घाणीचे साम्राज्य...

सरपंचाच्या वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात 
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील नाल्या जागोजागी तुंबल्या असल्याने अल्पश्या पावसाने नालीतील घाण रस्त्यावर येउन नागरिकांच्या घरात जात असून, परिणामी सरपंचाच्या वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र कोर्ट परिसराच्या पाठीमागे दिसून येत आहे. 
येथील लाकडोबा चौक परिसरातील न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या वार्ड क्रमांक ३ मधील वस्तीत सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावली नसल्याने जागोजागी गटार तुंबलेले आहे. याचा वार्डातून सरपंचांसह तीन सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांनी स्वार्थ असलेल्या रस्ते निर्मित्ती तथा गुत्तेदारीमध्ये व्यस्त राहत असल्याने नागरी समस्यांचे काही देणे घेणे नाही अश्या तोर्यात वावरत आहेत. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अल्पश्या पावसाचे पाणी सुद्धा नागरिकांच्या घरात घुसत असल्याने या भागातील रहिवाशियंचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्यासंबंधी वारंवार अर्ज विनंत्या करूनही सदरील वस्तीत रस्ते, नाली बांधकाम करण्यास ग्राम पंचायत टाळाटाळ करीत असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे डोक्यावर घेऊन गटारातून मार्ग शोधावा लागत असल्याने एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इकडे ढुंकूनही पहात नसून केवळ नावापुरतेच असल्याचे नागरीकातून सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचे पुढारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न पाहत असल्यने चमकोगिरीवर त्यांचा अधिक जोर असल्याचा येथील नागरीक सांगत आहेत. 

अनेक वेळा ग्रामपंचायतीत खेटे मारूनही निद्रिस्त पुढारी जागे होत नसल्याने ग्रामपंचायतीसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिला आहे.

याबाबत सरपंच शिंदे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, अलीकडची जागा हि लकडोबा मंदिर आणि सोसायटीची आहे. त्यांनी जागा दिली तर दोन दिवसात येथे नालीचे बांधकाम करून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास सोयीचे होईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी