एका तासात पकडले

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील आठवडी बाजारात मोबाईल, पाकीटमार, मंगळसूत्र चोरट्यांनी धुमाकूळ माजविल्याने सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण होते. मात्र पोलिस स्थानकाचा कारभार अनिलसिंह गौतम यांनी सांभाळतच नागरिकांनी निडरपणे वावरण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या काळातील पहिल्या आठवडी बाजात मोबाईल खरेदीच्या बहाण्याने हातचालखी करणाऱ्या चोरट्यास फक्त एका तासात पकडून ५ हजाराची रक्कम हस्तगत करून दुकानदारास परत दिल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. आजच्या घटनेमुळे आगामी काळात शहरातील आठवडी बाजारात होणार्या चोरट्यांच्या उच्छादाला लगाम बसेल अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मागील सहा महिण्यापासून हिमायतनगर येथील बुधवारच्या आठवडी बाजारात ऐड्रोइड मोबाईल, रोख रक्कम आणि महिलांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना भर दिवस घडत होत्या. तसेच बाजारातून येथील तीन नामवंत पत्रकारांसह शेकडो लोकांचे मोबाईल चोरी गेल्यानंतर तक्रारीचा ओघ सुरु झाला. तरीदेखील आठवडी बाजाराच्या गस्तीसाठी नेमण्यात आलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी हे कर्तव्यात कसूर करीत असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढून चोरीच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत होती.

१५ दिवसापूर्वी आठवडी बाजारात तालुक्यातील मौजे जीरोना येथील सौ.सुरेखा प्रभाकर वानखेडे हि महिला भाजीपाला खरेदी करताना एका महिलेने गळ्यातील पोत कापण्याच्या उद्देशाने ब्लेडनेवार करून जखमी केले होते. नागरिकांनी पोत लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र दुसया दिवशी पोलिसांनी पावबंद करून सोडून दिले होते.

त्यानंतर अचानक येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक सोनवणे यांची बदली झाली आणि, त्यांच्या जागेवर कर्तव्यदक्ष सिंघम स्टाईलचा वापर करीत अवैद्य धन्देवाल्यासह दारुडे, चोरट्यांना सुंदरीचा प्रसाद देऊन वठणीवर आणणारे अनिलसिंह गौतम यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या येण्याने बहुतांश अवैद्य धंदे कोणतेही प्रयत्न न करताच बंद झाले आहेत. त्यांची कारकीर्द माहित नसलेल्या चोरट्यांनी दि.१६ रोजी आठवडी बाजारातील गर्दीचा फायदा घेत येथील वर्धमान मोबाईल शोपिवर मोबाईल खरेदीच्या नावाखाली हातचलाखी करून एका २५ वर्षीय युवकाने सोबत एका आठ वर्षीय मुलास घेऊन दुकानदाराच्या खिश्यातून पाच हजाराची रक्कम पळविली. हा परका दुकानदारास ते दुकान सोडल्यानंतर लक्षात आला. त्यांनी तातडीने गौतम यांना दूरध्वनीवरून कल्पना दिली. आणि अवघ्या एका तासाच्या आत सदर चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गौतम यांच्या सुंदरीच्या प्रसादाने चोरट्याने मुलाजवळ दिलेली चोरीची रक्कम पोलिसाच्या स्वाधीन केली. हिमायतनगर शहरात प्रथमच चोरीला गेलेली रक्कम तासाभरात हस्तगत करून दुकानदारास परत केल्या गेल्याने गौतमच्या या कामगिरीने सामान्यांना दिलासा मिळाला असून, त्यांचे सर्व स्तरातील नागरीकातून कौतुक केले जात आहे.

वृत्त लिहीपर्यंत सदर घटने बाबत गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र या चोरट्याने अगोदर कुठे कुठे चोरी केली, याची चौकशी करून अन्य गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री गौतम यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी