फुलमाळ तांडा येथे छापा टाकून बत्तीस हजाराचा गांजा पकडला -NNL

लोहा तालुक्यातील घटना; उस्माननगर पोलीस स्टेशनची कारवाई


उस्माननगर, माणिक भिसे|
दि.३ सप्टेंबर रोजी २२.१५ वा.सुमारास उस्माननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फुलमाळ तांडा ता.लोहा येथील  आरोपी हा संतोष गंगाराम चव्हाण यांचे मालकीचे घरी राहत असलेल्या घरासमोरील अंगणात अमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड करून अमली पदार्थ गांजाची एकूण मुळीसह दोन हिरवे झाडे वजन सहा किलो( 400 )  चारशे ग्राम किंमत 32 हजार रुपयांचा माल उस्माननगर पोलिस स्टेशने जप्त करून कायदेशीर कारवाई करून आरोपीला न्यायालयात हजर केले आहे.

पोलीस सुत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार ,उस्माननगर पोलीस स्टेशनचे  सपोनि पांडुरंग दिगंबर भारती यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामधन गेमा राठोड   वय ६५  वर्ष राहणार फुलमाळ तांडा तालुका लोहा दिनांक 3 सप्टेंबर रोजी पो.का.२४२ मोरे यांनी सहा.पो.नि.भारती यांना कळले की प्रकाश उत्तम जाधव राहणार फुलमाळ तांडा यांनी डायल एक एक दोन वर कॉल करून रामधन गेमा राठोड राहणार फुल मूळ तांडा यांचे घरासमोर गांजांचे झाड लावले अशी माहिती कळवली.  

तेव्हा पो.का.कडून माहितीची शहानिशा करून त्याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती फोन द्वारे कळविली व वरिष्ठांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली फिर्यादीने मान्य तहसिलदार यांना छापा मारणे बाबत हजर राहण्याचे पत्र दिले.उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार थोरात यांनी राजपात्रित अधिकारी म्हणून माननीय पोलीस निरीक्षक पडवळ कंधार यांना पाठविले.शासकीय दोन पंच बोलाविले . खाजगी तराजू ,काटे वाल्यास बोलावले ,फोटोग्राफर यांना बोलविले लाख मोहोर सिल करणारे लेखनिक हवालदार यांच्यासह फिर्यादीस पोलीस निरीक्षक पडवळ , पीएसआय पल्लेवाड, पो.हे.का.२११९ ,२२२७,पो.ना.५६६,५८२,पो.का.४०९,३३०,चालक पो.ना.२८०६ ,चालक ASl खालेत या सर्वांना रेड बाबत सूचना देऊन छापा घालण्यासाठी दोन सरकारी जीपने रवाना होऊन घरासमोर अंगणात 22 पंधरा वाजता छापा टाकला असता आरोपीने घराचे अंगणात गांजाचे झाडे दिसून आले.

सदर घरातून एक व्यक्ती बाहेर आली त्याचे नाव काय ना विचारता राम गेमा राठोड वय 65 वर्ष राहणार फुलमाळ तांडा असे सांगितले. फिर्यादी शासकीय पंच पोलीस निरीक्षक व स्टाफसह अंगणातील झाडांची पाहणी केली असता गांजाचे लहान-मोठे दोन झाडे दिसून आली. आपली पदार्थ गांजाची लहान-मोठी हिरव्या रंगाची ओलसर उग्र वास येत असलेली एकूण दोन झाडे मुळीसह हिरवे पाने असलेले होलसेल अमली पदार्थ गांजा प्रत्येकी झाडाची वजन पहिल्या झाडाची वजन सहा किलो साठ ग्राम तर दुसऱ्या झाडाचे वजन ३४० ग्राम असे एकूण सहा किलो 400 ग्राम किंमत प्रति किलो पाच हजार रुपये प्रमाणे   एकूण किंमत 32 हजार रुपयांचा ( ऐवज) गांजा  मिळून आला. उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि पांडुरंग भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून हस्तगत करून आरोपीसह ताब्यात घेतले.

नमूद आरोपीने त्याचे घर मालक संतोष चव्हाण यांचे मालकीचे घरी राहात असलेल्या घरासमोरील अंगणात विनापरवाना बेकायदेशीर रित्या भदवि कायद्यानुसारच्या तरतुदीच्या भंग करून आम्हाला पदार्थ गांजाचे झाडाची लागवड करून स्वतःचे फायदे व चरकी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाचे झाडाची लागवड केलेली मिळून आली आहे. वगैरे फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून उस्माननगर पोलीस स्टेशन सपोनि  भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लेवाड हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी