पेरलेल्या बियांना कोंब फुटेना...

कोरडा दुष्काळ जाहीर करा
प्रती हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
तिबार पेरणीने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

हिमायतनगर(अनिल मादसवार)रोज भरून येणारे नभ रुसल्यागत फिरून जात असल्याने तीबार पेरणीचा संकट शेतकऱ्यांवर आलं आहे. भरून आलेले आभाळ रीत होईना..पेरलेल्या बियाला कोंब फुटेना...अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून, शासन काही कोरडा दुष्काळ जाहीर करेना. असे म्हणत आभाळाबरोबर जमिनीतील कोम्बे पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाला कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारची नुकसान भरपाई द्यावी असे साकडे घालण्याची वेळ आली आहे.

जून संपला..जुलै शेवटला आला..मात्र पाऊस काही पडेना..त्यामुळे अल्पशा पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यावर दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. सततची हुलकावणी देणारा पाऊस आणि वाढत्या महागाईने उधारी व व्याजाने बी- बियाणाची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावर निसर्गाच्या अवकुपेने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मात्र तरीदेखील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी चार छावणी व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रभावशाली पाऊल उचलले नाही. एवढेच नव्हे पाऊस पडत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना देखील कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची साधी तसदी सुद्धा घेतली नाही. त्यामुळे निसर्गाप्रमाणे आघाडी शासन सुद्धा शेतकर्याचा अंत पाहतो कि काय..? असा प्रश्न तिबार पेरणीच्या संकटात सापडलेला बळीराजा आभाळातील पळणारी ढगे आणी जमिनीतील न उगवलेली कोम्बे पाहून विचारीत आहे.

आता तरी शासासाने जागे होऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अंध्रप्रदेशाच्या धरती प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांना देखील मोफत वीज पुरवठा करून वीज बिल माफ करावे, चाराछावण्या उभाराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे कोरड्या जमिनीचे सर्वे करून प्रती हेक्टरी ५० हजाराची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. अश्या मागणीचे निवेदन ग्रामीण व शहरी भागातील नुकसानग्रस्त शेतकर्यांनी येथील तहसील प्रशासनाकडे दिले आहे. यावर सटवाजी चवरे, संतोष गाजेवार, पामेश्वर पानपट्टे, हनुसिंग ठाकूर, बाळू वारकड, परमेश्वर इंगळे, मधुकर चव्हाण, साहेबराव देवसरकर, स.हरून स.हबीब, नारायण गायके, रामराव मादसवार, लक्ष्मण ढोणे, रामराव कुपटे, दिगंबर वानखेडे, अनंता तुंबलवाड, आबाराव जोगदंड, दत्ता दंडेवाड, यांच्यासह पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, एकम्बां, सीरंजणी, शेलोडा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, शिबदरा, वडगाव, सरसम, टेंभी, घारापुर, रेणापूर, हिमायतनगर, टेंभी, अन्देगाव आदीसह तालुक्यातील अनेक वाडी तांडे, गावागावातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी