कुठे ढगाळ तर कुठे पाऊस

नांदेड(अनिल मादसवार)तीन दिवसाच्या फरकानंतर जिल्हयात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन कुठे पाऊस तर कुठे केवळ ढगाळ वातावरण दिसून आले आहे. सर्वत्र पहिल्यांदा मंगळवारच्या रात्री 8 तारखेला पावसाचे आगमन झाले होते.

यावर्षी मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले, त्यानंतरच्या नक्षत्रात ऐन आषाढी एकादशीपासून पांडुरंगाच्या कृपेने मराठवाड्यात पावसाला दुरुवात झाली. मात्र पुन्हा चार दिवस उघडीप दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला होता. परंतु काल पासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आता पाऊस असाच बरसत राहील अशी अशा शेतकर्यांना लागली आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात ५० टक्याहून अधिक पेरण्य होणे बाकी असल्याचे चित्र उजाड रानोमाळाच्या चित्रावरून दिसून येत आहे. उशीराने का होईना पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे.

रविवारच्या रात्री तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये पुढील प्रमाणे आहे. नांदेड- 16.25, मुखेड-3.67, अर्धापूर-8.67, भोकर-6.5, उमरी-2.00, कंधार-0.83, लोहा-3.50, किनवट-5.14, माहूर-4.25, हदगाव-7.85, देगलूर-11.67, हिमायतनगर-1.67, धर्माबाद-1.0, नायगाव-13.0, बिलोली-17.60, मुखेड-1.71मी मी.पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात रविवारच्या रात्री एकूण 105.31 मि.मी. पाऊस, झाला त्याची सरासरी 6.58 मि.मी. एवढी आहे.

यात सर्वात कमी पाऊस म्हणजे हिमायतनगर तालुक्यात झाला असून, मागील ४ मी.मी.व कालचा १.६७ मी.मी. म्हणजे केवळ ६ मी.मी.अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या वर्षीचा दुष्काळ शेतकर्यांना वेठीस धरणारा ठरला असून, कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

अजूनही पाण्यासाठी महिलांच्या दिंड्या

पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने सध्या तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाई बरोबर चार टंचाई चे सावट दिसून येत आहे. आगामी काळात होणारी पाण्याची चिंता लक्षात घेता महिला, मुले व वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ देवी देवतांना साकडे घालत आहेत. आज दि.१४ सोमवारी तालुक्यातील सवाना जा येथील महिलांची ७ कि.मी.वरून हिमायतनगर शहरात दाखल झालेल्या पाई दिंडीने परमेश्वराला साकडे घालून पाऊस पाणी पडू दे अशी विनवणी केली आहे.

कापूस लागवडीचे दिवस गेल्याने केवळ चार उगवण्याची वेळ

कापूस लागवडीचे नक्षत्र गेल्यामुळे आता कपाशीची लागवड होणे शक्य नाही. तर मुग, उडीद, सोयाबीन, ज्वारी सुद्धा उत्पन्न देऊ शकत नाही. पाऊस झाला नसल्यामुळे कापूस या नगदी पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अनेक पिके कोमेजून गेली. आता काय करावे.. बेन्केचे व साहुकारांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी किमान जनावरांचा चारा तरी निघेल या दृष्टीने ज्वारी पेरणीवर भर देणार असल्याचे काहींनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी