थेचे विनोद कुटे पाटील यांनी केली आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, वनविभागा एवढीच वन्यप्राणी सुरक्षेची नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे सांगत शिकारी सापडले तर कार्यवाही निश्चित करण्यात येईल, परंतु सदरील घटना हि अपघात असल्याचे सांगून शिकारी सक्रिय असल्याच्या वृत्तास नकार दिला. 
या बाबत एका वन कर्मचार्याशी खाजगीत बातचीत केली असता ते म्हणाले कि, कदाचित शिकारी टोळी पाठीमागे लागली असेल, त्यामुळे सैर वैरा पळणार्या हरणाच्या काळापा पैकी एक हरीण वाहनाच्या धडकेने मरण पावला. तरी देखील शिकार्याने हरणाचे मास व कातडी कडून नेली असल्याने प्रेताची अवस्था अशी झाली असावी अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. 

गुरुवार, 10 जुलाई 2014

पथकाकडून तपासणी

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील वर्दळीच्या ठिकाण असलेल्या बसस्थानक परमेश्वर मंदिर, मस्जिद व सर्व देवी देवतांचे मंदिर असेलेल्या ठिकाणावर नांदेड येथील बॉम्ब शोधक पथकाने यंत्राच्या सहाय्याने गुरुवार ता.१० रोजी तपासणी केली.

जिल्ह्यात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरे, मस्जीत सुरक्षेच्या दुष्टीने प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून, जिल्ह्यातील १६ तालुक्यात जागोजागी नाकेबंदी करून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. त्या अनुषंगाने हिमायतनगर शहरात सुद्धा पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त वाढविली आहे. तर शहरतील मंदिरे, मस्जिद या ठिकाणावर नांदेड येथील बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख विठ्ठल घोडके, अजय यादव राजू चव्हाण, रंगराव राठोड, यांनी यंत्राद्वारे कसून तपासणी केली. शहरात प्रथमच अश्या प्रकारची तपासणी केल्याने नागीकानी हे दृश्य पाहण्यासाठी कुतूहलाने उपस्थिती लावली होती. 

खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना

आषाढी एकादशी निमित्ताने टाळ - मृदंगाच्या गजरात नगरप्रदक्षिणा दिंडी हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील महिला - पुरुष विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशी उत्सवा निमित्ताने टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात नगर प्रदक्षिणा दिंडी काढून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला. तसेच आगामी खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ, पाऊस पाणी होऊन दुष्काळाची छाया दूर कर... अशी प्रार्थना करून येथील परमेश्वर मंदिरातील श्रीचे व विठ्ठल रुखमाई चे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले. 

दर वर्षी शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा उत्सव आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या निमित्ताने मागील चार दिवसापासून अखंड विना पारायण, हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरु आहे.  बोरगडी येथील माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या मधुर वाणी व मंदिर विश्वस्तांच्या उपस्थित शेकडो महिला, पुरुष, बालके, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करीत आहेत. साप्ताह दरम्यान आलेल्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत हातही भगव्या पताका घेऊन..विठूनामाचा गजर करीत, टाळ -मृदंगाच्या वाणीत हरिनामाचा गजर करीत वाढोणा शहराला नगर प्रदक्षिणा केली आहे. 

नगर प्रदक्षिणा दिंडीत शेकडो महिला व बालकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान शहरच्या गावाबाहेरील व शहरातील सर्व मंदिरातील देवी - देवतांचे दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यांनी घेतला आहे. पावसातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी दिनी नगर प्रदक्षिणा काढण्याची हि परंपरा मागील शेकडो वर्षापासून मंदिर समितीच्या पुढाकारातून  अविरतपणे सुरु असून, भजन गीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात परत येउन करण्यात आला आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी शोभा यात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोल - ताश्याच्या गजरात काढण्यात येउन, महाप्रसाद, अन्नदानाच्या पंगतीने समारोप केल्या जाणार आहे.