परंपरा कायम जपा

आदर्श गावाची परंपरा कायम जपा...अनिलसिंह गौतम

हिमायतनगर(अनिल मादसवार)सर्व जाती - धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असतील तरच गावात लक्ष्मी नांदेल.. टेंभी हे गाव गुरुदेव सेवा मंडळाच्या विचाराने प्रभावित असल्याचे पाहून मनोमन आनंद झाला आहे. गावाचा आदर्शापणा जापण्यासाठी कायम प्रयत्न करा असे आवाहन हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले. ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथील गावकर्यांना शांतता कमेटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, अशोक अनगुलवार, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, मुन्शी आनेबोईनवाड  आदींसह गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. 

हिमायतनगर येथे रुजू झाल्यापासून अनेक लोकप्रिय कामे हाती घेतल्याने अनिलसिंह गौतम हे सर्व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. रमजान ईद, गणेशोत्सव, पोळा यासह, आगामी विधानसभा निवडणुका शांततेत व्हाव्या यासाठी गत तीन दिवसापासून गौतम यांनी गाव - खेडे - पाडे, वाडी - तांडे तथा १०० घरांची वस्ती असलेल्या सर्वच ठिकाणी जाऊन शांतता कमेटीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावातील वातावरण प्रदूषित करून भांडण तंट्यास खतपाणी घालणाऱ्या सर्व अवैद्य धंदेवाल्यांनी आपले बस्तान गुंडाळून चांगल्या कामास सुरुवात करावी अन्यथा अश्या दुर्जनांची यथेच्छ धुलाई करण्यात येईल. माझे काम शिस्तबद्ध व कडक आहे, मी काळे कागद करण्यात वेळ वाया घालात नाही, जो चुकला त्याला ठोकला असे माझे काम आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे. 


तसेच ग्रामीण भागातील पालकांनी पाल्याच्या शिक्षणावर अधिक भर द्यावा, कारण हे स्पर्धेचे युग  आहे, परंतु बहुतांश विद्यार्थी हे तासानतास टी.व्ही.समोर बसून अमुल्य वेळ वाया घालतात. हे सर्व करीत असताना वेळेचे भान ठेवून मैदानी, खेळ, कुस्तीचे  आखाडे, नियमित व्यायाम व अभ्यास करावा. तरच स्पर्धेच्या युगात आजचा विद्यार्थी टिकू शकेल. तसेच संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराजांची शिकवण चांगली आहे, गावातील जेष्ठांनी गावात धार्मिक, प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन संतांचे महात्मे, विचार सर्वांपर्यंत पोन्चविण्यासाठी गावात गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य वाढवावे. त्यासाठी लहान थोरांनी माणूस म्हणून जगण्यासाठी माणुसकी जपा, भांडण तंटे, करून घेऊ नका, माझे घर..माझा शेजारी...माझे गाव..समजून सन उत्सव आनंदाने पार पडा असेही ते म्हणाले.   


तसेच आगामी काळात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, त्यासह अन्य सन उत्सव काळात दारू, जुगार, मटका यासह अन्य अवैद्य धंदे बंद झाले पाहिजे. निवडणूक काळात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी दाखूउ नये, असा कोणी पर्यंत करीत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही. कारण मी कोणाचेही ऐकत नाही. तसेच गावच्या सुरक्षेसाठी १८ ते ३५ वर्ष वायोगटातील युवकांचे ग्रामसुरक्षादल कार्यरत ठेवल्यास चोर्या, लुटमार होणार नाहीत. त्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन आदर्श गावाची परंपरा कायम ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गावातील तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष्या, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते   आणि गावातील महिला पुरुष व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन गणपत महाराज यांनी केले उपस्थितांचे आभार सर्पांचा साईनाथ राजरवाड यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी